सुंदर जग हे…

जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे…
मात्र ती तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर
अवलंबून आहे…. शुभ सकाळ👍👍

हा संदेश व्हाट्सएपच्या माध्यमातून (नाही तरी सध्या हा एकच माध्यम आहे संदेशवहन करण्यासाठी) आला आणि मनाला जरा आधार (सध्या ह्या व्हर्च्युअल आधाराचे महत्त्व खूप वाढले आहे. माणसाला आता हा एकमेव आधार राहिला आहे) मिळाला. हा संदेश परत परत वाचून मनाला उभारी देत होतो. तितक्यात अर्धांगिनी शेजारी येऊन बसली.

“लक्ष संदेशावर होते म्हणून समजले नाही कोण आलय ते.” मी म्हणालो. (नाही तरी घरात दोघेच असल्याने येऊन येऊन कोण येणार होतं)

पण तीने संदेश वाचला होता.

ती म्हणाली, “अहो, माझं ही हेच म्हणणं आहे तुम्हाला. जग खूप सुंदर आहे. प्रत्येक गोष्ट सुंदर आहे. फक्त तुम्हाला आपला दृष्टिकोन बदलायची आवश्यकता आहे.” असे बोलत असतांना ती आपला पदर ठिक करून माझे लक्ष तिच्या कडे वेधून घेण्याचा प्रयत्न करित असल्याचे माझ्या लक्षात आले. जणू ती खूप सुंदर आहे असे सांगण्याचा प्रयत्न होता तिचा.

“हे बघा ही साडी किती सुंदर आहे न! त्यावरील ही फुलं बघा हो किती सुंदर दिसत आहेत” मी आपला हुं हुं करत होतो.

तिने पुन्हा सुरू केले “अहो मला कशी दिसतेय ही साडी?”. मी काहीच प्रतिसाद न दिल्याने तिने पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहिला, “अहो, मी कशी दिसतेय या साडीत??” आता मात्र मला प्रत्युत्तर देणे भाग होते. नाही तर सांगता येत नाही काय झाले असते. “अग, खूप छान आहे ही साडी. कधी घेतली होती आपण? मला आठवत नाही म्हणून विचारले बस?”. मी सहज विचारले. “आपण? किती साड्या घेतल्या आहेत हो तुम्ही माझ्या साठी आतापर्यंत. आणि हो एखाद्या विषयाची वाट लावण्यासाठी मुळ विषयाला वेगळी वाट करून देण्यात हातखंड आहे तुमचा. याबाबतीत कोणीही तुमचा हात धरु शकणार नाही बर. प्राविण्य मिळविले आहे आपण याविषयात नाही का?” ती अक्षरशः डाफरलीच. मोठ्या तावातावाने ती बोलली. “अग, तसं नाही काही. मला खरचं आठवत नाही म्हणून म्हणालो मी! आणि ते तू काय म्हणालीस विषय…” “अहो, मी सुंदरतेचा विषय करत होते. तुम्ही साडी कधी घेतली असा विषय करून मुळ विषयाची वाट नाही का लावली.” “सॉरी सॉरी बर का. माझ्या मनात असे काही नव्हते. असो तर तू सुंदर आहेच मुळात.”

“पण तुम्हाला मी कधी सुंदर दिसलेच नाही. सर्व जग म्हणतं कि मी किती सुंदर आहे. सिनेमात जावे म्हणून. पण माझा नवरा कधीच मला सुंदर म्हणत नाही. जाऊ द्या. नाही तरी जगात कोणत्या पुरुषाला आपली पत्नी सुंदर वाटते.”

“अग, पण मी कधी म्हणालो आणि कोणाला म्हणालो कि माझी बायको कुरुप आहे. मला अभिमान आहे कि तू माझी पत्नी आहे. परवा काय झाले बघ. आपण नाही का बाजारात गेलो होतो.”

