मित्रांनो, जगात कोरोना ने जन्म घेतला आणि दररोज नवनवीन शब्दप्रणाली ने ही जन्म घेतल्याचे निदर्शनास यायला लागले. जसे पूर्वी वायरस हा शब्द क्वचितच कानी पडायचा. बहुतेक पावसाळा आला कि वायरल इन्फेक्शन हे शब्द ऐकायला यायचे. तेव्हा गळा खवखवणे, ताप येणे थंडी वाजणे हि लक्षणे दिसणारच. डॉक्टरांकडे गेलात तर जवळजवळ सर्व रुग्ण ह्याच लक्षणांची दिसायची.
आता घरात एखाद्याला एखादी शिंक आली कि धस्स होते. काय झाले असेल याला असे सतत वाटत असते. काही बोलता ही येत नाही. मनातल्या मनात विचार घर करत राहतात.
आणखी प्रचंड प्रमाणात प्रचलनात असलेला नवीन शब्द म्हणजे क्वारंटाईन. दिवसातून अनेकदा हा शब्द कानावर पडतो. ह्या इवल्याशा अद्रुष्य निर्जीवाने म्हणजे कोरोनाने संपूर्ण जगाला घरात क्वारंटाईन केले आहे. तसा हा शब्द नवीन नाही. डिक्शनरी मधीलच आहे. पण तो माणसासाठी वापरला जात नव्हता. हा साक्षात्कार मला परवाच झाला. संगणकावर मी नेहमी एँटीवायरस टाकतो. मागच्या १५ वर्षांपासून टाकत आहे. एकदम तीन वर्षांचे पेकैज घेतले की स्वस्त पडते. त्यात मला हा क्वारंटाईन शब्द सापडला. संगणकात जे वायरस घुसतात, त्यांना क्वारंटाईन करू ठेवले जाते. पण या शाश्वत जगात तर उलटेच घडले आहे. एका वायरस ने माणसाला क्वारंटाईन करून टाकले आहे. ही भविष्यात घडणाऱ्या घडामोडींची चाहूल तर नाही न! भविष्यात मशीन युग असेल आणि तेव्हा रोबोट माणसावर राज्य करेल असे भाकित काही वैज्ञानिकांनी केले आहे असे कधी तरी वाचण्यात आले होते असे आठवत आहे.
अरे हो. आता आठवले. मी त्याकाळात एक सिनेमा पाहिला होता वेलकम टू ट्वेन्टि थर्ड सेंच्युरी. म्हणजे २३ व्या शतकात जग कसं असेल हे त्यात चित्रित केले होते. ही त्याचीच झलक असावी. असो.
(12220790)
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आयुष्याने शिकवलेलं एक वाक्य…
“जिंकलो तर आवरायचं आणि हरलो तर सावरायचं…”
🌼🌹 शुभ सकाळ🌹🌼
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
http://www.koshtirn.wordpress.com
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