अवघा रंग एक झाला😊…

(मित्रांनो, व्हाट्सएपच्या माध्यमातून एक अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारी गोष्ट प्राप्त झाली. ती जशीच्या तशी ये सादर करित आहे. लेखक अज्ञात आहे पण तो विठ्ठल स्वरूप असावा.)अवघा रंग एक झाला😊…..सावळी आज येणार नाही आजीच्या बहिणीच्या नातीने शेजारच्या गॅलरीतून ओरडून निरोप दिला,…ते ऐकून आजी अस्वस्थ झाल्या,…पडल्या पडल्या डोळ्यातून पाणी गळायला लागलं आता आपलं नॅपकिन कोण बदलणार ..?खरंतर सावळीमुळे आपण एवढं व्यवस्थित राहू शकतो आणि सावळी येणार नाही म्हणते पण का काय झालं,..? अगतिक होऊन चिडून ओरडून आजींनी विचारलं ,..त्यावर नात म्हणाली,.. “आजी कर्फ्यु लागला आहे रस्त्याने जीवावर उदार होऊन येते ती गेल्या 15 दिवसांपासून तुम्हाला काय माहिती हो बाहेर काय वातावरण आहे ते,..” .एवढं बोलून ती नात आत निघून गेली,…आजीला जाणवायला लागलं खुपच उष्ण पाणी आपल्या गालावरून ओघळतंय आपल्याला आता खरंतर मरून जावं वाटतंय,..देवा काय खेळ लावला आहेस रे ह्या जीवाचा..? लवकर सम्पव तरी अरे आमच्या सारखी मरण मागणारी माणसं सोडून तरुण लोक घेऊन चालला न्याय कुठे तुझा,…?तेवढ्यात आजीला लॅच उघडल्याचा आवाज आला,..आजी ओरडली ,..भयभीत होऊन कारण चावी फक्त सावळीकडेच असते,..आणि आताच तर निरोप असा आजी विचार करत होती तर समोर गोड हसणारी सावळी,.. आजी म्हणाली,” काय गम्मत करतेस का ग माझी म्हातारीची??”सावळी ओढणी कमरेला बांधत म्हणाली,..गम्मत केली नाही माझ्या बापाने केला होता तो फोन कारण खरंच बाहेर वातावरण खराब झालं आहे,..बाप म्हणतो लग्न आहे तुझं,…काही झालं तुला तर,..?
ऐकून आजीला हुंदकाच फुटला आणि आजी चादरीत तोंड लपवून रडू लागली,…सावळे किती करतेस ग माझ्यासाठी,…?नक्की आज पण भांडून आली असशील घरच्या लोकांसोबत,…सावळीने लगेच आजीचा हात हातात घेतला,..आजी रडू नका तुमचे खुप उपकार आहेत माझ्यावर त्यासाठी हे करणं तर काहीच नाही,..चला उठा स्वच्छ व्हा छान सावळीच्या मदतीने आजी अगदी प्रसन्न तयार होऊन मस्त बसली ,…आपल्या काळ्याभोर विठ्ठल मुर्ती समोर,…सावळीची सगळी लगबग सुरू होती,..छोट्याश्या मूर्तीला तुळशीहार तयार होता,.. त्याच्या समोर पुसून नाजुक रांगोळी रेखाटली होती,…चांदीची निरंजन चकचकीत घासुन साजुक तुपाने गच्च भरलेली शांतपणे तेवत होती ,…आजी शांत मनाने जप करत होती,..स्वयंपाक घरातुन सावळी बाहेर आली चहा घेऊन,… आजीने चहा घेताना विषय काढलाच,..”.सावळे तू नस्तीस तर काय झालं असतं ग माझ्या म्हातारीचं,…?? नुसता पैसा असुन उपयोग नसतो बघ …आयुष्यात मायेनं जवळ घेणारं लागतंच कुणीतरी,…नुसतं रक्ताच्या नात्याचं नाही ग बाई मनाच्या नात्याचं,..हो किनी ग,…जशी मला तू,…!”
सावळी म्हणाली आजी,..”.हे सगळं तुम्ही जीव लावला म्हणून आहे,..टाळी एका हाताने वाजत नाही,…आजी मला आजही आठवतं,.. एक तर पोरगी आणि त्यात काळी म्हणून बाप चिडत होता,..मारत होता,..म्हणून आई तुमच्याकडे कामाला येताना घेऊन यायची,.. तुमच्या मनाला पाझर फुटला माझं शिक्षण केलं,…आज मी चांगल्या हॉस्पिटलमध्ये नर्स आहे ती तुमच्यामुळे आणि मग माझं शिक्षण जर तुमच्या कामाला नाही आलं तर काय उपयोग हो,…मध्ये आई गेली तेंव्हा तर खरा आधार पैशानं, मनानं तुम्ही दिला मला,…आणि त्या पैश्यापेक्षा संस्काराची शिदोरी दिलीये आजी,…तुमच्याकडे असलेले सणवार,भजन,पुजा आनंद कसा मिळवावा ते शिकवून गेले,…ते सगळं मला अनुभवू दिलंत तुम्ही,…आजोबांना जाऊन वर्ष पण झालं नाही तर तुम्ही अश्या पॅरॅलीस झाल्या,… तुम्हाला मुलबाळ नसलं तरी तुम्ही मला मुली सारखंच जपलं ना,…मग माझं कर्तव्य मी करतीये आणि करणार,…होणाऱ्या नवऱ्याला पण सांगितलं आहे मी,… सकाळचे दोन तास माझे आजीसाठी आहेत खास लग्नानंतर सुद्धा,…म्हणुन सांगते आजी तुम्ही काळजी करू नका,…मी येते बरोबर कशीही,… मला माहित आहे मी गेल्यावर तुमच्या बहिणीची नात जी वर राहते ती येते तुमच्या मदतीला,… पण तुम्हाला पण मी येऊन गेल्या शिवाय करमत नाही ना,???”…दोघी हसल्या,…
हसता हसता आजीच्या डोळ्यात पाणी आलं,…आजी म्हणाली,..”सावळे तू हि विठ्ठल मुर्ती दिली आणि तेंव्हा पासुन मला तू सतत जवळ असल्यासारखं वाटतं,… तू तशी फार हुशार मी केलेल्या सगळ्या पंढरपूर वाऱ्या तुला माहीत होत्या,… पण ह्या 3 वर्षापूर्वी गुढग्यांच्या दुखण्याने मला वारीला जाता नाही आलं म्हणून मी नाराज होते तर तू चक्क हि मूर्ती आणून ठेवली माझ्या हातात,…काळीभोर आणि शांत,…
