एकटेपणा

पूर्वी खेड्यात राहणाऱ्या लोकांना एकटेपणा कधी जाणवत नसायचा. लहान मोठे सर्व आपापल्या मित्रांसोबत गप्पा गोष्टी किंवा खेळा मधे रमलेली असत.

पण आता परिस्थिती बदलेली आहे. मुळात खेडी अक्षरशः ओस पडली आहेत. सर्व नौकरी धंदा मिळण्यासाठी शहराकडे धाव घेत आहेत. त्यामुळे उरलेल्यांना एकटेपणाची जाणिव होते. इकडे शहरात गर्दी खूप वाढली आहे. पण तरीही प्रत्येक जण एकटाच आहे.

इमारतींच्या जंगलात माणस आहेत पण माणूसकी नाही. कोणी कोणाशी बोलत नाही. खेळत नाही. सर्व आपल्या मोबाईल किंवा टि.व्हि. च्या विश्वात मग्न असतात. अहो, ह्या मोबाईल नावाच्या ईडियट ने व त्यातील व्हाट्सएपने स्री- पुरुष, मुल-मुली सर्व कसे वेडे झाले आहेत. घराघरात मानसं असतात पण एक दुसर्यासोबत बोलायला कोणालाही वेळ नाही. ‘डायनिंग टेबलवर जेवणासाठी बसलेले नवरा बायको भाजी वाढ म्हणून व्हाट्सएपवर मेसेज पाठवून सांगतात’ असा विनोद व्हाट्सएपवरच फिरत असतो. ही परिस्थिती आहे सध्या. घरातल्या घरात गुड मॉर्निंग गुड ईव्हनिंग हे तोंडाने न बोलता व्हाट्सएपच्या माध्यमातून होते. आहे की नाही गंमत. एकटेपणा असून नसल्यासारखा आहे हा. व्हाट्सएपचे वेगवेगळे ग्रुप तयार झालेले आहेत बघा. जसे, बालवाडीतील वर्ग मित्रांचा ग्रुप, शाळेतील मित्रांचा ग्रुप, कॉलेज मधील मित्रांचा ग्रुप, कॉलेज मधील एका बेचचा ग्रुप, एका कुटुंबातील सदस्यांचा ग्रुप, समाज बांधवांचा ग्रुप, नोकरीनिमित्त एकत्रित प्रवास करणाऱ्यांचा ग्रुप त्यात ही रिक्षाने, बसने वा रेल्वेने एकत्रित प्रवास करणारे वेगळे. इ.इ. असे ग्रुप तयार झालेले आहेत. असे ग्रुपीजम होणे म्हणजे समाजाचे विभाजन होणे आहे का? हा मोठा प्रश्न आहे. या २१ व्या शतकात मानसांनी एकत्र राहणे आवश्यक आहे कि असे वाटून घेणे योग्य आहे हा गहन चिंतनाचा विषय आहे मित्रांनो.

अहो, मुलांना खेळायला ही वेळ मिळत नाही. इतकेच काय शाळेमधे ही असे ग्रुपीजम झाले आहे. वर्ग सरांनी विद्यार्थ्यांचा तयार केलेला ग्रुप, वर्ग मित्रांचा ग्रुप, वर्ग मैत्रिणींचा ग्रुप, इ.इ.

आणि विशेष म्हणजे इतके सर्व असून ही मानूस हा एकटाच आहे. त्याला सतत एकटेपणाची जाणिव होत असते.

काय वाटते? काय कारण असेल या एकटेपणाचे??

विचार करा.

——–

——–

-.-.-.-.-.

अहो, काय झाले आहे कि आपला मेंदू छोटासा. हजारो लोकं, त्यात हजारो ग्रुप. इतक्या लोकांबद्दल विचार करणे, प्रत्येकाशी संवाद साधने कसे शक्य आहे. मग चला कमीतकमी व्हाट्सएपवरच बोलू या असे होते. त्यात ही इतका वेळ जातो कि खाजगी काम राहून जातात. म्हणून मनुष्य अबोल झाला आहे.

Advertisements

स्वप्न…

अचानक खडबडून जाग आली तर समोर सौ. उभ्या. माझ्या घाबरलेल्या वदनाकडे बघून त्यांनी त्यांच्या वदनाने विचारणा केली “अहो काय झाले एकदम असे घाबरायला?”

“काही नाही. कुठे काय? ” मी.

