तारूण्यावस्था

मी आतापर्यंत ऐकत आलोय कि पाश्चात्य संस्कृती वेगळीच आहे. तेथे मुलं १८ वर्षाची झाली कि स्वतंत्र राहतात. आई वडीलांना विचारले जात नाही. कुटुंब संस्कृती नाही. पण व्हाट्सएपच्या माध्यमातून विदेशातील एक व्हिडीओ प्राप्त झाला. त्यावरून हे सर्व मला खोटे वाटत आहे. त्या संस्कृती ची बदनामी केल्या सारखे वाटते.

हा व्हिडीओ जरूर पहा. वयाची ९० पार करूनही तो मनुष्य तारूण्यावस्थेत असल्याचे भासत आहे.

हा व्हिडीओ विदेशातील आहे. एक कोर्ट सुरू आहे. समोर खुर्चीवर जजसाहेब बसलेले आहेत. ते वयस्कर आहेत. एक अतिशय म्हातारी व्यक्ती तेथे येते. त्यांना जज समोर खाली एका खुर्चीवर बसवले जाते. जजसाहेब त्यांना आदराने सर म्हणून संबोधतात.

त्यांच्यावर चार्ज असतो शाळेच्या झोनमध्ये गाडी जास्त गतीने हाकली.

त्यांचे वय विचारले जाते. तेव्हा ते सांगतात ९६. केंसरग्रस्त मुलाला दवाखान्यात घेऊन जात होते म्हणून गाडीला गति जास्त होती. मुलाचे वय ६३ वर्षे.

जजसाहेब त्यांचे केस डिसमिस करून टाकतात.

बघा आता.

यात नशिबवान कोण आहे बरं. तो केंसरग्रस्त मुलगा. कि ९६ वर्षाचे वडील कि जजसाहेब.

माझ्या मते मुलगा नशिबवान आहे असे म्हणता येईल. कारण त्याच्या आजारपणात त्याचे ९६ वर्षांचे वडील त्याचा सांभाळ करू शकत आहेत. ९६ व्या वर्षी मनुष्य अंथरुणावर पडून असतो. त्यालाच इतरांच्या मदतीची गरज असते. पण मुलगा नशिबवान म्हणून त्याचे वडील ९६ व्या वर्षी सुद्धा कार चालवून मुलाला दवाखान्यात घेऊन जाऊ शकतात.

पण असे ही म्हणता येईल कि मुलगा कमनशीबी आहे म्हणून त्याला या वयात आजारपण येऊन ज्या वडीलांची जर्जरावस्थेत त्याने सुश्रुषा करणे अपेक्षित होते त्यांच्या कडून त्यालाच सेवा करवून घ्यावी लागत आहे.

माझ्या मते वडील ही भाग्यवान आहेत कि या वयात ही ते तारूण्यावस्थेत असल्यासारखे आहेत नव्हे ईश्वरानेच त्यांना तसे ठेवले आहे.

पण त्यांना ही कमनशीबी म्हणता येईल कारण या वयात मुला नातवंडांकडून सेवा सुश्रुषा करून घेणे अपेक्षित असताना देवाने त्यांच्या मुलाला आजारपण दिले व त्यांना त्या मुलाचीच सुश्रुषा करण्यासाठी बाध्य व्हावे लागले.

राहिले जजसाहेब. त्यांनी त्या आरोपीचे वय, त्यांना ज्या परिस्थितीत नियम भंग करावा लागला ती परिस्थिती व त्यांच्या मुलाला त्यांची असलेली गरज या सर्व बाबींचा योग्य प्रकारे विचार करून त्यांचे केस डिसमिस केले. हे खरे नशिबवान.

(20679)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

💥💥शुभ सकाळ💥💥

” स्पष्ट ” बोला पण असे बोला कि समोरच्याला ” कष्ट ” होणार नाही
अन् त्याचे आणि तुमचे नाते “नष्ट ” होणार नाही..”
प्रयत्न करा की कोणी आपल्यावर रुसु नये जिवलगाची सोबत कधी सुटु नये.
नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे असे निभवा की त्याचे बंध आयुष्यभर तुटु नये.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.manachyakavita.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

ह्रदयस्पर्शी….

