जैविक घड्याळ….

घड्याळ टिकटिक करत नाही का मित्रांनो. दिवसा इतर इतके आवाज अवतीभवती असतात कि घड्याळात असलेला सेकंद काटा फिरताना दिसल्यावरच घड्याळ सुरू आहे कि बंद याची खात्री पटते.

पण जसजसी रात्र होते घड्याळाच्या काट्यांचा आवाज सुस्पष्ट ऐकायला येतो.

रात्री बारा नंतर तर घरात फक्त घड्याळाच्या सेकंद काट्याचाच आवाज घुमत असतो. सॉरी, आणखी एक आवाज सतत कानात येत असतो आणि तो म्हणजे रातकिड्यांचा. शहरातील रातकिडे म्हणजे डांस.🦟🦟 गावातील रातकिडे म्हणजे झुरळ किंवा नाकतोडे. अर्थात हे माझे मत आहे. 🦗🦗🦗🦗

मानवी शरीर पण फार विचित्र आहे बघा. जागा बदलली कि झोपच येत नाही. आणि अशा वेळी हमखास घड्याळाची टिकटिक ऐकावी लागते.

अचानक लहानपणाची एक गोष्ट आठवली बघा. पूर्वी घरी घड्याळ नसायचे. सूर्यप्रकाश म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ. मी कायम रात्री अभ्यास करत होतो. अगदी बालपणापासून. लाईट सुद्धा नसायची घरात. चिमणीच्या प्रकाशात अभ्यास करावा लागत असे. माझे तर इंजिनिअरिंग सुद्धा चिमणीच्या प्रकाशात झाले. शेवटचे तीन वर्ष तर स्ट्रिट लाईटाच्या प्रकाशात. रात्री बारा ते तीन अभ्यास. तोही रस्त्यावर. मग झोप. सकाळी पुन्हा सात वाजता कॉलेज सुरू व्हायचे. सॉरी पुन्हा विषयांतर झाले.

तर लहापणाची ती गोष्ट म्हणजे जैविक घड्याळ⏰. रात्री झोपताना सकाळी किती वाजता उठायचे आहे तितक्या वेळा डोके उशीवर आपटायचे. आपटायचे म्हणजे फुटेल इतक्या जोरात नव्हे.😃😃 अगदी आपल्या डोक्याला समजेल इतक्या जोरात. जर सकाळी पांच वाजेला उठायचे असेल तर पांच वेळा आपटायचे. हमखास सकाळी पांच वाजता जाग येणारच. हा प्रयोग आज ही गरज असेल तेव्हा मी करतो. गजर लावायची गरज भासत नाही. बघा तर मग एकदा हा प्रयोग करून. आणि मला प्रतिक्रियेद्वारा अवश्य कळवा.

(5120718)

⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰

आयुष्याने शिकवलेलं एक वाक्य…
“जिंकलो तर आवरायचं आणि हरलो तर सावरायचं…”

🌼🌹 शुभ सकाळ🌹🌼

⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰

http://www.manachyakavita.wordpress.com

⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰

हास्यारोग्य

नाही नाही, तुम्ही समजताय तसा हा काही रोग नाही. आणि मला वाटतं असा शब्द ही अस्तित्वात नाही. हा मी आताच तयार केलेला नवीन शब्द आहे. हास्य आणि आरोग्य दोघांचे मिश्रण म्हणजे संधी.

खरच हास्य हे आरोग्य ठणठणीत ठेवण्यासाठी योग्य औषध आहे. याचे डोज प्रत्येकाने दररोज दिवसभर किंवा कमीत कमी तीन वेळा तरी घ्यायला हवे. प्रमाण विचारताय राव. आता हे बघा. देवाने प्रत्येकाला दोन गाल, दोन ओंठ, दांत, वाणी, जिव्हा दिले आहेत. जितका शक्य असेल तितका त्याचा वापर करावा.

आपआपल्या ऐपतीप्रमाणे डोज घ्यावा. थोडा जास्त घेतल्याने त्रास काही होत नाही. म्हणजे विपरीत परिणाम काही होत नाही. पण अति डोज नको नाही तर वेड्यांच्या दवाखान्यात न्यावे लागते. हा हा हा.😆😆😆😆. अति तेथे माती असे आपले पूर्वज उगाच म्हणत नसत. आता आम्ही ही म्हणतो. पण एक मात्र नक्की. काही कालावधी नंतर आम्ही ही पूर्वज होणार. तेव्हा आपले वंशज ह्या म्हणी पूर्णतः विसरून गेलेले असणार आणि आपल्याला ही. कारण काळ झपाट्याने बदलत आहे. लोकं चंद्र आणि मंगळावर राहायला जायची स्वप्न बघत आहेत. अहो, चंद्रावरचे प्लॉटपर बुक झालेय म्हणतात. कुठेतरी वाचल्यासारखे वाटतेय. 😆😆😆😆.