“हो हो. गेलो होतो. मग काय त्याचं??” मी,” काय झाले? काल मला कॉलेजचा एक वर्गमित्र भेटला. चहा पीत असतांना तो म्हणाला कि परवा तुझ्या बरोबर कोण बाई होती बाजारात?” “अरे तुझी वहिनी आहे ती!” मी म्हणालो. ओ तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून मी नर्व्हस झालो. तर तो नाराजीने म्हणाला “यार जास्त विचार करू नको. होते असे प्रत्येकाला अप्सरा मिळत नसते.” मी पण “चलता है यार!” असे म्हटले. तो पुढे म्हणाला “यार तू आपल्या कॉलेज मधील हिरो होतास. सर्वात सुंदर. किती मुली तुझ्या मैत्री साठी आसुसलेल्या असायच्या.” मी म्हटले, “जाऊ दे रे. कोण म्हणतं माझी बायको सुंदर नाही.” तो, “तसे नाही रे पण …..” “गप्प बस मित्रा. मला आता हा माझ्या बायकोचा अपमान सहन होत नाही.” आणि मी त्याला हाकलून दिले. तूच सांग बर माझे काही चुकले का यात. ती लगेच खुश. “तुम्ही खर बोलत आहात न!” “अग तुझी शप्पथ.” आणि ती “मला क्षमा करणार न तुम्ही. उगीच मी तुमच्या वर शंका घेत होते. अहो पण तुमचे खरच माझ्यावर प्रेम आहे का?” मी आपलं फुगलो आणि फिल्मी स्टाईल मधे म्हणालो, “तेरे लिए तो मै आसमान से तारे भी तोडकर ला सकता हुँ.” “बर बर. ते तारे तोडायचे राहू द्या. आणि प्रेमाची परिक्षा द्या आता.” मी, “म्हणजे काय करावे आम्ही?” “महाराज आम्ही थकलो आहोत काम करून. लॉकडाऊन मुळे तुम्ही घरात बसून थकला असणार. व्यायाम पण नाही. सकाळची सैर पण सैरभैर झाली. मग थोड उभे राहा, चालत चालत किचनमध्ये जा परत या परत जा. तितकेच वाकिंग होईल. आणि नुसतेच वाकिंग करून काय होणार. दोन कप चहा केला तर थकवा निघून जाईल आमचा.” आम्ही आ वासून बघतच राहिलो महाराणींकडे. “अहो पण दोन कप चहा पिणार आपण. पित्त वाढेल आपले.” मी पण महाराजांच्या आविर्भावात उत्तरलो. “महाराज आम्ही एकटीने चहा पीणे शोभून दिसत नाही. आपण ही घ्या आमच्या सोबत चहा.” महाराणी उत्तरल्या. आता काय करणार स्वारी(अर्थात मी हो ) आपल्याच जाळ्यात अडकली होती. गुपचूप जाऊन चहा करून आणला.

(ही एक काल्पनिक कथा आहे. या लॉकडाऊन च्या काळात नवविवाहित पण साधारण दोन वर्षे लग्नाला झालेल्या व घरात कंटाळलेल्या जोडप्याची ही काल्पनिक कथा. टाईमपास कसा करावा. बस. इतकेच. )

(8520753)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात… त्यांना तोडण हा क्षणाचा खेळ असतो तीच माणस जोडणं हा मात्र आयुष्याचा मेळ असतो…! 🌹🌹🌹 सुप्रभात🌹🌹🌹. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐www.koshtirn.wordpress.com. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

हास्यारोग्य

नाही नाही, तुम्ही समजताय तसा हा काही रोग नाही. आणि मला वाटतं असा शब्द ही अस्तित्वात नाही. हा मी आताच तयार केलेला नवीन शब्द आहे. हास्य आणि आरोग्य दोघांचे मिश्रण म्हणजे संधी.

खरच हास्य हे आरोग्य ठणठणीत ठेवण्यासाठी योग्य औषध आहे. याचे डोज प्रत्येकाने दररोज दिवसभर किंवा कमीत कमी तीन वेळा तरी घ्यायला हवे. प्रमाण विचारताय राव. आता हे बघा. देवाने प्रत्येकाला दोन गाल, दोन ओंठ, दांत, वाणी, जिव्हा दिले आहेत. जितका शक्य असेल तितका त्याचा वापर करावा.

आपआपल्या ऐपतीप्रमाणे डोज घ्यावा. थोडा जास्त घेतल्याने त्रास काही होत नाही. म्हणजे विपरीत परिणाम काही होत नाही. पण अति डोज नको नाही तर वेड्यांच्या दवाखान्यात न्यावे लागते. हा हा हा.😆😆😆😆. अति तेथे माती असे आपले पूर्वज उगाच म्हणत नसत. आता आम्ही ही म्हणतो. पण एक मात्र नक्की. काही कालावधी नंतर आम्ही ही पूर्वज होणार. तेव्हा आपले वंशज ह्या म्हणी पूर्णतः विसरून गेलेले असणार आणि आपल्याला ही. कारण काळ झपाट्याने बदलत आहे. लोकं चंद्र आणि मंगळावर राहायला जायची स्वप्न बघत आहेत. अहो, चंद्रावरचे प्लॉटपर बुक झालेय म्हणतात. कुठेतरी वाचल्यासारखे वाटतेय. 😆😆😆😆.

(3920706)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

😊 😊

कोणीतरी एका विद्वान महापुरूषाला विचारले, “राग म्हणजे काय ?”
विद्वानाने हसत उत्तर दिले ,”राग म्हणजे दुसऱ्याची चुक असतांना स्वतःला त्रास करून घेणे”

💐🙏🏻शुभ सकाळ🙏🏻💐

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.koshtirn.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

संयम…..

“चूक नसताना सुध्दा
निव्वळ वाद टाळण्याकरिता
मागितलेली माफी
जीवनातील संयमाचं
एक मोठं उदाहरण ठरतं !!”