व्हाट्सएपच्या माध्यमातून प्राप्त पोस्ट. जशी च्या तशी सादर.

एक अतिशय सुरेख वाचनात आलेली कथा :

मला संतोष पवार भेटला तेव्हा मी त्याला विचारले “आता तुझ्यासोबत हे कोण पाहुणे आहेत ?”
तो म्हणाला,” हे माझे आईवडील आहेत. ”
मला खुप आश्चर्य वाटले. मी त्याला लगेच म्हणालो,” मागच्या वेळी तर वेगळे होते. हे तर दुसरेच कोणीतरी आहेत. हे कसं काय ?”
तर तो मला म्हणाला,” आपण हाॅटेलमध्ये बसून बोलुयात. ”
आम्ही जवळच असलेल्या चहाच्या टपरीवर गेलो. तेथे बाकावर बसलो. तो मला सांगू लागला.
” माझे आई वडील लहानपणीच वारले. माझ्या काकाकाकूंनीच मला वाढवले. नोकरी लगेच मिळाली आणि छोकरीही. कारण माझे वर्गातील एका मुलीवर प्रेम होते. मला नोकरी लागताच मी माझ्या काकांना या प्रेमाबद्दल सांगितले. त्यांनी होकार तर दिलाच शिवाय ते माझ्यासोबत मागणी घालायला तिच्या घरीसुध्दा आले. लग्न नोंदणी पध्दतीने झाले आणि माझी बदली नागपूराहून थेट मुंबई ला झाली. आमच्या कंपनी ने मला रहायला विरारला बैठे घर दिले. तेथे सर्व सुखसोयी होत्या पण मी नोकरीला जाताच घरी बायको कंटाळुन जायची.
मला ती नेहमी म्हणायची “सासूसासरे असते तर बरे झाले असते. त्यांची घरात थोडी मदतही झाली असती आणि मुलांना छान संस्कार मिळाले असते.”
एकदा आम्ही बागेत सगळे फिरायला गेलो होतो. तेथे एक आजी आजोबा उदास बसलेले दिसले. मी विचारले, ” काय काका, काही त्रास होतो आहे का ? मी काही मदत करु शकतो का ?”
तर ते म्हणाले,” बाळा, आम्हा दोघांना एकटेपणा खातो आहे रे. आयुष्य गेलं स्वप्ने रंगवण्यात. आता काम होत नाही. लगेच थकवा येतो. पण काम करण्याशिवाय पर्यायही नाही. ”
मी म्हणालो,” मुले सांभाळत नाहीत ?”
त्यावर ते म्हणाले, ” मुलगा सून अमेरिकेतच असतात. ”
आणि दोघांनी त्यांची तोंडे बाजूला वळवली आणि डोळ्यांना रुमाल लावला.
मी काय समजायचे ते समजलो. आणि म्हणालो,” आमच्याकडे येता का आठ दिवस रहायला ? तेवढाच हवाबदलही होईल आणि या दोन नातवंडात वेळही जाईल. ”
तर ते म्हणाले,” बाळा तुला कशाला आमचा त्रास ? अरे नेहमी इथेच भेटु आपण सगळे रविवारचे. ”
आणि मग दर रविवारी आमची त्यांची भेट होऊ लागली.

माझ्या मनात होतं की बायकोला विचारावे की या दोघांना आपल्याच घरी ठेवुया का ? पण एकदा तीच मला म्हणाली,” काही बोलायचे होते तुमच्याशी.”
मी म्हणालो,” बोल ना काय बोलायचे आहे ते.”
तर ती म्हणाली,” रविवारी आपण बागेत त्या आजीआजोबांना भेटतो ना, त्यांना आपल्या घरीच आणुया का ? म्हणजे मला असं वाटतंय की आपल्या मुलांनाही त्यांच्या भेटीची उत्सुकता असते आणि दोघेही आपल्या मुलांबरोबर किती आनंदात असतात ना !!”
मला तिचे म्हणणे पटत होते पण कंपनीने दिलेल्या घरात यांना कसे ठेवायचे ?