(3920706)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

😊 😊

कोणीतरी एका विद्वान महापुरूषाला विचारले, “राग म्हणजे काय ?”
विद्वानाने हसत उत्तर दिले ,”राग म्हणजे दुसऱ्याची चुक असतांना स्वतःला त्रास करून घेणे”

💐🙏🏻शुभ सकाळ🙏🏻💐

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.koshtirn.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रेष्ठ उपासना….

💐 “देवाचं स्मरण होण्यासाठी ज्ञान पाहिजे.”
“ज्ञान होण्यासाठी सदगुरु पाहिजे.”
“सदगुरु मिळण्यासाठी भाग्य पाहिजे.”
“भाग्य मिळण्यासाठी पुण्य पाहिजे.”
आणि पुण्य मिळण्यासाठी
सत्कर्म ही सर्वात श्रेष्ठ उपासना आहे.. 💐 शुभ सकाळ 💐

अशा शुभ संदेश नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या महेशरावांना त्यांच्या सौभाग्यवतींनी सकाळी सकाळी पाठवला.

महेशराव ही आता रिकामेच होते. उचलला मोबाईल व रिकामटेकड्या लोकांचा आवडता मित्र म्हणजे व्हाट्सएप उघडला. पहिला संदेश सौ.चाच होता. वाचला व उठले. त्या किचनमधे आहेत हे भांड्यांच्या आवाजावरून त्यांच्या लक्षात आले म्हणून ते किचनात गेले.

“सौ. पोहे करतात वाटतं.” महेशराव.

“नाही, भाजीची तयारी करतेय.” सौ.

“काय. पोह्यांची भाजी.” महेशराव.

“अहो, समोर पोहे दिसत आहे न. ही सकाळची वेळ आहे न.” सौ.

“हो.” महेशराव.

“मग सकाळी पोह्यांचं काय करतात.” सौ. प्रश्नार्थक नजरेने म्हणाल्या.

“पोहे!” महेशराव जोरात हसले.

“मग विचारत का होते.”

“काय.” महेशराव.

“हेच. पोहे करताय वाटतं.” सौ.

“बर ते जाऊ दे. आज तू खूप सुंदर संदेश पाठवला आहेस ग. श्रेष्ठ उपासना.

मग पुण्य मिळवण्यासाठी श्रेष्ठ उपासना करायला हवी की नाही.” महेशराव.

“हो. मग!” सौ. महेशरावांच्या तोंडाकडे प्रश्नार्थक नजरेने बघत राहिल्या.

“अग. मग काय? सत्कर्म करा काही तरी.”

“नेमके काय म्हणायचे आहे तुम्हाला. मला वाटलच होत. घरी बसल्यावर तुम्ही खूप त्रास देणार ते.” सौ.

“अग त्रास कसला आलाय त्यात. फक्त माझा आवडता पदार्थ…..”

“अच्छा. अस होय. मी संदेश पाठवला. ते चुकलंच माझ.”

“अग, तस नाही. असेच नवनवीन संदेश पाठवत जा दररोज.”

“म्हणजे तुम्ही त्यातून काही तरी नवीन अर्थ काढायला मोकळे. मी मात्र कधीच सेवानिवृत्त होणार नाही वाटतं.”

“अग, तस नाही काही. चल हो बाजूला. मी छान से पोहे बनवतो.”

“अहो, मी गंमत करत होते. स्री ही कधीच सेवानिवृत्त होत नसते. कारण ती सर्वांना सेवा देत असते. सासू – सासरे, दीर- जेठ, ननद, नवरा,मुलं, नातवंडे अशा अखंड गोतावळ्यात अडकलेली “ती” आयुष्यात खंड पडेपर्यंत अखंडीतपणे सेवा देण्यातच धन्यता मानत असते. तीला कसली आलीय सेवानिवृत्ती!”

महेशराव मनातल्या मनात पुटपुटले; बिचारी, नवरोबाने जराशी स्तूति केली की खुश होते.

