खाजगी जंगल

मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल न कि येथे जंगल संपत चाललयं आणि खाजगी जंगल कस असेल?

विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ पहा. व्हाट्सएपवर आलेला आहे. हिस्ट्री चैनलवरचा वाटतोय.

एक भारतीय सदग्रुहस्थ आहेत. त्यांची पत्नी विदेशी आहे. 30 वर्षापूर्वी ते भारतात आले तेव्हा त्यांनी पाहिले येथील जंगल तर संपत चाललयं. तेव्हा त्यांनी निर्णय घेतला आणि अमेरिकेतील सर्व विकून दक्षिण भारतात 30 एकर जागा घेऊन राहायला लागले. त्या जागेत त्यांनी स्वतःच म्हणजे खाजगी जंगल उभारले आहे. आज हे जंगल 300 एकर जागेत पसरले आहे. पहा हा व्हिडीओ.

अक्षयवट…

मित्रांनो, दर वर्षी पाऊस हा कमी कमी होत चालला आहे. जवळजवळ दर वर्षीच दुष्काळसद्रुष्य परिस्थिती निर्माण होत असते. वर्तमान पत्र किंवा टि.व्हि. रिपोर्ट मध्ये आपण वाचत/पाहत असतो जंगल कमी होत चालले असल्याने ग्लोबल वार्मिंग दरवर्षी वाढत चालले आहे. म्हणून पाऊस कमी पडत आहे.

महाराष्ट्र शासनाने दरवर्षी कोट्यवधी झाडे लावायचे उपक्रम राबविले आहेत.

याबद्दलचा म्हणजे झाडे लावण्याबद्दलचा माझा अनुभव मी शेअर करू इच्छित आहे.

माझी 2003 मधे मुंबई हून नाशिक ला बदली झाली. तेथील संस्थेचा परिसर खूप मोठा होता. खूप कार्यालयं होती एकाच परिसरात. त्यात माझे ही होते.

बसके ऑफिस असल्याने समोर भरपूर जागा होती. परिसरात भरपूर वडाची झाडं होती. मला कल्पना सुचली कि वडाच्या झाडाच्या कलम आपण लावून बघू. प्रयोग सफल झाला तर छानच होईल. पावसाळ्यात मी हा प्रयोग करायचे ठरवल.

स्टॉफमधील काही सहकार्यांना सोबत घेतले आणि एका वडाच्या झाडाच्या तीन फांद्या काढल्या. ऑफिस समोर तीन खोल खड्डे करवून घेतले. तीन्ही फांद्या ह्या खड्यांमधे रोवल्या. न विसरता रोज त्यांना पाणी द्यायचे.

आठवड्याभरात लक्षात आले कि तीन कलमांपैकी दोन कलमा जगायची शक्यता आहे. मग त्यांचे वर लक्ष केंद्रित केले. भाग्य माझे कि त्या दोन्ही कलमा जगल्याही. त्यांना पालवी फुटायला लागली. पण माझे एक चुकले होते. एव्हढ्या मोठ्या वडाच्या कलमा लावतांना दोघांमध्ये अंतर कमी ठेवले. साधारण महिन्यानंतर असे लक्षात आले की दोघांपैकी एक कलम जळायला सुरुवात झाली. मात्र तिसरे कलम चांगल्यापैकी जगले आहे.

नोव्हेंबर 2009 मधे ते कलम बरेच मोठे होऊन त्याचे एका लहान झाडात रुपांतर झाले होते. आता बराच काळ लोटला आहे. आता तर ते खुपच मोठे झाले असेल. पुन्हा नाशिक ला जायचा योग आला तर त्या झाडाला अवश्य भेट देईल. त्याचा 2009 मधील फोटो खाली देत आहे. सोबत आहे एक कर्मचारी ज्यांची मदत घेतली होती.

