मूर्तिकला

परवाच मी कन्येसोबत डेक्कनला काही कामानिमित्त गेलो होतो. रस्त्यात एके ठिकाणी गणपती मूर्ती तयार करण्याचा कारखाना दिसला. अचानक मला साडूची माती घ्यावी असे सुचले. कन्या हो म्हणाली पण आई ओरडेल असे ही म्हटली. मी चालेल म्हटले आणि माती घेतली. घरी आणली व तिला मूर्ती बनविण्याचे सांगितले. ती म्हणाली पप्पा मला जमणार नाही. अग, बेटा प्रयत्न करून पहा जमेल. आणि तिने करून पहिले. तिचे आराध्य दैवत श्रीगणेशाच्या मूर्तीपासून शुभारंभ केला. त्याचे चित्र येथे टाकत आहे.

श्रीगणेशाची मूर्ती तयार करतांना.

श्रीगणेशाची मूर्ती तयार करतांना.

तयार झालेली मूर्ती

Advertisements

लेक टेपिंग- एक सुखद अनुभव

काल दि.२५/०४/२०१२ रोजी आपल्या महाराष्ट्रासाठी मनाचा तुरा असलेल्या कोयना प्रकल्पावर एक अतिविशिष्ट घटना घडली ज्याचा मी स्वतः साक्षीदार राहिलो. मी आपल्या डोळ्यांनी टी घटना घडतांना बघितली. टी म्हणजे कोयना येथे दुसऱ्यांदा झालेली लेक टेपिंग. पहिली १९९९ मध्ये झाली होती. मला अभिमान वाटतो की मी ह्या घटनेचा साक्षीदार राहिलो.

मी ह्या कामाशी निगडीत असल्याने मला लेक टेपिंग म्हणजे काय हे माहित आहे. पण बऱ्याच मंडळींना ह्याचा अर्थ काय हा प्रश्न पडला असेल. म्हणून मी ही पोस्ट लिहीत आहे.

लेक टेपिंगचा शाब्दिक अर्थ असा होईल. लेक म्हणजे जलाशय/सरोवर. आणि टेपिंग म्हणजे छिद्र पाडणे. होय हाच त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. पाण्याच्या अगडबंब अशा अतिभव्य जलाशयाला जमिनीतून भगदाड पाडणे म्हणजेच लेक टेपिंग.

सध्या सरळ भाषेत सांगायचे झाले तर असे सांगता येईल की एखाद्या पाणी साठवायच्या टाकीला भोक पाडून नळ बसविणे. फरक इतकाच असतो की आपण टाकीला भोक पाडून नंतर नळ बसवितो आणि येथे आधी नळ बसवितो व नंतर भोक पडतो.

हे ह्या खालील चित्रावरून अगदी सहज समजून येईल.ह्या चित्रामध्ये एक पाण्याचा तलाव दिसत आहे. त्या तलावाच्या खालून एक बोगदा तयार करून तलावाच्या तळाशी आणला जातो. पण तलावामध्ये पाणी असल्याने त्या पाण्याच्या दाबाने छिद्र पडू नये म्हणून एका ठराविक जाडीचा खडक तसाच ठेवला जातो.तो खडक येथे काळ्या रंगाने दर्शविण्यात आला आहे. ह्याच काळ्या खडकात स्फोटक लावून त्याला उडविले जाते. ते खाली पाण्यात पडते आणि पाण्याचा प्रवाह सुरु होतो.

हे अतिकौशल्याचे काम आहे म्हणून ह्या कामात सहभागी सर्व अभियंते व इतर सर्वांचे मनापासून अभिनंदन करायला हवे.

This slideshow requires JavaScript.

 

लाक्षागृह!

कधी कधी आपणाला जे दिसत तस प्रत्यक्ष नसत, पण जे नसत तेच दिसत. ही जुनी म्हण आहे हे आपल्या सर्वांना माहीतच असेल. कधी कधी तर काही ही नसत पण आपल्याला सर्व काही दिसत असत. अस कधी होत जेव्हा आपल मन आपल्याला तस बघण्यासाठी भाग पाडत तेव्हा. अहो थोड कोठे पोटात दुखायला लागल की आपल्याला कधी तरी कोणी तरी एखाद्याबद्दल सांगितलेली गोष्ट लगेच ध्यानात येते. जसे त्या अमक्याला पोटात दुखत होत आणि दवाखान्यात नेल्यावर फोटो वगैरे काढून झाल्यावर डॉ. ने सांगितले होते की त्याला केंसर झाला आहे. आणि ते आठवल की मन सुरु होतात मनाचे खेळ. अहो आपल मन फारच भाबड असत. लगेच त्याच्या मागे धावत आणि मग  गुदमरायला होत. अस वाटत तो यमराज त्याच्या त्या अगडबंब रेड्यावर बसून भला मोठा दोरखंड घेऊन आपल्या दरीच येऊन उभा आहे आणि कोणत्या ही क्षणी आपल्याला उचलून नेईल. झोपेत नव्हे तर जागे पाणीसुद्धा आपल्याला तो यमराज दिसतो खरोखर. असा अनुभव कदाचित प्रत्येकाला येत असेल. मी घेतलेला आहे. म्हणून सांगतो. पण मग मी मन घट्ट केले. काय होईल ते बघू . यम जरी येऊन ठाकला तरी त्याला परतवून लाऊ असा विचार मनात आला आणि मग काय विचारूच नका.

असो मुख्य मुद्दा हा नव्हे. खूप दिवसांनी माझ्या मनावर लिहीत आहे. लेखाचे नाव लाक्षागृह असे ठेवले आहे. त्याचा अर्थ सर्वांना ठाऊक असणारच. कौरवांनी पाण्डवांसाठी तयार केलेली लाक्षागृह ही एक अशी   वास्तू होती की ज्यात जाण्यासाठी पांडव आतुर झाले पण ती जशी होती तशी ती नव्हती. ती सुंदर होती पण भ्रम होती. ते त्यांना थोड्याच वेळात कळल.

महाभारत काळातील ही गोष्ठ वाचून असे वाटते की आपले पूर्वज किती प्रगत होते. असो असेच लाक्षागृह एका कलाकाराने रेखाटले आहे. तेही रस्त्यावर. 3 D Painting द्वारे. काळ परवा अचानक फेस बुक वर मला ते दिसले. त्या कलाकाराच्या साईट वर जाऊन भेट दिली आणि काही चित्र येथे टाकत आहे. कल्पना करवत नाही की त्या रस्त्यावर चालत असतांना कसे वाटत असावे. समोर खड्डा दिसत असेल. तोल चुकला आपण त्या खड्ड्यात पडू अशी सारखी भीती ह्या हळव्या मनाला वाटत असेल. जास्त हलवा मनुष्य असेल त्याला अशा खड्ड्यात आपण पडलो असे जाणवून त्याला हृदय विकाराचा झटका आल्याशिवाय राहणार नाही. बघा तर मग. पण जरा जपून. आप आपले हृदय सांभाळा. चुकून खड्ड्यात पडू नका कारण खड्डा इतका खोल आहे की कोणी बाहे कडू शकणार नाही.

त्या ब्लॉग ची लिंक : http://www.hongkiat.com/blog/

अग बाई जरा जपून!