🌹शुभ सकाळ🌹

वरील “शुभ सकाळ” संदेश आज सकाळी-सकाळी मी सौभाग्यवतींना पाठविला. म्हटले तोंडाने तर रोजच बोलतो आपण आज मूकसंदेश पाठवू.🤫 एका तासानंतर अचानक घराला हादरे बसायला लागले. मला काही कळेना काय झाले ते. क्षणाचाही विलंब न करता मी सौ. ठिक आहेत न बघण्यासाठी बेडरूमकडे धावायचा प्रयत्न केला. पण हादरे इतक्या जोरात होते कि पाय स्थिर होत नव्हते. त्यामुळे मला पळता आले नाही. मी तसाच स्तब्ध उभा राहिलो. बेडरूममधून आवाज आला. सॉरी चुकलं. आवाज नव्हे डरकाळी. आणि मला घाम फुटला. एक मात्र झालं. हादरे कमी व्हायला लागले. तसं माझ्या मनात आलं होतं पण आता पक्की खात्री झाली कि हे हादरे भूकंपाचे नव्हते. हे सौभाग्यवतींच्या संतापाचे हादरे होते. माझ्या डोक्यात चक्र फिरू लागली. लक्षात आले कि तासाभरापूर्वी आपण शुभसंदेश पाठविला आहे. त्यावरून संताप झाला असावा. मग लक्षात आले कि त्या संदेशात गुढ कारण लपलेले होते. खरे ही होते ते. कारण कालच एक घटना घडली होती. माझी चूक नसताना सुध्दा
निव्वळ वाद टाळण्याकरिता मी सौ.ची माफी मागितली होती. इतक्या वेळात दुसरी डरकाळी कानी पडली आणि मी खाडकन भानावर आलो.

धावत बेडरूममध्ये शिरलो आणि रणरागिणी समोरच चवताळलेल्या सिंहिणी सारखी उभी आहे हे लक्षात येताच जागच्याजागी थबकलो. आणि “तेथेच उभे रहा.” हे शब्द विस्तवावरून भाजून हवेत उडत कानावर पडत आहेत असे वाटले.😭 शरीर घामेघाम झाले असल्याने मी हळूच खिशात हात घालून रुमाल काढला व तोंड पुसायला लागलो. पुढील आदेशाची वाट बघत. तेही खाली मान घालून. याचा मला खूप फायदा होतो. तिचा राग क्षणात ५०% उतरतो. मी सुरुवातीपासून हा कानमंत्र अंगिकारला असल्याने ती संयमाने वागते.( तुम्हाला वाटत असेल याला संयमाने वागणं म्हणतात. होय यालाच म्हणतात. एके दिवशी संयम सुटल्यावर मला काय भोगावे……. जाऊ दा न मित्रांनो उगाच सर्व उघड करायला नका न लावू.) हा कानमंत्र मला माझ्या सासूबाईंनी दिला होता. म्हणून मी त्यांना गुरूमाई म्हणतो. उरलेला राग थोडी त्यांची स्वतःची व त्यांच्या माहेरच्यांची स्तुती केल्यावर उतरतो. नाही, नेमकं हेच मला जमत नाही. आणि हिच गोष्ट तिने हेरून ठेवली आहे. म्हणून जेव्हा ती रागवली व मी माहेरच्यांची स्तूति केली कि तीची ट्युब पेटते व ती मनातल्या मनात हसते. मला हसल्याचे जाणवू न देता. हे तंत्र ह्या बायकांना कस काय जमतं काही ठाऊक नाही. पण ती मनात हसली कि मला कळते. तुम्ही म्हणत असाल! कस काय? हे गुपित आहे व ते मी कोणालाही सांगत नाही. तीन दशकं उगाच सोबत काढली का राव! माझी ट्युब पेटली कि आमच्या घरात लख्ख प्रकाश पडून घर इतकं प्रकाशित होऊन जाते कि तिला माझे व मला तिचे मन स्पष्ट दिसायला लागते. ते दोन्ही मन अतिशय पारदर्शी असतात. त्यात काही ही नसत प्रेमाशिवाय.🤔🤔😆😆

(720675)

👌💐👌💐👌💐👌💐👌💐👌💐👌💐👌

http://www.koshtirn.wordpress.com

💐👌💐👌💐👌💐👌💐👌💐👌💐👌💐

हास्य विनोद…☺

नवरा -:नविन वर्ष सुरू होणार आहे, सांग तुला काय गिफ्ट देऊ ?

बायको -:अस काही तरी द्या जे पुर्ण वर्षभर चालेल ….

नवरा -:हे घे केलेंडर. हे पूर्ण वर्षभर चालेल. इतकंच काय यातून बरच ज्ञान पण मिळेल. भरपूर वाचन होईल दररोज. एका पानावर इतक आहे कि रोज ते पान वाचायचे.