“अहो, तुमचा चेहरा सांगतो आहे कि सर्व. तुम्ही स्वप्नात भितीदायक काही तरी बघितले ते. आता सांगून टाका काय बघितले ते.”

मी बिचारा आता खरोखरच घाबरलो. “अहो काय झाले कि मी स्वप्नात निवांत झोपलो होतो. तेव्हा मला स्वप्नात एक हत्तीच पिल्लू दिसले.” माझे बोल ऐकून आता ती आश्चर्यचकीत होऊन मोठे डोळे करून व कान उघडे करून मला ऐकायला लागली.

” ते पिल्लू सतत माझ्या समोर येऊन त्याची सोंड तोंडापुढे नाचवत होते. सुरुवातीला मी दुर्लक्ष केले. मला भास होतो आहे असे मला वाटले. कारण आपल्या घरात हत्तीचे पिल्लू कसे येणार? पण असे परत परत होत असल्याने मी डोळे वटारून पाहिले. लगेचच हात लावून पाहिले तर ते खरोखर हत्तीचे पिल्लू होते.

आता मात्र मी दचकलो. मी विचार करू लागलो कि हे पिल्लू मला का बर त्रास देत असेल? तितक्यात माझ्या कानावर शब्द येऊन आदळले काय मित्रा कसं वाटतयं नाकाने जेवण करतांना? मजा येतेय न!

मला आश्चर्य झाले.

पिल्लू: अरे मी तर फक्त पाणी पितो माझ्या सोंडेने. तुला सर्व काही तुझ्या ह्या सोंडेनेच करावे लागत आहे. आहे कि नाही ही शिक्षा तुला?

“हो न मित्रा, अरे सर्व काही ह्या नळीने घ्यावे लागतेय. कसला स्वादच कळत नाही.”मी

तो मोठ्या ने हसून माझ्या समोर पुन्हा एकदा सोंड नाचवून निघून गेला. आणि मी घाबरून डोळे उघडळे. मी आरशात पाहिले तर तसे काही नव्हते. म्हणजे माझ्या नाकाला सोंड नव्हती. मी निश्चिंत झालो. अचानक मोबाईलची घंटा वाजली आणि तशाच घाबरलेल्या अवस्थेत जागा झालो आणि समोर पाहतो तर तुम्ही उभ्या!”

“चला आज तुम्हाला दवाखान्यात जायचे आहे न! तयारी करा. मी जेवण वाढते. पोटभर जेवण करा आणि जाऊन या. ” सौ.

मला लक्षात आले आज बोलावले होते डॉक्टर साहेबांनी. मी देवाला विनवण्या करायला लागलो. देवा आता पुन्हा नको……

निखळ मैत्री

आज जागतिक मैत्री दिवस साजरा केला जातो आहे मित्रांनो. गंमत आहे न. आपण एक दुसर्याला काय मित्रा? कसा आहेस? म्हणायचे आणि मैत्री दिवस ही साजरा करायचा.

अमेरिकेने 1935 पासून दरवर्षी ऑगष्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा करायला सुरुवात केली. आणि आता जग भरात हा दिवस साजरा केला जातो.

माझ्या मते जेव्हा खरे नाते, खरे प्रेम हे कमी व्हायला लागते न तेव्हा आपल्याला त्याची आठवण करून द्यावी लागते. हल्ली तसेच झाले आहे. खरे प्रेम दुर्मिळ झाले असल्याने वर्षातून एकदा तरी आपण ते नातं जगू या म्हणून त्या नात्याच्या नावाचा तो दिवस साजरा केला जात असावा असा माझा तरी समज आहे. खर कारण वेगळ असू शकत.

मदर्स डे, फॉदर्स डे, फ्रेंडशिप डे, डॉटर्स डे, इ.इ. जवळजवळ दररोज कुठलातरी दिवस जागतिक स्तरावर साजरा होत असतो. पूर्वी अस काही नव्हते हो. आई शिवाय घरातल पान हलत नव्हते म्हणजे रोजच मदर्स डे असायचा की राव.

असो. आज मैत्री दिवसाच्या निमित्ताने विविध संदेश प्राप्त झाले त्यातील एक मनभावन वाटला. मनाला बालपनात ओढून घेऊन गेला. म्हणून हा प्रपंच. तुम्ही ही पहा आणि एक फेरफटका मारून टाका आपल्या बालपणाच्या विश्वात.

