माझे ब्लॉगिंग

मित्रांनो आज मला खूप आनंद होतोय.

कारण काय ते नाही विचारणार?

बर विचारा!

अहो आज मी सहज  ईंडीब्लॉगर (indiblogger) वर गेलो आणि आपल्या ब्लॉग्स ची सद्यःस्थिती काय आहे हे तपासले तर मला आश्चर्य झाले. कारण माज्या प्रत्येक ब्लॉग ची स्थिती अतिशय उत्तम आहे.

माझ्या मना या माझ्या अतिशय आवडत्या ब्लॉग ची ईंडी रेन्किंग आहे ८१, गुगल पेज रेन्किंग आहे ४. Alexa रेन्किंग आहे ४.०२ . येथे आणखी एक महत्वाचे सांगायचे आहे कि माझ्या मनाची गुगल रेन्किंग नोवेंबर २००९  पासून आता पर्यंत ३ ते ५ च्या दरम्यानच आहे.  येथे बघा.

माझा हिंदी ब्लॉग आहे ‘ कुछ पल’ त्याचे स्टेटस

माझा इंग्रजी ब्लॉग आहे  My Blog. ह्या ब्लॉग वर मी फारच कमी लिहितो.  जवळ जवळ एक महिन्यापासून मी त्यावर काहीच लिहिले नाही. तरी हि त्याची पेज रेंक जानेवारी मध्ये वाढून ३ झाली आहे.  एकूण विजीटर्स आहेत ७५२७ फक्त.

माझा गणिताचा ब्लॉग मेजिक मेथ्स वर मी २७/०३/२०१० नंतर एक हि पोस्ट टाकलेली नाही तरीही त्याची गुगल पेज रेंक सतत २ च आहे.

युरेका!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!


Advertisements

बुटका माणूस

आपल्या देशात पूर्वीच्या काळातील इतिहासाचे बरेच पुरावे किल्ल्यांच्या रुपात अस्तित्वात आहे. जसे मुरड जंजिरा, मुंबईतील सायन चा किल्ला, वसईतील किल्ला, मध्यप्रदेशातील अशीरगड किल्ला असे बरेच किल्ले आज हि अस्तित्वात आहेत. माझा जन्म जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील फ़ैज़पुर या गावचा आहे. १९६८ साली आम्ही सर्व, मोठे भाऊ नौकरी साठी नेपानगर या मध्यप्रदेशातील गावी गेल्यामुळे, राहायला गेलो. माझा जन्म १९५९ चा म्हणजे मी तेव्हा ९ वर्षाचा होतो.  नेपानगर या गावाजवळ बुऱ्हानपूर रस्त्यावर अशीरगड हा शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ला आहे. त्या किल्ल्यावर आम्ही शाळेतील मित्र सायकल वर मला पूर्णतः आठवत नाही पण ८-९ मध्ये असू. माझ्या बरोबर माझे मित्र होते, प्रकाश चौधरी, कृष्णकांत किरंगे, रवींद्र पवार, विजय शाह आणखी हि असावेत पण नाव आठवत नाही आता.
किल्ल्यावर बर्याच आणि मोठ मोठ्या म्हणजे उंच असलेल्या पायऱ्या चढून जावे लागले होते. तेव्हा लहान असल्याने मजा येत होती म्हणून भराभर चढून ही गेलो. वर गेल्या वर त्या किल्ल्याचे स्वरूप व विस्तार बघून मी थक्क झालो. अबबबब किती उंच उंच भिंती, किल्ल्यावर विहिरी, मोठ मोठे दरवाजे. ते चित्र बघून माझे लहानसे मन थक्क झाले होते. विहिरीला  स्वच्छ व मधुर पाणी होते. विशेष म्हणजे उन्हाळ्याचे दिवस होते तरी ही  त्या किल्ल्यावरील विहिरीला पाणी होते. याचे आश्चर्य वाटत होते. त्या किल्ल्याचे जाड जाड व वजनदार दरवाजे.  इतकेच नाही तर त्यांच्या ज्या कड्या होत्या त्या ही  जाड होत्या. त्या दाराला आम्ही सर्व मित्रांनी हलवायचा प्रयत्न केला होता. पण नो सक्सेस. किल्ल्याचे मी प्रथमच दर्शन केले होते. त्यामुळे अचंभित होणे स्वाभाविकच होते. मला प्रश्न पडायचा की एव्हडी मोठीकडी, कुलूप अगडबंब दरवाजे कसे उघडले जात असतील. निश्चितच त्याकाळी मोठ मोठी ताकदवान आणि उंच मनसे तेव्हा असावीत. नाही तर किल्ल्याच्या भिंती कश्या तयार केल्या असतील. त्या ही डोंगरावर आणि एकावर एक दगड ठेऊन. हे काम तर आताच्या माशिनीने ही शक्य वाटत नाही. असे माझ्या बालमनाला तेव्हा वाटले होते.
तेव्हा पासून तो विषय माझ्या मनात होता. नंतर एकदा त्याबद्दल वडिलांकडे ह्या विषयावर चर्चा केली होती.  तेव्हा त्यांनी मला त्यांच्या लहानपणाची एक हकीकत सांगितली होती. त्यांचे वास्तव्य जळगाव जवळच्या पाळधी या गावी होते. खरे म्हणजे आम्ही मुळचे पाळधीकरच. वडिलांचा जन्म तेथीलच. त्यांनी सांगितले ते १०-११ वर्षाचे असतांना  जळगाव जवळील  एका किल्ल्यावर गेले होते. तेव्हा त्यांनी तेथे एक राक्षसासारखा उंच आणि धीप्पाड मनुष्य बघितला होता. त्याने वडिलांना कडे वर घेतले होते. ते तर घाबरून रडत होते. सांगायचा तात्पर्य असा की पूर्वी खूप उंच अशी मनसे अस्तित्वात होती. पूर्वी म्हणजे खूप पूर्वी नव्हे तर आता १००-१५० वर्षापूर्वी. त्याचा हा दुसरा  पुरावा.

