मेडिकल क्षेत्र….

पूर्वी इंजिनिअरिंगच्या ४-५ शाखा होत्या. तेव्हा माझ्या कॉलेज मधे मला आठवते ईलेक्ट्रिकल, मेकेनिकल, सिव्हिल आणि ईलेक्र्टॉनिक्स ह्याच शाखा होत्या. मी एडमिशन घेतले होते १९७७ मधे. आता तर खूप वाढल्या आहेत. कित्येक शाखांचे नाव सुद्धा माहिती नाही आम्हाला.

तसेच पूर्वी डॉक्टर म्हणजे लिमिटेड क्षेत्र वाटायचं. पण हळूहळू या क्षेत्रात ही खूप बदल झाला आहे. शरीरातील प्रत्येक अवयवासाठी वेगवेगळे एक्सपर्ट दिसतात. इतकेच काय वेगवेगळ्या सेवा पुरविण्यासाठी एक्सपर्ट वेगळे असतात. नुकताच एका नातेवाईकासोबत दवाखान्यात गेलो होतो. त्यांना सांधेदुखी चा त्रास सुरू झाला आहे. सांधेदुखी चे एक्सपर्ट म्हणजे कोण याचा नेटवर शोध घेतला तर रिमेटोलॉजी (rheumatology) क्लिनिक व एक्सपर्टला rheunatologist असे संबोधतात असे आढळले. हे माझ्या साठी एकदम नवीन क्षेत्र होते. फोनवर अपॉइंटमेंट घेतली. क्लिनिक वर गेलो ही पण खात्री होत नव्हती. शेवटी विचारले कि हे सांधेदुखी चे तज्ञ आहेत न? त्यांनी हो म्हटल्यावर मनाला शांती मिळाली. नाही तर उगाच ६००/- रु। फी भरावी लागली असती. आणि ते नातेवाईक सुद्धा नाराज झाले असे.

आम्ही जेथे गेलो होतो तो मोठा दवाखाना होता. तेथे वेगवेगळे क्लिनिक होते. कधी ऐकली नव्हती त्यांची नावे. तुम्ही ही आश्चर्यचकित व्हाल. एक होते travel clinic. मला काही समजले नाही. हे काय असते. मी त्यावर विचार करायला सुरुवात केली. मला तेथे एक वॉकर घेतलेली व्यक्ती आंत जातांना दिसली. मला वाटले कदाचित ज्यांना अपघातामुळे चालायला त्रास होतो त्यांना मार्गदर्शन केले जात असावे. पण मन ऐकत नव्हते. ही सवय लहानपणापासून जडली आहे. जोपर्यंत मनाचे समाधान होत नाही तोपर्यंत पिच्छा पुरवायचा आणि माहिती गोळा करायची. शेवटी मी बाहेर बसलेल्या असिस्टंट कडे मोर्चा वळवला. त्यांना विचारले मेडम हे ट्रेव्हल क्लिनिक काय असते? त्यांनी सांगितले ज्यांना विदेशी जायचे असते त्यांचेसाठी आहे ते. बस यापुढे विचारून स्वतः चे जास्त हसे करून घ्यावे असे मला वाटले नाही व मी येऊन आपल्या जागी बसलो. मला वाटते आजारी व्यक्ती विदेशात जात असेल तर त्याला तेथे काय करावे, कोणते औषध घ्यावे, अचानक काही त्रास झाला तर नेमके काय करावे? अशा प्रकारच्या सल्ल्यासाठी हे क्लिनिक असावे.