संततधार…

यंदा पाऊस खूप सुरू आहे. मला लहानपणी पाहिलेली पाऊसाची संततधार आठवली. एकदा पाऊस सुरू झाला कि १५-१५ दिवस थांबायचा नाही. लोकं कंटाळून जायची. दैनंदिन कामं ही करता येत नव्हती. त्याकाळी नौकर्या अशा नसायच्या. हातावर कामं असायची. आपापले व्यवसाय करून लोकांनी पोट भरायचे असे होते तेव्हा. मात्र अशी पावसाची झडी सुरू झाली की ही कामं बंद पडायची. त्यामुळे बिचारी उपाशी रहायची वेळ यायची लोकांवर. काम केले तर पैसे मिळणार.

मग सर्व लोकं देवाला साकडे घालायचे पाऊस बंद होणेसाठी.

यंदा अशीच संततधार सुरू आहे. फण आता परिस्थिती खूप बदललेली आहे. घरोघरी वाहनं आहेत. दळणवळणाची अनेक साधनं उपलब्ध आहेत. मात्र रस्ते पाण्यात गेले की दळणवळण थांबते.

मला मात्र एक प्रश्न पडतो. प्रश्न तसा बालिश आहे. प्लिज हसु नका बर. नाही तर मी विचारत नाही. बर बर हसणार नाही का. मग विचारतो.

“पाऊस कसा पडतो? समुद्राच्या पाण्याची वाफ होते. ती आकाशात जाते. ढगं तयार होऊन हवेने वाहतात. थंड झाली कि पाऊस कोसळतो. कारण गुरूत्वीय आकर्षणाने वजनदार पाणी अवकाशात राहु शकत नाही. पण जमा झालेले पाणी एकदमच कोसळणार न. संततधारेच्या वेळी सतत पाऊस कसा येतो ढगांमध्ये. बर अशा वेळी ढगं वाहत येतांना ही दिसून येत नाहीत. मग असे कसे घडत असते?”

ह्या बालिश प्रश्नाचे कोणी उत्तर देईल का? असेल उत्तर तर प्रतिक्रिया स्वरूपात द्या.

खाजगी जंगल

मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल न कि येथे जंगल संपत चाललयं आणि खाजगी जंगल कस असेल?

विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ पहा. व्हाट्सएपवर आलेला आहे. हिस्ट्री चैनलवरचा वाटतोय.

एक भारतीय सदग्रुहस्थ आहेत. त्यांची पत्नी विदेशी आहे. 30 वर्षापूर्वी ते भारतात आले तेव्हा त्यांनी पाहिले येथील जंगल तर संपत चाललयं. तेव्हा त्यांनी निर्णय घेतला आणि अमेरिकेतील सर्व विकून दक्षिण भारतात 30 एकर जागा घेऊन राहायला लागले. त्या जागेत त्यांनी स्वतःच म्हणजे खाजगी जंगल उभारले आहे. आज हे जंगल 300 एकर जागेत पसरले आहे. पहा हा व्हिडीओ.

मोबाईल क्रांती..

आज वर्तमान पत्रात एक बातमी वाचली. आपल्या देशात पहिला मोबाईल फोन कॉल ३१ जुलै १९९५ रोजी करण्यात आला होता. या घटनेला २४ वर्षे पूर्ण झाली. या काळात मोबाईल ची किती उत्क्रांती झाली असावी याची कल्पना ही करवत नाही. मे २०१९ मधील आपल्या देशातील मोबाईल ग्राहक संख्या तब्बल १अब्ज १६ कोटी १८ लक्ष ५९ हजार ६२१ इतकी प्रचंड आहे. त्यानंतर दोन महिने उलटले असून या संख्येत आणखी भर पडली असेल. १३० कोटी जनसंखेत ११६ कोटी पेक्षा जास्त लोकांकडे मोबाईल असणे हे मला वाटतं देश सम्रुद्ध झाल्याचे द्योतक आहे.

त्या बातमीमधे असे ही आहे कि आपल्या देशाच्या जीडीपी मधील ६.५ % वाटा एकट्या मोबाईलचा आहे. ग्राहक संख्येने भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. तसेच देशातील ३.२ कोटी नौकर्या फक्त मोबाईल क्षेत्रात आहेत. आहे न कमाल.

जागतिक स्तरावरील कंपन्या यामुळे च भारताकडे आकर्षित होतात. भारत ही फार मोठी बाजारपेठ आहे.