माझे इंदोर शहरात वास्तव्य असतांना मी देवी अहिल्या यांच्या राजवाड्याला भेट दिली होती. तेव्हा तेथे त्या काळातील हत्त्यार मी पाहिली होती.  त्यांचे वजन व उंची बघून आताचा मनुष्य ते हाताळू शकणार का हीच शंका मनात आली. कमीत कमी ६ फुटी भाले होते. तलवारी कमीत कमी ४ फुटी तरी असतील. मला वाटते मनुष्य आपल्या

चिलखत

उंचीपेक्षा जास्त लांबीचा भला हाताळू शकत नाही. यावरून असे वाटते की तेव्हा मानव खूप उंच असावा.  याशिओवाय तेव्हा स्वतःच्या संरक्षणासाठी चिलखत घातली जात होती. ती लोखंडी होती. त्यांचे वजन ही खूप जास्त् असावे.  आताचा मानव ते परिधान करून लढू शकेल? अहो परिधान करून त्याचे वजन तरी पेलेल का हीच शंका वाटते.

मला वाटते हळू हळू मनुष्य लहान होत गेला असावा आणि पुढे ही त्याची उंची कमी होईल अशी शंका वाटते.

 

फेसबुकचा धन्यवाद

मित्रांनो हल्ली सोसिअल साईट्स चा बोलबाला आहे. सध्या फेसबुक हि साईट सर्वात जास्त चालते असे वाटते. मी सुध्दा ह्या साईटवर आहे. ह्या साईट वर मला बरीच मित्र मंडळी भेटली. पण सर्वात महत्वाचे म्हणजे मी १९७७ मध्ये ११ वी पास झाल्यावर ज्या शाळेतून बाहेर पडलो त्या शाळेतील मित्र या साईटवर मला भेटली. इतकेच नव्हे तर मला त्या काळात म्हणजे १९७२ ते १९७७ मला ज्या  शिक्षकांनी शिकविले ते सुध्दा ह्या साईटवर भेटले हे आश्चर्यच म्हणावे लागेल. १९७७ म्हणजे आजपासून ३३ वर्षापूर्वी ते मला शिकवीत होते. त्यावेळी त्यांचे वय सुमारे ४० तरी असावे. यावरून आज त्यांचे वय सुमारे ७३-७४ तरी असेल. या वयात माझे शिक्षक नेट वर आहेत याचा मला अभिमान वाटतो. हे पहा मला केमिस्ट्री शिकविणारे शिक्षक. ह्यांचे नाव सुध्दा रवींद्रच होते. सारख्या नावाचे असल्याने आमचे जमत नव्हते. आता त्याकाळातील आठवणी येतात आणि हसायला होते. मी कायम वर्गात पहिला असायचो आणि सरांचा आवडता विद्यार्थी वेगळा होता.