बरं आजी आता जाऊ का मी,…”आहो माझी आजीसासू सिरीयस आहे म्हणून लग्न उद्याच करायचं ठरलंय,… हे लॉकडाऊन काही उघडत नाही म्हणून घरातच करणार आहे ,…उद्या फक्त धकवून घ्या,…परवा येतेच मी आशीर्वाद द्या मला,…आजीला गहिवरून आलं,..सगळ्यांनी काळी म्हणून हिणवलेलं लेकरू,…कष्टाळू आणि प्रामाणिक होतं,… उद्या तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात होणार होती,…तिला जवळ घेत आजी म्हणाली काय देऊ ग तुला,…?तशी सावळी म्हणाली,..”.आनंदी रहाण्याचा आशीर्वाद बस बाकी काही नको,…”
आजीला तेवढ्यात काहीतरी आठवलं,…आजी म्हणाली,”सावळे तू खरेदी केली कि नाही तुला माझ्या त्या पैठणी लुगड्यासारखं लुगडं घालायचं होतं ना ,…आणि त्यावर मोत्याची नथ,…”
सावळी हसली आणि म्हणाली,”आजी हे लॉकडाऊन इतकं झटपट झालं ,…खरंतर आईने पैसे साठवून ठेवले होते मला तस पैठणी लुगडं घ्यायला पण आता राहिलं,… जाऊ द्या,… नंतर घेऊ चला येऊ मी,..?”
आजी म्हणाली,” थांब ते कपाट उघड,…ती खालच्या कप्प्यात सुती कापडाची घडी आण इकडे,…”
सावळीने पटकन ती घडी ठेवली हातात,…आजींन त्यातुन लालचुटुक पैठणी काढली,…आणि सावळीला म्हणाली,” घाल लग्नात,… आणि परवा मला आणुन दाखव कशी दिसली ते,…”
तशी सावळी म्हणाली,” आजी,… अहो मी तुमच्यासारखी पैठणी घेणार होते पण रंग हा नाही अहो माझ्या सारख्या काळीला चांगली तरी दिसेल का,..?”
आजी म्हणाली सावळे,…”अग माणसाचा कातडीचा रंग गौण असतो ग,…त्याच मन ज्या रंगाचं असतं ना,..त्यावर त्याच सौन्दर्य असतं,…. म्हणजे,…. कपटी,धूर्त,प्रेमळ,निरागस असे वेगवेगळे रंग असतात त्यावर विचार करायचा,…आणि आता मला सांग ह्या विठ्ठलाचं वस्त्र कोणत्या रंगाच आहे ग,…?”
सावळी हसुन म्हणाली ,”अगदी असंच लाल,…”
आजी लगेच म्हणाली,…मग त्याला ते वाईट दिसतंय का,???
सावळी म्हणाली,” आजी तो देव आहे,…त्याला चांगलंच दिसणार,…”
आजी हसली म्हणाली,…”सावळे देवत्व मूर्तीत नसतं असं नाही पण मूर्तीशिवाय जेंव्हा ते बघायच असतं ना तर ते,…माणसाच्या कृतीत,कष्टात,स्वभावात बघायच असतं,… आता ह्या महामारीच्या काळातच तर तू म्हंटली ना,…हे शेतकरी, पोलीस,नर्स,डॉकटर,सफाई कामगार अगदी देव बनुन पृथ्वीवर वावरत आहेत म्हणून,…”
सावळीने दोन्ही हात कोपऱ्यापासून जोडले आणि आजीला म्हणाली,”बोलण्यात मी तुम्हाला काही हरवू शकणार नाही,…द्या ते लुगडं मी परवा नेसुन आणि नवऱ्याला घेऊन येईल आशीर्वाद घ्यायला आणि सेवेला पण येईन,…जाऊ का आता,…??आजीने नथीची डबी पण ठेवली हातात,..तशी ती घाबरत म्हणाली,सोन्याची आहे आजी हि नथ मला नको,…आजी म्हणाली “घालुन परत आणुन दे मग तर झालं,…अग पैठणीवर शोभुन दिसेल,…”
सावळीचे डोळे पाणावले,…ती पटकन आजीच्या गळ्यात पडली,…आणि चटकन निरोप घेऊन निघाली,..
आजी हताशपणे पडून राहिली,…विठ्ठलाकडे पहात,…
तिसऱ्या दिवशी लालचुटूक पैठणी घालुन नवऱ्यासोबत ती आजीच्या अपार्टमेंटच्या गेटमधून आत शिरली तसं आजीच्या नातीने तिला वर ये म्हणून हाक मारली,…सावळीला खरंतर आधीआजीला भेटायचं होत पण आधी तिच्याकडे जावं लागलं,…
नातीने दरवाज्यातच तिला थांबवलं,…तोंडाला मास्क बांधूनच ती बोलत होती,..तिने सावळीला आजीच्या फ्लॅटची चावी मागितली आणि म्हणाली सावळे”,… अग परवा तू गेल्यावर काही तासात आजी गेली अग,…तू केलेलं जेवण द्यायला मी फ्लॅटमध्ये गेले तर आजी रडत होती,…मला म्हणाली,…” माझ्या सावळीच लग्न आहे,…तिला दिलेली पैठणी आणि नथ तिला माझी आठवण म्हणून सांग ,…मी जवळ बसले तर मला म्हणाली,ती विठ्ठल मूर्ती दे माझ्या जवळ,…त्या मूर्तीला कवटाळून म्हणत होती खरं सांग तूच सावळी बनून येत होतास ना,…आणि प्राण सोडले ग तिने,…
सावळी सुन्न होऊन गेली,…नवऱ्याने तिला सावरलं,…ती निघाली आणि निघताना म्हणाली त्या नातीला मला ती विठ्ठल मूर्ती देता का???नातीने लगेच फ्लॅटचे कुलूप उघडून ती मूर्ती तिच्या हातात दिली,…सावळी विठ्ठल घेऊन चालू लागली,…पण सावळीच्या मनातला प्रश्न विठ्ठल ऐकत होता,…
सावळी मनात म्हणत होती,..”आजी तुझी सेवा केली म्हणून मी तुझा विठ्ठल कि तू मला चांगलं जगणं दिलंस म्हणून तू माझा विठ्ठल,..??”माणुसकीचा हा अवघा रंग एक झालेला पाहून विठ्ठलमूर्ती हसुन म्हणत होती,… अवघा रंग एक झाला😊