(3720704)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

खरें शोधितां शोधितां शोधताहे।

मना बोधितां बोधितां बोधताहे।।

परी सर्वही सज्जनाचेनि योगें।

बरा निश्चयो पाविजे सानुरागे।।

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.manacheslok.blogspot.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

वहाणा….

मित्रांनो, लहानपणी हा शब्द बराच ऐकिवात होता. आता याचा मागमूस ही नाही. ऐकायला सुद्धा येत नाही. आई माझ्या वहाणा कुठे ठेवल्या आहेत? असे आम्ही कधी आईला विचारले नाही. त्याची दोन कारणं आहेत. एक- आमच्या कडे वहाणा नव्हत्याच मुळी. दुसरे-आमचा काळ म्हणजे १९६० च्या जवळपासचा. तोपर्यंत आम्ही बरेच पुढारलो होतो म्हणून वहाणा ह्या शब्दाचा पर्यायी शब्द प्रचलनात येऊ घातला होता व आम्ही जरी खेड्यात रहात होतो तरी आमच्या कानापर्यंत तो पोहोचला होता. त्याकाळी समाज माध्यमं नव्हती. जसे, टिव्ही, वर्तमानपत्र, मोबाईल, व्हाट्सए, फेसबुक. यापैकी काहीच नव्हतं. म्हणायला वर्तमानपत्रं होती. पण मोजकीच. आणि ती ही फक्त श्रीमंतांच्या आवाक्यातील. आम्ही व आमच्या सारखे गरीब वर्तमानपत्रं विकत घेण्याची कल्पना ही करु शकत नव्हते. असो.

आतापर्यंत आपल्या लक्षात आले असेलच कि वहाणा म्हणजे पादत्राणे. पण पादत्राणे हा फारच उच्च प्रतिचा व दररोजच्या वापरात नसलेला शब्द आहे.

वहाण

यासाठी रोजचा प्रचलित शब्द म्हणजे चप्पल. तो आजही सर्रास वापरला जातो. पण हा शब्द वाहन याशी साधर्मी वाटतो न. यावरून मला वाटते जसे वाहन आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते तसे ही चप्पल किंवा वहाण सुद्धा आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते. फरक एकच कि वाहन स्वयंचलित असते. वहाणा मात्र आपल्याला चालवाव्या लागतात. पण काम मात्र त्यांचे सारखेच असते.

( 3620703)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

जगातील प्रत्येक गोष्ट सुंदर आहे…
मात्र तीची सुंदरता तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे.

💐💐शुभ सकाळ💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

संपत्ती आणि माणुसकी

खरोखर, ज्याने हा स्मॉर्ट फोन आणला म्हणजे तयार केला व ज्याने कोणी हे व्हाट्सएप तयार केले; त्यांना दोघांना ही साष्टांग दंडवत घालायला हवे. कारण स्मॉर्ट फोन नसता तर व्हाट्सएप आले नसते. असो. पण रोज सकाळी इतके सुंदर सुंदर संदेश पाठवले जातात. वाचले किती जातात व त्यावर किती अंमल होते हा संशोधनाचा विषय आहे. उदाहरणार्थ हा खालील संदेश वाचा.

“आयुष्यात एवढी संपत्ती कमवा की दारात उभी राहीलेली संधी आणि दारी आलेला भिकारी रिकाम्या हाती जाता कामा नये त्यासाठी आयुष्यातले काही निर्णय ह्रदयापेक्षा मेंदूला घेऊ द्या परंतु एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा पैसा कितीही प्रिय असला तरी तो कमावतांना नितीमत्ता आणि माणुसकी कधीच सोडु नका.”
🌹शुभ सकाळ🌹

किती सुंदर व अंमल करण्यायोग्य संदेश आहे हा. यात जास्त आवडले ते “आयुष्यातले काही निर्णय ह्रदयापेक्षा मेंदूला घेऊ द्या.”

आणि

“पैसा कमावतांना नितीमत्ता आणि माणुसकी कधीच सोडु नका

असे बरेच संदेश खूप छान असतात.

हा आणखी एक संदेश वाचा.

“एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली. एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते तर तीच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते.”

