निखळ मैत्री

आज जागतिक मैत्री दिवस साजरा केला जातो आहे मित्रांनो. गंमत आहे न. आपण एक दुसर्याला काय मित्रा? कसा आहेस? म्हणायचे आणि मैत्री दिवस ही साजरा करायचा.

अमेरिकेने 1935 पासून दरवर्षी ऑगष्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा करायला सुरुवात केली. आणि आता जग भरात हा दिवस साजरा केला जातो.

माझ्या मते जेव्हा खरे नाते, खरे प्रेम हे कमी व्हायला लागते न तेव्हा आपल्याला त्याची आठवण करून द्यावी लागते. हल्ली तसेच झाले आहे. खरे प्रेम दुर्मिळ झाले असल्याने वर्षातून एकदा तरी आपण ते नातं जगू या म्हणून त्या नात्याच्या नावाचा तो दिवस साजरा केला जात असावा असा माझा तरी समज आहे. खर कारण वेगळ असू शकत.

मदर्स डे, फॉदर्स डे, फ्रेंडशिप डे, डॉटर्स डे, इ.इ. जवळजवळ दररोज कुठलातरी दिवस जागतिक स्तरावर साजरा होत असतो. पूर्वी अस काही नव्हते हो. आई शिवाय घरातल पान हलत नव्हते म्हणजे रोजच मदर्स डे असायचा की राव.

असो. आज मैत्री दिवसाच्या निमित्ताने विविध संदेश प्राप्त झाले त्यातील एक मनभावन वाटला. मनाला बालपनात ओढून घेऊन गेला. म्हणून हा प्रपंच. तुम्ही ही पहा आणि एक फेरफटका मारून टाका आपल्या बालपणाच्या विश्वात.

Advertisements

खाजगी जंगल

मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल न कि येथे जंगल संपत चाललयं आणि खाजगी जंगल कस असेल?

विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ पहा. व्हाट्सएपवर आलेला आहे. हिस्ट्री चैनलवरचा वाटतोय.

एक भारतीय सदग्रुहस्थ आहेत. त्यांची पत्नी विदेशी आहे. 30 वर्षापूर्वी ते भारतात आले तेव्हा त्यांनी पाहिले येथील जंगल तर संपत चाललयं. तेव्हा त्यांनी निर्णय घेतला आणि अमेरिकेतील सर्व विकून दक्षिण भारतात 30 एकर जागा घेऊन राहायला लागले. त्या जागेत त्यांनी स्वतःच म्हणजे खाजगी जंगल उभारले आहे. आज हे जंगल 300 एकर जागेत पसरले आहे. पहा हा व्हिडीओ.

मोबाईल क्रांती..

आज वर्तमान पत्रात एक बातमी वाचली. आपल्या देशात पहिला मोबाईल फोन कॉल ३१ जुलै १९९५ रोजी करण्यात आला होता. या घटनेला २४ वर्षे पूर्ण झाली. या काळात मोबाईल ची किती उत्क्रांती झाली असावी याची कल्पना ही करवत नाही. मे २०१९ मधील आपल्या देशातील मोबाईल ग्राहक संख्या तब्बल १अब्ज १६ कोटी १८ लक्ष ५९ हजार ६२१ इतकी प्रचंड आहे. त्यानंतर दोन महिने उलटले असून या संख्येत आणखी भर पडली असेल. १३० कोटी जनसंखेत ११६ कोटी पेक्षा जास्त लोकांकडे मोबाईल असणे हे मला वाटतं देश सम्रुद्ध झाल्याचे द्योतक आहे.

त्या बातमीमधे असे ही आहे कि आपल्या देशाच्या जीडीपी मधील ६.५ % वाटा एकट्या मोबाईलचा आहे. ग्राहक संख्येने भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. तसेच देशातील ३.२ कोटी नौकर्या फक्त मोबाईल क्षेत्रात आहेत. आहे न कमाल.

जागतिक स्तरावरील कंपन्या यामुळे च भारताकडे आकर्षित होतात. भारत ही फार मोठी बाजारपेठ आहे.

पण का प्रत्येकाला मोबाईल लागतो माहित नाही. फोन मुळात महत्त्वाचे काम करण्यासाठी असायला हवा. पण एवढी मोठी बाजारपेठ असल्याने व ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेटवर्क कंपन्या प्रलोभने देत आहेत. अहो सुमारे तीन वर्षापूर्वी २५० एमबी रोजचा डेटा घेण्यासाठी मला वाटते रू.५/- लागायचे. आज दिवसाला १.५ GB रू.५/- पेक्षाही कमी मधे मिळतो. त्यामुळे महिन्याचे पेकेज घेतले की काळजी नसते.

याला म्हणतात क्रांती.

पाऊस….

मित्रांनो, मागील काही वर्षापासून आपण पाहतो आहोत कि निसर्गाने आपल्याला बदलून घेतले आहे. पूर्वी 7 जूनला पाऊस येणार म्हणजे येणारच. वडील म्हणायचे उद्या पासून मृग नक्षत्र सुरु होतयं. पाऊस येईल उद्या. दर 15 दिवसांनी नक्षत्र बदलते. ….. नक्षत्र असतात. प्रत्येकाचे वेगळे वाहन असते. बेडूक वाहन असेल तर खूप पाऊस पडतो असे म्हणायचे आणि तसे व्हायचेही. कारण वर्षानुवर्षे ही परंपरा चालत आलेली आहे. पंचांगात दिलेले असतेच की हे. पूर्वी घरोघरी पंचांग असायचे. आता विज्ञान युगात आपण जगत आहोत. पंचांग आपण कुठ बघणार. त्याच्यावर विश्वास सुद्धा नसतो. पण ज्याप्रमाणे मानूस बदलत गेला न त्याच प्रमाणे निसर्ग ही बदलत गेला. आपण नैसर्गिक जगणे सोडले आणि निसर्गाने ही नैसर्गिक वागणे सोडले.

हल्ली पाऊसाच्या लहरीपणाने कळस गाठला आहे. वर्ष भराचा पाऊस येतो पण कसा? पावसाळ्यात दोन तीन वेळा येऊन वर्षाची सरासरी गाठतो. इतर वेळी कोरडाठाक असते वातावरण. दरवर्षी असच सुरू आहे. जेव्हा कमी कालावधीत जास्त पाऊस पडतो तेव्हा मुंबई म्हणा किंवा जगातील इतर कोणतेही शहर म्हणा त्यांची काय अवस्था होते हे आपण टि.व्हि. वरील बातम्यांमधे बघतच असतो. ही चित्र बघा. संपूर्ण मुंबई शहर जलमग्न होऊन गेले आहे. पण अस का होत? मुंबई शहर समुद्र सपाटीवर वसलेले आहे. म्हणजे समुद्राची व शहराची उंची सारखीच आहे. त्यामुळे मुंबई त जेव्हा जास्त प्रमाणात पाऊस पडतो तेव्हा समुद्रात भरती असते म्हणून शहराच्या गटारींचे पाणी समुद्र स्वतः त सामावून घेऊ शकत नाही. त्यामुळे शहरातील सांडपाणी व पाऊसाचे पाणी शहरात साठून शहर जलमय होते.

ह्या वर्षी जरा परिस्थिती चांगली आहे असे वाटते. तरी ही पाऊस उशिराच आला. पण जेव्हा पासून सुरू झाला आहे तेव्हा पासून सातत्याने सुरू आहे. खंड न पडू देता. जुलै महिन्यात जवळपास महिनाभर पाऊस पडत आहे. आजच बातमी वाचली कि पुणे शहरात फक्त जुलै महिन्यात रिकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे.

मी दरवर्षी माझ्या ब्लॉगवर लिहित आलोय कि आता आपल्याला ही निसर्गासोबत बदलून घ्यायला हवे. तो विलंबाने सुरू होत असल्याने शेतकऱ्यांनी ही त्यानुसार शेतीचे वेळापत्रक बदलून घेणे योग्य आहे.