(9320761)💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐www.rnk1.wordpress.com💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

मित्रच ते….(व्यंग कथा)

सुधीर आणि सौमित्र दोन अगदी जीवलग मित्र.

अधूनमधून भेटतात. पण सुधीर बाहेर गावी नौकरी साठी गेल्यानंतर त्यांची भेट क्वचितच होते. सौमित्र च्या लग्नानंतर त्यांची पहिली भेट होय. सुधीर च्या कानावर एक बातमी आली कि तो घटस्फोट घेतोय. त्याला हे न पटल्याने सुधीर गावी आला होता. सौमित्र ला सुधीर ने बोलावून घेतले गावाबाहेर नेहमी भेटतात तेथे.

सुधीर मित्राला विचारतो : कायरे मित्रा, तुझं वर्षभरापूर्वीच तर लग्न झालयं. इतक्या लवकर तुला घटस्फोट हवाय.
सौमित्र : यार, तुला काय सांगू!

सुधीर: अरे सांग की.

सौमित्र: माझी बायको माझ्या कडून लसुन सोलुन घेते,कांदे चिरून घेते आणि भांडी सुद्धा घासुन घेते.
सुधीर: मग त्यात काय? सर्वच करतात ही कामं.

सौमित्र: काय? ही काय पुरूषाची कामं आहेत व्हय!( आश्चर्याने)

सुधीर: अरे पण, ह्यात अवघड काय आहे, हे बघ मी तुला शिकवतो.

सौमित्र त्याच्या कडे टक लावून बघू लागला.

सुधीर ने सुरू ठेवले: (१) लसुण गरम करून घेतली की सोलायला सोपी जाते. मी तर मित्रा हेच करतो. एकदम सोपे जाते.
(२) कांदे चिरायच्या आधी फ्रिज मधे ठेव म्हणजे कापताना डोळ्यात जळजळ होणार नाही.

(३) भांडी घासायला घेण्यापुर्वी १० मिनिटे पाणी भरलेल्या टब मधे ठेव व नंतर भांडी घास.

(४) कपडे सर्फनी धूण्यापूर्वी साध्या पाण्यात भिजवून ठेवा म्हणजे डाग आरामात निघून जातील
सौमित्र: समजलं मित्रा. चांगलं समजलं.
सुधीर: काय समजलं

सौमित्र: तुला हे सर्व कस काय ठाऊक आहे.

सुधीर: अरे मी हे वाचलं आहे.

सुधीर बोलताना तोंड लपवत आहे, हे सौमित्र च्या लक्षात आले होते.