श्री रविंद्र परांजपे सर्

हे आमचे गणिताचे व भौतिक शास्त्र शिकविणारे सर्.

श्री शर्मा सर्

सरमा सरांचा मी आवडता विद्यार्थी होतो.

ह्यांना बघून आपण परत लहान झाल्यासारखे वाटते. मला वाटते असे प्रत्येकाला होत असावे. आपल्या प्राथमिक शाळेच्या सरांना पाहून आपण पुनः शाळेत जातो कि काय असे वाटायला लागते. नाही का?

याच फेस बुक वर मी इतर हि काही मित्रांना शोधायचा प्रयत्न करीत आहे पण ते काही सापडत नाही. मी तर माझ्या हिंदीच्या ब्लॉगवर त्याच्या बद्दल पोस्ट सुध्दा टाकली होती. कोण जाणे तो जगातल्या कोणत्या कोपर्यात असेल आणि कंटाळा आल्यावर वाचेल. पण तसे काही घडले नाही. माझ्या कडे आज हि त्या मित्राचा फोटो आहे. फोटो सुध्दा मी ब्लोगवर टाकला होता. त्या पोस्ट ची लिंक येथे देत आहे.

http://ravindrakoshti.blogspot.com/2009/11/blog-post_08.html

कस मी जगु ?

पुण्याला बदली काय झाली मला शिक्षाच मिळाली. अहॊ काय सांगू मी नेट वर बसताच येत नाही हो. आणि ते तर माझे जिव की प्राण झाले आहे मागिल वर्षभरापासुन! अरे हो माझ्या मनाला १ वर्ष झाल असाव, थांबा जरा तपासतो……………………………………………………………………
अरे माझ्या मनाचा वाढदिवस निघुन गेला की. मित्रांनो मी किती कमनशिब आहे बघा. माझ्या ब्लॊगचा पहिला वहिला वाढदिवस सुद्धा साजरा करु शकलो नाही. २०-०८-२००९ रोजी माझ्या मनावर माझी पहिली पोस्ट ‘पोळा‘ कोरली होती.  २० तारखेला मी माझ्या ब्लॊग चा वाढदिवस साजरा करायला हवा होता.
पुण्यामधे बदली होऊन दोन महिने झाले आणि सहकुटुंब येऊन एक महिना झाला. घरी फोन लागला पन ब्रॊड्बेंड अजुन लागलेल नाही. तपास केल्यावर एक महिना लागेल असे सांगण्यात आले. कोण जाणे किती दिवस लागतील. पण हे दिवस नेट शिवाय घालविणे अवघड जात आहेत. जी.पी.आर.एस. मुळे थोड्या प्रमाणात करता येते पण गती मिळत नाही. म्हणुन मी बझ व ब्लॊग वर सद्ध्या जवळ जवळ नसतोच.

हत्ती आणि मुंगी

मुंगी कानात चावते आणि हत्ती मारतो असे लहान पाणी ऐकले आहे. म्हणून हत्ती मुंगीपासून वाचण्याचा अतोनात प्रयत्न करीत असतो. पण एव्हढा मोठा हत्ती तो एव्हढ्या लहानश्या मुंगीला सध्या डोळ्यांनी बघू हि शकत नाही तर तिच्या पासून वाचायचा प्रयत्न करणे विफल ठरते. कोठून तरी ती मुंगी येते आणि पटकन एक चावा घेते आणि निघून जाते.  एव्हढा मोठा विशाल शरीर असलेला हत्ती छोट्याश्या मुंगी समोर  हतबल ठरतो. त्याला काहीच करता येत नाही. तो देवाला कोसतो. देवा तू मला येव्हढे मोठे शरीर दिले काय उपयोग. सर्व मला घाबरतात माझे मोठे शरीर बघून पण मी इतक्या लहान मुंगीला घाबरतो. देवा माझे जीवन निरर्थक आहे.