मित्रांनो, या अनुभवावरून मला सूचवावेसे वाटते की वडाच्या झाडाचे कलम लावून जगवता येते तर मग तेच झाड आपण का लावत नाही. कारण ह्या झाडाचे आयुष्य सर्वात जास्त आहे. आपल्याकडे 300 वर्ष्यापेक्षा आयुष्याचे वडाचे झाड आढळले आहे. ह्या झाडाचा विस्तार प्रचंड मोठा असतो. खालील फोटो वरून बघा याचा विस्तार.

याशिवाय हे राष्ट्रीय वृक्ष सुद्धा आहे. ह्या वृक्षाचे पौराणिक ग्रंथात ही महत्त्व विषद केलेले आहे. आजच मी नेटवर वडाच्या झाडाबद्दल काही माहिती मिळते का म्हणून शोधल्यावर छान माहिती सापडली. त्यात याला अक्षयवट असे संबोधले असून इतर सर्व विषयांशिवाय या वटाचे वैज्ञानिक महत्त्व काय आहे ते पहा.

एक पूर्ण वाढलेले वडाचे झाड एका तासाला सातशेबारा किलो इतक्या प्रचंड प्रमाणात प्राणवायू वातावरणात सोडत असते. वडाच्या झाडाखाली वेळ व्यतीत करणे; म्हणजे शरीराला आवश्यक असणाऱ्या प्राणवायूची पूर्तता भरून काढणे. त्याला आकाराने मोठी व संख्येने भरपूर पाने असल्यामुळे तो जास्तीत जास्त कर्बवायू आणि इतरही अनेक विषारी वायू शोषून घेतो व हवा शुद्ध ठेवतो. वड उन्हाळ्यात दिवसाला दोन टन इतके पाणी बाष्प स्वरूपात बाहेर फेकतो. त्याचा उपयोग ढग बनण्यासाठी आणि हवेत आर्द्रता व गारवा निर्माण करण्यासाठी देखील होतो. पावसाळ्यात ढगातील पाणी खेचून घेऊन पाऊस पाडण्यास मदत करणे हेदेखील वडाच्या झाडाचे कार्य आहे. वटवृक्ष सदैव हिरवागार असतो व त्याच्या विशाल आकारामुळे तो भरपूर सावली देतो.

खालील वेबसाईट ला भेट द्याच. https://www.thinkmaharashtra.com/node/1871

श्री विक्रम यंदे यांनी ही माहिती संकलित करून “थिंक महाराष्ट्र” वर टाकली आहे.

इतके वैज्ञानिक गुणधर्म आहेत म्हणून आपल्या पूर्वजांनी रस्त्या रस्त्यावर वटवृक्ष लावलेले दिसून येतात. रस्ता रुंदीकरणाने मात्र हे वटवृक्ष खाऊन टाकले.

जर रस्तारुंदीकरणाच्या करारात एक वटवृक्ष तोडल्यावर त्याच्या फांद्या ंना रस्त्याच्या दुतर्फा रोवण्याची व जगवण्याची अट घातली तर असंख्य वटवृक्ष पहायला मिळतील.

पुर्वी चे खेड्यापाड्यातील रस्ते आठवतात का? प्रत्येक रस्त्यावर दोहो बाजुंना वटवृक्ष दिसत. पूर्वी दळणवळणाची साधनं नव्हती. तेव्हा बैलगाडी, घोडा किंवा पायी चालतच गावोगावी प्रवास केला जात असे. तेव्हा हेच वटवृक्ष प्रवाशांना सावली देत असतील न? रानावनात सुद्धा वटवृक्षाच्या फांद्या रोवल्या तर शैकडो वर्षे टिकेल असे वन तयार होऊ शकेल. अर्थात हे माझे मत आहे आणि मी या विषयातील तज्ञ मुळीच नाही.

असो माझे विचार कसे वाटले आपल्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून अवश्य कळवा. धन्यवाद….

पाण्याचे महत्त्व..

जीवनात पाण्याचे काय महत्त्व आहे हे ह्या लहानशा क्लिप वरून दिसून येईल.

