दिवाळी – पण फटाक्याविना

मित्रांनो आता दिवाळी अगदी आपल्या दारावर उभी राहून दरवाजा ठोठावून घरात यायची वाट पाहत आहे. आताच माझ्या मनाला एक अप्रतिम विचार चाटून गेला आणि मी जागा होऊन ही पोस्ट लिहायला बसलो. तसा मी कधीच फटाके फोडत नाही, पण मला वाटले कि आपण आपल्या सर्व ब्लॉग मित्रांना आवाहन करून ही दिवाळी फटाक्याशिवाय  साजरी करण्याचा आग्रह का धरू नये? आखिर हमारा भी कोई रिश्ता है! ( आहे न?) आहेच. आणि हे सर्व ह्या बिन भिंतीच्या घरात राहणारे सर्व सदस्य मान्य करतीलच.अशी मला खात्री आहे.

तर मित्रांनो आज आपण सर्वांनी हा प्रण करावा, शपथ घ्यावी कि “हा  दिवाळीचा  सण आम्ही  सपरिवार फटाक्या शिवाय साजरा करू व शक्य तितक्या आप्त व  मित्र- मैत्रिणींना(?) तसे करण्याचा आग्रह धरू”

फटाके फोडल्याने आवाजाचे प्रदूषण तर होतेच पण वायू प्रदूषण खूप होते जे अत्यंत  घातक असते. विषारी वायू त्यातून बाहेर पडून वातावरणात पसरतात आणि श्वासावाटे आपल्या फुप्पुसांपर्यंत पोहोचतात. चुकी च्या पध्दतीने  फटाके फोडले तर आग लागण्याचा संभव असतो. आवाजाने लहान मुलं व वृद्धांना त्रास होतो.  याशिवाय पैस्याचा विनाकारण चुराडा होतो. त्यात काय आनंद मिळतो देवच जाणोत.

ह्या विचाराने त्रस्त होऊन आताच मी फेसबुक वर एक ग्रुप तयार केला आहे ज्याला नाव दिले आहे, “फटाक्यांशिवाय दिवाळी” आणि मित्रांना या दिवाळीला फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे. काही मित्रांना मी स्वतः सदस्य केले आहे. आपण सुध्दा त्या ग्रुपचे सदस्य व्हावे असे मी आवाहन करतो.

तर “फटाक्याशिवाय दिवाळी!”

कचरा- जरा विचार केला तर

आज कचरा हा प्रत्येक शहरासाठी फार मोठी डोकेदुखी ठरत आहे. रोज  शेकडो टन कचरा शहरात तयार होत असतो. त्याची विल्ळेवात कशी आणि कोठे लावावी हि स्थानिक

 

कचरा

 

स्वराज्य संस्थांना डोके दुखी ठरत आहे. शरांचा दररोज विस्तार होत असल्याने कचऱ्याची शहराबाहेरील जागा शहरामध्ये येऊन जाते. पुनः नवीन जागा शोधावी लागते. पुनः शहर वाढते. असे चक्र सुरु आहे.

काही शहरांमध्ये कचऱ्यापासून खात निर्मिती केली जाते. काही ठिकाणी वीज निर्मिती करण्याचे प्रयोग होत असल्याचे समजते. पण यातून समाधानपूर्वक काही होऊ शकत नाही.

पण जर आपण थोडा विचार केला व सहकार्य केले तर खारीचा वाटा सहज उचलता येऊ शकतो. नाही नाही असे घाबरून जाऊ नका.  मी काही केर उचलण्याचे म्हणत नाही. माझे म्हणणे तर जरा ऐकून घ्या. मग विचार करा.

 

भाज्या

 

आज शहरामध्ये प्रत्येकाच्या घरी टेरेस/ बाल्कनी किंवा गार्डन  असतेच. असेल तर त्यात झाडे लावली जातात.  आपण दररोज ज्या भाज्या आणतो त्यात पाले भाज्या असतात, फळभाज्या असतात. ह्या भाज्या कापल्यानंतर त्यातून जो केर कचरा निघतो तो चाकू ने बारीक कापून किंवा किसनी ने किसून ह्या झाडांना घातला तर झाडांना खात घातल्यासारखे होते. त्याने झाडांची वाढ चांगली होते. मी स्वतः हा प्रयोग केला आहे. येथे पुण्याला होत नाही. ह्याने अर्धा कचरा कमी होतो. समजा एका घरातून एका दिवसाला सर्वसाधारण पाने १ किलो कचरा निघत असेल तर त्यात भाजी

 

फळ

 

आणि फळे ह्यांचाच कचरा ६००-७०० ग्राम असू शकतो. हा आपण रोज फळ आणत असतो. त्यातील केळीची साल झाडांसाठी उत्तम खताचे काम करते. मी तर आंबयाची साल, पपई, टरबुज च्या सालीचा किस, चिकू ची साल, असे जवळ जवळ प्रत्येक फळाचे खत झाडांना घालत होतो.