आता तर पावसाने संपूर्ण देशालाच व्यापून टाकले आहे. राजस्थानचा थोडा भाग वगळता संपूर्ण देश पावसाने व्यापलेला आहे. बघा हे चित्र.

कांदे बटाटे

आपल लहानपन मला आठवतय राव. किती आनंदी होत. खायला व्यवस्थित नव्हत,कपडे व्यवस्थित मिळत नव्हते पण सुखी ओथंबून वाहत होतं. कोणीही हेवा करावा असच. आज सर्व काही आहे. पण जीवनातील आनंद कोणी हेरावून घेतला आहे कोणास ठाऊक? असो.

जर आईने काही समजावून सांगितले आणि लक्षात आले नाही कि आई म्हणत असे तुझ्या डोक्यात काय कांदे बटाटे भरले आहेत की काय? सांगायच तात्पर्य असा कि उपरोधिक शब्द प्रयोग म्हणून या शब्दांचा उल्लेख जीवनात केला जातो. जीवनात हे दोन्ही पदार्थ क्षुल्लक समजली जातात.

पण खरोखर अस असत का? तर उत्तर आहे “नाही ” प्रत्येक गोष्टीच जीवनात सारखच महत्त्व असत. आपण त्याला कमी जास्त लेखत असतो.

आता हेच पहा न कि रोज सकाळी उठल्यावर स्त्री प्रथम किचनमध्ये जाते व कांदा शोधते. कांदे पोहे करण्यासाठी. सकाळी नाश्ता बनविण्यापासून सुरुवात होते ते रात्री झोपेपर्यंत कांदे उपयोगात येतात. स्वयंपाक करतांना प्रत्येक भाजीत कांदा वापरतात. नाही वापरला तरी बाहेरून जेवणासोबत तोंडी लावायला तरी वापरतोच. कांद्याचे। हेच वैशिष्ट्य आहे किती ही नावडता असला तरी तो आवडतोच.

भाजीत वापर व तोंडी लावणे झाले आता प्रसिद्ध कांदेभजे कांद्यांशिवाय कसे बनतील? उन्हाळ्यातील कांद्याचा कळकळा माहित आहे का? आमच्या खांदेशातील एक प्रसिद्ध रेशिपी. आंब्याचा रस आणि तोंडी लावायला कांद्दाचा कळकळा. ही म्हणजे कांद्दाची भाजीच असते.

पावसाळ्यात गरमागरम भजी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. बाहेर पाऊस पडतो आहे आणि समोर प्लेट मधे गरमागरम भजी ठेवलेली त्यातून एक एक गरम भजी उचलून खायचा आनंद. अचानक तोंडून शब्द बाहेर पडतात “वाह क्या बात है? ”

या कांदापुराणाच्या नादात बटाटा ज्याला नेहमीच विसरायला होते तो पुन्हा विसरलात आपण.

हा ही कांद्दाचाच भाऊ. एकदम तुच्छ असा पदार्थ. पण याच्या शिवाय आपल क्षणभर ही गाड पुढे जात नाही. स्वयंपाक घरातील प्रत्येक भाजीत याचा वापर केला जातो. याचा उपयोग केला नाही तर भाजीला चव येत नाही. लहान मुलांना खूप आवडणारा हा पदार्थ.

याशिवाय बटाट्याच्या भाजीचे पराठे तर काय सांगावे. नुसते नाव जरी काढले राव तरी तोंडाला इतके पाणी सुटते कि पराठे खाल्ल्यावरच थांबते. आणि पोट भरले तरी खायचे थांबवत नाही.

त्यानंतर बटाटा भजी. यांचे चहेते ही फार असतात. जसी कांदा भजी तशी बटाटा भजी. बटाटा वेफर्स सारखा कापून त्यापासून बेसन पीठ वापरून ही भजी बनवतात. फार स्वादिष्ट लागतात. बटाटा वेफर्स तर प्रसिद्ध आहेत. प्रत्येक ग्रुहिणी उन्हाळ्यात वेफर्स बनवून साठवून ठेवते.

शॉर्ट सर्किट..