सौमित्र: खर सांग मित्रा. तुला माझी शप्पथ आहे.

सुधीर: काय सांगु मित्रा. घरोघरी मातीच्याच चुली आहेत.

आणि दोघे जोरजोरात हसायला लागले.

सौमित्र ने मात्र घटस्फोटाचा विचार त्यागला.

(1620683)

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

तुटलेली फुले, “सुगंध” देऊन जातात🌹गेलेले क्षण, “आठवण” देऊन जातात प्रत्येकांचे “अंदाज” वेग-वेगळे असतात
म्हणुन काही माणसं “क्षणंभर”, तर काही “आयुष्यभर” लक्ष्यात राहतात…!!

💐💐 शुभ सकाळ 💐💐
🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

http://www.manachyakavita.wordpress.com
🕊🦢☀🦢🕊🌷🕊🦢☀🦢🕊🕊🦢☀🦢🕊

देव आणि भक्त

तो रोज रोज देवाची पूजा करून देवाला प्रसन्न करायचा प्रयत्न करीत होता. अर्ध आयुष्य संपल पण काही केल्या देव प्रसन्न झाला नाही. आणि त्याची परिस्थिती काही सुधारली नाही.

एके दिवशी तो देवाच्या देवळात गेला आणि रागे रागे त्याला म्हणाला देवा मी आयुष्य भर तुझी पूजा अर्चा केली पण काय उपयोग झाला. मी आज पासून तुझी पूजा करणार नाही. इतकेच काय दर्शन सुध्दा घेणार नाही.

असे म्हणून तो रागाने देवळातून बाहेर पडला. तितक्यात देव ओरडून म्हणाला. ‘अजी रुठ कर अब कहा जाईयेगा, जहा जाईयेगा हमे पाईयेगा. त्याला देवाच्या तोंडून ते शब्द ऐकल्यावर खरे वाटते. कारण देव सर्व ठिकाणी वास करतो हे त्याला माहीत होते.

पण त्याला देवाचा राग आलेला असतो म्हणून तो म्हणतो ‘आंसू भारी है ये जीवन की राहे, कोई उनसे (म्हणजे देवाला) कह दे हमे भूल जाये.’

हपापलेला भाग-४

ती भिकारीण मागच्या सीट वर बसून आनंदाने मनातल्या मनात उड्या मारीत होती. ती मीनल ला म्हणाली” बाई साहेब, तुम्हाला हे बाळ दत्तक घ्यायचे असेल तर घेऊन टाका मत्र मला काही तरी द्यावे लागेल.”
“ते ठीक आहे ग पण हे बाल तुझे नाही का? तुला त्रास नाही का होणार मला बाल देऊन टाकल्याने.” मीनल म्हणाली
“तास नाही मेडम. बाळ माझच आहे. पण घराची गरीब बाळाला काय खाऊ घालणार. तुम्ही घेतले तर चांगल शिकेल मोठा होईल तो.” ती भिकारीण उच्चारली.
” हो तुझ ही बरोबर आहे म्हणा. देईल मी तुला काही रक्कम हो. तू काळजी करू नको.”
आणि अश्या गोष्ठी करीत असतांना मीनल चे घर आले. तिने गाडी थांबविली आणि तिने त्या भिकारणीला मी सांगत नाही तो पर्यंत गाडीतच बसायच्या सूचना दिल्या. ती होकार देऊन गप्पा बसली.
तितक्यात घरातून आया आली. मेडम ला बघून ती घाबरली होती. ” मेडम तुम्ही या वेळी कशा काय आल्या ?”असे बोलत असतांना तिच्या चेहऱ्यावर चा घाम मीनल च्या नजरेतून सुटू शकला नाही. “काय ग तू असी घाबरलेली का आहेस. इतका घाम का सुटला आहे तुला?” असे मीनल ने विचारता क्षणी ती म्हाणाली” नाही मेडम कुठे काय मी तर ठीक आहे.” आणि ती आयला घेऊन घरात शिरली. तिला बसवले. आणि काही विसरल्यागत करून त्या आया बाईला म्हणाली  “अग थांब मी गाडीत काही विसरले आहे ते घेऊन येते.आणि हो ते ठेऊन मी लगेच जाणार आहे बर का”

मीनल बाहेर आली आणि तिने गाडीचे दर उघडून बाळाला आणि भिकारणीला सोबत घेतले आणि घरात शिरली. घरात शिरल्यावर तिने घराचे दार आतून  लावून घेतले. ती भिकारीण घर बघून मनो मन खुश होत होती. तिच्या जवळ बाळाला बघून ती आया तर वेडीच झाली. ती धाय्य मारून रडायला लागली. जावून मालकिणीच्या पायावर पडली व “मेडम माझ चुकल हो मला माफ  करा” असे रडून रडून म्हणू  लागली. इकडे त्या भिकारणीला काही कळेना काय चालले आहे ते. आता मीनल ने गणेशला फोन लावून ताबडतोब घरी बोलावून घेतले. आणि लगेच पोलीस स्टेशन ला फोन लावला व त्यांना ही घरी बोलावले.आता त्या भिकारीण ला काही गुन्हा केला आहे असे जाणवायला लागले. मीनल ने बाळाला जवळ घेऊन त्याची पप्पी घेतली आणि आतून त्याचे कपडे आणून घालायला लागली तेव्हा त्या भिकारणीच्या डोक्यात प्रकाश पडला आणि ती ही रडता रडता मीनल च्या पाया पडू लागली.