आणि आम्ही दोघांनी एक निर्णय घेतला. या दोघांना दत्तक घ्यायचा. कागदोपत्री दत्तक घेतले व कंपनीला ते दत्तक पेपर्स दाखवले. कंपनी मालकाने माझा सत्कार केला आणि माझा पगार त्यांनी दिडपट केला.
आजीआजोबांना एक खोली दिली.

त्यांचे नाव श्री सुहास कळसकर व सौ सुहासिनी कळसकर अशी आहेत. त्यांचे टेलरिंगचे दुकान होते. त्यांना एक मुलगा झाल्यावर त्यांनी कुटुंबनियोजन केले व याच मुलाला खुप शिकवायचे ठरवले. मुलाला इंजिनियर केले व पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवले. एमबीए करताना तेथील एका मुलीच्या प्रेमात पडला व परस्पर लग्न करुन मोकळा झाला. सूनेला एकदा दाखवायला आणलं होते. नंतर दर तीनचार महिन्यांनी पैसे पाठवायचा. नंतर नंतर सहा महिन्यांनी पैसे येऊ लागले. एकदा तो भारतात आला होता. म्हणाला तुम्ही दोघे तिकडेच रहायला चला. ही तयार नव्हती पण नंतर खुप दिवसांनी तयार झाली पण खुप उशीर झाला होता. नंतर पैसे यायचेही बंद झाले. पत्रव्यवहार केला तर कळले तो दुसरीकडे वेगळ्या शहरात राहतो. आणि त्याला फोन केला तर त्याने त्याची नोकरी गेल्याचे सांगितले. बायकोच त्याला सांभाळते. सातआठ वर्षात फक्त फोनवर बोलतो. त्याच्या मित्राने सांगितले,’त्याची नोकरी वगैरे काही गेली नव्हती उलट बढती मिळाली होती. एक बंगला व गाडी आहे.

आपलेच मुल आहे म्हणून माफ केले आणि नव्या जीवनाला सुरुवात केली.

कळसकर दांपत्याला दत्तक घेतल्यावर आम्हाला जोशी दांपत्य भेटले. त्यांची कथा वेगळीच. त्यांना मुलच नव्हते आणि ते अतिशय गोड बोलणे व संस्कारी जोडी होती. मग त्यांनाही आमच्या घरात सामील करुन घेतले. ते आनंदाने आमच्यात राहतात. ते जोशी काका म्हणजे आत्ता माझ्याबरोबर आहेत ते. त्यांना भाजी आणायची खुप आवड. जोशी काकू स्वयंपाक खुप छान करतात. चोघी मिळुन स्वयंपाक घर सांभाळतात आणि आता तर माझी मुलगीही त्यांच्या हाताखाली स्वयंपाक शिकते आहे.

मधल्या काळात आणखी एक जोडी आमच्यात आली. कांबळे काकाकाकू. त्यांचा तरुण मुलगा अपघातात ठार झाला. ते आमच्यात आले आणि त्यांनाही मी दत्तक घेतले. आता मला तीन आईवडील आहेत. कांबळे काकाकाकू नोकरी करत होते. त्यांना पेंशन आहे. त्यां दोघांनी त्यांच्याकडील पीएफचे तीस लाख आम्हाला दिले मग त्यात माझे सेव्ह केलेले टाकले. बायकोने तिचे दागिने विकून आम्ही एक मोकळी जागा घेऊन त्यावर एक बैठे मोठे घर बांधले.

बंगल्याप्रमाणे पुढे बाग केली आहे. कांबळे काका त्यात रमतात.
जोशी काका पुजेचे पाहतात व भाजीही आणून देतात.

