त्यांचे जीवन…

सोनी टिव्हीवर दर शनिवार रविवार रात्री एक कार्यक्रम येतो. कपिल शर्मा शो. हलकी फुलकी कॉमेडी असते. म्हणून लोकांना खूप आवडते. मला अधूनमधून बघायची इच्छा होते. मागे एकदा या सदीचा सुपरस्टार ज्यांना महानायक ही म्हटले जाते ते अमिताभ बच्चन या शोवर आले होते.

कपिल शर्मा याने बच्चनजींना काय प्रश्न केला असेल? आपण कल्पना ही करू शकत नाही असा सर्वसाधारण प्रश्न त्याने विचारला. प्रश्न असा होता,”आंघोळ करतांना अंगाला साबण लावत असतात. तो साबण शेवटी छोटा होतो. तेव्हा तो साबणाचा तुकडा हातातून सटकून खाली पडतो. त्याला तुम्ही उचलतात का? हो असेल तर उचलतांना तुम्हाला कसे वाटते? लगेच पुढचा प्रश्न, साबण संपतांना शेवटचा भाग राहतो तो तुम्ही नव्या साबणाला चिपकवतात का?

हे अगदी सामान्य लोकांच्या घरामध्ये घडते. आपल्या भारतीय संस्कृतीत वस्तू पूर्णपणे वापरण्याची सवय आहे. वाया घालविणे आपल्या संस्कारात नाही.

बच्चन ही उत्तर देतात हो. आम्ही ही हेच करतो.

मित्रांनो, जो साबण आपण वापरतो तोच किंवा तेव्हढाच साबण ते ही वापरतात. त्या मोठ्या लोकांसाठी काही मोठ्ठा साबण तयार होत नाही. पण आपल्या सामान्य माणसाच्या मनात हे प्रश्न येतात.

जशी पोळी आपण खातो तशीच पोळी ते ही खातात. ते अब्जाधीश असले म्हणून सोन्याची पोळी नाही खात.

मला आठवलं कि मी शिक्षण झाल्यावर मुंबईत नौकरीला लागलो, तेव्हा आपले वरिष्ठ अधिकारी काय खातात याची उत्सुकता मला होती. एकदा लंच सुरू असताना त्यांनी मला बोलाविले. तेव्हा मी पाहिले कि ते कोबीची भाजी खात आहेत.

खूप मोठा माणूस आहे म्हणून तो मंगळावरून अवतरला आहे. वेगळे काही खातो, पितो, घालतो असे काही नसते. फक्त क्वालिटी चा तितका फरक असेल. आपण ५००/- रूपयांचे बुट घालतो. त्यांचे ५०००/- रूपयांचे असतील. पण असतील बुटच.

यांची फैशन सुद्धा लाखोंच्या जगण्याचा आधार असतो हे ठाऊक आहे का तुम्हाला? नाही न! आपल्याला वेळ ही नसतो तितका विचार करायला. आपण आपल्या दैनंदिनीत व्यस्त असतो. कशाला रिकामा विचार मनात आणावा.

पण अशा सेलिब्रिटींची दैनंदिनी जाणून घेण्यासाठी सामान्य मनुष्य धडपड करत असतो. म्हणून ही वर्तमानपत्र, ही विविध चेनल्स चालतात व लाखो लोकांना रोजगार मिळतो. आपली जाणून घेण्याची उत्सुकता हे लाखो लोकांच्या जगण्याचा आधार असते ही कल्पना ही कोणी करत नसेल. मी सुद्धा केली नव्हती. ती आताच सुचली.

एखाद्या सिनेमात नट नटीने कसे कपडे घातले होते. तसेच डुप्लिकेट कपडे देशभरातील बाजारात उपलब्ध होतात. ते ही लगेच. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. केव्हढा मोठा व्यवसाय चालतो तो.
असे एक न अनेक व्यवसाय निव्वळ सिनेमा इंडस्ट्री वर आधारित आहेत.

चप्पल, बुट, पेन, पेंसिल, केसांची स्टाईल, कपडे, कोट, टोपी, घर सजावट, खाद्यपदार्थ, फर्निचर, भांडी आणखी अनेक असतील. अरे हो मी विसरलोच. हजारो स्थानिक कलाकार, गायक व डांसर या सिनेमावाल्यांच्या आधारावर जगत असतात. नकलाकार ही यातीलच.

विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो, एक नट किंवा नटी एका सिनेमात काम करते. त्यावर हजारो लाखो नव्हे करोडो लोकांची पोटं भरतात. हा सेकंडरी व्यवसाय आहे. एकावर आधारित दुसरा.

