कोडे नं.१

अमित रोहनला म्हणाला ‘मला खडू भाड्याने दे’

रोहन’अरे अम्या हे काय बडबडतो आहेस. माझ्या कडे कसला आलाय खडू. आता काय आपण शाळेत जातो काय?’

‘बर ते जाऊ दे मी जे म्हणालो खडू भाड्याने दे याचा इंग्रजीमध्ये अर्थ काय ते सांग. पण एक लक्षात घे हे एका खायच्या वस्तूचे नाव आहे.’अमित  म्हणाला.

रोहन डोके खाजवायला लागला. खूप विचार केला पण त्याला काही उत्तर सुचले नाही.

कोणी तरी रोहनला मदत करेल काय?

भविष्यकालीन जीवन

आपल्या संस्कृतीत एकदा लग्न झाले की आपली पत्नी, मग मुल, आपला संसार यात मनुष्य गुंतून पडतो. त्यांच्यासाठी झटणे हेच माणसाचे कर्तव्य असते. पण पुढे काय वाढून ठेवले आहे हे ह्या ज्योक वरूनच लक्षात येईल.

मी दोन मुलांना बोलतांना ऐकले. एक दुसर्याला मोबाईलमध्ये आलेला एस एम एस वाचून दाखवीत होता. तो मेसेज असा होता की बायको आपल्या नवर्याला सांगते. “ Honey, your kids and my kids are beating our kids.”

सिरिअल्स

सध्या टी व्ही वर सुरु असलेल्या सर्व चेनल्स पैकी सब वर सुरु असलेली तारक मेहता का उलटा चष्मा ही माझी  सर्वात जास्त आवडणारी सीरिअल आहे. एका पेक्षा एक कलाकारांनी भरलेली. निवड करता ला सलाम करावा लागेल कारण त्याने अप्रतिम कलाकारांची निवड केली आहे. प्रत्येक कलाकार आपापल्या रोल साठी पूर्णतः फिट आहे. लहान मोठा म्हातारा सर्व. दिवस भरच कामाचा तन आल्याने डोक्याला क्षीण येतो तो घालविण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे ही सीरिअल होय. जरूर पहावी.

समाजात होत असलेल्या दैनंदिन घटना आणि त्या तून समाजाला शिकवणूक देणे हे ह्या सीरिअल चे काम आहे.

चिमण्याचे बोल..

संजय आणि संजना दोघे ही आपल्या चिमण्याला घेऊन डॉक्टरांकडे गेले होते. संजयला ताप आला होता म्हणून. ते तिघे आपला नंबर येण्याची वात पाहत बसले होते. अर्ध्या तासाने त्यांचा नंबर आला आणि तिघे डॉक्टरांच्या केबिन मध्ये शिरले. संजय आणि ते डॉक्टर दोघे मित्र होते. थोडा वेळ त्यांनी गप्पा केल्या आणि मग डॉक्टर म्हणाले “आता संग संजय काय झाले आहे? आज ह्या गरीबाच्ग्या घरी म्हणजे क्लिनिक वर कसे काय येणे केले?” संजय म्हणाला,” अरे डॉक्टर मला काल पासून ताप येत आहे. मी म्हणालो हिला कि काही विशेष नाही उतरेल ताप पण हिने एकलेच नाही. म्हणाली सध्या स्वैन फ्लू चे वारे वाहत आहे. त्यामुळे डॉक्टरांना दाखवून देऊ. म्हणून मी आलो.” बर ये. संजय स्ट्रेचर वर झोपला आणि डॉक्टरांनी त्याला तपासायला सुरुवात केली. त्यांनी संजय ला प्रथम छाती वर सर्व दूर स्तेथीस्कोप ठेवून तपासले आणि मग मागे पाठीवर सुद्धा तपासले. संजय चा चिमण्या हे दृश्य बारकाईने पाहत होता. त्याला हे कळेना कि डॉक्टर सर्व दूर का तपासता आहेत. त्याच्याकडून राहवले गेले नाही. त्याने त्याच्या आईला विचारले,: आई डॉक्टरांना हृदय कोठे असते हे माहित नाही वाटते?” त्याच्या आईला आश्चर्य झाला. तिने त्याला प्रश्न केला,”बाळा, तू असे काविचारात आहेस?” चिमण्या म्हणाला,” अग आई, ते केव्हा पासून पप्पाच्या छाती वर व पाठीवर स्तेथी स्कोप लाऊन तपासात आहेत.” 🙂

चलते चलते.