बरोबर आहे. विदेशात ही औषधे मिळत असतीलच असे नाही. आणि जापान, रुस अशा वेगळी भाषा असलेल्या देशात गेल्यावर काय करणार? काही झाले तर तेथील डॉक्टर ला काय सांगणार? मी लगेच फ्लॅशबेक मधे गेलो. १९९८ मधे मला या समस्येला सामोरे जावे लागले होते. माझी प्रक्रुति बरी नव्हती. मला संपूर्ण अंगाला मुंग्या यायच्या. डोक्यातून पाठीमागून निघायच्या आणि खालपर्यंत जायच्या. मला खूप अस्वस्थ व्हायचे. बरेच डॉक्टर झाले. कोणालाही कळेना नेमके काय झाले आहे ते. एक दिवस मी गळ्यात टांगायची बेग घेतली. त्यात डबा पुस्तकं इ. साहित्य ठेवले. व ती माझ्या खांद्यावर लटकवली. तेव्हा मला मुंग्या कमी झाल्यासारखे वाटले. परत परत लक्ष दिले. मग हेच कारण आहे असे जाणवले. रात्री घरी गेल्यावर गळ्याला टर्किश टॉवेल गुंडाळून ताट मान करून बसलो. खूप बरे वाटले. मग सुटीच्या दिवशी होमिओपॅथी डॉक्टर कडे गेलो. ओळखीचे होते. त्यांना हे सांगितले. तेव्हा स्पांडेलायटिसचा त्रास असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर औषध दिले व काही दिवसांनी बरा झालो. जवळजवळ ५-६वर्षे मी तो त्रास सहन करत होतो. आजार बरा होत नसल्याने आत्मविश्वास कमी होत चालला होता. असो.

पुन्हा पूर्वपदावर येऊ. तर Travel clinic चा उलगडा झाला होता. नंतर शोधल्यावर infectious disease clinic, respiratory medicine, असे बरेच क्लिनिक असतात असे समजले.

आणखी एका Ergonomic clinic ची माहिती मिळाली. याचा अर्थ शोधला तर उलगडा असा झाला. Ergonomic चा अर्थ designed for efficiency and comfort in the working environment असा दिसून आला. म्हणजे तुम्ही जेथे काम करत आहात तेथील वातावरण कसे आहे. तुमची क्षमता कशी वाढवता येईल. फर्निचर कसे डिजाईन केले असावे. याचे मार्गदर्शन हे डॉक्टर देतात. कमाल आहे न!

असे असंख्य प्रकार या मेडिकल क्षेत्रात आहेत. आपल्याला माहिती नसतात. किंबहुना आपण करून घेत नाहीत. किंवा जेव्हा गरज पडेल तेव्हा बघू. ही प्रवृत्ती असते व नडते ही.

माणसाने चौफेर लक्ष ठेऊनच जगले पाहिजे. कौन जाने कब कौन बनेगा करोडपती से बुलावा आ जाये!😊😊

(19620)

http://www.koshtirn.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

🌷शुभ प्रभात🌷🕉नमः शिवाय।🕉

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

राग…(19611)

हो रागच. नाही नाही. हा तो गाण्यांचा राग नाही बर का!☺️.मानवाला किंवा कुठल्याही सजीवाला येतो तो राग. आपल्या मनासारखे झाले नाही तर आपला राग अनावर होतो. पण हा राग माणसागणिक बदलतो. काही तर अगदी साध्या गोष्टी साठीही इतके संतापतात कि त्यांना आवरणे शक्य होत नाही. जेव्हा पासून मोबाईल त्यातील केमेरा हातात आला आहे तेव्हा पासून अशाप्रकारचे काही कोठे घडले तर आजूबाजूच्या लोकांपैकी कोणीतरी मोबाईल वर व्हिडीओ काढून घेतो आणि वायरल करतो. टिव्हीवर प्रत्येक न्यूज चेनलवर वायरल व्हिडीओ साठी स्वतंत्र स्लॉट ठेवले जातात. तेव्हा अशा जगजाहीर राग व्यक्त करणार्या लोकांना जग प्रसिद्धी मिळते.

मानसाला जेव्हा राग येतो न तेव्हा कोणत्याही प्रकारे तो राग व्यक्त करणे आवश्यक असते. नाही तर शारीरिक व मानसिक त्रास होतो. राग बाहेर काढण्यासाठी हातातील वस्तू आपटणे, लांब भिरकावणे, फेकून मारणे असे उद्योग माणूस करतो. आपण वर्तमानपत्र वाचतो. काही महाभाग तर रागाच्या भरात लहान मुलांना आपटतात. त्यात बिचार्या त्या तान्हुल्या जिवाचा नाहक जीव जातो. मध्यंतरी व्हाट्सएपवर एका आईचा व्हिडीओ वायरल झाल्याचे आठवते. लहान बाळाला आपटून आपटून मारत होती. अरे काय हा राग. मला वाटते जेव्हा राग येतो न तेव्हा तो मनुष्य शुद्धी वर राहत नाही.