पाण्याचा गोळा………

मित्रांनो आज जगात पाणी प्लास्टिक बाटलीत भरून विकल जात आहे. त्यामुळे तहान भागते पण एक वेगळा भयानक प्रश्न जगासमोर येऊन उभा राहिला आहे. रिकाम्या बाटल्यांच काय? त्यामुळे प्रदूषण प्रचंड वाढतय! व्हाट्स अप कोणी तरी हा व्हिडिओ शेअर केला. मला आवडला. पण याबद्दल खात्री केलेली नाही. 

पण मला वाटते कि पाणी . पिल्यावर बाटल्या जमा करण्यासाठी मोठ्या डस्ट बिन ठेवल्या व त्या बाटल्यांचे रिसायकलिंग करून वापर केला तर? किंवा त्याच कंपन्यांनी त्या बाटल्या घेऊन स्टरलाईज करून पुन्हा वापरल्या तर चालेल का? 

दुसर मत वाचून  जरा किळस वाटतो.

असो आपल मत नोंदवा जरूर

पावसाची बोंब- माझी एक कल्पना!!!

आपल्या देशाची संरचना विशिष्ट प्रकारची आहे. त्यामुळे आपल्या देशात उन्हाळा, हिवाळा व पावसाळा हे तीन मुख्य ऋतू आढळतात. मित्रांनो मागील काही वर्षापासून मी असे निरीक्षण केले आहे की आपल्याकडील हे ऋतू आपल्या ठराविक वेळेपेक्षा पुढे सरकू लागले आहेत. सन २००९ मध्ये सुध्दा दुष्काळ पडला होता. आता लगेच २०१२ मध्ये विदारक दृश्य सध्या तरी दिसत आहे.( अजून ही आशा आहे की नोव्हेंबर पर्यंत पाऊस येऊ शकतो) २००९ मध्ये व त्यापूर्वी ही कृत्रिम पावसाचे प्रयोग आपल्याकडे झाले आहे. पण आपली एक वाईट सवय आहे ती अशी की आग लागली की विहीर खोदायला सरसावणे. खरे तर आग लागेलच अशी कल्पना करून विझविण्यासाठी आधीच तरतूद करून ठेवणे

मेघा बरसो रे भाई!

आवश्यक असते. पण ते कधीच होत नाही. सांगायचा तात्पर्य की कृत्रिम पावसाचे प्रयोग प्रत्येक वर्षी करणे किंवा त्यासाठी तयारी ठेवणे का आपण आवश्यक  समजत नाही. आपण दुष्काळ पडण्याची वाट का बघतो.

कृत्रिम पाऊसाचा प्रयोग

या वर्षीच बघा जून जुलै मध्ये खूप काळे ढग तयार होता आहेत. पाऊस येईल असे वाटते आणि ते ढग पाऊस न पडता पुढे निघून जातात. जर आधी पासून तयारी ठेवली असती तर जून अखेर पासून कृत्रिम पाऊसाचे प्रयोग करून पाऊस पडता आला असता. म्हणजे ढगांसोबत येऊन पुढे जाणारे पाणी वाया गेले नसते.( पण ते ढगांमधील पाणी नेमके कोठे जाते त्याचे काय होते याचा शोध लावायला हवा.)आता जुलै अखेर आली आहे व आता कृत्रिम पाऊस पडायची तयारी करायला सुरुवात केली तर फार उशीर होईल. पण तरीही निराश न होता आता ही प्रयोग करायला हरकत नाही असे माझे मत आहे. अन्यथा हे वर्ष खूप वाईट असेल असे वाटायला लागले आहे.( १२ डिसेंबर २०१२ आठवत आहे  का?)

असो, पण माझा मुळ मुद्दा वेगळाच आहे. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी ढगांवर जे sodium iodide  किंवा जे  रसायन त्यांच्यावर सिम्पडावे लागते ते वर ढगांवर जाऊनच सिम्पडणे आवश्यक आहे का? ते आपण जमिनीवरून एखाद्या बॉम्ब च्या सहाय्याने का करू शकत नाही. असा एखादा बॉम्ब जो वर जाऊन  फुटेल आणि त्याचे जे आवरण असेल ते वरच विरघळून नाहीसे होईल. पावसाळी ढगाच्या काही भागावर जरी ते आढळले तर संपूर्ण ढगातील पाणी कोसळेल.