लहान मुलांच्या हातून अजाणतेपणी काही चुका होतच असतात. अशा वेळी आपण त्यांना  नावे ठेवीत असतो. आणि लहान आहे असे समजून व समजावून सोडून देतो. पण मोठी माणसे काही आकाशातून पडलेली नाहीत. ती सुद्धा चुका करतातच. त्यांच्या हातून सुद्धा जाणते  अजाणतेपणी  चुका होतच असतात. आणि मग काय गंमती घडतात ते पहा.

खुंटलेली वाढ

बऱ्याच वेळा असे दिसून आले कि मी काम्पुटर वर बसलेलो असतांना सौ. जवळ येते आणि माझे डाव्या हाताचे बोट हातात घेऊन बघते. पहिल्यांदा मी त्याकडे दुर्लक्ष केले वाटले सहज बघितले असेल. दुसर्यांदा दोन तीन दिवसांनी तसेच केले तेव्हा मला वाटले तिने प्रेमाने हात हातात घेतला असेल कदाचित असा विचार करून पुनः दुर्लक्ष्य केले. काही दिवसांनी पुनः तेच बोट हातात धरले तेव्हा मी खुश झालो मनोमन हसायला खिदळायला लागलो, हल्ली सूर्य पश्चिमेला उगवत आहे कि काय असे वाटायला लागले. पण मी मनातल्या भावना मनातच ठेवल्या. म्हटल उगाच बोललो तर जे खरे खोटे प्रेम आहे ते सुद्धा कमी होऊन जाईल. पण आज सौ. ने पुनः तेच केल्यावर माझ्या कडून राहवले गेले नाही. मी लगेच तिचा हात धरला आणि विचारले कि हल्ली काय चालले आहे तू नेहमी माझा हाताचे बोट हातात घेऊन काय पाहतेस. तर ती म्हणाली तुमच्या डाव्या हाताच्या तर्जनी वर निवडणुकीच्या वेळी जी स्याही लावली होती ती अजून खूपच मागे आहे. माझ्या बोटावरील स्याही तर आता निघायला आली आहे. तिचे म्हणणे होते कि ती स्याही काही केल्या निघत नाही पण जस जसे नख वाढते तस तसे त्या श्याहीचे चिन्ह पुढे पुढे सरकत जाते. आणि बाहेर पडत जाते. मी लगेच उत्तर दिले  तुझे वाढते वय आहे.

माझे बोट

म्हणून नख लवकर वाढत आहे. माझी वाढ खुंटलेली आहे म्हणून वेळ जास्त लागत आहे. हे ऐकून मुलगी सुद्धा

सौ.चे बोट

हसायला लागली.

त्रिकोणी कुटुंब म्हणजे जीवघेणी कसरत असते असे मला तरी वाटते. तिघांचे ते लहानसे जग असते. मुलगी बरोबरीच कोणी नाही म्हणून एकटेपणात जगते. विरंगुळा म्हणून नेत वर बसून नेत च्या जगात वावरते. बायको दिवसभर घरात एकटी असते. मुलगी नेत बसल्यावर तिला बोलायला कोणी नसते. त्यांची ही ओढाताण बघून मला फार वाईट वाटते म्हणू सायंकाळी घरी आल्यावर त्यांच्या सोबत गमती जमाती कराव्या लागतात. सोबत टी.व्ही. बघणे आलेच. सब टी.व्ही. वरची “तारक मेहता का उलटा चष्मा” ही आमची तिघांची आवडती कॉमेडी सीरिअल. ती एक दिवस सुद्धा चुकवत नाही. ९ वाजता बिग बॉस बघायचे नसते तरी ही त्यांच्या सोबत अधून मधून बसावे लागते. त्यामुळे ब्लॉग वर बसायला रात्रीचे ११ तरी होतात. त्यानंतर किती वेळ बसणार हे माहित नसते.

