एक महान गायक मोहम्मद रफी

काल हिंदी सिनेमा जगातील महान गायक मोहम्मद रफी साहब यांची ८५ वी जयंती होती. त्यांचा जन्म २४ डिसेंबर १९२४ सालचा व ३१ जुलाई १९८० रोजी हा महान कलाकार जग सोडून गेला. हम तुमसे जुदा होके, मेरी आवाज सुनो अशी अप्रतिम व सदाबहार गाणी गाणारा हा गायक १९४० ते १९८० हिंदी सिनेमात गात राहिला. त्यांचे घरचे नाव होते फिको. प्यासा कागज के फुल, गाईड, नया दौर अशा असंख्य गाजलेल्या सिनेमात त्यांनी गाणे गायले. त्यांची आठवण म्हणून त्यांचे काही गाणी सादर करीतआहे.

जब जब फुल खिले या सिनेमाच हे गाण ऐका.

ह्या व्हीडीओत मोहम्मद रफी दिसणार नाहीत फक्त त्यांची गाणी ऐकावीत

हिरा रांझा सिनेमाच हे अप्रतिम गाण”ये दुनिया ये महफिल…….”

स्वर-लता

आज दसरा आहे. या सोबतच आजचा दिवस आणखी महत्वाचा आहे. आज गाण-कोकिला लता दीदींचा वाढदिवस सुद्धा आहे. स्वरांची देवी ज्यांच्या रूपाने आपल्या देशाला एक अनमोल,अमूल्य असा हिरा देवाने दिला आहे.आज दीदी ८० वर्षांच्या झाल्या पण आज हि त्यांचा आवाज एखाद्या लहान मुली सारखाच वाटतो. हि त्यांना देवाने दिलेली  अद्वितीय अशीच  देणगी आहे.दीदींना वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दीदींच्या वाढदिवसानिमित्त google image  वरून download  केलेल्या त्यांच्या काही चित्रांचा स्लाईड शो सदर करीत आहे.
“तुम जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार”