२५ पुर्ण

२५ म्हणजे पाव! हो न? हा २५ चा आकडा आयुष्यात फार महत्वाचा मानला जातो. २५ दिवस, २५ महिने, २५ वर्ष यांना फार महत्व असत. त्यानंतर ५०, ७५ आणि शेवटी १००. यांना महत्व दिल गेल आहे. २५ म्हणजे सिल्वर जुबली, ५० म्हण्जे गोल्डन, ७५ महणजे ्डायमंड आणि १०० शतक.

आयुष्यात असे दिवस येतात कि ते आठवणित राहतात. मुलगा/मुलगी २५ वर्षाचे झाले की त्याला महत्व असते. तसेच लग्नला २५ वर्ष झाली की तो दिवस साजरा केला जातो. आज आमच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस. आम्ही साजरा केला नाही, पण हा दिवस कायम आठवणित राहावा म्हणुन हा प्रपंच.

१५ जुन १९८६ ह्या दिवशी आम्ही कायमचे एक दुजे चे झालॊ होतो. म्हनजे आमचे लग्न झाले होते हो. प्रेम विवाह नव्हे. २५ वर्ष कशी संपली काही कळलेच नाही. जीवन कसे असावे? चटपटीत जेवणासारखे! त्यात सर्व माल मसाले असले तरच मजा येते. नाही तर जेवण संपले तरी पोटात भुक राहाते.

तसेच जीवनाचे ही असते. सहज तर सर्वच जगतात. त्यात थोडे मिठ, मसाले घातले कि जीवनाचा स्वाद बदलुन जातॊ. खुप प्रेम, मधुनच भांडण, मग त्यावर लोणी लावणे, आणि मग लोणचं तोंडी लावून मजेदार जगणे म्हण्जे जिवन.

असेच जीवन जगुन आयुष्याची ही २५ वर्ष संपवली.

उपरवाल्याने चप्पर फाड के दिलेली अफाट दुःख फुलासारखी आनंदाने झेलत इथ पर्यंत आलो आहोत. त्याच्या क्रूपेने पुढील आयुष्य सुखाचे जावो हीच प्रार्थना आहे.

Advertisements

माझा वाढ दिवस

मित्रांनो आज माझा खरा खुरा वाढ दिवस! गम्मत वाटली न! अशीच परिस्थिती आहे. पूर्वीच्या काळी आई वडील सुशिक्षित नसल्याने मुलांचे वाढ दिवस लक्षात ठेवत नसत. किंवा माहित नसत. इंग्रजी तारखांचे तर शक्यच नाही. त्यांची पंचाईत होत असे शाळेत नाव घालायच्या वेळी.( नशीब आपले शाळेत नाव घातले म्हणून आज येथवर येऊन पोहोचलो 🙂 ) शिक्षकांनी जन्म तारीख विचारली कि त त प प व्हायची. मग काही तरी सांगून टाकायचे किंवा तुम्हाला वाटेल ती तारीख लिहा पण शाळेत नाव घाला. शिक्षक बिचारे काय करतील. जवळची तारीख म्हणजे १ जून. जेव्हा  शाळेत नाव घालायचे तेव्हाची १ जून पकडून मागचे सहा वर्ष मोजायचे आणि ती जन्म तारीख लिहायची झाले.

काही वर्षांपूर्वी गावी माझा जन्म कधी झाला हे शोधून काढले तर तारीख मिळाली १५ फेबृवारी. तेव्हापासून आम्ही हा वाढदिवस साजरा करायला लागलो. साजरा करणे म्हणजे जास्त काही नाही फक्त सकाळी उठल्यावर घरच्यांनी शुभेच्छा देणे. मनात आले तर काही तरी गोड करून खाणे.

तुम्ही विचारलं माझे वय किती? कोणाला वय विचारायचे नसते हो! 🙂

 

आज त्याचा वाढदिवस

मित्रांनो १५ मे १९८७ हा त्याचा वाढदिवस. तो त्या दिवशी जन्मला आणि क्षणिक आनंद देऊन गेला. आज तो असता तर २३ वर्षाचा झाला असता. मन रडते आहे. देवा काय वाईट केले होते रे मी कि तू त्याला लगेचच बोलावून घेतले.

मित्रांनो आजच्याच दिवशी माझ्या पहिल्या मुलाचा जन्म झाला होता. पण तो आनंद देवाजीने जास्त दिवस मला उपभोगू दिला नाही.  ४ महिन्यांनी तो गेला. आणि आयुष्य भारासाठी आठवण ठेवून गेला. मनातील दुखः कोणाजवळ बोलून हि दाखविता येत नाही. मनातल्या मनात दाटून राहते. रडता हि येत नाही. आज आपल्या मनातील दुखः शेअर करावे असे वाटले म्हणून येथे टाकले आहे.

त्याचे काय झाले कि मी नेत वर बसलो होतो तर मस्कत येथे राहत असलेली अनुजा ओं लाईन आली. काही दिवसांपूर्वी तिची आई वारली होती. त्याबद्दल आपल्या मनातील दुखः व्यक्त करीत होती कारण मनातील भावना व्यक्त केल्या तर मन हलके होते. तेव्हा १५ मे सुरु झाले होते. मला अचानक माझ्या मुलाची आठवण झाली आणि त्यावरून पोस्ट लिहायला घेतली. मित्रांनो कदाचित हि पोस्ट एकदम खाजगी असल्याने काही मित्रांना आवडणार हि नाही. पण तसे वाटले तर जरूर कळवा मी पोस्ट काढून टाकेल.

कन्येचा वाढदिवस

माणसाला दिवस कसे भरा निघुन गेले ह्याची जाणिव केव्हा होते हे कोणी मला विचारले तर मी उत्तर देईन आपल्या  मुलांना मोठ झालेल पाहून.  वेळ सुपर सोनिक गतिने पळत असतो. मुल कधी मोठी होऊन जातात हे आपणाला कळतच नाही. आज माझी कन्या जी काल परवा पर्यंत चिमुकले बाळ होती  ती कधी मोठी झाली हे समजलेच नाही. आज ती एम एस सी च्या पहिल्या वर्षाला आहे. कधी कधी आश्चर्य वाटते.

मित्रांनो आज माझ्या त्या चिमुकलीचा वाधदिवस आहे. तिच्या साठी मी येथे एक कविता वाढदिवसाची भेट म्हणुन देत आहे.

आमची सुकन्या

तु इवलीसी नाजुकसी

सोनपरी सारखी दिसणारी

इवल्या इवल्या

पावलांनी तुरुतुरु पळणारी

मोठी हॊऊन माझ्या समोर उभी आहेस

यावर माझा विश्वासच बसत नाही.

आज ही आठवतात मला

तुझे ते इवले इवले से

मातीने माखलेले हात

आणि तोंडाला चिकटलेले

ते वरण भात

जे तुझी आई तुला भरवत

होती दररोज,

चिऊ काऊ ला

खाऊ घालित होती

तुझ्या टातातील घास.

प्रत्येक घासाला तुझे

ते पळुन जाणे

आणि माझे तुझ्या मागे

प्रेमाने रागवुन धावत जाणे,

आठवते मला आज ही

तुझे ते खेळने, हिंडने

मस्ती करणे घर भर

आज तु मोठी झालीस आणि

आज तुझ्या वाढदिवसाला

त्या आठवनींची मनात माझ्या

उजळणी  झाली अचानक.

बेटा, तुला आज या दिवशी

वाढ दिवसाच्या शुभेच्छा

तुला उद्दंड आयुष्य लाभो

हिच आहे त्या ईश्वर चरणी आशा.

–मम्पा

वर्चुअल बर्थडे पार्टी

आज माझा खराखुरा वाढदिवस बर का! आता तुम्ही म्हनाल हे काय असत. तर हे घ्या! पुर्वी शिक्षणाचा गंध कमीच होता. आम्चे आइ वडील अनाडीच होते.खर सांगायच तरी आई पुर्ण अनाडी व वडिल ४ थी पर्यंत. त्यामुळे शाळेत नाव घाल्तांना फार अड्चण यायची. मग काय शिक्षक जुन मध्ये प्रवेश घेतला जात असल्याने सरसकट सर्वांची जन्म तारीख १ जून टाकून द्यायचे. त्याकाळातील बहुतेकांची जन्म तारीख हीच आहे. माझ्या घराची माझ्या सकट मोठ्या भावांची हीच व सौ.च्या घरी सर्वांची हीच जन्म तारीख आहे. तसे आपण स्वतःला नशीबवान समजतो कि इतके चांगले पालक भेटले कि त्यांनी शाळेत पाठविले. याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानायला हवेत.
तर मूळ मुद्दा असा कि शाळेच्या प्रमाणपत्रानुसार जन्म तारीख १ जून आहे.काही  वर्ष्यापुर्वी सहज म्हणून मी सौ.च्या भावाकडे खऱ्या जन्म तारखेचा  विषय काढला होता. त्यांनी आमच्या गावाच्या नगरपालिकेतून जन्माचा दाखलाच आणून दिला. तेव्हा कोठे खरी जन्म तारीख कळली. तर आज १५ फेब्रुअरी हि माझी खरी जन्म तारीख. मी वाढ दिवस कधी साजरा करीत नाही पण आज सकाळी उठता बरोबर सौ.ने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. म्हणून मी बझ वर छोटी पोस्ट टाकली. ऑफिसमध्ये जाने आवश्यक होते. गेल्यावर सर्वांना चहा बिस्कीट तरी द्यावे म्हणून सांगितले. आणि त्यांनी ओळखले कि माझा वाढदिवस आहे. मग काय मजाच गेली. थोड्यावेळाने सर्वांनी बुके आणून शुभेच्छा दिल्या. खूप आनद वाटला. आज पहिल्यांदा मी वाढदिवस साजरा केला. आता कळले लोकं हा दिवस का साजरा करतात.

हि रसमलाई भाग्यश्री ने तयार केली आहे.

दुपारी सुहास ने जमणार नाही म्हणू कळविले व मोबाईल नंबर दिला मी सुद्धा माझा नंबर दिला. एक नवा मित्र मिळाला. आताच त्याचा शुभेच्चा कॉल आला होता.
असो कांचन ने वर्चुअल परतीची डिमांड केली. मला प्रश्न पडला हि पार्टी कशी द्यावी. तरीही सर्वांना निमंत्रण दिलेच. आता तयारी करता करता १० वाजले.
येथे सर्वांसाठी जेवण केले आहे. वेज नोंवेज दोन्ही प्रकारच्या  डिश आहेत. सर्वांनी आग्रहाने भरपोट जेवण घ्याव आणि परतीचा आनंद लुटावा. मधुशाला विसरावी बरका.

हि डिश गुगल बाबा ने तयार केली आहे.