होय मित्रांनो, जग हे खूप स्वार्थी आहे. जगातला प्रत्येक जीवंत प्राणी , जीव, जंतू, वनस्पती, झाडे, झुडपे सर्व सर्व स्वार्थाने भरलेले आहे. सुरुवात तर मी ईश्वरापासूनच करेल. मला वाटते त्याने हे जग त्याच्या स्वार्थासाठीच निर्माण केले असावे. ईश्वराने हे जग निर्माण केले नसते तर त्याला कोणी पूजल असत? म्हणजे त्याची कोणीतरी पूजा करावी म्हणून मानव निर्मित केला असावा. मानव जगला पाहिजे म्हणून झाडे, झुडपे , वनस्पती, जीव जंतू निर्माण केले. त्यांच ही स्वतंत्र अस्तित्व नाही. ते ही एक दुसऱ्या वर अवलंबून आहेत. आहे न विचार करण्यासारखी गोष्ट. आता आपण माणसाकडे वळू या. पहिल्यांदा आईवडील म्हणजे स्री पुरुष ज्यांच्या पासून नवीन जीव निर्माण होतो. ते त्यांच्या म्हातारपणी आपला सहारा व्हावा म्हणून मुलं आसावीत. त्यासाठी लग्न करतात. आणि मुलांना जन्माला घालतात. यात त्यांचा स्वार्थ नाही का? स्पष्टपणे स्वार्थ आहे. त्याला लहानाचे मोठे करतात. नको नको ते लाड पुरवतात तेही तो नाराज होऊ नये. मोठेपणी आपल्याला त्रास देऊ नये म्हणून. जर मोठा झाल्यावर त्याने त्रास दिला तर तसे बोलून दाखवतात ही. यासाठीच का तुला लहानाचा मोठा केला? तुझे लाड पुरविले. असे उघडपणे बोलतात. यात त्यांचा स्वार्थ स्पष्टपणे दिसून येतो. नव्हे असतोच. पूर्वी वडिलांशी संवाद साधणे अशक्यप्राय होते. ते तरी काय करणार? घरोघरी इतकी मुलं असायची कि वडील कोणाकोणाला जवळ घेणार हा प्रश्न असायचा. त्यामुळे लाड नकोच. असे तेव्हाचे धोरण असावे.
असे म्हणणे उचित होईल कि मुल स्वतःहून लहानाची मोठी व्हायची. तेव्हा ची मुल निस्वार्थ पणे काम करायची. कारण धाकच असा होता. पाय चेपून दे जरा म्हटलं तर निमूटपणे जाऊन चेपून द्यावे लागे. मला वेळ नाही, मी अभ्यास करतोय. ही कारणं चालतच नसायची. ऐकायचं म्हणजे ऐकायचच.
आता त्या लहानशा पिल्लाला जरी काम सांगितले तरी तो चॉकलेट देणार? म्हणून विचारतो. पप्पी देणार? इतपर्यंत ठिक होतं.पण चॉकलेट म्हटलं तर. लहानपणी काम करण्यासाठी चॉकलेट मागितले कि समजून जायला हवं कि हा मोठेपणी काय काय दिवे लावणार!! अहो अभ्यास करण्यासाठी मार नाही खात आता चॉकलेट खातात मुलं. आणि आई!! आईच तर विचारुच नये. मुलाने काम करण्यासाठी खाऊ मागितला कि मुलाची आई मध्ये बोलणार च. अहो एकूलत एक लेकरू आहे तुमच. एक रूपयाचं चॉकलेट तर मागतोय. पूर्वी अस नसायचं. वडील बाहेरून घरी आले आणि वडिलांनी फक्त त्याच्या कडे पाहिले तरी तो समजून जायचा आणि पळतच घरात घुसायचा. तेही समोर नव्हे. कुठे तरी कानोड्यात जाऊन लपून बसायचा. चॉकलेट तेव्हा नव्हतेच. साध्या लिमलेटच्या गोळ्या मिळायच्या. पण त्या हि मागणे अशक्यप्राय गोष्ट होती. समजा चुकून माकून मुलाने मागितलीच तर आईच ओरडायची आणि झाडू घेऊन खाऊ पाहिजे तुला. आई मारणार नाही पण उगारणार. तरीही मनात आईविषयी आदरयुक्त भिती असायची.
हल्ली प्रत्येक जण आपला स्वार्थ बघतो. लहान मुल असो, आईवडील असो किंवा आणखी कोणी. काही फायदा असेल तरच काम करायच. नाही तर संबंध ठेवण्यात काही हशील नाही. असे बोलून सुद्धा दाखवणार.
हे तर माणसांचं झालं. अहो पशूपक्षी सुध्दा स्वार्थ जपतात. तुम्ही त्याला खायला दिले तरच तो तुमच्या जवळ येणार. शेपटी हलवणार किंवा पायाशी लोळन घालणार. तुम्ही एक दोन दिवस दिले आणि नंतर दुर्लक्ष केल तर त्याच वागणं बघा. तो सुद्धा तुमच्याकडे दुर्लक्ष करतो. अगदी जवळ नव्हे थोड लांब थांबणार. तुमच्या न बघता नजर ठेवणार. तुम्ही आवाज दिला तरी दुर्लक्ष करणार, न ऐकल्यासारखे करणार. दोन तीन वेळा आवाज दिल्यावर हळू तुमच्या कडे बघणार. पण भावनाशून्य नजरेने. हा हि स्वार्थच नाही का??
आईवडील, भाऊ बहिण, मुलं, नातेवाईक, मित्र, शेजारीपाजारी, सहकारी सर्व सर्व जगच स्वार्थी झालयं.
मित्रांनो, विषय खूप मोठा आहे. पण आता मला ही लिहायचा कंटाळा आला आहे आणि तुम्हाला ही वाचायचा कंटाळा येईल म्हणून आटोपट घेतो.
लेख आवडला का? आलडला असेल तर प्रतिक्रिया अवश्य द्या.
आणि माझ्या या स्पष्ट भावनांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व.
(4821864)
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आकाशात जेव्हा ऊन आणि पावसाचा संघर्ष असतो, तेंव्हाच इंद्रधनुष्य तयार होते.
आयुष्य हे असेच असते. सुखदुःखाचे हेलकावे घेतच चालावे लागते.
तडजोडीमुळे नुकसान होत नाही, तर संधी मिळते, इंद्रधनुष्य फुलवण्याची..!
🌹🌷शुभ प्रभात🌷🌹
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
www. koshtirn.wordpress.com
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