आणखी एक कल्पना आता हा लेख लिहत असतांनाच मला सुचली की आपल्या राज्यातील काही भाग असा आहे जेथे खुपच कमी प्रमाणात पाऊस पडतो. जसे मराठवाडा व इतर पठारी भाग. ह्या भागात पावसाळी ढग दर वर्षी येतात पण पाऊस कमी येतो. अशा भागात दर वर्षी ह्या बॉम्बचा उपयोग करून पाऊस पडला तर तेथील पाणी टंचाई नाहीसी होऊन कायमची डोकेदुखी निघून जाईल.

कृत्रिम पावसा बद्दलची  काही लिंक्स येथे देत आहे.

सन २००९ ची बातमी

Cloud_seeding

NASA makes their own rain clouds

बिन भिंतींची शाळा

सध्या वर्तमान पत्रात बिन भिंतीच्या शाळेचा विषय खुप चर्चिला जातोय. हे वाचुन मला माझे लहानपण आठवले. मी सुमारे १९७१-७२ मध्ये ६ वी ७ वी मध्ये असेल. माझा जन्म महाराष्ट्रातील्च. दुसरी पर्यंत मी येथेच शिकलो. परिस्थितीमूळे आम्हाला मध्यप्रदेशात जाव लागल. तेथे ५ वी पर्यंत मराठी शाळा होती. पण ६ वी पासुन हिंदीत शिक्षण घ्यावे लागले. तेव्हा आमचे प्राचार्य होते श्री पाठक सर. त्यांना वेगळं करण्याची खुप हौस होती. नेहमी ते वेगळे काही तरी करत असत. त्यांची शिकवण्याची पध्दतपण वेगळी होती.

विदेशात फ़ोरेस्ट स्कुलची संकल्पना आहे हे ह्या चित्रावरुन स्पष्ट होते. गुगल वरुन सापडलेले हे चित्र.

एके दिवशी त्यांनी फर्मान काढले की संपुर्ण शाळा जवळ जंगलात असलेल्या नदीकाठावर भरेल. ६ वी पासुन ११ वी पर्यंतची सायंस, आर्ट्स व कॊमर्स ची आमची शाळा. म्हणजे विद्यार्थी संख्या जास्तच. जंगल व नदी शाळेच्या जवळ म्हणजे १ ते दिड किलोमीटर अंतरावर होते. सकाळी सर्व विद्यार्थ्यांची प्रभात फेरी निघाली कि थेट नदीकाठावर जाऊनच थांबायची. मग वेगवेगळ्या झाडाखाली वेगवेगळे वर्ग भरायचे. सुटी होण्यापुर्वी सर्व विद्यार्थी रांगेने आधी शाळेत यायचे मग सुटी होत असे. निसर्गाच्या सान्निध्यात आमचा अभ्यास खुप छान होत असे. सर्व विद्यार्थी आनंदी असत.

mishra madam was teaching English

आमचे पाठक सर प्राचार्य असुन सुध्दा आम्हाला इंग्रजी हा विषय शिकवित असत. पण काही तास घेत असत. खरे सर वेगळे होते. ते नसले तेव्हा प्राचार्य शिकवित असत. त्यां

च्यामुळे माझी इंग्रजी भाषा छान झाली. त्यांनी आमच्या ११ वी च्या बेच (१९७७) वर खुप मेहनत घेतली होती. म्हणुन आमच्या एकमेव बेच मधुन सर्वात जास्त ५ विद्यार्थी इंजिनिअरिंगला गेले होते. निकाल पण खुप छान लागला होता. मी त्यांचा आवडता विद्यार्थी अत्यंत गरिब पण हुशार असल्याने त्यांना आवडत होतो. ११ वी मध्ये मी ्मेरिट मधे आलो होतो. जिल्ह्यात पहिला म्हणुन त्यांनी माझे खुप कौतुक केले होते. मला इंजिनिअरिंग कॊलेजला त्यांनीच प्रवेश मिळवुन दिला होता. फोर्म सुध्दा त्यांनीच मा