यावर मनन, चिंतन, दीर्घश्वसन हे उपाय आहेत.

💐💐💐💐💐

💐शुभप्रभात💐

मनुष्याजवळची नम्रता संपली की, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे💐

http://www.manachyakavita.wordpress.com

पुरे आता…(19606)

तो आता दिवाळीचे फराळ खाऊनच जाणार. किंवा फटाके फोडून जाणार. आणखी काय काय? अरे बहिणीने ओवाळून सुद्धा झालं न आता. फराळ ही संपला आणि दिवाळी ही संपली. पण तो अजून चिपकून बसला आहे.

काय? कोण तो? असे विचारताय का? ओळखा तुम्हीच! नाही ओळखत! असू दे ! आता तुम्हाला वेळ कुठे आहे रिकामी कामे करायला! आम्ही आपले रिकामटेकडे. काही तरी उद्योग करत असतो.

चला मीच सांगतो. अहो!😊दिवाळी झाली, भाऊबीज झाली, फराळ ही संपला पण तो काही केल्या जायला तयार नाही.

काल संध्याकाळी मी चक्क पावसात भिजलो. जोरदार पाऊस अचानक सुरू झाला. रस्ता ओलांडत होतो. अर्धा पार केला आणि पाऊस सुरु. ट्राफिक तर विचारू नका. रस्त्यावर उभ्या उभ्या भिजलो हो. 😢. काल रात्रभर पाऊस होता.

आली दिवाळी..(19588)

मित्रांनो,हल्ली दिवाळी आली कधी व गेली कधी काही कळतच नाही. जाणीव होते ती फक्त लक्ष्मी पूजनाच्या दिवसी थोडे फार फटाके फुटल्याने.

एकेकाळी घरात इडली करायची म्हटलं तरी उत्सव आहे असा भास व्हायचा. आणि आता आठ दिवसांवर दिवाळी आली आहे तरी ही कोणाचीच लगबग नाही कि धावपळ नाही.

पूर्वी साधी इडली करण्यासाठी घरातील बायकांची किती धावपळ असायची! आणि घरातील लहान मुलांची तर विचारूच नका. फक्त घरात इडली बनवणार आहेत हे कानावर जरी पडले तरी ही बातमी बाहेर वार्यासारखी पसरायची. रविवार येण्याची सर्व आतुरतेने वाट बघायचे. आणि घरातील बायकांची लगबग तर बघुच नका. आदल्या दिवशी तांदूळ-डाळ धुवून,भिजत घालून वाटायची, पीठ आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं. मग सांबार आणि चटणीसाठी तयारी करायची. रविवारी घरातील सर्व पहिल्यांदा लहान मग मोठी व शेवटी बायका एकत्र खाणार. त्या दिवशी तेच जेवण असायचे. तरी ही कंटाळा येत नसायचा. कारण एकच महिन्यात एकदाच इडली व्हायची.

आता हे सगळं अाठवणींपुरतं शिल्लक राहिले आहे. आता तर इडलीचे तयार पीठ आणि तयार चटणीही गल्लोगल्ली विकत मिळते. नुसत्या इडल्या केल्या की काम झालं. तेवढे कष्ट नको असतील तर हाॅटेल्स आहेतच. आणि हो, तेवढेही कष्ट नको असतील तर स्विगी, झोमॅटो, उबर वगैरे ऑनलाइनवालेआहेतच सेवेला…!😊 पण आजही. जी जून्या पिढीला घरचेच आवडते.