😃😜😃😜😃😃😜😃😜😃😃😜😃😜😃

हातात हात…..(सहज विनोद)

मी, काल बसल्या बसल्या मोबाईलवर व्हाट्सएपच्या पोस्ट वाचत होतो. एक पोस्ट खूप आवडली. बायकोला वाचून शेअर करावी असे मनाला जस्ट चाटून सॉरी सॉरी वाटून गेले. तिला आपल हे व्हाट्सएप बिट्सएफ अजिबात आवडत नाही. खर म्हणजे तिला स्मॉर्टफोनच आवडत नाही. पण नाईलाजाने तिला मी हातात घेतलेला फोन झेलावा लागतो. तसं मी फोन हातात घेतला कि ती चिडते, नाही तर तोंड दुसरीकडे करून घेते किंवा तिसरा पर्याय म्हणजे मोबाईल हिसकावून फेकून फोडते. नाही पण हा तिसरा पर्याय फक्त माझ्या मनात आहे बर का! अजून तरी तिने तसे केलेले नाही व करणार ही नाही याची मला हजार टक्के खात्री आहे. कारण फोन दहा हजाराचा आहे. पण हे मॉडेल बंद होऊन दोन वर्षे तरी झाली असावी. पण तिला हे माहित नाही व मी अशा गोष्टी माहिती ही करून देत नाही. उगाच अंगलट यायचे.

मी हे केस उन्हात बसून पांढरे केलेले नसल्याने व तुमचा सर्वांचा घनिष्टतम (यापेक्षा मोठा शब्द सूचत नसल्याने) मित्र असल्याने एक कानमंत्र सांगतो मित्रांनो, आपल्या कडील सामान्य ज्ञान हे योग्य ठिकाणीच वापरावे. त्यासाठी मित्र मंडळी सर्वात योग्य ठिकाण आहे घर नव्हे. असो, खूप विषयांतर झालं.

हो, ती पोस्ट तिला कशी ऐकवायची? हा विचार मी करीत होतो. मी विचार केला कि थोडं जोरात पण तोंडातल्या तोंडात बोलून वाचावे. (हसू नका बरे ) म्हणजे तिच्या कानावर जाईल. मी पुटपुटलो.

” हातात हात घेतला तर मैत्री होते..”

आणि आश्चर्य म्हणजे तिच्या कानावर माझे बोल पडले सुद्धा. इतर वेळी ती दुसर्या खोलीत असते तेव्हा मी ओरडून काही सांगितले तरी ऐकायला जात नाही तिला. काय करणार बरोबर त्याच वेळी वारे विरुद्ध दिशेने वाहतात म्हणून आवाज ऐकायला येत नाही. असे ती मला सतत ऐकवत असते.😆🤣

पण आज मी पुटपुटत असून सुद्धा काय आश्चर्य माझा आवाज पोहोचला! लगेच प्रतिक्रिया आली सुद्धा.

“काय कोणाचा हात हातात घेताय या वयात?” थोडे रागावूनच उच्चारली ती.

मी काय बोलणार.

“अग, आज नेमके वारे तुझ्या दिशेने वाहत आहेत नाही.”

“हो न, बघा. तुम्ही नुसते पुटपुटलात आणि तुमचे ते गोड स्वर माझ्या कानात येऊन अलगद पडले बघा.”

तीचे ते खोचक बोलणे मी न ऐकल्या सारखे केले व पुढे वाचन सुरू ठेवले.

“दोन्ही हात जोडले तर भक्ति होते..”

“जळलं मेलं, कधी हात जोडतात का देवासमोर? देवळात कधी जात नाही व घरात ही देवाच्या कधी पाया पडत नाहीत.”

तीव्र भावना उमटत होत्या. मला पश्चाताप होत होता. उगाच संदेश वाचायला घेतला. बर आता वाचणे बंद केले तरी चालणार नाही. पूर्ण केल्या वाचून पर्याय नाही आता.म्हणून मी माझी प्रतिक्रिया उमटवली.

“अहो, काही तरी काय बोलत आहात? गणपती मीच बसवतो न दरवर्षी?”

“वा वा वा.👏🏻👏🏻👏🏻 (तीन वेळा टाळ्या वाजल्या ? वाजल्या काय हातावर हात आपटले हो. ते ही पूर्ण जोमाने.) वर्षांतून एकवेळा.”

“आणि ते गुढी पाडव्याला…..” माझे वाक्य संपायच्या आंतच त्यांची प्रतिक्रिया उमटली.

“अरे हो मी विसरलेच.🤔🤔 गुढी उभारली म्हणजे पूजा केली??? ठिक आहे. सांगा कोणता झंडा लावू.🏳तुमच्या साठी.” उपरोधानेच बोलली ती.

मी दुर्लक्ष केलं.व पुढे पटपट वाचन सुरू ठेवलं.

“हातावर हात आपटला तर टाळी वाजते..”

“कुणाला हात दिला तर मदत होते..”