सी.एफ.एल.

आजची माझी १०१ वी पोस्ट सादर करतांना मला फार आनंद होत आहे. (२० आगस्ट २००९ रोजी  मी पहिली पोस्ट टाकली होती.)  ह्या निमित्त  मी आताच आमचा संवाद सुरु असतांना झालेला एक जोंक येथे टाकत आहे.
झाले असे कि बाथरूम मधील ५ वाट चा  IMG1983Aसी.एफ.एल. बल्ब  बंद पडला. मी बटन लूज  आहे का ते बघितले. बटन लुजच होते. “बटन लूज असल्याने बल्ब  लवकर खराब झाला असे मी म्हणालो” आणि  दुसरा एक लेम्प लावला. त्यावर मुलगी म्हणाली “मी तुम्हाला किती दिवसापासून म्हणत होते कि बटन लूज झाले आहे ते बदला. पण तुम्ही माझे ऐकत नव्हते”. हे ऐकून सौ. मुलीला एकदम म्हणाल्या “तेव्हा आमचे बटन लूस होते ना”. हे एकता बरोबर आम्ही सर्व जोरजोराने हसलो.
IMG1982Aसी. एफ. एल. वरून मला एक नमूद करावेसे वाटत आहे कि मी घरामध्ये बहुतेक सी. एफ. एल. चे बल्ब लावले आहे.  प्रत्येक रूम मध्ये एक सी. एफ. एल. आणि एक ट्यूब असे दोन बल्ब लावलेले आहेत. वाचन करायचे असते तेव्हा ट्यूब लावतो. नसल्यास फक्त सी. एफ. एल. ज्या रूम मध्ये आम्ही असतो त्याच रूम मध्ये उजेड ठेवतो. त्याने एनर्जी सेव होते आणि बिल पण कमी येते. म्हणजे आपला हि फायदा आणि वीज कंपनीला ताण कमी.

आता योगायोगाने विषयच निघाला आहे तर माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे  थोडीसी माहिती द्यावीशी मला वाटत आहे. विचेची बचत करणे आज आपल्या महाराष्ट्रात व देशात हि फार गरजेचे होऊन गेले आहे. आपण पूर्वी पिवळा प्रकाश देणारे गोळे वापरायचो. ४० वाट चा एक गोळा/ दिवा सतत २५ तास सुरु ठेवला तर एक युनिट वीज जळते. आणि १८ वाट चा सी.एफ.एल. दिवा ५५ तास सुरु राहिला तर एक युनिट वीज जळते. या पेक्षा चांगला किंवा जास्त प्रकाश देणारा २३ वाट चा सी.एफ.एल. चा दिवा सतत ४३ तास सुरु ठेवला तर एक युनिट वीज खर्च  होते. तसेच ४० वाट ची ट्यूब + त्याचे चोक मिळून ऐकून सुमारे ५५ वाट होतात. अशी एक ट्यूब १८-१९ तास चालल्यावर एक युनिट वीज खर्च  होते. यावरून स्पष्टपणे दिसून येते कि कोणता बल्ब वापरणे जास्त चांगले, कमी बिल देणारे आहे.

चुटकुला (joke)

मोबाईल वर आलेला एक एस. एम. एस. जसाच्या तसा येथे प्रस्तुत करीत आहे.

A man jmpd in watr n dnt return. Aftr dt anthr man jmpd n he ws also nt seen. A sardar wtchng al this cncluded dt ” HUMAN BEINGS R SOLUBLE IN WATER” gn. icon-biggrin icon-rolleyes