मला नेहमी प्रश्न पडतो कि हे संदेश कोण लिहितो. कारण ९९.९९९९९९% लोकं फक्त आलेले संदेश फॉरवर्ड करण्याचे कर्तव्य करत असतात.( माझ्यासहित)

ह्यावरून एका गोष्टीची मात्र खात्री पटते कि हे जग १००-९९.९९९९९९ याचे जे काही उत्तर येईल त्यांच्या मुळेच व्यवस्थित सुरू आहे. नाही तर हे सुंदर संदेश आपल्याला आलेच नसते. मग या इंटरनेट, स्मॉर्ट फोन आणि व्हाट्सएप हे कसे काय चालले असते. लाखो लोकांचा रोजगार कसा चालला असता? पोट कस भरल असत त्यांनी?

म्हणून मी हे जे संदेश लेखक असतात त्यांना मी मनापासून उद्दंड व निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देतो. ते रोज दररोज नवनवीन शुभ संदेश लिहून वायरल करो व त्याला आम्ही सर्व फॉरवर्ड करते तहहयात फक्त फॉरवर्ड करत राहो.

आणि हो स्मॉर्ट फोन बनविणारे व व्हाट्सएपचे निर्माते यांना ही मी मनापासून उद्दंड व निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देतो. ते शुभसंदेश लिहणारांसाठी काही असे फिचर्स मोबाईलमधे किंवा व्हाट्सएपमधे आणो कि त्यांना संदेश लिहिणे सहज शक्य होवो. सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे शुभसंदेश फॉरवर्ड करणारे यांना असे फिचर्स उपलब्ध होवो जेणेकरून फक्त फॉरवर्ड करण्यात सुद्धा कमीत कमी श्रम पडो, जसे फक्त फॉरवर्ड म्हटले कि संदेश पुढे जावो.

ताजा कलम:

आता ही पोस्ट लिहित असताना खालील संदेश प्राप्त झाला.

उद्याची तारीख अविस्मरणीय असणार आहे

आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात परत अशी तारीख येणार नाही

०२ ०२ २०२०

दोन्ही बाजूनी तीच.

(3420701)

🤣😆🤔🤣🤔😆🤣🤔😆🤣🤔😆🤣🤔😆

जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे…
मात्र ती तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे….

💐💐शुभ प्रभात💐💐

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

http://www.koshtirn.wordpress.com

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

ओळख माणसांची…..

मित्रांनो,

हजारों-लाखों वर्षांपूर्वी जगाची उत्पत्ति झाली. यात मानव, जीव- जनावरांचा ही समावेश होता. या धरणीवर लाखो करोडों प्रकारचे जीव, जंतू, मानव आहेत. सुरुवातीला एकच जीव जन्माला आला कि एकदम सगळे आकाशातून पडले. कोणालाही माहित नाही. असो, पण हळूहळू मानव स्थिरावत गेला असावा व त्याने प्रथम शब्द व नंतर भाषा आत्मसात केली असावी. नंतर एक दुसऱ्याला संबोधन करतांना अडचणी यायला लागल्या असाव्या. म्हणून मग नावे ठेवणे म्हणजे माणसाचे नामकरण सुरू केले असावे. नाव कसे ठेवावे? सर्वप्रथम सूर्य, चंद्र किंवा इतर कशाचाही आधार घेऊन बाळांचे नामकरण सुरू झाले असावे. जसे सूर्य म्हणजे रवी. यावरून रवींद्र, रविश असे नाव ठेवले असावे.

पूर्वी मानव म्हणा किंवा प्राणी हे कबिल्यात रहात होते. जेथे अन्न, वस्त्र, निवारा उपलब्ध होईल अशा नदी काठी शक्य तो कबिल्यांच्या वसाहती असत. जोपर्यंत १५-२० लोकं आहेत तोपर्यंत फक्त नावावरून ओळख ठेवण्यात अडचणी येत नसाव्या. जसजशी कबिल्याची जनसंख्या वाढत गेली असावी, तसतशी ओळख ठेवण्यात गफलत होत गेली असावी. मग काय रे पोटदुख्या. सतत पोट दुखवत असतो. असे एखाद्या ला संबोधले जाऊ लागले असावे. हे आडनावं कशी पडली असतील त्याच एक उदाहरण दिले आहे. मग त्याचे मुल समोर आले. तेव्हा अरे हे कोणाच पोर रे. दुसरा म्हणाला असेल अरे तो नाही का पोटदुख्या. त्याच हे पोर. झालं मग त्याला, त्याच्या मुलाबाळांना पोटदुखे आडनाव पडल असावं.