मधेच ती पुन्हा, “हे बघा, काही कुणाला मदत बिदत द्यायची नाही. माझे भाऊ येतात बिचारे त्यांना साधा चहा पाजायला सुद्धा हॉटेलमध्ये नेत नाहीत तुम्ही. एरव्ही जातात पण तो आला कि ‘घरचाच चहा पितो मी. मला बाहेरचा आवडत नाही.’ असे सांगून बोळवण करतात बिचार्याची. तो ही बिचारा ऐकून घेतो. साधाभोळा आहे तो.”

“अग, तो आला होता न तेव्हा नेमकं ते हॉटेल बंद होतं.” मी तिची नजर चुकवत बोललो. कारण मला काही केल्या खोटं बोलता येत नाही हो. खूप प्रयत्न केले पण विफल झालो. परिक्षेत नेहमी शेवटून पहिला येवून पास होत होतो. पण आयुष्याच्या परीक्षेत मी सपसेल नापास झालो.

“काही कारणं सांगू नका मला. मला सर्व माहिती आहे.” इति सौ.

मी पुन्हा वाचन सुरू केले.

“कुणाला हात दाखवला तर धमकी होते..”

“अरे हो. मला आठवले, माझा भाऊ आला होता तेव्हा तुम्ही त्याला हात दाखवला होता. मला सांगितले होते त्याने. म्हणजे तुम्ही त्याला धमकी दिली होती का? 🤛 बाप रे. लावा माझ्या भावाला फोन,📱सांगतेच मी त्याला.”

“अग, काही तरी काय बडबडत आहेस. त्याला मी भविष्य सांगण्यासाठी हात दाखवला होता.”

आता पुढे वाचावे कि नाही!हा प्रश्न मला पडला. तरी ही हाती घेतलेले काम पूर्ण करावे हे कोणीतरी सांगून गेले आहे. म्हणून मी पुढे भराभरा वाचायला सुरू केली. काही ही झालं तरी मधे थांबायचं नाही ही गांठ पक्की बांधून घेतली आणि बुलेट ट्रेनच्या गतीने वाचायला लागलो.

“हात वर केले तर असहाय्यता दिसते..”

“हाता वर हात ठेवले तर निष्क्रियता दिसते..”

“हात पुढे केले तर मदत होते..हात पसरले तर मागणी दिसते..”

“हाताचे महत्व इतक की अनेक हात पुढे आले तर अशक्य ते शक्य होते.”

वाचन झालं आणि एक मोठ्ठा सुस्कारा सोडला. पटकन उठलो आणि चप्पल घालून बाहेर पडलो. ती काय सांगते आहे हे ऐकायच्या आंत. उगाच काही तरी काम मागे लावले तर🙏🙏🙏🙏

(420672)

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

.🌹 शुभ सकाळ🌹

चांगला स्वभाव गणितातल्या शून्यासारखा असतो, ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते.

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
http://www.rnk1.wordpress.com

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

” अहो, जरा ऐका न…”

“अहो, तुम्ही हॉलमधे आहात का?” तिने बेडरूम मधून आवाज दिला.

“हो ग!काही काम आहे का?”मी पेपर वाचता वाचता उत्तरलो.

“अहो, जरा ऐका न” तिने थोडे लाडाने म्हटले. मी समजलो. तिने बेडरूममध्ये बोलावले होते ते.

“हं बोल काय म्हणतेय.” मी बेडरूममध्ये गेल्यावर बेडवर बसता बसता विचारले.

“काही नाही.” ती मला बसताना बघून सुद्धा मला “बसा न” असा प्रेमळ आदेश देत म्हणाली.

मी ही मिश्किलपणे “धन्यवाद ” म्हणत पलंगावर बसलो. (पलंग हे मी मनातच म्हणालो कारण पलंगाला कॉट म्हणायचे असा तिचा ती या घरात आल्यापासून आदेश आहे व आम्ही सर्व तिचे सर्व आदेश पाळतो).

गुगल इमेज

“मग कशाला आवाज दिला?” मी विचारले. ती माझ्या कडे प्रश्नार्थक नजरेने बघत राहिली.

मी म्हणालो, “अग, तू मघाशी मी “बोल काय म्हणतेय?” असे विचारले तेव्हा मला “काही नाही” असे म्हणाली न. त्यावर मी म्हणालो “मग कशाला आवाज दिला मला?”

“बर बर. तुम्ही न. गोंधवळून टाकतात समोरच्याला” आता तिचा चेहराच सांगायला लागला होता कि ती गोंधळून गेली आहे. मी मनातल्या मनात हसलो.( तिला बर्याच गोष्टी आवडत नसल्याने आम्ही सर्व त्या गोष्टी मनातल्या मनात करत असतो. इतकी वर्ष झाली. आता आम्हाला मनातल्या मनात काम करण्याची सवय झाली आहे.)

“मी म्हणत होते हॉलमध्ये असाल व इकडे येत असाल तर मला ते टिपॉय वर ठेवलेले कुकींग चे पुस्तक घेऊन येणार का?”

“अग, मग हे सांगण्यासाठी मला इकडे बोलावले तू.”

