जरा हट के….भाग २

आज ह्या विषयाचा दुसरा भाग. एक शाळेत, ते ही ८ वीत शिकणारा १३ वर्षाचा मुलगा. मुंबई मधील हा चिमुकला एका कंपनीचा मालक झालाय. त्याने ती नवीन संकल्पनेवर आधारित कंपनी स्थापली आहे. त्याचे नाव आहे तिलक मेहता.

एकदा शाळेत पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले कि तो एक पुस्तक आणायला विसरला. मुंबई सारख्या मोठ्या शहरात घरी जाऊन आणणे शक्य नाही. ह्या अडचणी वर मात करण्यासाठी त्याला एक अकल्पित कल्पना सूचली. एका शाळकरी मुलाला. तो घरी सहज म्हणून बालकनीत उभा असताना त्याला मुंबईतील डबेवाला दिसला. झाले त्याची ट्युब पेटली. त्याने त्याला आलेली अडचण इतरांना ही येत असेलच. एका दिवसात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एखादी वस्तू पाठविण्याची सद्यस्थितीत व्यवस्था नाही. त्याने विचार केला कि हे घरोघरुन डबे जमा करतात आणि ऑफिस मधे डबे पोहोचवतात. यांच्या मार्फतच आपण कुरिअर सर्विस दिली तर. त्याच्या घरच्यांना त्याने ही कल्पना सांगितली. आणि घरच्यांनी ही त्याची ही कल्पना उचलून धरली. आज तो लहानगा एका कंपनीचा मालक आहे. शाळेत ही जातो. शाळा सुटल्यावर ऑफिस मध्ये जातो व काम करतो. करोडोची कंपनी तो हाताळत आहे.

खालील लिंकवर याबद्दल बातमी मिळेल.

https://m.jagran.com/news/national-13-year-old-tilak-mehta-set-up-in-mumbai-logistics-company-18212198.html

(20682)

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵

✍🏻✍🏻शब्द दिल्याने “आशा”
निर्माण होतात
आणि
दिलेला शब्द
पाळल्याने “विश्वास”

🙏🏻 ।। शुभ सकाळ।।🙏🏻

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵

http://www.koshtiravindra.blogspot.com

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵

🌸🌹 शब्दगंध🌹🌸

✍🏻…..जीवनात उत्तम मित्र, योग्य रस्ता, चांगले विचार, उच्च धेय आणि अंगी नम्रता,
या पाच गोष्टी पाच बोटाप्रमाने असतात आणि सर्वच जुळून आल्या तर वज्रमुठ तयार होते.
आणि याच वज्रमुठीची ताकत माणसाला यशाकडे घेऊन जाते.

(19634)

💐 ☕🙏 शुभ सकाळ🙏☕ 💐

(व्हाट्सएपवर प्राप्त संदेश)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.koshtirn.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

नववर्ष आगमन(19603 )

🎉🎉🎊🎉🎉🎊🎉🎉🎊

आज पवित्र पाडवा,
काल लक्ष्मीचे झालेले शुभागमन,
आज नववर्षाचे पहिले पाऊल,
अशा ह्या मंगल प्रसंगी
आपल्या मंगल भविष्याची
पायभरणी होवो,
आपणा बरोबर परिवारास
सुखशांती लाभो..!

दिवाळी पाडवा आणि नववर्षांनिमित्त
स्नेहमय शुभेच्छा…! 🙏💐

🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊

http://www.manachyakavita.wordpress.com

दिवाळी पाडवा..(19602)

आज बलिप्रतिपदा💐
💐दिवाळी पाडवा,
राहो सदा नात्यात गोडवा💐
💐कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे,
बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा)💐
साडेतीन मुहूर्तांपैकी एक💐
💐बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या
परिवारास मनापासून शुभेच्छा💐
💐💐शुभ दीपावली!💐💐

*****

http://www.manachyakavita.wordpress.com

आपण मात्र सर्वांचे व्हावे ….(19583)

पहाटे प्राजक्तासारखे उमलून🌹

निशिगंधासारखे सुगंधित होत जावे🌼

सुगंधित आनंदाच्या लाटांवर🌹

आयुष्य झुलत जावे 🌼

अश्रू असोत कुणाचेही🌹

आपणच विरघळून जावे !🌼

नसोत कुणीही आपले,🌹

आपण मात्र सर्वांचे व्हावे ….. !!!🌼

🌺🙏शुभ सकाळ 🙏🌺

महानायक..(41019575)

एखादा मनुष्य किती भाग्यवान असू शकतो ? याची कल्पना केली जाऊ शकते का? पण आहे अशी एक व्यक्ती आहे.