पण असे हातावर हात धरून बसून काहीच उपयोग नाही. काही तरी उपाय शोधायला हवा. हत्ती खूप विचार करतो. विचार करता करता तो चालत असतो जंगला तून आणि त्याच्या अंगावर मुंग्या पडत असतात. त्यांच्या पासून तो बचाव करत करत विचार करत असतो आणि समोर त्याला वाळवंट दिसते. तो विचार करतो ह्या मुन्ग्यांपासून वाचायचे असेल तर ह्या वाळवंटाचा सहारा घेणेच योग्य. कारण तेथे अति उष्णतेने मुंगी जगू शकणार नाही. आणि तो वाळवंटाचा सहारा घेतो. आता त्याला थोडा  दिलासा मिळतो. म्हणून तो अत्यानंदाने चालत राहतो. चालता चालता तो बराच लांब निघून जातो. त्याला तहान लागते. जवळपास कोठेच त्याला पाणी दिसत नाही. मागे पाहतो तर जंगल हि दिसत नाही.  शेवटी पाणी पाणी करत तो हत्ती मरून जातो. मरता मरता तो म्हणतो देवा अशा मरण पेक्षा मुंगीने चावा घेऊन आलेल मरण बर.

इंडिअन ब्लॉग रेंकींग

मित्रानो आजच मला इंडिअन ब्लॉग या साईट कडून माझ्या विविध ब्लॉगचे रेन्किंग कळविण्यात आले आहेत. सांगायला अत्यंत वाईट आटते आहे कि माझा “माझ्या मना” ह्या व इतर हिंदी व इंग्रजी ब्लोग्स चे रेन्किंग खाली सरकले आहेत. मागच्या काही दिवसांपासून मी लिहायचे कमी केले आहे त्याचा च हा परिणाम आहे. याची मला कल्पना होतीच पण मनाला खंत वाटत आहे. म्हणून हि पोस्ट.

माझ्या मनाचे सुरुवातीचे रेन्किंग ८२ होते मग ते कमी होऊन ८० वर आले. या महिन्यात तर ते ७१ पर्यंत खाली आले आहे.

कुछ पल या माझ्या हिंदी ब्लॉग चे रेन्किंग पण बऱ्याच खाली आले आहे जे आता ५५ इतकी खाली आली आहे.

माझा इंग्रजी ब्लॉग ज्याचे नाव आहे “माय ब्लॉग” व्हे रेन्किंग ३७ पर्यंत खाली आले आहे.

त्यातल्या त्यात एक आनंदाची बातमी आहे कि माझा गणिताचा ब्लॉग ज्याचे नाव मेजिक मेथ्स” असे आहे सुरुवातीपासून ४४ या अंकावरच अडकून पडला आहे.

मी बघितले कि माझ्या या मेजिक मेथ्स चे विजीटर्स खुपच कमी आहेत. त्यावरचे एकूण हिट्स फक्त ३२७ झाल्या आहेत. तरी हि त्याची रेन्किंग ४४ इतकी आहे. आणखी एक आश्चर्याची नमूद करण्यासारखी गोष्ट आहे कि गुगल ने त्या मेजिक मेथ्स ला पेज रेन्किंग ३/१० असे दिले आहे. याउपर आम्झ्या मनाचे विजीटर्स २०७८९ झाले आहेत तरी हि त्याचे पेज रेन्किंग ४/१० इतकेच आहेत.

मी विचार करून करून थकलो आहे कि हे पेज रेन्किंग/ इंडिअन ब्लॉग रेन्किंग साठी कोणता निकष लावतात हेच लक्ष्यात येत नाही.

जर कोणाला माहित असेल तर लिहावे अर्थात कोमेंत्स च्या रूपात.

सावधान कोणी तरी डोकावत आहे…

होय मित्रांनो हल्ली कोणाचा ही भरवसा राहिलेला नाही. अगदी आता आपल्याशी छान गप्पा मारणारा प्रवाशी चोर निघेल अशी पुसट्शीही कल्पना आपणाला नस्ते आणि नको ते घडुन जाते. कलियुग आहे राव कलियुग!  येथे काही ही घडु आणि घडविले जाऊ शकते. कोणत्या जमान्यात वावरत आहात तुम्ही. असे मग आपल्याला लोक बोलतात.

असाच एक प्रसंग येथे देत आहे.

काही दिवसांपासुन माझ्या असे लक्षात येत होते की माझा आय डी सतत बदलत आहे. ( गुगल मेल अकाऊंट ओपन केल्यावर खाली आपणाला आपला आय डी दिसतो.) तसेच एकाच वेळी माझे जी मेल अकाऊंट दोन आय डी वर ओपन झाल्याचे ही दिसले. बरेच दिवस असे होत होते. काही कळत नव्हते काय होते आहे ते. मुलगी पण प्रयत्न करित होती. काही उपयोग होत नव्हता.

परवा रात्री ११.३० च्या दरम्यान चेटींग ची विंडॊ अचानक सुरु झाली. बघितले तर आपला सुहास ऒनलाईन होता. बराच वेळ आम्ही चेटींग केल मी त्याच्या आय टी फ़िल्ड बद्दल माहिती घेतली. त्याच वेळी पुनः मेल विंडो मधील आय डी बदलत असल्याचे दिसले.  त्यालाच विचारणे योग्य असा विचार करुन मी सुहासचा हात पकडला. त्याने मला लगेच आपला एड्रेस आय डी चेक करणार्या साईट ची लिन्क दिली. त्यावर मी चेक केले तर माझा आय डी वेगळाच दखवित होता. पण तो पत्ता नाशीक्चा दाखवित अस्ल्याने तो योग्य होता. पण मग हा दुसरा आय डी कोणाचा? असा प्रश्न पडला. सुहास ने स्क्रिन शोट मागितला मी तो ्त्याला मेल केला. त्या बिच्यार्याने शोधुन काढले की तो आय डी बोक्स-बी वाल्यांचा आहे. त्याने मला त्या बद्द्ल  विचारले मी हो सांगितले. तो म्हणाला ” काका ते तुमचा मेल बोक्स सतत चेक करित आहेत. म्हणून तुम्ही अन- सब्स्क्राईब करा” मी लागलिच कामाला लागलो. आणि त्यांची लिंक काढुन टाकली व अन- सब्स्क्राईब करुन टाकले. तसे लगेच पास्वर्ड बदलुन टाकला.

दुसर्या दिवशी त्यांनी बोंबा बोंब केली. तुमचा पास्वर्ड बदलला गेला आहे. तुम्ही नविन पास्वर्ड द्या. मी दाद दिली नाही. तिसर्या दिवशी म्हणजे आज एक अन नोन मेल आला की कोणी तरी चुकुन  कोणत्या तरी साईट ला अन- सब्स्क्राईब केले आहे. तुम्ही पुनः सब्स्क्राईब करा. या वेळी त्यांनी बोक्स बी चे नाव लपविले होते.

झाले असे की मला काही दिवसांपुर्वी एक मेल आला होता. बोक्स बि असे काही तरी नाव होते त्या कंपनीचे. मी रजिस्टर केले तर मला html कोड दिला गेला तो मी माझ्या हिंदी ब्लोग कुछ पल वर चिकटविला. त्यांच्या मार्फत मला मेल येऊ लागले. त्यांनीच हा गोंधळ घातला होता.

माझी सर्व मित्रांना विनंती आहे की अशा अनोळखी मेलला लगेच चेपुन टाका नाही तर ते या बिन भिंतीच्या घरात घुसुन आपली काय काय माहिती घेतील कोण जाणे.

जर इतरांना असे काही अनुभव आले अस्तील तर त्यांनी ते जरुर शेअर करावे.म्हनजे सर्व सावध र्होतील.