मित्रांनो, मानसाला प्रगति केल्यापासून ज्या मूलभूत गरजांची नितांत गरज भासत आहे त्यात वीज हा महत्त्वाचा घटक आहे.

जसे जगण्यासाठी पंचमहाभूतांची गरज आहे. तशीच या मानवनिर्मित महाभूतांची ही गरज आता भासत आहे. वीज नसली तर मनुष्य आंधळा पांगळा होतो.जागच्या जागी थिजल्यासारखे होते त्याला. इतके महत्त्व आहे आपल्या जीवनात विजेचे.

पण मानवाने शोधलेल्या प्रत्येक गोष्टी जितक्या चांगल्या सिद्ध झाल्या आहेत तितक्याच त्या त्रासदायक सुद्धा ठरलेल्या आहेत. त्यांचा दुरूपयोग सुद्धा होऊ लागला आहे. जसे अणुऊर्जा. चांगल्या मानवतेच्या कामासाठी याचा शोध लावला गेला. पण पुढे अत्यंत दुरूपयोग…

वीजेचे ही तसेच. आपण प्रमाणात वापर केला तर काही ही त्रास होत नाही. मात्र अविचाराने वापर केला तर ती प्राणघातक ठरू शकते. हे अनेक दुर्घटनांनी सिद्ध केलेले आहे. आपण नेहमीच टि.व्हि.वर आणि वर्तमान पत्रात वाचतो रहिवासी इमारतीला शॉर्टसर्किट मुळे आग लागली किंवा व्यापारी संकुलाला शॉर्टसर्किट मुळे आग लागली. पण आपण कधी विचार करतो का हे शॉर्टसर्किट म्हणजे काय? व ते का होते. नाही न! कारण आपल्याला तितका वेळच नसतो. मानसाची मानसिकता अशी झाली आहे की जोपर्यंत स्वतःला एखाद्या घटनेची झळ पोहोचत नाही तोपर्यंत त्याबद्दल विचार ही करायचा नाही. असो.

मित्रांनो, आपण पावसाळ्यात जर पाऊस जोरात असेल तर आपल्या घरावरील पाऊसाचे पाणी दारासमोर साचायला सुरुवात होते. जास्त साचले तर ते घरात येण्याची शक्यता बळावते. म्हणून मग आपण त्या साचलेल्या पाण्याला मार्ग करून देतो. एक लहानशी गटार तयार करून. ह्या गटारीचा आकार आपण अंदाजित घेतो. लहान मोठी होते ती. पण त्या तात्पुरत्या गटारीचे लहान-मोठेपण आपण कसे ठरवतो. जर पाणी ओव्हर फ्लो होऊन बाहेर पडले तर लहान आणि गटार रिकामी राहिली तर मोठी. गटार लहान असेल तर पाणी गटारीच्या आजूबाजूच्या भिंती तोडून ओव्हर फ्लो होते. असेच मोठ्या कालव्याचे होते. त्यांचे संकल्पन करतांना जास्तीत जास्त किती पाऊस पडतो व किती पाणी वाहून नेणे आवश्यक असते याचा विचार होतोच. पण अचानक थोड्या वेळात जास्त पाऊस पडला, असे क्वचितच होत असते, तर मात्र कालव्याची क्षमता कमी पडते व कालव्याच्या भिंती तुटतात.

असेच वीजेच्या बाबतीत ही होते. घर असो वा कार्यालय जेव्हा नवीन तयार केले जाते तेव्हा वीजेचा किती वापर होईल याचा अभ्यास करून संकल्पन करून वापरात येणाऱ्या केबल व वायरी निवडल्या जातात. हे सर्व मुळ मालकाशी सल्ला मसलत करून केले जाते. ओव्हरलोडचा ही विचार केला जातो.