तर मित्रांनो आपल्याकडे बाल्कनीमध्ये कुंड्या असतीलच, तर मी सुचविलेला प्रयोग कराच. खूप उपयोग होईल. झाडं चांगल्या प्रकारे वाढतील. त्यामुळे निसर्गाचे  रक्षण केल्यासारखे होईल.

लग्न पत्रिका

लग्न म्हटली कि लग्न पत्रिका आल्याच. पूर्वी घरोघरी गो गावी फिरून अक्षदा वाटून तोंडी निमंत्रण दिली जात असत. साध्या  सुध्या पत्रिका वाटत असत. पण हल्ली पत्रिकेबद्दल होड लागली आहे असे वाटते. भला तुम्हारी साडी मेरी साडी से…………………या आविर्भावात माझी पत्रिका त्याच्या लग्न पत्रीकेपेक्षा सरस कशी राहील याबद्दलची चढाओढ लागलेली दिसते. दरवर्षी करोडो पत्रिका छापल्या जात असतील आणि क्षणार्धात त्यांचा उपयोग नाहीसा होत असेल. इतकेच नाही तर त्यांचा उपयोग संपल्यावर त्या कचऱ्यात फेकल्या जातात आणि त्या पत्रिकेवर छापलेले गणपतीचे फोटो………….

उद्या आमच्या नातेवाईकाकडे मुलाचे लग्न आहे. त्यांनी लग्न पत्रिका  छापल्याच नाहीत. मला याचा फार अभिमान वाटला. जर त्यांनी लग्न पत्रिका छापल्या असत्या तर कमीत कमी ५०० पत्रिका लागल्या असत्या. वजन झाले असते कमीत कमी एक किलो. कदाचित जास्त सुध्दा झाले असते कारण मुलगा आय. टी.  क्षेत्रातला आहे. म्हणजे पत्रिका साधी निश्चितच नसती. आता पत्रिका त्यात दोन जाडजूड पृष्ठे त्यावर लिफाफा. एक किलो कागदाला किती झाड लागले असते. पर्यावरणाचा किती ऱ्हास झाला असता.

कधी कधी असे वाटते आपले पूर्वज खरोखर समजूतदार होते. ज्या रीतीभाती त्यांनी सुरु केल्या आहेत त्या अतिशय योग्य आहेत.

सर्वांनी असा विचार केला तर खूप बरे होईल आणि पर्यावरणाचा र्हास सुध्दा होत नाही.

वाटर हार्वेस्टींग

आता पावसाळा सुरु झाला आहे.  या वर्षी पाऊस चांगला येईल अशी अपेक्षा आहे. पण तरी ही आपले सामाजिक कर्तव्य म्हणुन शक्य तितके पावसाळी पाणी वाचविले तर चांगले. रेन वाटर हार्वेस्टींग हे योग्य पाईप लाईन टाकुन टाकी तयार करुन करता येते. पण असे काही ही न करता किंवा कोणता ्ही अतिरिक्त खर्च न करता ही रेन वाटर हार्वेस्टींग केले जाऊ शकते. मी स्वतः ते केले आहे. दोन वर्षा पुर्वी केले होते. मगच्या वर्षी पाऊसच आला नाही त्यामुळे करु षकलो नाही. या वर्षी मी घरी नसणार पुण्याला बदली झाली आहे न!

चला आता मी उपाय योजना सन्गतो.

शहरा मधे जवळ जवळ प्रत्येक फ़्लेट्ला टेरेस किंवा बाल्कनि असतेच. या टेरेस मधे आपण सहज पाणी साठवु शकतो. जेव्हा पाऊस सुरु होतो तेव्हा या टेरेसचे ड्रेन पाईप्चे तोंड बंद करावे. कशाने करावे? काय राव आता हे सुध्दा मला सांगावे लागेल का? जे साधन मिळेल त्याने ते बंद करावे   आणि शक्य असेल तितके पाणी साठवावे.  अर्थात टेरेस्च्या क्षमतेप्रमाणे. मग हे पाणी घरातील एखाद्या प्लास्टिक च्या मोठ्या टाकीमधे ओतुन घ्यावे. हे काम मात्र जिकिरिचे आहे. एका वेळी २०० लिटरपेक्षा जास्त पाणि साठा होतो.  एका समजुतदार कुटुंबासाठी २ दिवस ह्या पाण्याचा वापर सहज होऊ शकतो.