असो, तर आपला विषय दिवाळी फराळाचा होता. पूर्वी दिवाळी जवळ आली की घरात फराळाच्या पदार्थांची तयारी सुरू व्हायची. काय व्याप असायचा तो..! पण घरातल्या बायकांना खूप आनंद वाटायचा. एक दुसर्याच्या मदतीला जाणे, फराळ करणे. कसे घरगुती संबंध असायचे. आता ते संपल्यात जमा आहे. आॅर्डर देऊन पदार्थ विकत आणायचे आणि खायचे. कैरीचं पन्हंसुद्धा तयार करण्याचे कष्ट आता कुणी घेत नाहीत, त्याचाही पल्प दुकानात तयार मिळतो. साखरसुद्धा मिसळायची गरज नाही. नुसतं पाण्यात टाकून ढवळलं की झालं. ते काहीही असो. पण जेव्हा पासून हे रेडिमेड पदार्थ मिळायला लागले न तेव्हा पासून सणांची मजाच नाहीशी झाली. शेजार्यापाजार्याशी जवळीक राहिली नाही. नातेवाईकांशी जवळीक नाही. पैसा फेको और…..असो.

बायकांनी पूर्वी ढोकळा, अळूवड्या, कोथिंबीर वड्या करायच्या म्हणजे पुष्कळ घाट असायचा. आता हे घरी करण्याचे पदार्थ राहिलेले नाहीत. अहो, भेळेसाठी लागणारी चिंच-गुळाची चटणीसुद्धा तयार मिळते, पाणीपुरीचं पाणी सुद्धा तयार मिळतं.

मुगाची खिचडी सुद्धा तयार मिळते. आपण फक्त त्यात मापानं पाणी घालून कुकर लावायचा की झालं.

पूर्वी चिवडा, चकली, करंज्या, शंकरपाळ्या, अनारसे, इ.पदार्थ दिवाळीतच खायला मिळायचे. आणि त्यामुळे खाण्यात मजा यायची. आता तर ती वर्षभर मिळतात. आंब्याचा रस वर्षभर मिळतो, आंबापोळी-फणसपोळी वर्षभर मिळते, गव्हाचा चिकसुद्धा वर्षभर मिळतो. पूर्वी केवळ दिवाळीतच हौसेनं होणारी कपड्यांची खरेदी आता वर्षभरात कधीही होते किंवा वर्षभर सुरूच असते. एकूण काय तर, कोणत्याही गोष्टीसाठी आता वाट पहावी लागत नाही. येथेच तर गोम आहे. सर्वी मजाच गेली राव. इंतजार में जो मजा होता है वोही खत्म हो गया.

सगळं झटपट आणि तयार मिळतं, कधीही-केव्हाही-कुठंही…! यामुळे झालं काय कि आयुष्यातलं अप्रूप पार संपूनच गेलं.. त्या अप्रूपातला आनंद आणि अनामिक हुरहूरही आटून गेली. आठवणींची धरणं ही अप्रूपाच्या दुष्काळामुळं कोरडी पडलीत न राव.

आता तर आयुष्यातलं अप्रूप संपवून टाकण्याची इतकी घाई झाली आहे लोकांना की काही सांगायलाच नको. अहो लग्नाआधीच प्री-वेडींग शूट केल जातय. आयुष्याच्या होणार्या जोडीदाराबरोबर तो/ती कसा असेल/ कशी असेल ही उत्कंठा असायची, आयुष्यातील ती पहिली जवळीक व त्या बद्दलची आतुरता आता राहिली नसल्याने आनंद संपला आहे. या गोष्टी मुळे आयुष्य कृत्रिम, बेचव, नीरस, कंटाळवाणं वाटायला लागल आहे. आणि लवकरच बोअर व्हायला लागतं ते ह्याच गोष्टींमुळे. पुढे जाऊन हे तर मानसिक अस्वस्थतेचं मूळ कारण ठरते.

पूर्वी घराघरात निरांजनाच्या फुलवाती बनवल्या जात होत्या. आता तर त्या नुसत्या मिळत नाहीत तर थेट तुपात भिजवलेल्याच मिळतात. दसरा, दिवाळीची फुलांची तोरणं आता तयारच मिळतात. संक्रांतीचे हलव्याचे दागिने तयारच मिळतात.

लग्नातलं रूखवत सुद्धा तयारच मिळतं. आता तर ते भाड्यानंसुद्धा मिळतं. नऊवारी साडी किंवा सोवळं शिवून तयारच मिळतं. साड्या नेसवणारी व तयारी करणारी माणसंसुद्धा मिळतात आणि ती बक्कळ पैसे ही घेतात.