कालांतराने जर आणखी लोड वाढला तर त्या वायरी/केबल कमकुवत होत जातात. सततच्या ओव्हरलोड मुळे त्याची वीजवहन क्षमता कमी होत जाते. त्यांच्या वर जे पीव्हीसी/प्लास्टिक कोटिंग असते त्याची क्षमता कमी होते किंवा त्याला नुकसान पोहोचते. एक क्षण असा येतो जेव्हा कोटिंगचे आवरण फुटते आणि शॉर्टसर्किट होते. आग लागते. हे नवीन वायरिंग मधे ही होऊ शकते बर का? कारण तरूणाची ही एक विशिष्ट क्षमता असते. त्या पलीकडे त्याला ही सहन होत नाही.

म्हणून घरात/ कार्यालयात नवीन वीज उपकरणे बसवितांना योग्य तज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे असते. थोडे पैसे खर्च होतात पण मोठे नुकसान होण्यापासून सुटका होते.

अस का होत….

मित्रांनो,

नेमकं माझ्यासोबतच अस का होतं माहित नाही. कालचीच गोष्ट सांगतो. मी एका मोठ्या इस्पितळात गेलो होतो. वरच्या माळ्यावर जायचे असल्याने मी लिफ्ट(शुद्ध मराठीत या यंत्राला उदवाहक असे म्हणतात) च्या रांगेत उभा राहिलो. पण उभे राहण्यापूर्वी एक मिनीटासाठी मी थांबलो. कारण तेथे चार लिफ्ट होत्या. प्रत्येकासमोर रांग होती पण कमी जास्त लोकं होती रांगेत. मी इतर सामान्य माणसासारखा थबकून विचार केला कि आपण नेमके कोणत्या रांगेत थांबावे. गंमत बघा की मला एक लहान रांग दिसली. मी तिकडे जाण्यासाठी वळालो व पाय उचलला तितक्यात शेजारच्या रांगेतील दोन माणसं मला जायचे होते त्याच ओळीत येऊन उभी राहिली.

आता मला मी ज्या रांगेत जाणार होतो ती रांग मोठी वाटली. मी पुन्हा थांबलो. आता मी चार ही रांगांची लांबी नजररुपी फुटपट्टीने मनात ल्या मनात मोजू लागलो. मोजून झालेवर मनाने एका ओळीकडे जायचा इशारा केला व मी कोणालातरी माझे मनातील विचार समजून या आधी घडल्याप्रमाणे कोणीतरी नेमके मी जाणार असलेल्या रांगेत मी उभे राहण्यापूर्वी येऊन उभे राहण्यापूर्वी मी क्षणाचाही विलंब न लावता धावत जाऊन उभा राहिलो. बाप रे त्या क्षणाला किती दमछाक झाली माझी काय सांगू. पण एक मात्र छान झाले. यावेळी कोणीच माझे मनातील विचार ओळखले नाहीत.

लिफ्ट खाली येण्यापूर्वी पुन्हा तेच व्हायला लागले. दोन तीन लोकं या रांगेतून त्या रांगेत वा त्या रांगेतून त्या पलिकडच्या रांगेत अदला बदली झालेच तेव्हा माझ्या लक्षात आले कि माझे मन वाचायला कोणी मनकवडा नाही येथे ही मानसाची मनोवृत्ती आहे.

तर मित्रांनो, असे प्रसंग तुम्ही सुद्धा अनुभवले असणारच.

आणखी असे की तुम्ही नेमका एका मित्राची आठवण काढता. पण तो तर कामानिमित्त बाहेर गावी गेलेला आहे हे लक्षात येते आणि तुम्ही विचार बदलतात.

थोड्या वेळाने बाहेर पडला तर रस्त्यावर समोरून तोच मित्र येतांना दिसतो. तुमचा आपल्याच डोळ्यांवर विश्वास बसत नाही. अरे तू तर बाहेर गावी गेला होता न! तुम्ही आश्चर्य चकित होऊन त्याला विचारतात. तो ही तितक्याच आश्चर्याने उत्तर देतो का कुणास ठाऊक पण मला परवा घरी परत यावस वाटायला लागले. मन लागतच नव्हते. शेवटी निर्णय घेतला परत येण्याचा. आता तुलाच भेटायला येत होतो.

असे बरेच प्रसंग अनुभवायला येत असतात. तुम्हाला ही आले असतीलच.

असो.