माझा मुलगा आता काॅलेजमध्ये आहे. मुलीने फॅशन डिझाईनिंगचा कोर्स केला म्हणून तिने बुटीक टाकले त्यात कळसकर काका सुध्दा तिला मदत करतात.

तु तुझ्या फॅमिलीला घेऊन ये ना आमच्या घरी रहायला. पहा घर कसे आनंदाने भरुन वहात असते. आमच्या हातातील चहा केव्हाच संपला होता. मी चहाचे पैसे देत होतो तर चहावाल्याने घेतलेच नाहीत. म्हणाला,” साहेबांकडुन पैसे घेतले तर मला पाप लागेल .माझ्या मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च तेच करतात. किमान फुल ना फुलाची पाकळी उपकार थोडे परतफेड तरी करु द्यात हो. ” असं म्हणताना त्याचे डोळे ओले झाले होते.

संतोष पवार शाळेत खुप अबोल असायचा. आज कळले की आईवडिलांची किंमत फक्त त्यालाच कळाली होती. म्हणूनच तर त्याने तीन आईवडील दत्तक घेतले होते. लहानपणीच्या आईवडिलांची भरपाई करत समाजालाही त्याने एक मोठी शिकवण दिली. कशाला पाहिजेत वृध्दाश्रम ? ज्यांना शक्य आहे त्यांनी एक एक आजीआजोबा दत्तक घ्यायचे आणि समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडायचे हीच तर खरी आधुनिक जगाची उभारणी झाली म्हणता येईल.

मी असा विचार करत करतच घरी आलो आणि बायकोला सगळे सांगितले. ती म्हणाली पुढच्या आठवड्यात आपण सगळेच जण जाऊयात. भरपूर गिफ्ट घेऊन जाऊ.

_ अनुज कुलकर्णी, कांदिवली

(20673)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

जीवन जगण्याची कला
त्यांनाच माहित असते
जे स्वतःसोबत दुसऱ्याच्याही
आनंदाचा विचार करतात

😘❣शुभ सकाळ❣😘

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.koshtirn.wordpress.com

👍👌👍👌👍👌👍👌👍👌👌👍👌👍👌

जाते, पाटे आणि वरवंटे….

लहान असताना रोज सकाळी ३-४ वाजेला घरातील कामे सुरु होत. त्यात जात्यावर दळण दळायचं काम एक होते. हे काम दररोज नसे. पण दोन तीन दिवसातून एकदा केले जायचे. दोन शेजारणी एकत्र दळत. सोबत गाणं गायलं जात असे. कधी कधी आई एकट्याने दळत असे. पण ती पहाट आठवणीत राहून गेली. अशी सुमधुर सुश्राव्य सकाळ कधी होणे नाही. दळण असो अगर नसो. पूर्वी बायका सकाळी लवकर उठत असत. सवयच होती ती सर्वांना. पुरुष मंडळी सुद्धा सकाळी पांच वाजेला आंघोळ करून तयार असायचे. ठंडी आहे म्हणून उशिरा उठणे असे कधी झाले नाही. आम्ही लहान होतो तरीही लवकर उठून तयारी करत होतो. सकाळी पांच वाजता चिमणी घेऊन अभ्यास करायला बसत असू. घरोघरी असच असायचं. आम्ही तर शेजारच्या मित्रांसोबत अभ्यास करत होतो. असो.

पूर्वी गिरण्या नव्हत्या. घरोघरी जाते होते. दगडी जाते. दोन पाते असायची एक वरचं तर दुसरं खालचं. मधे एक दांडा असायचा. वरच्या पात्याला एक दांडा असायचा. त्याने वरचं पातं गोल फिरवल जायचं. वरच्या पात्याच्या मध्यभागी असलेल्या दांड्याच्या अवतीभवती थोडी मोकळी जागा मुद्दामहून ठेवलेली असायची.