इतकच काय सत्यनारायण पूजेचं किंवा गणपतीच्या पूजेचं साहित्य रेडीमेड खोक्यात मिळतं.

“भूक लागली भूक लागली म्हणून कावकाव करू नकोस. दहा मिनिटं बस एका जागी. थालिपीठं लावतेय..” असं आता कोणती आई म्हणते? हे तर आयांनी सोडूनच दिल आहे. कारण काय? तर “वेळच नसतो..”नौकरी करणाऱ्या आयांच ठिक आहे. पण घरी असणार्या आयाही विसरल्या.
आठ-आठ दिवस एखाद्या गोष्टीची तयारी करणं, त्यासाठी आवर्जून वेळ देणं, ती गोष्ट पूर्ण होईपर्यंत वाट पाहणं ही जगण्याची पद्धतच आता अडगळीत गेली आहे.

जीवनात आता राम राहिला नाही. क्रेझच राहिले नाही काही. अहो क्षणात सर्व उपलब्ध होते आता. मग त्यासाठी कष्ट कोण करणार! आणि जेव्हा कष्ट केले जात नाही तेव्हा त्यात जी मजा येते ती कशी येणार.

ता.क. ः-राग आणि वादळ, दोन्ही सारखेच शांत झाल्यावरच समजते,
किती नुकसान झाले ते! 🌹

हुशार हंस….(19585)

मित्रांनो, आपण टिव्हीवर बातम्यांमधे सतत बघत असतो जगातील कुठल्या न कुठल्या शहरात अतिवृष्टी मुळे पाणी साठले आहे. महापुर आला आहे. गाड्या वाहून जात आहेत. घर कोसळत आहेत आणि इतकी लोकं मेली. प्रगत देशांमध्ये सुद्धा हे घडत आहे. याच मुख्य कारण प्लास्टिकचा अति वापर……पुढे खालील लिंक वर वाचा😊

https://koshtirn.wordpress.com/2019/10/17/325/

काळानुरुप बदल…..(91019580)

जी माणसे पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात, आणि जी माणसे डोक्याने चालतात ती निश्चितच ध्येय गाठतात…
शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळतं तो माणूस जीवनात निश्चितच यशस्वी होतो…
यशस्वी माणुस तोच होतो ज्याच्यावर शञुने लिंबु फेकले तरी तो त्याचा सरबत करून पितो.

काळानुसार बदला नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल.
💐💐शुभ प्रभात 💐💐

संगत…(19572)

संगतीचा परिणाम आपण सर्व अनुभवत असतो. आपण ज्याच्या शी संवाद करतोय तो ज्या टोनमध्ये बोलत असतो थोड्या वेळाने आपली टोन ही तशीच होऊन जाते. जशी मुंबई ची भाषा सिनेमा मधे जी आपण ऐकतो तशी. मी मुंबई मधे एक तपापेक्षा जास्त काळ होतो पण कधी तशी भाषा कोणाच्या तोंडून ऐकलेली नाही. हे मात्र निश्चित कि जशा परिसरात आपण वावरतो तसा परिणाम आपल्यावर होतो. फक्त भाषाच नव्हे तर आपले राहणीमान, आपली शरीराची ठेवण, चेहरेपट्टी, इ. मित्रांनो, हे निरिक्षण मी कॉलेज मधे असतांना पासून करत आलोय.

शेवटी असे म्हणता येईल कि आपल्या विचारानुरूप आपल्या संपूर्ण शरीरयष्टीत बदल होत जातो.

आपण बघत आलो आहे कि बर्फाळ प्रदेशात राहणारे प्राणी केसाळ असतात.

तेथील झाडांची विशिष्ट रचना असते. ती ही बर्फापासून बचाव करण्यासाठी.

(सर्व फोटो गुगलवरून) संगतीचा परिणाम काय असतो तो व्हाट्सअपवर आलेल्या खालील व्हिडीओ वरून दिसून येईल.

यात एक कोबडी बदकांच्या कळपात शिरली आणि तिच्या ऐटीत किती बदल झाला ते निरिक्षण करावे.