अशी ही एक वीज निर्मिती-भाग-१

मित्रांनो आज आपणाकडे विजेची खुपच कमतरता भासत आहे. शहरामध्ये सकाळ संध्याकाळ २-२ तास वीज नसते. वरून हा उन्हाळा. दिवस काढणे कठीण होते. आपल्या शहरांचे ठीक आहे पण खेडे गावात तर काही विचारूच नका. दिवस दिवस भर वीज नसते.

या वर मात करण्यासाठी मी मागे इको फ्रेंडली हाऊसच्या माझ्या काही संकल्पना लिहिल्या आहेच. आज मी माझी आणखी एक संकल्पना येथे मांडत आहे. मुंबईमध्ये मोठ मोठ्या इमारती आहेत. ३०-४० माळ्याच्या इमारती आहेत. माझ्या मनाला असे वाटले कि ह्या इमारती मध्ये त्यांनी स्वतः वीज निर्मिती केली तर थोडा फार का होईना हातभार लागेल. ती कशी शक्य होईल याचा विचार केल्यावर मला वेगवेगळ्या कल्पना सुचल्या ज्या सहजपणे साकारणे शक्य होईल. त्यातील एक येथे मांडत आहे.

या मोठाल्या इमारती मध्ये बरीच कुटुंब राहतात. एका माळ्यावर चार फ्लेट गृहीत धरले व एकूण ३० माळे धरले तरी १२० फ्लेट होतात. बरयाच परिसरात अश्या ३-४ इमारती असतात. सर्व मिळून ४x१२० म्हणजे ४८० कुटुंब आणि प्रत्येक कुटुंब चौकोनी आहे असे गृहीत धरल्यास ४८० x ४ म्हणजे १९२ ० माणसे त्या इमारतीत राहत असतील. एका माणसाला एका दिवसात १०० लिटर तरी पाणी लागत असेल. म्हणजे सर्व इमारती मिळून १९२००० लिटर पाणी रोज लागत असेल. जर शौचालयाचे पाणी वेगळे केले तर उर्वरित पाणी वापरून काही प्रमाणात का होईना वीज निर्मिती करणे सहज शक्य होईल. समजने सोपे जावे म्हणून मी एक स्केच तयार केले आहे ते येथे टाकले आहे. बघा.

वीज निर्मिती साठी हेड मिळावा म्हणून मी येथे खाली दोन माळे म्हणजे ८ फ्लेट सोडले आहेत. सध्या जल विद्युत निर्मिती साठी पिको टर्बाईन सुद्धा उपलब्ध झाले आहेत. असे छोटे टर्बाईन वापरून वीज निर्मिती केली तर कमीत कमी इमारतीमधील कॉमन लाईटींग ची जरी सोय झाली तरी खूप वीज बचत होईल.

कशी वाटली माझी ही संकल्पना जरूर कळवा.

मी पाहिलेली स्वप्न

मित्रांनो मला लहानपणा पासुनच नको ती व झेपवणार नाहित अशी स्वप्न पाहायची सवय आहे. आज सुध्दा माझी ती सवय मोडलेली नाही. मी साधारण पणे १०-११ वर्षाचा असतांनाची गोष्ट असावी. मी शक्यतो मित्रांमधे कधी खेळायला जात नसे. पण कधी कधी जास्तच आग्रह झाला तर जावे लागे. माझ्या अशा वागण्याने माझा लहान भाऊ माझ्यावर भारी चिडत असे. एकदा मी खेळायला नकार दिल्याने त्याला इतका राग आला की त्याने माझ्या तर्जनीवर जोराने चावा घेतला. माझा तो भाऊ जगाला सोडुन गेला पण माझ्या जवळ आयुष्यभरासाठी एक आठवण ठेवून गेला. आज ही माझ्या बोटावर त्या चाव्याची खुण आहे. असो.

असेच लहान असतांनाचा एक प्रसंग. मी काही मुलांना फुगा फुगवुन खेळ्तांना पाहत होतो. अचानक एका मुलाच्या हातुन तो अर्धवट फुगविलेला फुगा सुटला आणि तो त्याच्या पासुन लांब उडत गेला. त्यावरुन त्यावेळी माझ्या लहानशा डोक्यात एक कल्पना सुचली.  हा फुगा विरुध्द दिशेला उडाला. याचा उपयोग करुन आपण हवेवर चालणारी  कार तयार का करु शकत नाही. बस मग काय हे विचार माझ्या मनात तेव्हा पासुन घर करुन बसले होते. माझ्या मोठ्या भावाला मी माझे विचार सांगितले. पण काही करुशकलो नाही.