त्यातून ज्वारीचे दाने टाकले जायचे. दोन पात्यांमधे ते येत व दळले जात. शुद्ध पिठ बाहेर पडत असे. शुद्ध आणि पौष्टिक ही. भाकरी सुद्धा स्वादिष्ट लागत असे. तेव्हा चे अन्न गुडचट लागे. पोळी असो अगर भाकरी नुसती जरी खाल्ली तरी गोड लागत असे. तोंडाला लाळ सुटून आणखी गोड होत असे. आता तर पोळी ही गोड लागत नाही आणि खातांना तोंडातून लाळ ही उत्पन्न होत नाही. जन्म झाला आहे म्हणून खायचे व जगायचे बस. अर्थात जगण्यासाठी खायचे.

पूर्वी ज्वारी ची भाकरी दररोज खात असत. तेव्हा ज्वारी चे पिक जास्त घेतले जात होते. गहू कमी खात असत. आमच्या कडे तर दिवाळी, दसरा अशा सणाला किंवा विशिष्ट पाहूणे आले तरच वरण पोळी व भाताचे जेवण होत असे. इतर वेळी फक्त भाजी भाकरी. याच्याने पोट व्यवस्थित राहत असे. तब्येत ठणठणीत राहणार. आणि घरात वरण भात म्हणजे जिन्नस व आनंदाचा दिवस मानला जात असे. अहो, शीरा पूरीचा पाहुणचार म्हणजे खुप मोठी गोष्ट. दिवाळी दसरा या सणांची आतुरतेने वाट पाहात असत सगळे. स्रिया तर एक महिना आधी पासून काय घ्यायचं, काय करायचं याचं नियोजन सुरू करत. असो, नेहमी प्रमाणे विषयांतर झालच.

पाटा आणि वरवंटा ही जोडी ही त्याकाळी अत्यंत महत्त्वाची होती.

घरोघरी असणारच. हीच श्रीमंती होती हो त्याकाळी. पाट्या वरवंट्यावरील चटणी😢 काय स्वाद असायचा राव. आता लिहित असताना ही तोंडाला पाणी सुटले. तो स्वाद आठवला राव. मिक्सर आला आणि जीवनातील रयाच गेली बघा.

आधीच रसायनांचा मारा म्हणून भाजी पाला बेस्वाद झालेले. त्यात मिक्सर, ग्राईंडर ची भर. त्यात चटणी केली सर्व स्वाद जळून जातो.

आणि हो ह्या सुख सोयी सोबत आजारपण घेऊन आल्या.

(19649A)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

लिहिल्याशिवाय
दोन शब्दातील अंतर
कळत नाही….
हाक आणि हात
दिल्याशिवाय माणसांचे
मनं जुळत नाही…
💐💐शुभ सकाळ💐💐

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.ownpoems.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

मात्रुदुग्ध पेढी….

मध्यंतरी वर्तमान पत्रात एक आगळी वेगळी बातमी वाचण्यात आली होती. एक अमेरिकन तरुणी पुण्यात ऑफिस कामानिमित्त दहा दिवसांसाठी आली. ती सॉफ्टवेअर इंजिनिअर होती. तिने नुकताच एका बाळाला जन्म दिला होता. म्हणजे ती तरूणी नसून एक माता आफल्या लहानग्या ताण्हुल्याला सोडून परदेशात आली होती.

ही माता किती संवेदनशील असावी याची कल्पना पुढील बातमी वरून येईल. तिने भारतात येण्यापूर्वी बाळापासून लांब गेल्यावर जो पान्हा फुटेल त्याचे काय करावे याचा आधी च विचार केला. गुगल वर सर्च करून माहिती मिळविली. पुण्यातील ससुन या सरकारी दवाखान्यात आईच्या दुधाची पेढी आहे हे तिला समजले. त्या माऊली ने ईमेलवर संपर्क केला. आधीच सर्व व्यवस्था केली मग आली. तिच्या वास्तव्यकाळात तिने सात लिटर दुध दान केले. अशा प्रकारे तिने पुण्याशी कायमचा संबंध प्रस्थापित केला.