” अहो, तसं नाही. मला वाटले तुमचा इकडे येण्याचा काही बेत असेल. तर येताना साधं एक पुस्तक आणायला काय हरकत आहे!”

” अग पण माझा असा काही बेत असावा असे तुला वाटण्याचे कारण काय?”

“अहो, सहज मला असं वाटलं. ते काय म्हणतात! इंट्युशन का काय ते.”

“अग, काही तरी आपलं. मी पेपर वाचत होतो.”

ती तातकन,” पेपर नाही. वर्तमानपत्र. हे इतकी वर्षे झाली मी सांगत आले आहे. पण तुम्ही लक्षात ठेवत नाही.” अरे बाप रे मुड बिघत चाललेला दिसून येऊ लागला. आणि मी लगेच, “बर, ते कसले पुस्तक आणायला सांगत होतीस तू.”

“अहो, ते~~~~~~~हो आठवले. कुकींग चे.” मी हॉलकडे आपला मोर्चा वळवणार तोच बाईसाहेब,” अहो, तुम्ही नाराज नाही न झालात माझ्यावर.”

“अग तस नाही. पण मी पेपर नाही नाही वर्तमानपत्र वाचत होतो न त्यामुळे…..”

“अहो, आता तुम्हाला ओरडून सांगणे योग्य वाटते का? सोसायटी मधील लोकं काय म्हणतील? म्हणून मला तुम्हाला बोलावून सांगणे योग्य होईल असे वाटले”

“हो. ते ही बरोबर आहे म्हणा.”

“बर असू देत. तुम्ही नाराज होऊ नका. मी बघते.” आता ती मला आश्चर्याचा धक्का देत ( हा खरोखरचा धक्का होता. मी सडपातळ व ती…. त्यामुळे तिचा स्पर्श जरी झाला तरी हवेत उडाल्यासारखे वाटते.) हॉलमध्ये पुस्तक शोधायला गेली. मला वाटले. चला मी सुटलो एकदाचा.

पण. दोनच मिनिटांनी तिने पुन्हा आवाज दिला.

“अहो. जरा ऐका न!”

मी “हो हो. आलो.” म्हणत आज्ञा धारकासारखा हॉलमध्ये गेलो.

मी सोफ्यावर बसण्यासाठी वाकलो. तितक्यात ती म्हणाली. “अहो बसायला नाही बोलावले मी.”

“मग!” मी तिच्या कडे प्रश्नार्थक नजरेने बघितले व एक तसाच उकडू स्थितीत स्तब्ध राहिलो. मग सरळ झालो.

“अहो मी येतांना चष्मा तेथे बेडवर विसरले. जरा!!!!” तिची केविलवाणी विनंती ऐकून मला राहावले नाही.

“हो बाई. आणतो~~~.” तिचे एक आहे. पहिल्यांदा ती आदेश देते. दुसर्यांदा मात्र केविलवाणा चेहरा करून विनवणी केल्या सारखे करते. मग काय. पुरुष बिचारा ऐकणार नाही तर काय करणार! आणि जर तरीही ऐकले नाही किंवा न ऐकल्या सारखे केले तर मात्र ……….. सॉरी मी हे अनुभवले नाही. फक्त पाहिले आहे. एकदा मुलावर हा प्रयोग झाला होता. तेव्हा मी पाहिले होते. तेव्हा पासून मी पहिल्या आवाजात च ऐकतो. जास्तीत जास्त दुसर्या आवाजात.

असो. मी बेडरूममध्ये चष्मा आणायला गेलो तर मला तो तिने सांगितले होते त्या ठिकाणी म्हणजे बेडवर सापडला नाही. इकडे तिकडे ही शोधला पण सापडला नाही. मग मी तिला आवाज देऊन हे सांगितले. तर ती “अहो इकडे येऊन बोला. तेथून ओरडू नका. सोसायटी मधे आवाज जातो. लोकं काय म्हणतील. तसे ते बिचारे काही ही म्हणत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे तुम्हाला ते चांगले ओळखतात.” झालं सुरू. आता मी वैतागून काही बोललो, नव्हे नुसते बडबडलो (मनातल्या मनात, याची मला खूप खूप सवय झाली आहे.), तरी तिचा पारा चढेल आणि मग माझेच काय कोणाचेही घरात राहणे अवघड होऊन जाते. मुलं असताना असं काही घडलं तर मग माझंच अवघड होऊन बसते. सर्व घर माझ्या वर उलटतं, मुलांसहित.

असो, तिने आवाज दिल्यावर मी हॉलमध्ये गेलो.

“हं, बोल?” मी तिच्यासमोर एखाद्या आज्ञाधारक बाळासारखा उभा राहत म्हटले.

“मला वाटते त्या दुसर्या बेडरूममध्ये असेल. नाही तर किचनमध्ये तरी असेल.”