क्रमशः

हपापलेला भाग-२

हपापलेला च्या पुढचा भाग येथे सादर करीत आहे.
तिने सांगितलेली गोड बातमी ऐकल्यावर तो अत्त्यानंदित झाला. डिलिवरी पूर्वी तिने रजा घेतली होती. ठरलेल्या वेळेनुसार तिने एका गुबगुबित बाळाला जन्म दिला. दोघेही बाळाला बघून आनंदित झाले. त्याचा आनंद तर गगनात मावत नव्हता. आणि बघता बघता दोन महिने सहज निघून गेले. तिची चिंता आता वाढत चालली होती. पुढे काय करावे आपण कामावर गेल्या वर बाळाचा सांभाळ कोण करणार हि चिंता तिला अस्वस्थ करीत होती. एके दिवशी तिने त्याला सांगितले ” हे बघ गणेश आता पुढच्या सोमवार पासून मला कामावर जावे लागणार आहे.”
“अरे हो मी तर विसरलोच होतो.”गणेश
” विसरून कसे चालेल.पण वास्तविकता हीच आहे. आपल्याला आता बाळासाठी काही तरी व्यवस्था करावी लागेल.”गणेश विचार करू लागला.
विचार करता करता तो अचानक तिला म्हणाला ” मी काय म्हणतो मीनल, आपण माझ्या आई वडिलांना आपल्याकडे घेऊन आलो तर ते बाळाचा सांभाळ व्यवस्थित करू शकतील असे तुला नाही का वाटत.” यावर मीनल थोडी नाराजीनेच म्हणाली,” तुझ बरोबर आहे रे. पण ती दोघे अनाडी. शहराची त्यांना काही हि माहिती नाही. ते येथे येऊन काय  करतील.”
“तरी पण आपण प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे.”
“नाही मला अजिबात हे पटलेलं नाही. तू त्यां गावरान लोकांना येथे आणायचे नाही समजल का तुला.” ती जवळ जवळ ओरडलीच. बिच्चारा काय करणार. चिडीचूप. एक शब्द हि तोंडातून उच्चारला नाही. त्याचा चेहरा बघून तिलाच त्याची कीव आली. तिने पुनः बोलायला सुरुवात केली.” अरे तुझे ते अनाडी आई-वडील माझ्या बाळाचा काय सांभाळ करू शकतील. आणि बाळाच्या मनावर काय संस्कार होतील. तुला माहित आहे मुलांना लहानपणा पासून चांगले संस्कार दिले तर मुल चांगली तरक्की करतात. आपण अस करू एक चांगली आया बघू. ती बाळाचा चांगला सांभाळ करेल.”
तो बिच्चारा मन मारून गप्पा बसला आणि तिने तिच्या मैत्रिणींना फोन करून आया बद्दल माहिती विचारायला लागलीच सुरुवात करून  टाकली.मैत्रीनिन्न्कडून तिला काही बायकांचे रीफरेंस मिळाले. “उद्या तुला सुटी आहे त्यामुळे ती घरी बाळा जवळ थांबायचं मी आया बाईचा शोध घेयून येईल. ठीक आहे न.”
तिने दुसर्या दिवशी ठरल्याप्रमाणे आया बाईचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि एका बाईला पक्के करून टाकले. काय द्यायचे घ्यायचे सर्व ठरवून टाकले. सायंकाळी तिला घरी यायच्या सूचना हि दिल्या. ती आया ठरलेल्या वेळी घरी आली. तिला मीनल ने सर्व घर दाखविले. कामाचे स्वरूप सांगितले. दिवस भर तिने काय काय करायचे हे सांगितले. आणि  ओळख व्हावी म्हणून काही वेळ बाळाला तिच्या कडे दिल सुद्धा. तिने सुद्धा बाळाला लडा लावायला सुरुवात केली.
दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर ८ वाजता आया कामावर हजर झाली. तिला बघून मीनल ला आनद झाला.”बरे झाले मावशी तू आलीस ते. आता मी कामावर निश्चिंतपने जाऊ शकते.” मीनल आयाला म्हणाली. गणेशला त्या आयाचे घरी येणे अजिबात पटत नव्हते पण त्याचा नाइलाज होता. आपल्या लाडक्या बाळाला एका पर स्त्री कडे सोपवून आपण रोज कामावर जाणे हे त्याच्या मनातील एका कोपऱ्यात ठसलेल्या  गावठी विचारांना पटत नव्हते. त्याचे मन रडकुंडीला आले होते. पण पुरुष होता तो. असा कसा रडू शकेल.