सॉफ्टवेअर इंजिनिअर असून सुद्धा ही माता किती संवेदनशील आहे हे यावरून सिद्ध होते.

इतकेच नव्हे आईच्या दुधाची पेढी असते ही नवीन माहिती समजली.

(19624)

http://www.manachyakavita.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

💐💐💐शुभ सकाळ💐💐💐

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

अमूल्य देण(19610)

मित्रांनो, माणसाचे चारित्र्य ही अमूल्य देणं असते. ती असी एक ठेव असते जीचे मूल्य दिवसागणिक चक्रवर्ती वाढत जाते. समाजात एकदा का नाव झाले कि ते पसरत जाते. समाज आदरयुक्त नजरेने तुमच्या कडे बघतो. आणि त्याने समाजात माणसाची पत वाढत जाते. ही समाजात पत असते ती चारित्र्याचीच सावली असते.

अब्राहम लिंकन यांनी म्हटले आहे:

“Character is like a tree and reputation like it’s shadow. The shadow is what we think of it. The tree is the real thing.”

चारित्र्य जितके चांगले असेल समाजात तुमची पत तितकी जास्त असते.

पण हा समाज फार विचित्र असतो. एकदा का तुमचे काही चुकले की सर्व संपले म्हणून समजा. अगदी साधी चुक जरी झाली तरीही तुम्हाला माफी नाही. म्हणून प्रत्येक पाऊल विचार करूनच टाकावे लागते.

समाजच कशाला, हा प्रत्येक माणसाचा स्वभावधर्म आहे. अहो लांब कशाला जाता. आपल्या घरातच बघा न. तुम्ही मुलांचा रोज अभ्यास घेता. एक दिवस जास्त थकून आलात आणि कंटाळा केला कि झाले. मुलं नाराज होणार पण बायको ही टोमणे मारणार. नौकरीच्या ठिकाणी ही तसेच. तुम्ही पूर्ण इमानदारीने काम करता म्हणून तुमच्यावर काम लादले जाते. तरी तुम्ही करता. जास्त वेळ थांबून करता. पण एक दिवस तुम्हाला काही काम असेल तर तुम्हाला बॉस सोडत नाही. किंवा एखादी चुक झाली कि बॉसचे बोलणे ऐकावे लागतात. अरे पण मी हजारो काम चांगली केली त्याचे काय? असे वाक्य साहजिकच तुमच्या तोंडून निघते. तेव्हा मित्र म्हणतात आणखी दाखव इमानदारी!

💐💐💐💐💐

💐 शुभ सकाळ💐

निसर्ग, काळ व धीरोदात्तता हेच खरे राजवैद्य!

-अरिस्टॉटल

http://www.ownpoems.wordpress.com

नमस्कार…(19594)

●● नमस्काराचे महत्व ●●

महाभारताचे युद्ध सुरु होते. दररोज कौरवसेनेचे मोठमोठे योद्धे मारले जात होते. पितामह भिष्मांसारखे ज्येष्ठ योद्धे कौरवांच्या बाजूने असून देखील त्यांच्या सेनेची सतत हानी होत होती..

एक दिवस दुर्योधन वैतागून पितामहांवर
व्यंग करतो. त्यामुळे व्यथित होऊन भीष्म पितामह घोषणा करतात की..”मी उद्या सर्व पांडवांचा वध करेन..” त्यांच्या घोषणेची बातमी पांडवांच्या शिबिरात पोहोचताच पांडवांची अस्वस्थता वाढली कारण भीष्मांच्या क्षमते बाबत सर्वांनाच कल्पना होती..

तेवढ्यात श्रीकृष्ण शिबिरात दाखल झाले. पांडवांची अस्वस्थता त्यांच्या
लक्षात येताच ते द्रौपदीला म्हणाले.. “माझ्या सोबत चल..” द्रौपदीला सोबत घेऊन श्रीकृष्ण पितामहांच्या कक्षात पोहोचले. ती वेळ रात्रीची होती. स्वतः बाहेर उभे राहून ते द्रौपदीला म्हणाले की,
आत जाऊन पितामहांना प्रणाम कर..