मुळ बंद पडला कि या सेकंडरीला ही आपला गाशा गुंडाळावा लागतो.

असेच कारखान्यांचे ही असते. कार इंडस्ट्री असते. त्यात कार तयार करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य ते तयार करत नसतात. नट, बोल्ट, टायर, ट्यूब असे अनेक साहित्य ते बनवून घेतात. त्यामुळे कार कारखाना बंद पडला कि छोटे कारखाने ही बंद पडतात.

पुन्हा विषयांतर झाले मित्रांनो.

असो, तर ह्या सेलिब्रिटी लोकांचे असे जीवन असते व आपले सुद्धा असेच असते.

(1720684)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सुखी माणसाचा सदरा घातल्याने कोणी सुखी होत नाही.

💐💐शुभ प्रभात💐💐

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.koshtirn.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आंबा….

फळांचा राजा आंबा. त्याला चाखल्यावरच कळत फळांचा राजा का म्हणतात ते. तो सर्व फळांचा राजा असला तरी त्याच्यात वेगवेगळ्या जाती आहेत.

गरिबात गरिब आंबा म्हणजे तो अगदी लहान असतो. रस जवळजवळ नसतोच. पण गोड. गरिबाला परवडणारा. आणि श्रीमंतांना परवडणारा म्हणजे देवगड हापूस. सर्वात महागडा. हा आंब्याचा राजा.

हापूस मधे ही रत्नागिरी, कर्नाटकी हापूस असे काही प्रकार असतात.

पण आपल्याला त्याचे काय आंबा गोड आणि स्वादिष्ट लागला म्हणजे झालं.

माझा हे शीत पेय आंब्याच्या रसापासून तयार केलेले. प्रवासात सोबत घेतले की काही खायची गरज वाटत नाही.

मस्त

विकतचे दुखणे……

माणसाला वातावरणातील बदलाणे किंवा आणखी काही कारणाने आजारपण येतच असते. पण कधी कधी बाहेरचे काही खाल्ल्याने आजार येतो. असा अनुभव मी उपभोगत आहे.

झाले असे कि काल कन्येची सेट ची परीक्षा होती. तिला सेंटरवर सोडून घरी आलो. परीक्षा दिवसभर होती.  मधला लंच टाईम २ तासाचा होता. तिची जेवणाची व्यवस्था काय? म्हणून आम्ही दोघे हि सेंटरवर गेलो. आणि म्हटले कधी मुलगी आणि सौ. ह्या हॉटेलात जेवणाला येत नाहीत मग आता तशी वेळ आली आहे तर घेऊन जाऊ यांना जेवणाला. शोधून शोधून थकलो. जवळ पास कोठेच चांगले होटेल सापडले नाही.

खूप शोधल्यावर एक डायनिंग हॉल सापडला. खूप छान होता. दर सुध्दा खूप जास्त होते. म्हटलं येथील जेवण खुपच चांगले असेल. आपल्याकडील मानवाची हि समाज झाली आहे कि जी वस्तू महाग असते ती चांगली असते. महागडा डॉ. चांगला इलाज करतो. महागड्या हॉटेलचे जेवण अतिशय चांगले असते. त्यामुळे मी तेथे जेवण करण्यासाठी यांना घेऊन गेलो.

अनलिमिटेड जेवणं होत. पण आपल जेवण काय तर दोन पोळ्या थोडी भाजी बस. सोबत स्वीट म्हणून जिलेबी होती. त्यतील दोन पीस खाल्ले. आणि रबडी हि होती. ती आवडली म्हणून २-३ वाट्या खाल्ल्या. आणि पोट भरलं? अहो भरलं नाही जास्त झाल.

घरी येईस्तोवर हात पाय गळून गेल्यासारखे झाले. अस्वस्थता वाढली. आणि सायंकाळी ७ च्या दरम्यान वांती होऊन सर्व बाहेर पडल. तेव्हा थोडं बर वाटायला लागलं. रात्री जेवण केल नाही. रात्री सौ. म्हणाल्या कि ती रबडी सीताफळाची होती. अग, बाई तेव्हा काय झाले होते सांगायला. मी उत्तरलो.

अहो त्या रबडी मुलेच तुम्हाला त्रास होत आहे.

बरोबर आहे ग बाई तुझ.

आणि रात्री काय तर जुलाब सुरु झाले. रात्र भर हैराण झालो. कमजोरी एव्हडी वाढली आहे कि चालणे कठीण वाटत आहे. ऑफिस जाणे आवश्यक आहे. पण सुटी घेता येत नाही. सुट्या शिल्लक आहेत. पण नाही घेता येत. त्या आता वाया जातील.