मी पटकन किचनमध्ये गेलो. कारण ती थोड्या वेळा पूर्वी तेथेच होती. आणि चष्मा तेथेच डायनिंग टेबलावर होता. तो मी उचलून तिला हॉलमध्ये दिला आणि लगेच बेडरूममध्ये कपडे बदलायला गेलो. बाहेर जायला निघालो व जातांना “अग मी जरा बाहेर जाऊन येतो. तो मित्र वाट बघत असेल.” असे म्हणून तिच्या प्रतिसादाची वाट न बघता घराबाहेर पडलो. बाहेर पडता पडता माझ्या कानावर तिचा आवाज आला, “अहो, जरा ऐका न”.

(19657)

🌼🌹🌹🌼🌼🌹🌹🌼🌼🌹🌹

तुटलेली फुले, “सुगंध” देऊन जातात🌹गेलेले क्षण, “आठवण” देऊन जातात प्रत्येकांचे “अंदाज” वेग-वेगळे असतात
म्हणुन काही माणसं “क्षणंभर”, तर काही “आयुष्यभर” लक्ष्यात राहतात…!!

💐💐 शुभ सकाळ 💐💐
🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

http://www.manachyakavita.wordpress.com
🕊🦢☀🦢🕊🌷🕊🦢☀🦢🕊

आरसा(19547)

रोज सकाळी आंघोळ झाल्यावर डोक्यावर खोबरेल तेल लावले कि कंगवा घेऊन आरशासमोर उभे राहायचे व भांग पाडायचा हे प्रत्येकाचे नित्य कर्म. मला ह्या धनाढ्य लोकांचा प्रश्न नेहमी सतावत असतो. बिचारे स्वतः केस विंचरत असतील का? नाही मला नाही पटत. अरे इतके नौकर चाकर असतात ते काय कामाचे? मला वाटते त्यांचे रोज सकाळी उठल्यावर दाढी करणे, केस विंचरणे हे नौकर करत असावेत. असो.

पण आरसा हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. रस्त्यावर राहणाऱ्या गरिबाला ही आरसा लागतो. तो अखंड नसला, तुकडा असला तरी चालतो. तोंड दिसते न मग झाल. मोठ्यांकडे भिंती एवढ्या आकाराचे आरसे असतात. मुगले आजम सिनेमातील ते गाणं आठवा. चहु बाजुंनी आरसेच आरसे. आज ही जुन्या वास्तुत गेले जसे एखादा महाल तर तेथे मोठ मोठे आरसे दिसतात.

पूर्वी सर्कशीत बघा चित्र विचित्र चेहरे दिसणारे आरसे असायचे. तिकिट काढून तेथे जात असू लहानपणी. गंमत वाटायची.

गुगल वरून साभार

सिनेमात आरशांनी तयार केलेला भुलभुलय्या ही आठवत असेल. त्यात नायक व खलनायक भांडता भांडता शिरतात. खलनायकाला हजारो नायक दिसतात. तो गोंधळतो. नायकाला मात्र तो दिसत असतो. तो त्याची खूप धुलाई करतो आणि सहज निसटतो ही. आपण प्रेक्षक हसून हसून लोटपोट होतो.

आरशाचा शोध कधी व कोणी लावला याचा मी शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला पण मला त्याचा काही केल्या शोध लागला नाही. असो.

।।इति श्री आरसा पुराण समाप्तम्।।

स्वप्न…(19538)

अचानक खडबडून जाग आली तर समोर सौ. उभ्या. माझ्या घाबरलेल्या वदनाकडे बघून त्यांनी त्यांच्या वदनाने विचारणा केली “अहो काय झाले एकदम असे घाबरायला?”

“काही नाही. कुठे काय? ” मी.

“अहो, तुमचा चेहरा सांगतो आहे कि सर्व. तुम्ही स्वप्नात भितीदायक काही तरी बघितले ते. आता सांगून टाका काय बघितले ते.”

मी बिचारा आता खरोखरच घाबरलो. “अहो काय झाले कि मी स्वप्नात निवांत झोपलो होतो. तेव्हा मला स्वप्नात एक हत्तीच पिल्लू दिसले.” माझे बोल ऐकून आता ती आश्चर्यचकीत होऊन मोठे डोळे करून व कान उघडे करून मला ऐकायला लागली.

” ते पिल्लू सतत माझ्या समोर येऊन त्याची सोंड तोंडापुढे नाचवत होते. सुरुवातीला मी दुर्लक्ष केले. मला भास होतो आहे असे मला वाटले. कारण आपल्या घरात हत्तीचे पिल्लू कसे येणार? पण असे परत परत होत असल्याने मी डोळे वटारून पाहिले. लगेचच हात लावून पाहिले तर ते खरोखर हत्तीचे पिल्लू होते.

आता मात्र मी दचकलो. मी विचार करू लागलो कि हे पिल्लू मला का बर त्रास देत असेल? तितक्यात माझ्या कानावर शब्द येऊन आदळले काय मित्रा कसं वाटतयं नाकाने जेवण करतांना? मजा येतेय न!