सांगितल्याप्रमाणे द्रौपदीने आत जाऊन पितामहांना प्रणाम करताच, “अखंड सौभाग्यवती भव” असा आशीर्वाद त्यांनी तिला दिला..

त्यानंतर त्यांनी द्रौपदीला विचारले की,
“वत्स, एवढ्या रात्री तू एकटी कशी
काय आलीस..??”

“माझे बंधू श्रीकृष्णासोबत मी इथे आले आहे आणि ते बाहेर थांबले आहेत” असे द्रौपदीने सांगताच श्रीकृष्णाला भेटायला पितामह बाहेर आले आणि त्या दोघांनी
एकमेकांना प्रणाम केला. भीष्म पितामह म्हणाले.. “माझ्या एका वचनाला दुसऱ्या
वचनाने मात देण्याचे काम फक्त श्रीकृष्णच करु शकतात..”

शिबिरात परतताना श्रीकृष्ण द्रौपदीला म्हणाले की, “बघ, तुझ्या फक्त एक वेळ जाऊन पितामहांना नमस्कार करण्यामुळे
तुझ्या पतींना जीवनदान मिळाले, हे तुझ्या लक्षात आले का..?? जर तू दररोज नित्यनेमाने पितामह
भीष्म, धृतराष्ट्र, द्रोणाचार्य ह्या मान्यवरांना नमस्कार केला असतास आणि दुर्योधन, दु:शासन ह्यांच्या पत्नींनी जर नित्यनेमाने ज्येष्ठ बंधू पांडवांना नमस्कार केला असता तर हि युद्धाची वेळच आली नसती. अशी असते नमस्कार आणि आशीर्वादाची शक्ती..!!

तात्पर्य..

वर्तमानकाळात आपल्या घरी ज्या
समस्या आहेत, त्यांचे मूळ कारण हेच
आहे की, कळत नकळत आपल्या
हातून वडिलधाऱ्या मंडळीची उपेक्षा
केली जाते..

जर प्रत्येक घरात वडिलधाऱ्या मंडळीना दररोज नमस्कार करुन त्यांचा आशीर्वाद घेण्याचे संस्कार असतील, तर त्या घराघरात वितंडवाद सहज टाळता येऊ शकतात.. असे घर स्वर्ग बनू शकते..

मोठ्यांचा आशीर्वाद हे एक असे कवच आहे की, ज्याला कुठलेही शस्त्र भेदू शकत नाही. कारण.

नमस्कारात प्रेम आहे.. 🙏

नमस्कारात विनय आहे.🙏
नमस्कारात अनुशासन आहे. 🙏

नमस्कार आदर शिकवतो..🙏
नमस्कारामुळे मनात सुविचार येतात..🙏
नमस्कारामुळे क्रोध नष्ट होतो..🙏
नमस्कारामुळे अहंकार नष्ट होतो..🙏
नमस्कारात शीतलता आहे..🙏
नमस्कार अश्रू पुसण्याचे काम करतो🙏
नमस्कार आपली संस्कृती आहे..🙏
ह्या संस्कृतीचे आपण जतन केले पाहिजे.

🙏🏼 जय श्री कृष्ण🙏

हुशार हंस….(19585)

मित्रांनो, आपण टिव्हीवर बातम्यांमधे सतत बघत असतो जगातील कुठल्या न कुठल्या शहरात अतिवृष्टी मुळे पाणी साठले आहे. महापुर आला आहे. गाड्या वाहून जात आहेत. घर कोसळत आहेत आणि इतकी लोकं मेली. प्रगत देशांमध्ये सुद्धा हे घडत आहे. याच मुख्य कारण प्लास्टिकचा अति वापर……पुढे खालील लिंक वर वाचा😊

https://koshtirn.wordpress.com/2019/10/17/325/