जेव्हा त्याला पोटदुख्या म्हटलं तेव्हा तेथे बरेच म्हणजे १५-२० कबिलेवाले जमले असावे. तो चिडून दुसऱ्या माणसाला म्हणाला असेल अरे हा बघा, सतत मान मोडत असतो. मानमोड्या कुठचा. झालं आता त्याचे आडनाव मानमोडे ठेवले गेले असावे. याच धरतीवर पोटझोडे, कानगुडे, माने, इ. आडनावं पडली असावी. अर्थात ही माझी मतं आहेत.

अशाप्रकारे आडनावं ठेवण्याची प्रथा सुरू केली गेली असावी.

याशिवाय समोर जे दिसेल त्याचा आधार सुद्धा घ्यायला सुरुवात झाली असावी.

जसे, कपड्यांवरून सुद्धा आडनावं ठेवलेली आढळतात. कापडे, वस्रे, पितांबरे, रुमाले,इ. आडनावं ही अशीच वाटतात.

एखादा कुटुंब प्रमुख विना चप्पल वावरत असावा. म्हणून त्याला अडवाणे असे आडनाव पडले असावे. आमचे आडनाव हेच आहे.

धातूंच्या नावांचा आधार घेऊन सुद्धा आडनावं ठेवलेली आढळतात. जसे, तांबे, पितळे, लोखंडे, पराते, इ.

पक्षी, प्राणी यांच्या नावाचा आधार घेऊन सुद्धा आडनावं ठेवलेली आहेत. जसे कावळे, कोकिळ, कोल्हे,गरुड, गाढवे, घारे,पोपट, लांडगे, वाघ,बकरे, मांजरे, मुंगी, मोरे, हरणे,इ.

तसेच खायचे पदार्थ म्हणजे श्रीखंड, तूप, ताक, इ. वरुन सुद्धा आडनावं ठेवल्याचे दिसून येते. जसे, श्रीखंडे, तुपे, तूपसांडे, ताकभाते,भाजीभाकरे, इ.

ओढे, ढगे, पर्वते, डोंगरे ही आडनावं तर चक्क डोंगर, ढग, ओढे यांचा आधार घेऊन तयार केलेली दिसून येतात.

एखादी व्यक्ती कोणत्या कामात पारंगत आहे. त्यावरून सुद्धा आडनावं ठेवलेली आढळतात. जसे, सापधरे, वाघमारे, इ.

हो एक राहिलेच, काम कोणते करतो त्यावरून सुद्धा आडनावे ठेवलेली आढळतात. जसे कपडे विणणारा कोष्टी, लोखंडी काम करणारा लोहार, सोन्याचे काम करणारा सोनार, इ.

अशी अनेक आडनावं आणखी असावीत.

ही आडनावं फक्त आपल्या मराठी म्हणजे महाराष्ट्रातील आहेत. उत्तरेकडे गेल्यावर वेगवेगळ्या प्रकारची आडनावं आढळतात. दक्षिणेकडे आडनावे राहत्या गावावरून पडली आहेत असे वाटते.

मित्रांनो, ही आडनावं फक्त आपल्याकडे आहेत असे नाही. जगभरात ही पद्धत आहे. पश्चिमेला गोल्डस्मिथ हे आडनाव आहे. त्याचा अर्थ सोनार होतो. तसेच ब्लेकस्मिथ म्हणजे लोहार.

(3320700)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

मना पापसंकल्प सोडूनि द्यावा।

मना सत्यसंकल्प जीवीं धरावा।।

मना कल्पना ते नको वीषयाची।

विकारें घडे हो जनीं सर्व ची ची।।

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.manacheslok.blogspot.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

छोटीसी चुक..

टुटु चे बाबा आज ऑफिस मधे गेले नाही म्हणून तो आनंदी होता आणि टेंशन मधे ही होता. आनंदी होण्याचे कारण म्हणजे आज निश्चितच बाबा काही तरी खाऊ आणतील याची खात्री. ते रजेवर असतात तेव्हा हमखास आवडीचा खाऊ आणतात. टेंशन याचे होते कि टुटु ला शाळेला सुटी होती व हे घरी म्हटले कि अधूनमधून त्याच्यावर राग काढणार…….

पुढे वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..

https://ravindra1659.wordpress.com/2019/12/13/259/

(2820695)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आयुष्याने शिकवलेलं एक वाक्य…
“जिंकलो तर आवरायचं आणि हरलो तर सावरायचं…”
🌼🌹 शुभ सकाळ 🌹🌼

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.ownpoems.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