मला नक्की आठवत नाही पण एखाद वर्ष झाल असाव, सकाळ या मराठी दैनिकात एक बातमी झळकली होती. इटली मधे कोणी तरी हवेवर चालणारी कार तयार केली अशी बातमी होती. मी आनंदित झालो. त्या कंपनीचा दुवा दिला होता. मी लगेच त्या कंपनीची वेब साईट बघीतली. त्यांचा कॊंटेक्ट मेल शोधला आणि त्यांना अभिनंदनाचा मेल केला. त्यात माझ्या लहान्पणाच्या स्वप्नाचा उल्लेख पण केला. त्यांनी उत्तर ही पाठ्विले. मग बर्याच वेळा आमची विचारांची देवाण्घेवाण झाली. एके दिवशी मी त्यांना एक मेल पाठविली की मी त्या हवेवर चालणार्या कार चा खुप विचार केला मला एका प्रश्नाचे उत्तर सापडले नाही. तुम्ही ती व्यवस्था कशी करणार आहात.

त्यावर त्यांचा मेल आला की आम्ही तुम्ही सांगितलेली प्रोबलम आमच्या इन्जिनिअर ला पाठविलि आहे. तो काय म्हणतो तसे आम्ही कळवु. काही दिवसांनी त्यांचा मेल आला की आम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही म्हणुन आम्ही तो हवेवर चालणार्या कार चा प्रोजेक्ट बंद करुन टाकला. आता तर त्यांची ती वेब साईट सुध्दा बंद केली आहे.

त्यावेळी त्या कंपनीसोबत झालेल्या मेल चे स्क्रिन केप्चर येथे देत आहे.

अशी स्वप्न बघायची माझी लहानपणा पासुनची  सवय आहे.

मी खुप लहान असतांना टाळ्यावाजवुन विजेचे दिवे लावता येऊ शकतात याचा ही विचार केला होता. मी काहीच करु शकलो नाही याची मला खंत वाटते. परिस्थिती माणसाला हतबल करुन टाकते.

आज थोडी फार परिस्थिती बरी आहे तर वेळ नाही. आज सुध्दा माझ्याकडे अशा भन्नाट कल्पनांचा भांडार आहे ज्या जगात अस्तित्वात नाहीत. मी बर्याच वेळा माझ्या आयडिया पेटेंट करुन घ्याव्या असा विचार करतो. याबद्दल कोणाला काही माहित असेल तर जरुर मार्गदर्शन करावे.

सर्वांना होळीच्या शुभेच्छा

आज होळी आहे. या निमित्त सर्व मित्रांना शुभेच्छा! उद्या सर्वांनी रंग खेळायचा. मी बर्याच वर्षापासुन रंग खेळलेलॊ नाही. पण या वर्षी का माहित नाही लहान पणाची होळी राहुन राहुन आठवत आहे. आम्ही मी लहान असतांना मध्यप्रदेशातील नेपानगर या छोटेखानी शहरात राहात होतो. जवळ जंगल होते. त्या जंगलात पळसाची भरपुर झाडे होती. त्या झाडाची फुल आणुन आम्ही घरीच रंग तयार करित असु. तो खरा रंग असायचा. आता मिळतात हे केमिकल चे रंग. कधी कधी सुट करत नाहीत, मग त्रास होतो.

इंदोरला असतांना खुप रंग खेळत असु. त्याकाळी तेथे संपुर्ण शहर एकत्र होळी खेळत असे. होळीच काय दसरा सुध्दा एकत्र साजरा होत असे. शहरवाशीय १०-११ पर्यंत राजवाडा परिसराजवळ एकत्र जमायचे. आणि मग तेथुन सर्वांनी रेली काढायची. रेलीच्या पुढे व मधे सुध्दा २-३ रंगाच्या टाक्या भरलेल्या ट्रक त्यावर मोठे पंप असायचे. अशी ही रेली शहरभर फिरायची लोकांवर रंग उडवित.

सर्वांना पुन्हा एकदा होळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

होलीका दहन

मला युट्युब वर इन्दोरमधे साजरी होणारी होळी बद्दल एक व्हिडीओ सापडला तो येथे देत आहे.