क्रमशः

शीर्षक नसलेला भाग-२

शीर्षक नसलेला भाग-१ साठी येथे क्लिक करा

“अरे बाप रे! हे बरोबर नाही रे महेश्या.तू बाबा लक्ष ठेव त्याच्या वर. आणि हो जरा काम कमी करून घराकडे लक्ष दे.” उमेश महेशला म्हणाला.
“अरे हो रे बाबा तू काय मला शिकवीत आहेस. आता तूच सांग मी नौकरी सोडून देऊ का त्या कार्ट्यासाठी.” महेश
” तस नाही रे मी म्हणत. पण थोड लवकर जायला हव घरी.”उमेश महेशला.
“नाही रे मला तसे जमत. कामच खूप आहे. मी काम सोडू शकत नाही. रोजचे टार्गेट असते ते पूर्ण केल्या शिवाय मला घरी जाता येत नाही. आणि तू काय नवीन आहेस काय. तुला नाही का माहित नौकरी कशी करावी लागते ती?”महेश
“हो रे तुझ अगदी बरोबर आहे. खर सांगायचं झाल तर माझी हि हीच दशा आहे. येथे विदेशात राहून आम्ही दोघ ही नौकरी करतो. मुलाकडे अजिबात लक्ष देता येत नाही. पण तो अजून बराच लहान आहे. मात्र त्याच्या मनावर काय परिणाम होत असेल याची मला कल्पना आलेली आहे. पण जवाबदार्या वाढलेल्या आहेत.”
“कसल्या रे जवाबदार्या वाढविल्या इतक्या?.” महेश
“अरे मागच्या आठवड्यात आम्ही येथे घर घेतले स्वतःचे. आता त्याचे कर्ज फेडावे लागणार आहे. मी प्रथम तिची नौकरी सोडून द्यावी असा विचार तिच्या समोर मांडला होता. पण ती म्हणाली स्वतः चे एक घर घेऊ आधी. मी नाही म्हटले पण तिने हट्ट धरला. शेवटी ऐकावे लागले.”
” अरे छान झाले की.” महेश ने त्याचे कौतुक केले.
महेश म्हणाला,”मी सुद्धा तिच्या समोर हा प्रस्ताव ठेवला होता रे. पण तिला करिअर करायचे आहे. त्यामुळे तिने नौकरी सोडली नाही. ती तर मला म्हणत आहे की मी नौकरी सोडून द्यावी.”
उमेश,”नाही महेश अस काही हि मनात आणू नको रे बाबा. जे करायचं ते पूर्ण विचार करूनच कर.”
“नाही रे मी असा कसा चुकीचा निर्णय घेईल.”

शीर्षक नसलेला.(भाग-१) ……..

तो कॉफी हाउस च्या टेबलावर बसता बरोबर मोबाईलची रिंग वाजली. तो वैतागला त्याने त्याकडे प्रथम दुर्लक्ष्य केले. एव्हढ्या रात्री एक वाजता कोण बर असू शकत म्हणून त्याने मोबिल उचलून बघितला. तर तो त्याच्या अमेरिकेतील एका जिवलग मित्राचा फोन होता.उमेश हा त्याचा लंगोटीया यार म्हटल्यास हरकत नाही. कारण दोघेही सोबत लहानाचे मोठे झालेले.
“हेलो. महेश अरे यार मोबाईल का उचलत नाहीस मी केव्हाचा रिंग करतो आहे?”
“यार उमेश. मी जरा कंटाळलो होतो. म्हणून उचलला नाही यार. आणि तू विचार कर तुझा फोन मी उचलणार नाही असे कसे होईल.” महेश त्याला समजावण्याचा प्रयत्न करीत म्हणाला.
“बर ते सोड. कसा आहेस?” उमेश महेशला म्हणाला.
“काय सांगू मित्रा रात्रींचा १ वाजला आहे आणि मी आता कॉफी हाउस मध्ये बसलो आहे.” महेश
“का रे इतक्या उशिरा का. वहिनीने घराबाहेर काढले कि काय तुला.” उमेश ने त्यांची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला.
“नाही रे तस नाही. पण मला ऑफिस मधून निघायलाच रोज उशीर होतो. खूप काम असते.” महेश
“बाप रे, अरे पण वहिनी वैतागत असेल. रागवीत नाही का तुझ्यावर? भांडण होतात कि नाही रे मग तुमची?;”
“यार उम्या, तू काय माझी फिरकी घेत आहे. हा काय फिरकी घेण्याचा विषय आहे.”
“सॉरी यार.” उमेश
” मला वाटले तू तिकडे गेल्यावर बदलला कि काय. अरे मित्रा, आम्ही खूप परेशान आहोत. मला हि अशी रात्र होते आणि ती सुद्धा रात्री ९-१० वाजता घरी पोहचते. त्यामुळे तो आमचा कार्ट्या बिघडत चालला आहे रे.”
(क्रमशः )