गविला होता. त्या

शिवाय कॊलेजच्या डायरेक्टरांना पत्र देऊन मला शिक्षणासाठी एखादी नौकरी किंवा आणखी काही मदत करण्याची विनंती केली होती. आज मी इंजिनिअर आहे निव्वळ त्यांच्यामुळेच. मी स्वतःला धन्य मानतो कि मला असे प्राचार्य लाभले.

माफ करा विषय भरकटला. तर बिन भिंतीची शाळा आम्ही लहानपणीच अनुभवली आहे.

आम्हाला त्यावेळी गणित शिकविणारे शर्मा सर व रसायन शास्त्र शिकविणारे रविंद्र परांजपे सर आता फ़ेस बुकवर भेटले आणि मी धन्य झालो.

अप्रतिम लग्न पत्रिका

मित्रांनो, जस जसा काळ बदलत जातो, नाविन्य पुर्ण वस्तु बाजारात उपल्ब्ध होत असतात. नाविन्य म्हणजेच जिवन असे म्हटले जाते. नुकतिच एका होऊ घातलेल्या लग्नाची पत्रिका प्राप्त झाली  आहे.  ही पत्रिका आमचे नविन साहेब ह्यांच्या मुलीच्या लग्नाची आहे. अप्रतिम आहे मला आवडली म्हणुन येथे शेअर करित आहे.

पत्रिका उघडण्यापुर्वी अशी दिसते.

पुर्णतः उघडलेली लग्न पत्रिका

आधीच्या चित्रात दिसणारे दोन आकर्षक दोरे दोन्ही बाजुला ओढले तर पत्रिका उघडली जाते. थोडी उघडली तर ती अशी दिसते. फुलासारखी.

तू आता ये रे बाबा!

आपणाकडे पाहुणे येत असतात. काही पाहुणे हवे हवेसे असतात तर काही नको नकोसे. काही पाहुणे नवऱ्याच्या आवडीचे असतात तर काही बायकोच्या. अहो, जर आपला मेव्हणा घरी आला तर तो आपल्याला २-३ दिवस बारा वाटतो. नंतर कबाब मी हड्डी होतो. तसेच बायकोचे असते. तिच्या माहेरच कोणी आल तर विचारायलाच नको. पण आपल कोणी आल तर कपाळावर ……. जाऊ द्या ते. पण एक पाहुणा अगदी नकोसा झाला आहे बघा.

अहो, पाऊस. जून मध्ये तो येतो आणि दिवाळी संपली तरी चिपकुनच बसलेला असतो. जायचे नावच घेत नाही. असे मागच्या ४-५ वर्षापासूनच चालले आहे. त्यापूर्वी तो अगदी वेळेवर यायचा आणि वेळेवरच जायचा. पण आता?

अहो देवाला सकले घालावे लागते त्याला जा म्हणण्यासाठी अशी परिस्थिती आहे. आता बघा नोव्हेंबर संपायला आहे पण तो काही केल्या जायला जायला तयार नाही. ह्याचे कारण काय? ग्लोबल वार्मिंग दुसरे काय. अजून हि आपण डोळे उघडले नाही तर काही दिवसांनी तो वर्ष भर येत राहील. त्या गोऱ्यांच्या देशा सारखा.

आताच आपणाकडे पिकांचे नियोजन बदलायची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनी व्यवस्थित अभ्यास करून नियोजन केले नाही तर असेच शेतमालाचे नुकसान होत राहणार.

मी तर मागच्या ३-४ वर्षापासून मित्रांना सांगत आलो आहे कि आता निसर्ग बदलला आहे.  आता पिक घेण्याची वेळ बदलावी लागेल. अन्यथा आपले काही खरे नाही. कारण आपण ग्लोबल वर्मिन्ग्कडे कानाडोळा करीत आहोत.