पण का प्रत्येकाला मोबाईल लागतो माहित नाही. फोन मुळात महत्त्वाचे काम करण्यासाठी असायला हवा. पण एवढी मोठी बाजारपेठ असल्याने व ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेटवर्क कंपन्या प्रलोभने देत आहेत. अहो सुमारे तीन वर्षापूर्वी २५० एमबी रोजचा डेटा घेण्यासाठी मला वाटते रू.५/- लागायचे. आज दिवसाला १.५ GB रू.५/- पेक्षाही कमी मधे मिळतो. त्यामुळे महिन्याचे पेकेज घेतले की काळजी नसते.

याला म्हणतात क्रांती.

कांदे बटाटे

आपल लहानपन मला आठवतय राव. किती आनंदी होत. खायला व्यवस्थित नव्हत,कपडे व्यवस्थित मिळत नव्हते पण सुखी ओथंबून वाहत होतं. कोणीही हेवा करावा असच. आज सर्व काही आहे. पण जीवनातील आनंद कोणी हेरावून घेतला आहे कोणास ठाऊक? असो.

जर आईने काही समजावून सांगितले आणि लक्षात आले नाही कि आई म्हणत असे तुझ्या डोक्यात काय कांदे बटाटे भरले आहेत की काय? सांगायच तात्पर्य असा कि उपरोधिक शब्द प्रयोग म्हणून या शब्दांचा उल्लेख जीवनात केला जातो. जीवनात हे दोन्ही पदार्थ क्षुल्लक समजली जातात.

पण खरोखर अस असत का? तर उत्तर आहे “नाही ” प्रत्येक गोष्टीच जीवनात सारखच महत्त्व असत. आपण त्याला कमी जास्त लेखत असतो.

आता हेच पहा न कि रोज सकाळी उठल्यावर स्त्री प्रथम किचनमध्ये जाते व कांदा शोधते. कांदे पोहे करण्यासाठी. सकाळी नाश्ता बनविण्यापासून सुरुवात होते ते रात्री झोपेपर्यंत कांदे उपयोगात येतात. स्वयंपाक करतांना प्रत्येक भाजीत कांदा वापरतात. नाही वापरला तरी बाहेरून जेवणासोबत तोंडी लावायला तरी वापरतोच. कांद्याचे। हेच वैशिष्ट्य आहे किती ही नावडता असला तरी तो आवडतोच.

भाजीत वापर व तोंडी लावणे झाले आता प्रसिद्ध कांदेभजे कांद्यांशिवाय कसे बनतील? उन्हाळ्यातील कांद्याचा कळकळा माहित आहे का? आमच्या खांदेशातील एक प्रसिद्ध रेशिपी. आंब्याचा रस आणि तोंडी लावायला कांद्दाचा कळकळा. ही म्हणजे कांद्दाची भाजीच असते.

पावसाळ्यात गरमागरम भजी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. बाहेर पाऊस पडतो आहे आणि समोर प्लेट मधे गरमागरम भजी ठेवलेली त्यातून एक एक गरम भजी उचलून खायचा आनंद. अचानक तोंडून शब्द बाहेर पडतात “वाह क्या बात है? ”

या कांदापुराणाच्या नादात बटाटा ज्याला नेहमीच विसरायला होते तो पुन्हा विसरलात आपण.

हा ही कांद्दाचाच भाऊ. एकदम तुच्छ असा पदार्थ. पण याच्या शिवाय आपल क्षणभर ही गाड पुढे जात नाही. स्वयंपाक घरातील प्रत्येक भाजीत याचा वापर केला जातो. याचा उपयोग केला नाही तर भाजीला चव येत नाही. लहान मुलांना खूप आवडणारा हा पदार्थ.

याशिवाय बटाट्याच्या भाजीचे पराठे तर काय सांगावे. नुसते नाव जरी काढले राव तरी तोंडाला इतके पाणी सुटते कि पराठे खाल्ल्यावरच थांबते. आणि पोट भरले तरी खायचे थांबवत नाही.

त्यानंतर बटाटा भजी. यांचे चहेते ही फार असतात. जसी कांदा भजी तशी बटाटा भजी. बटाटा वेफर्स सारखा कापून त्यापासून बेसन पीठ वापरून ही भजी बनवतात. फार स्वादिष्ट लागतात. बटाटा वेफर्स तर प्रसिद्ध आहेत. प्रत्येक ग्रुहिणी उन्हाळ्यात वेफर्स बनवून साठवून ठेवते.