मला आश्चर्य झाले.

पिल्लू: अरे मी तर फक्त पाणी पितो माझ्या सोंडेने. तुला सर्व काही तुझ्या ह्या सोंडेनेच करावे लागत आहे. आहे कि नाही ही शिक्षा तुला?

“हो न मित्रा, अरे सर्व काही ह्या नळीने घ्यावे लागतेय. कसला स्वादच कळत नाही.”मी

तो मोठ्या ने हसून माझ्या समोर पुन्हा एकदा सोंड नाचवून निघून गेला. आणि मी घाबरून डोळे उघडळे. मी आरशात पाहिले तर तसे काही नव्हते. म्हणजे माझ्या नाकाला सोंड नव्हती. मी निश्चिंत झालो. अचानक मोबाईलची घंटा वाजली आणि तशाच घाबरलेल्या अवस्थेत जागा झालो आणि समोर पाहतो तर तुम्ही उभ्या!”

“चला आज तुम्हाला दवाखान्यात जायचे आहे न! तयारी करा. मी जेवण वाढते. पोटभर जेवण करा आणि जाऊन या. ” सौ.

मला लक्षात आले आज बोलावले होते डॉक्टर साहेबांनी. मी देवाला विनवण्या करायला लागलो. देवा आता पुन्हा नको……

लाक्षागृह!

कधी कधी आपणाला जे दिसत तस प्रत्यक्ष नसत, पण जे नसत तेच दिसत. ही जुनी म्हण आहे हे आपल्या सर्वांना माहीतच असेल. कधी कधी तर काही ही नसत पण आपल्याला सर्व काही दिसत असत. अस कधी होत जेव्हा आपल मन आपल्याला तस बघण्यासाठी भाग पाडत तेव्हा. अहो थोड कोठे पोटात दुखायला लागल की आपल्याला कधी तरी कोणी तरी एखाद्याबद्दल सांगितलेली गोष्ट लगेच ध्यानात येते. जसे त्या अमक्याला पोटात दुखत होत आणि दवाखान्यात नेल्यावर फोटो वगैरे काढून झाल्यावर डॉ. ने सांगितले होते की त्याला केंसर झाला आहे. आणि ते आठवल की मन सुरु होतात मनाचे खेळ. अहो आपल मन फारच भाबड असत. लगेच त्याच्या मागे धावत आणि मग  गुदमरायला होत. अस वाटत तो यमराज त्याच्या त्या अगडबंब रेड्यावर बसून भला मोठा दोरखंड घेऊन आपल्या दरीच येऊन उभा आहे आणि कोणत्या ही क्षणी आपल्याला उचलून नेईल. झोपेत नव्हे तर जागे पाणीसुद्धा आपल्याला तो यमराज दिसतो खरोखर. असा अनुभव कदाचित प्रत्येकाला येत असेल. मी घेतलेला आहे. म्हणून सांगतो. पण मग मी मन घट्ट केले. काय होईल ते बघू . यम जरी येऊन ठाकला तरी त्याला परतवून लाऊ असा विचार मनात आला आणि मग काय विचारूच नका.

असो मुख्य मुद्दा हा नव्हे. खूप दिवसांनी माझ्या मनावर लिहीत आहे. लेखाचे नाव लाक्षागृह असे ठेवले आहे. त्याचा अर्थ सर्वांना ठाऊक असणारच. कौरवांनी पाण्डवांसाठी तयार केलेली लाक्षागृह ही एक अशी   वास्तू होती की ज्यात जाण्यासाठी पांडव आतुर झाले पण ती जशी होती तशी ती नव्हती. ती सुंदर होती पण भ्रम होती. ते त्यांना थोड्याच वेळात कळल.

महाभारत काळातील ही गोष्ठ वाचून असे वाटते की आपले पूर्वज किती प्रगत होते. असो असेच लाक्षागृह एका कलाकाराने रेखाटले आहे. तेही रस्त्यावर. 3 D Painting द्वारे. काळ परवा अचानक फेस बुक वर मला ते दिसले. त्या कलाकाराच्या साईट वर जाऊन भेट दिली आणि काही चित्र येथे टाकत आहे. कल्पना करवत नाही की त्या रस्त्यावर चालत असतांना कसे वाटत असावे. समोर खड्डा दिसत असेल. तोल चुकला आपण त्या खड्ड्यात पडू अशी सारखी भीती ह्या हळव्या मनाला वाटत असेल. जास्त हलवा मनुष्य असेल त्याला अशा खड्ड्यात आपण पडलो असे जाणवून त्याला हृदय विकाराचा झटका आल्याशिवाय राहणार नाही. बघा तर मग. पण जरा जपून. आप आपले हृदय सांभाळा. चुकून खड्ड्यात पडू नका कारण खड्डा इतका खोल आहे की कोणी बाहे कडू शकणार नाही.

त्या ब्लॉग ची लिंक : http://www.hongkiat.com/blog/

अग बाई जरा जपून!