फास्ट टैग आणि वेग ही….

फास्टैग(Fastag) ही एक ईलेक्र्टॉनिक टोल कलेक्शन यंत्रणा आहे. यात RFID म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन चा वापर होतो. राष्ट्रीय महामार्गावर टोल वसुली साठी प्लाझा असतात. तेथे आतापर्यंत मेन्युअल सिस्टीम होती. त्याने गर्दी खूप व्हायची. वाहनांची लाईन लागलेली असायची. काही वेळा तर तर अर्धा अर्धा तास वाट बघत बसावे लागते. याने वेग मर्यादा येते, पेट्रोल/ डिझेल जास्त खर्ची होते आणि वेळ खूप वाया जातो. आता हा टेग लावला कि टोलसाठी थांबायची गरज नाही. आपल्या वेगाने पुढे निघून जायचे पैसे तुमच्या अकाऊंट मधून आपोआप वळते होतील.

प्रश्न हा आहे जर त्याक्षणी काही कारणास्तव बँकेशी यंत्रणा संपर्क साधू शकली नाही तर काय होईल? म्हणजे पैसे लगेच वळते होतील. का नंतर ही होऊ शकतील. पैसे मिळाल्या शिवाय वाहन पुढे जाणार नसेल. मग अशा वेळी पुन्हा ट्राफिक….. असो याचा विचार झाला असेलच. मी सहज मनात आले म्हणून विचार मांडले.

मी १९९८ मधे जापानला गेलो होतो. तेव्हा तेथे ही अजून असे टेग आले नव्हते. गाडी उभी करूनच टोल भरावा लागत असे. त्याकाळी आपल्याकडे टोल सिस्टीम सुरू झाली नव्हती.

असो, पण या यंत्रणेने वाहनांचा वेग वाढेल व गंतव्य स्थानी जाण्यासाठी जास्त वेळ खर्ची पडणार नाही हे मात्र नक्की.

(19655A)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आयुष्याने शिकवलेलं एक वाक्य…
“जिंकलो तर आवरायचं आणि हरलो तर सावरायचं…”

💐💐सुप्रभात🌼🌼

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

टेगलय

महेंद्रजींनी “मला टेगलय” अशी कॉमेंट दिली आणि मी अचंभित झालो. हा कोणता शब्द आहे ‘टेगलय’. मला वाटायला लागल की एक नवीन डिक्शनरी मी सुद्धा लिहायला घ्यायला हवी आता. नाही तरी ३-४ दिवसांपासून माझ्या मनात हा विषय घोळत होताच. मी सुद्धा टेगुन टाकाव या विचाराने ही पोस्ट …………

1. Where is your cell phone?

टेबलवर

2.Your hair?

पांढरेकाळे
( काळ्या पिवळ्यासारखे, जास्त पांढरे कमी काळे. दाढी मिश्या जवळ जवळ पूर्ण पांढऱ्या, डोके थोडे काळे  🙂  )

3.Your mother?

आई

(आई ही आईच असते)

4.Your father?

हेवनवाशी

(वडील स्वर्गवाशी झालेत.)

5.Your favorite food?

Nothing

(मी जगण्यासाठी खातो बुआ! काही ही चालते! काही वेळा काय खाल्ले हे सौ. ला विचारून घेतो.  खाल्ल्यावर बर का! खातांना विचारता येत नाही म्हणून.  🙂  )

6.Your dream last night?

Sweet!

(अस वाटत! कारण रात्रीच विसरलेल बर, उगाच दिवसाच्या काळोखात हरवलं तर  🙂 )

7.Your favorite drink?

पाणी

(त्याची चणचण भासत आहे व भासणार आहे म्हणून)

9.What room are you in?

बेड
(  कम्प्युटर तेथे ठेवला आहे म्हणून )

10.Your hobby?

blogging

( Now-a-days)

11.Your fear?

shuuuu…………

( बायको ने ऐकले तर, ( गम्मत बर का)  🙂  )

12.Where do you want to be in 6 years?

चंद्रावर

(म्हणजे शिखरावर आपल्या क्षेत्रातील, नशीब सोबत असेल तर( जे कधीच साथ देत नाही))

13.Where were you last night?

घरी

(आपला आणखी कोठे ठावठिकाणा नाही म्हणून)

17.Where did you grow up?

भारत

(भारतात जन्मलो म्हणून  🙂 )

18.Last thing you did?

झोप

झोपेतून उठून नेटवर बसलो म्हणून

19.What are you wearing?

🙂

20. Your favorite color?

आकाशी

मी महेंद्र, तन्वी, भाग्यश्री, अनुजा यांना टॅगतोय..