भाऊ बीज

सुटी होती म्हणुन तो वर्तमानपत्र वाचत बसला होता. बाहेर मुल दिवाळी साजरी करीत होते. अचानक त्याला काय सुचले कोण जाणे. त्याने सौ. ची फिरकी घेण्याचे ठरविले.
“अग, या दिवाळीला माहेरी कधी जाणार आहेस.”
“…………..” स्वारीने काहीच उत्तर दिले नाही.
उत्तर न मिळाल्याने तो निरुत्तर झाला. काय झाले असेल बर हिला. का बोलत नाही हि. तो मनात नाना विचार करू लागला.
त्याने पुनः आपला प्रयत्न करून पाहिला, बघू या काही उत्तर मिळते का ते.” अग, मी काय म्हणालो एकल का?”
“………….हं …………..”
अरे बाप रे आज स्वारी जाम भडकलेली दिसत आहे.
“अग, काय झाल मी तुझ्याशी बोलत आहे पण तू काहीच उत्तर देत नाही.” त्याने पुनः प्रयत्न करून बघितला.
पुनः तेच. सौ.ने काहीच उत्तर दिले. पण ती आता मनातल्या मनात हसू लागली होती. तिच्या चेहऱ्यावर हि स्मित दिसू लागल होत. पण ती चेहरा लपवत होती. खर म्हणजे तिला समजले होते कि त्याने तिची फिरकी घ्यायचा प्रयत्न केला आहे. व तिने हि उलटा तीर चालवायचा प्रयत्न केला होता. आता तिनेच त्याची फिरकी घ्यायचे ठरविले होते.
तिने पुनः उत्तर न दिल्याने तो आता काय करावे याचा जीवापाड प्रयत्न करू लागला होता. पण त्याला मार्ग सापडत नव्हता. मुल आपली दिवाळी साजरी करण्यात गुंग होती. त्यामुळे त्यांना सांगून काही होणार नव्हते.
शेवटी तिचे काम आटोपल्यावर ती जेव्हा थोडा वेळ सोफ्यावर सुस्तावली तेव्हा तो तिच्या जवळ जाऊन बसला.व त्याने सुस्कारा सोडला. त्याचे तिच्या कडे लक्ष नाही हे पाहून तिने चेहऱ्यावर स्मित आणले व लगेच घालवले हि. मात्र मनात ल्या मनात ती जाम हस्त होती. तिने जाणले होते कि तो खूप घाबरला आहे. म्हणून ती काहीही न बोलता गुपचूप डोळे बंद करून बसले होते.
त्याने तिच्याशी बोलायचं प्रयत्न केला तोंडाने नव्हे त्याने तिच्या हातावर हात ठेवला. हळूच तिचा हात आपल्या हातात घेऊन प्रेमाने कुरवाळू लागला. हे बघून तिला जोरजोराने हसावेसे वाटू लागले होते पण आजून नावे असे हि मनात वाटल्याने ती शांत बसली.
“अग, मी तुला कधी मना केले आहे का माहेरी जाण्यापासून. तुला जायचे असेल तर मी बस मध्ये बसवून देतो तुला व मुलांना.”
अजून हि ती शांतच होती. त्याने पुनः सुरु केले.” मला माहित आहे तुझा भाऊ घ्यायला आला नाही म्हणून तू नाराज असशील. पण भावाने यायलाच पाहिजे असे कोठे शास्त्रात लिहील;ए आहे का? असा कोठे नियम आहे का? तू काही काळजी करू नको हव असेल तर मी तुला पोहचवून येतो गावी.” त्याने तिला समजावण्याचा भरघोस प्रयत्न केला पण ती काही केल्या समजून घ्यायला तयार नव्हती असे त्याला तरी वाटत होते. तो अक्षरशः रडकुंडीला आला होता. उद्या दिवाळी आणि हि बाई ऐन दिवाळीच्या दिवशी नाराज असली तर दिवाळी कशी साजरी होणार. घराची लक्ष्मी दिवाळीला नाराज होऊन कशी चालेल.म्हणून तो जाम पछाडत होता. पण स्वारी काही केल्या एकूण घेत नव्हती.
आता त्याचा चेहरा बघून तीने जोराजोप्रात हसायला सुरु केले. तिला हसतांना पाहून तो वेद च झाला. आता पर्यंत हि बाई काही केल्या बोलत नव्हती व आता अचानक अशी जोरात हसायला काय लागली. तो वेड्या सारखे तिच्या कडे पाहू लागला. त्याला काहीच काळात नव्हते.
तिने आता बोलायला सुरुवात केली.”अहो, भाऊ आला नाही म्हणून का मी नाराज होणार आहे का? आणि बाईला माहेर हे किती दिवस असते. लग्न झाल कि ती महेर्पासून लांब जाते म्हणून तिला माहेरच आकर्षण असते. एकदाची मुलं झाली व ती आई झाली कि तिचे मन आपल्या संसारात रमून जाते. आता प्रत्येक वर्षी दिवाळी माहेरीच साजरी करावी असा नियम आहे का कोठे? मी काही नाराज नाही बर का?”आता पर्यंत तिने त्याला बोलायला वेळच दिली नाही, मात्र आता तो मधेयचं बोलला “अग पण मी केव्हाचा तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत आहे तर तू काहीच का उत्तर देत नव्हतीस?”
ती,”मला समजले होते कि तुम्ही माझी फिरकी घेण्यासाठी मला चिडवीत आहात. म्हणून मी तुमच्यावर उलटा डाव टाकायचे ठरवले. आणि उलटी तुमचीच फिरकी घेतली. घेतली कि नाही सांगा बर?”
“नाही हे तू बनवीत आहेस मला.”
“आहो मान्य करून टाका कि मी सुद्धा तुमची फिरकी घेऊ शकते ते.”
” बर बाबा मी मान्य केल. मी तलवार म्यान केली शरणागती पत्करली.” बिचारा तो काय विचार केला होता आणि काय झाले. शेवटी अर्धान्गीनीच्या समोर बिच्यार्याला शरणागती पत्करणे भाग पडले. आणि त्यांची दिवाळी आनंदाने साजरी झाली……

