दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

ही दिवाळी व नवीन वर्ष आपणा सर्वांना सुख समृद्धीचे व समाधानाचे जावो हीच इच्छा

 

 

 

ह्या दिवाळीला आपणा सर्वांना निमंत्रण आहे. फराळ तयार आहे. जरूर यावे.

 

 

 

 

 

 


दिवाळी – पण फटाक्याविना

मित्रांनो आता दिवाळी अगदी आपल्या दारावर उभी राहून दरवाजा ठोठावून घरात यायची वाट पाहत आहे. आताच माझ्या मनाला एक अप्रतिम विचार चाटून गेला आणि मी जागा होऊन ही पोस्ट लिहायला बसलो. तसा मी कधीच फटाके फोडत नाही, पण मला वाटले कि आपण आपल्या सर्व ब्लॉग मित्रांना आवाहन करून ही दिवाळी फटाक्याशिवाय  साजरी करण्याचा आग्रह का धरू नये? आखिर हमारा भी कोई रिश्ता है! ( आहे न?) आहेच. आणि हे सर्व ह्या बिन भिंतीच्या घरात राहणारे सर्व सदस्य मान्य करतीलच.अशी मला खात्री आहे.

तर मित्रांनो आज आपण सर्वांनी हा प्रण करावा, शपथ घ्यावी कि “हा  दिवाळीचा  सण आम्ही  सपरिवार फटाक्या शिवाय साजरा करू व शक्य तितक्या आप्त व  मित्र- मैत्रिणींना(?) तसे करण्याचा आग्रह धरू”

फटाके फोडल्याने आवाजाचे प्रदूषण तर होतेच पण वायू प्रदूषण खूप होते जे अत्यंत  घातक असते. विषारी वायू त्यातून बाहेर पडून वातावरणात पसरतात आणि श्वासावाटे आपल्या फुप्पुसांपर्यंत पोहोचतात. चुकी च्या पध्दतीने  फटाके फोडले तर आग लागण्याचा संभव असतो. आवाजाने लहान मुलं व वृद्धांना त्रास होतो.  याशिवाय पैस्याचा विनाकारण चुराडा होतो. त्यात काय आनंद मिळतो देवच जाणोत.

ह्या विचाराने त्रस्त होऊन आताच मी फेसबुक वर एक ग्रुप तयार केला आहे ज्याला नाव दिले आहे, “फटाक्यांशिवाय दिवाळी” आणि मित्रांना या दिवाळीला फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे. काही मित्रांना मी स्वतः सदस्य केले आहे. आपण सुध्दा त्या ग्रुपचे सदस्य व्हावे असे मी आवाहन करतो.

तर “फटाक्याशिवाय दिवाळी!”

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

ब्लॉग विश्वातील सर्व मित्रांना, त्यांच्या घरच्या मंडळींना व आप्तेष्टांना

“माझ्या मना

तर्फे

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

diwali greeting

(वरील शुभेच्छा कार्ड मी accessories मधील paint  या मधून तयार केले आहे.कसे झाले कृपया कळवावे.)

आली दिवाळी

५-६ दिवसांपूर्वी मी कम्प्युटरवर (म्हणजे ब्लोग) बसलो होतो. अचानक सौ. जवळ येऊन बसल्या आणि हळूच म्हणाल्या,”अहो, दिवाळी आली जवळ.”
मी “हुं…” कम्प्युटरवर बसलो असल्याने इतकेच शब्द बाहेर पडले.
तिचे समाधान झाले नाही थोड्या वेळाने पुनः,”अहो एकलत का?”
मी खडबडून जागा झाल्यासारखा बोललो,” काही म्हणाली का?”
सौ.”मी किती वेळा तेच तेच बोलाव. तुमच लक्षच नसत माझ्या बोलण्याकडे.”
मी,”तस नाही ग. तू उगाच रागवू नको बर का.”
सौ,”बर ते जावू द्या. मी काय म्हणते दिवाळी जवळ आली आहे.”
आता पर्यंत त्यांच्या वागण्याचा सूर माझ्या लक्षात आला होताच.मी समजून चुकलो होतो काही तरी हव असल्यासच ती अशी लाडाने बोलते. मी,”हो का मला माहितच नव्हते.”
सौ,” तुम्हाला त्या ब्लोग शिवाय हल्ली काही सुचतच नाही मुळी.”
मी,” हा बोल काय म्हणत होतीस.”
आता स्वारी जरा मूड मध्ये आली होती.”मला दिवाळीच काय घेणार म्हणते मी.” त्यांचे हे शब्द कानावर पडताच मी स्वारीचा बेत ओळखला व काही तरी वेगळा विषय काढून विषयपालट केला. आणि लगेच तिला मला जरा चहा देते का बनवून? असे सांगितले व ती लगेच किचन मध्ये निघून गेली.
तेव्हा मला खरोखर जाणीव झाली कि दिवाळी जवळ आलेली आहे.
दोन दिवसांपासून तर ती फराळाचे तयार करण्यामध्ये अतिशय मग्न आहे. आता पर्यंत लाडू, चकली, करंजी, शंकर पाडे तयार करून झाले आहेत.त्यांचे फोटो बघावे म्हणून येथे टाकीत आहे. तिच्या हातचे फराळ म्हणा किंवा रोजचे जेवण म्हणा अतिशय स्वादिष्ट असते. एकदा खाणारा खातच राहतो.तिच्या हाताचा स्वाद मी इतराच्या हातच्या पदार्थांमध्ये अद्याप बघितलेला नाही. (हे अगदी मना पसून लिहित आहे बर का नाही तर तुम्ह म्हणणार सौ.ला खुश करण्यासाठी लिहित आहे.)आणखी एक विशेषता सांगतो हे जे फराळाचे पदार्थ तिने बनविले आहेत ते फक्त माझ्या व मुळी साठीच कारण ती कधीच ते खात नाही किंवा तिला चालत हि नाही.

IMG1797AIMG1798AIMG1801AIMG1802A
चला तर मग आमच्याकडे फराळाला अवश्य या सह कुटुंब.
प्रतीक्षा

दिवाळीच्या प्रतीक्षेत दिवे

दिवाळीच्या प्रतीक्षेत दिवे

IMG1796A