ईको फ़्रेन्डली वसाहत– माझी एक संकल्पना

हल्ली इको फ़्रेन्डली चे जग आहे. ग्लोबल वार्मिंगचा परिणाम काय होऊ शकतो याची जाणिव आता सरकारला होऊ लागली आहे ही एक चांगली गोष्ट म्हणावी लागेल. माझे असे म्हणण्याचे कारण की आता शासनाच्या वेब साईट वर ईको फ़्रेन्डली होळी साजरी करा, ईको फ़्रेन्डली घरांनाच बांधकामची परवानगी द्या असे सांअगण्यात येत आहे. This seems to be a positive sign. मी या माझ्या मनावर ईको फ़्रेन्डली हाऊस बद्दल च्या काही संकल्पना या पुर्वी मांडल्या आहेतच आज या बद्दलची आणखि एक संकल्पना मी आपल्या पुढे सादर करित आहे.

माझ्या ईकोफ़्रेन्डली हाउस या लेखात मी पुर्व पश्चिम घर असेल तर शुध्द हवा कशी मिळते हे दाखविले होते. त्याच धरतीवर हा आजचा लेख आहे.

माझ्या इकोफ़्रेंडलि हाऊसच्या संकल्पने प्रमाणे प्रत्येक मनुष्य पुर्व पश्चिम असे घर बांअधणे शक्य होणार नाही. त्यावर एक तोडगा असु शकतो. एखादी कोलोनी ( वसाहत) बांधण्यासाठीचा प्लोट्च पुर्व पश्चिम घ्यावा. तसे केल्याने बरेच फायदे होऊ शकतिल. ते कसे बघा.

या खालिल रेखा चित्रात मी ते स्पश्ट केले आहे. आधि चित्र बघा  मग लगेच लक्षात येईल.

MY DREAM PLAN OF ECO-FRIENDLY COLONY

सोबतच्या चित्रामधे जे रंगीत ठोकळे आहेत ती खर म्हणजे इमारती आहे. म्हणजे ही एक वसाहत आहे. आपल्याला माहित आहेच की वारा नेहमी पश्चिमेकडुन पुर्वे कडेच वाहतो त्यामुळे प्र्त्येक दोन इमारतींच्य मधिल मोकळ्या जागेतून वारा वसाहतीम्धे प्रवेश करेल. दोन इमारती मधे डक्ट तयार झालेली असल्याने वारा कोम्प्रेस होऊन प्रवेश करेल म्हणजे त्याचा वेग वाढलेला असेल. आपल्याला माहित आहेच की हवा कोम्प्रेस झाल्याने गार होते. अहो, म्हणुनच आपण घराघरात पंखे वापरतो. हा कोम्प्रेस झालेला वारा पहिल्या गल्लिला क्रोस करेल तेव्हा त्याला मोकळी जागा मिळेल आणि तो त्या मोकळ्या जागेत पसरण्याचा प्रयत्न करेल. असे करतांना ती हवा दोन नंबरच्या लेन मधिल घरांमधे ज्या उघड्या खिडक्या किंवा दार आहेत त्यात शिरायचा प्रयत्न करेल.

अशा प्रकारे माझी कल्पना आहे की या आदर्श वसाहतीतील प्रत्येक घरात शुद्ध व गार हवा सतत खेळती राहिल. त्याने विजेची बचत होईल कारण विजेचा पंखा कमित कमित वेळ चालवावा लागेल.

सरकारने अशा प्रकारचे प्लान प्रत्येक शहरात व गावात डेव्हलप केले तर विचेची खुप मोठ्या प्रमाणात बचत होईल. त्यामुळे  विजेचा उपयोग अत्यन्त महत्वाच्या अशा

शेती साठि व उद्योगांसाठी करता येऊ शकेल.

माझ्या कल्पनेतील असे ईकोफ़्रेन्डली वसाहत ज्या मधे वरील प्रमाणे प्लान, रेन वाटर हार्वेस्टिंग, ज्या घराला येअर कंडिशनरची गरज नाही व इतर ही फायदे असतील अशी एक जरी वसहत तयार झाली तर मी धन्य झालॊ असे समजेल. मला त्याचे क्रेडि्ट मिळो अगर न मिळो काही फरक पडत नाही.

मी येथे हे वाक्य लिहिण्याचे कारण असे की मी १९८७-८८ मधे मुंबईमधुन पब्लिश होत असलेल्या Science Age (कालांतराने हे मासिक बंद पडले) या मासिकात मुंबईमधे दर पावसाळ्यात साठत असणार्या पाण्याचा निचरा करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय योजना सुचविली होती. २६ जुलाई ला झालेल्या घटनेने पुनः माझ्या मनाला जाग्रुती आली आणि चर्चे दरम्याने एका मित्राने सांगितले की अशी उपाय योजना दादर ला केलेली आहे. मन दुखावले गेले.