शेवटी हे विकतचे दुखणे घेऊन आल्या सारखे झाले आहे बघा.

आता कान पकडले. बाहेरचे जेवण करायचे नाही.

तसे मला सुरुवाती पासूनच बाहेरचे जेवण अगर काहीही आवडत नाही.

तोंडाला पट्टी

“अरे मित्रा तू हे खाऊ नकोस तुला डॉक्टरने हे खाण्यास मनाई केली आहे ना.” मी त्याला थोड रागावूनच बोललो.
“अरे काही नाही रे. त्या डॉक्टरला काय काम असते. आला रुग्ण कि त्यला परत पाठविता येत नाही. म्हणून त्याला काही तरी सांगायचं, औषध द्यायची आणि हाकलून लावायचं.” मित्राचे बोल.
“अरे वेडा आहेस का तू? ५ वर्षापूर्वी तुझ एन्जिओप्लास्तीच ऑपरेशन झालेलं आहे तरी हि तू गंभीरतेने घेत नाही हा विषय? मला तुझं आश्चर्य वाटत बाबा. असो शेवटी तुझी मर्जी.”  शेवटी मी त्याच्या पुढे हात जोडले व तेथून निघून गेलो.
हे संवाद साधारण दोन महिन्यापुर्वीचे आहेत. झाल अस कि आम्ही दोघ हि आपापल्या घरी एकटेच होतो. म्हणून मी त्याला बोलावून घेतले होते. आल्याआल्या त्याने जंगी परतीचा मनोदय व्यक्त केला होता. मी त्याचा तो मनोदय काही पूर्ण केला नाही. साध आणि सोप जेवण स्वतः च्या हाताने तयार केल होत. फरसाणवाल्या कडून शेव आणले व त्याची छान पैकी भाजी केली. त्याला हे माहितच नव्हत. तो तर टी. व्ही. वरील आवडत्या सीरिअल मध्ये पूर्ण गुंतून गेला होता.
स्वयंपाक तयार झाला हे त्याला मी सांगितले समोर ताट ठेवूनच. भाजी बघून तो प्रथम नाराज झाला पण मित्राने स्वतः च्या हाताने बनविली आहे म्हणून नाईलाजास्तव त्याला ताटावर बसव लागल. ( सांगणार कोणाला?) आणि आम्ही जेवण सुरु केल. माझ त्याच्या कडे लक्ष होत व त्याच मात्र त्या सीरिअल कडे लक्ष होत. जास्त न बोलता मी जेवण केल.
त्यानंतर आमची भेट झाली नाही. दोघीही आपापल्या कामात गुंतून पडलो.
कालच मला वहिनींचा फोन आला. त्या थोड्या चिंतेत होत्या. “अहो वाहिनी काय झाल.” मी त्यांना थेट प्रश्न केला.
“अहो भाऊजी, आमच्या ह्यांना दवाखान्यात भारती कराव लागला आहे हो.”
मी एकदम ओरडलोच.”काय झाल वाहिनी त्याला.”
“भाऊजी, डॉक्टरांनी इंजीओग्रफी करायला सांगितली आहे.”
“पण अचानक कस काय?”
“आज सकाळी ते एका मित्राकडे गेले होते. तो मित्र ४ त्या माळ्यावर राहतो. चढता-चढता त्यांना त्रास झाला. व तेथूनच थेट दवाखान्यात न्यावे लागले. तपासल्यावर डॉक्टरांनी इंजीओग्रफी करायला सांगितली. थोड्या वेळाने रिपोर्ट येणार आहेत.”
“मी आलोच वाहिनी तिकडे.” मी लगेच हिला सोबत घेतलं आणि दवाखान्यात पोहोचलो. डॉक्टरांना भेटलो.ते माझे मित्रच निघाले. त्यांना विचारला तर त्यांनी सांगितलं “अरे हे बाग रिपोर्ट तुझ्या मित्राच्या वाल्व मध्ये पुनः  कोलेस्तोराल साठले आहे. तू कसा रे मित्र त्याला समजावू शकत नाही का?”
” हो डॉक्टर मी त्याला प्रत्येकवेळी सांगतो. पण तो ऐकतो कोठे. बर आता काय करायचं?”
“मला तरी वाटच त्याच बाय-पास कराव लागेल. नव्हे तेच कारण सोयीस्कर ठरेल. तरी हि आपण आणखी एका स्पेशलिस्टच मत जाणून घेऊ.”
मी होकार दिला. व बाहेर येऊन वहिनींना धीर दिला. 
पण मी मनात विचार करायला लागलो ह्या मित्राने तोंडाला पट्टी लावली असती तर हि वेळ आली असती का?