पुढच्या वर्षी लवकर या

आज १२ दिवसानंतर गणपति विसर्जन हॉट आहे. या वर्षी एकुण १२ दिवस बाप्पा आपल्या सोबत होते. किती आनंद वाटत होता. सर्व दूर उल्ल्हास होता. आज मन दुखी होतय. दुखास्रुने बाप्पाला विदा केल जात आहे. “गणपति बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.” या गजराने त्यांची बिदाई होत आहे.

Ganesh2_Small_edited

बाप्पा  जातांना सर्वांना दुखी करून गेले
पण सोबत सर्वांना पाऊस रुपी प्रसाद देऊन गेले

एक दोन तीन चार  गणपती चा जय जय कार

एक दोन तीन चार गणपती चा जय जय कार

बाप्पा सर्वांवर मनसोक्त कृपा करा
आता मात्र भर-पूर पाऊस येऊन द्या
दुष्काळाचे सावट भूर होऊ द्या
आम्हा वर आपली कृपा होऊन द्या
पुढच्या वर्षी पुनः मात्र लवकर या
सेवेचा आम्हाला अवसर द्या

गणपती बाप्पाचे मखर

मखर कशे वाटले कृपया कळवावे. आपल्या प्रतिक्रिया मी मित्रापर्यंत  निश्चितच पोहोचविणार

आरास

माझ्या मित्राचा मुलगा घरीच दरवर्षी गणपती साठी जगभरातील प्रेक्षणीय स्थळांची प्रतिकृती तयार करून त्यात श्री गणपती ची स्थापना करीत असतो. मित्र मला दरवर्षी आवर्जून आठवण करून देतो ती आरास बघून जाण्याची. मी दरवर्षी जातोही. यंदा सुद्धा त्यांनी फोन  केला होता. कालच मी त्यांचे घरी जाऊन आरास बघितली. अत्यंत सुंदर व   प्रसंशनीय आरास.
त्यांनी सांगितले कि मुलाने इंटरनेट वरून होंगकोंग येथील एका प्रेक्षणीय स्थळाची  चित्रं डाउनलोड केली. त्यांची मोठ्या आकारातील फोटो प्रिंट काढून घेतली व त्यावरून हि आरास तयार केली. मला त्यांनी ती प्रिंट दाखविली सुद्धा. ती आरास बघून राहवलं नाही मी लगेच मोबाईल मध्ये फोटो घेयून टाकली. वेगवेगळ्या दिशेने घेतलेली ती फोटो बघून आपणाला सुद्धा हेवा वाटेल.

विशेषता अशी कि सर्व आरास मुलगा स्वतः एकटाच करत असतो. श्रीगणेशाने त्याला जी कला दिली आहे ती  प्रसंशनीय आहे. त्याचे कौतुक करावेशे वाटते.

तू सुखकर्ता ……….

//श्री गणेशाय नमः//

Ganesh 3_edited

          उद्या पासून गणेश उत्सवाला सुरुवात होत असल्याने जिकडे  तिकडे  लोकांची  झुंडच्या झुंड फिरतांना  दिसत  आहेत . दुकानांवर  गर्दी  आहे . सर्व   आपापल्या  पसंतीची  गणरायाची   मूर्ति  दुकानांवर  बघतांना  दिसत आहेत.   आपापल्या  ऐपतिप्रमाणे खिश्याला  परवडेल  त्या  प्रमाणे  मूर्ति निवडून  राखीव  करून घेत  आहेत. आम्ही  सुद्धा  आमच्या  इमारतीतील  मंडळासाठी  रात्रि उशिरा  जाऊन एक छानशी  मूर्ति पसंद  केली  आणि  पैसे  देऊन  राखीव करून घेतली. उद्या साधारण  दहा  वाजल्यापासून  रस्त्या  रस्त्यावर  गर्दीच  गर्दी दिसेल .  जो तो आपल्या  घरासाठी  किंवा  लहान  मोठ्या   मंडळासाठी राखीव केलेली  मूर्ति घ्यायला  जाईल  आणि वाजत  गाजत  सिद्धिविनायकाला   घरी  घेउन  येईल.

” गणेश उत्सव : प्रारंभ “

         आज गणेश चतुर्थी, विनायकाचे  आगमन  असल्याने  दिवस कसा  उत्साही  वाटत  आहे. मी  सुद्धा  उत्साही आहे .श्रावण संपला की भाद्रपद सुरु होतो. भाद्रपदाच्या चतुर्थीला गणपतीची स्थापना केली जाते.    विविध प्रकारची सजावटी ची सामुग्री ची दुकानं सुद्धा दिसायला लागली आहेत दहा वाजता  रस्त्यावर जिकडे  तिकडे  लोकांची  झुंडच्या झुंड दिसली . गर्दीच गर्दी. मानसच  मानसं  चोहिकडे . मनात  आले  आपल्या देशाची  जनसंख्या खुपच  वाढली  आहे. असो, रस्त्यांवर कोणी एकदंताला आणायला, तर कोणी घेऊन जातांना दिसत आहे.. प्रत्येक  जण   आप आपल्या  ऐपतिप्रमाणे चालत / मोटर  साइकिल  वर / रिक्षामध्ये / हातगाडीवर  किंवा कारमध्ये   श्री गणेशांना नेताना  दिसत  आहे. . मनात आले, हा भेदभाव  का? मात्र  देवाकडे  भेदभाव नसतो. मूर्ति लहान असली  / मोठी असली, तरी तो  देवच,  सर्वांवर  सारखेच  प्रेम करणारा.    सर्वांवर प्रेमाचा  सारखाच  पाऊस पडणारा .

          हो, पाऊसाच नाव निघाल आणि मन पुनः भरकटलं.  या वर्षी अद्याप, आगस्ट संपायला आला तरी व्यवस्थितपणे पाऊस हा आलेलाच नाही. सर्व कशी त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण तो यायला तयारच  नाही. त्याच्या  नाराजीचे कारण ते काय? हे समजतच नाही.  देवा गजानना तू तरी खुश हो.