माय बाप भाऊ बहिण पोटची पोरं
निवडता आली असती
तर किती छान झाले असते देवा।।
राहिला नसता कुठेच हेवा
सुखी जीवन जगता आलं असतं तेव्हा,
कोणीच दुख पाहिलं नसत
सर्व कसं सुखी राहिलं असतं
माय बाप भाऊ बहिण पोटची पोरं
निवडता आली असती
तर किती छान झालं असत देवा।।
संपत्ती साठी एक दुसऱ्याचा जीव घेतला नसता
मिळून मिसळून सर्वांनी घास घेतला असता,
माय बाप भाऊ बहिण पोटची पोरं
निवडता आली असती
तर किती छान झालं असत देवा।।
माय बाप पसंतीचे निवडले असते
तर म्हातारपणी त्यांना व्रुद्धाश्रमात का ठेवले असते देवा??
भाऊ बहिण निवडता आली असती तर बापाची संपत्ती वाटपात एकमेकांची डोकी का फोडली असती देवा??
आता तरी डोळे उघड देवा आणि
आम्हाला जन्माला घालण्यापूर्वी माय बाप भाऊ बहिण पोटची पोरं
निवडून घ्यायला परवानगी दे देवा।।
ते तर बरे झालेले बायको निवडता येते
चार वेळा पाहून बोलून लगीन करता येते
तरीही जमल नाही त्यांचं तर
नवरा बायकोची जोडी देवच तयार करून पाठवतो म्हणून सांगता येते देवा।।
म्हणून म्हणतो देवा एकदा निवडू दे माय बाप भाऊ बहिण
निवडून ही जमलं नाही तर समजेल चुकलं कोणाचं आणि कुठे?
पण प्रयत्न तर करून पाहू दे देवा,
माय बाप भाऊ बहिण पोटची पोरं
निवडता आली असती
तर किती छान झालं असत देवा।।
माझी कविता:- रविंद्र कोष्टी
(5121867)
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
माणूस कितीही गरीब असला तरी त्याच्याबरोबर भेद भाव करू नका,
कारण
त्याचा काळ आणि वेळ कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही.
🙏शुभ सकाळ 🙏
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
http://www.koshtirn.wordpress.com
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