मला आठवते मी लहानपणी एक सिनेमा पाहिला होता. नाव आठवत नाही. मला वाटते सन १९७०-७१ असावे. नेपानगर मधील पदमा टॉकीज. अमिताभ बच्चन हा हिरो होता.

एकदम सडपातळ देहयष्टी. भरपूर उंची (आता जी उंची गाठली आहे ती कोणत्याही नटाने गाठलेली नाही). तेव्हा त्याला बघुन कोणी कल्पना ही करू शकत नव्हते की नट एव्हढी उंची गाठेल. तो ज्या शिखरावर पोहोचेल तेथे दुसरा कोणीच पोहोचू शकणार नाही.

आई तेजी व वडील हरीवंशरॉय. आडनाव श्रीवास्तव होते पण वडिलांनी बच्चन लावले. वरील फोटोत बघा. बारका बुरका हा पोरगा जेव्हा सिनेमा मधे रोल मिळण्यासाठी प्रयत्न करत होता याला या उंची मुळे झिडकारले जात होते.

आज तोच मनुष्य संपूर्ण जगात प्रसिद्ध झाला आहे.

७७ वर्षे वय होऊन सुद्धा आपली सुपरस्टार ची सिट त्याने कायम ठेवली आहे. टिव्हीवर सतत जाहिराती आहेतच. मुथ्थुट फायनान्स, कौन बनेगा करोडपती, वेलस्पन टॉवेल, con fabrics,फ्लिपकार्ट,

कल्याण ज्वेलर्स कुठे नाही तो. एकमेवाद्वितीय असे हे व्यक्तिमत्त्व आणि न भूतो न भविष्यती असा ही मनुष्य जगाला ईश्वराने बहाल केलेले गिफ्ट आहे. ह्यांना उद्दंड आयुष्य लाभो हिच प्रार्थना

रुमादेवी(31019574)

मित्रांनो, कोणाच्या नशिबी काय लिहिलेले असेल काही सांगता येत नाही. असे म्हणतात कि ज्याच्या पत्रिकेत राजयोग असतो तो एखादा लिडर किंवा मोठा माणूस होतो. अशी अनेक जणं असतात जे अत्यंत गरीब घरची असतात पण त्यांच्या हातून असे काही घडते ते शिखरावर जाऊन पोहोचतात.

काही दिवसांपूर्वी कौन बनेगा करोडपती मधे रुमादेवी नामक एक स्रीला एक सेलीब्रिटी म्हणून विशेष आमंत्रित केले होते. वय फक्त ३० वर्षे. गावंढळ, राजस्थान मधील एका लहानशा खेड्यात राहणारी. फक्त आठवीपर्यंत शिक्षण व १७ वर्षाची असतांना लग्न झालेली एक महिला.

इतक्या कमी वयात कोणाचे ही पाठबळ नसतांना एका साध्या कशिदा च्या कामाच्या बळावर तीने सर्वोच्च उंची गाठली आहे. तीला सर्वोच्च नारी शक्ती पुरस्काराने महामहिम राष्ट्रपती यांचे हस्ते संमानित केले गेले आहे.

या वयात तीने २२००० महिलांना रोजगार मिळवून दिला आहे. इतक्या कमी कमी वयात, एक गरीब कमी शिक्षित महिला, २२००० महिलांपर्यंत पोहोचून त्यांना कशिदा करण्यासाठी प्रोत्साहित करते, त्या महिला व त्यांचे घरचे रुमादेवीवर विश्वास ठेऊन तयार होतात व त्याने एक नव विश्व नावारूपाला येते याला ईश्वरिय देनगीच म्हणावे लागेल.

अर्थात संधीचे सोने करणे हेही त्या व्यक्ती वर अवलंबून असते.

कौन बनेगा करोडपती मधे प्रसिद्ध सिने नटी सोनाक्षी सिन्हा ह्या रुमादेवीसोबत होत्या.

विशेष म्हणजे दोन्हींचे वय सारखे होते. रुमादेवीचे लग्न 17 व्या वर्षी तर सोनाक्षी अजूनही अविवाहित. हा फरक आहेच. असो.

रुमादेवी यांनी देशांतर्गत प्रदर्शनं भरविली, आपल्यासोबत कारागीर महिलांना घेऊन रेंप वाक सुद्धा केले. इतकेच नव्हे तर जर्मनी मधे त्यांच्या वस्रांचे प्रदर्शन ही भरवले होते. अशा ह्या अविश्वसनीय, अदभूत व अकल्पित व्यक्तिमत्वास सलाम.

(सर्व चित्रांसाठी गुगलचे आभार)