रस्त्यावरील वाढती गर्दी

आजचा अनुभव सांगतो. मी बाइक वर होतो. लाल दिवा असल्याने सर्व गद्य थांबलेल्या होत्या. हिरवा दिवा लागल्यावर गाड्या पुढे रेन्गायला लागल्या.मी पुढेच होतो. अचानक डाव्या बाजूला शेवटच्या लेन मध्ये बाईकवर असलेलेई मुले उजव्या बाजूला वळली. एकदम माझ्या समोरच आली. अचानक ब्रेक दबाव लागला. हल्ली रस्त्यांवर गाड्याच गाड्या असतात. टु व्हीलर थ्री व्हीलर आणि फोर व्हीलर गाड्यांची प्रचंड गर्दी असते. रस्त्यावर माणसे कमी गाड्याच जास्त दिसतात. प्रत्येक मनुष्य गाडीधारी असतो. जणू होडच लागली आहे प्रत्येकामध्ये.

TrafficI75_in_atlanta

याच गतीने जर गाड्या वाढत राहिल्या तर विचार करायला हवा. काही वर्ष्यानंतर शहरामध्ये फक्त वाहनच दिसतील. माणसांना चालायला जागा उरणार नाही. पण वाहनांच्या गर्दी मुळे रस्ते जाम होतील. गाड्या जेथे उभ्या आहेत तेथेच उभ्या राहतील. पुढे सरकायला जागाच राहणार नाही. शेवटी अशी वेळ येईल कि प्रत्येक माणसाला गाडी रस्त्यावर सोडून द्यावी लागेल. व स्वतः मात्र चालत कार्यालयात जावे लागेल.

आता विचार करून डोळ्यासमोर ते चित्र आणून पहा.  मुख्य रस्त्यावर गाड्याच गाड्या उभ्या आहेत बिन माणसांच्या. सर्व मानस गाडीतून उतरून पायी  चालत आहेत रस्त्याच्या कडेने. आता रस्त्याच्या कडेने प्रचंड मानस दिसायला लागली आहेत. आणि थोड्या वेळाने जाम झालेला रस्त्याच्या दोन्ही बाजूला.विचार करा कल्पना करा रस्त्यावर गाड्यांची प्रचंड गर्दी म्हणून माणूस कंटाळून उतरून पायी चालायला लागला आहे. त्याचा परिणाम आता असा झाला आहे कि रस्त्याच्या दोन्ही बाजू माणसांनी जाम झाल्या आहेत. माणसाला चालता हि येत नाही आहे. शेवटी माणूस कंटाळला व आहे त्याच जागेवर बसून गेला. जग जेथल्या तेथेच थांबून गेल. माणूस काय करणार. हतबल झाला व वर आकाशाकडे डोळे करून पाहू लागला. वरून देव पृथ्वी वरील गम्मत पाहत होते. पृथ्वी वरील सर्व मानस वर पाहत आहेत, देवाचे स्मरण करीत आहेत.

हे दृश्य पाहून देवाला दया आली व तो माणसाला म्हणाला,

“बोल माणसा मला का बोलावीत आहेस.”

माणूस लाचार होऊन म्हणाला ” देवा आपण सर्व दृश्य बघतच आहात. आता आम्ही काय करायचं, आम्हाला मार्गदर्शन करा. ”

देव म्हणाले, “वत्सा आता काहीच करता येणार नाही.  असे हि दृश्य आपल्याला पाहायला व भोगायला मिळेल याचा तू त्या वेळी विचारच केला नाही. तू डोळ्यावर काळी पट्टी बांधून घेतली होती.”

माणूस म्हणाला, ” हे देवा मी हतबल आहे. आता तूच आम्हाला वाचवू शकतोस”.
देव म्हणाले, ” पण आता मी हतबल आहे”
माणूस म्हणाला, ” देवा आम्हाला माफ करा , आम्ही चुकलो.”
देव म्हणाले, ” अरे हो, तू तर स्वर्गात येवून राहायचे स्वप्न बघत होतास त्याचे काय झाले.”
” नाही देवा इतकी आमची हिम्मत होईल का?”
” तास नाही रे पण चंद्र, मंगळ व इतर कोणता तरी ग्रह जेथे वस्ती करणे शक्य आहे, तेथे  राहण्यासाठी शोध घेत होतास कि इतकी वर्ष. अरे, तू
इतका वेळ व पैसा वाया घालवलास व त्यातून निष्पन्न काहीच झाले नाही. जर या पैश्यातून पृथ्वीवाषीयांना व्यवस्थित शिकवून समजावून सांगितले असते तर रस्त्यांवर वाहनांची व माणसांची हि गर्दी झाली नसती.”
” हो देवा आमच्या ते लक्ष्यात च आले नाही. आम्ही आमच्याच गुर्मीत व स्वतः पुरतेच जगलो. आणि फसलो.”
शेवटी देव सर्वांना तेथेच व त्याच अवस्थेत सोडून अंतर्धान पावले. व माणूस रडत बसला, डोक्याला हात लावून.