शिर्षक वाचून मोठी माणसं म्हणजे अंबानी किंवा एखादा मोठा पुढारी यांचं चित्र डोळ्यासमोर येते. पण येथे तसं काही नाही.
का हो? फक्त हिच मोठी माणसं असतात का? आपल्या कुटुंबातील सर्वात मोठ्या व्यक्तीची गणना यात होत नाही का? जितके समाजात त्यांना महत्त्व आहे तितकेच किंबहुना त्यापेक्षा ही जास्त आप आपल्या घरातील मोठ्या व्यक्तीला असते.
पण काळ बदलत गेला आणि घरातील मोठ्या माणसाचे महत्त्व हळूहळू कमी होत गेले.
ही मोठी माणसं आता अडगळीची वस्तू असते तशी झाली आहेत. यांची घराला गरज राहिलेली नाही.
वय झाले कि माणसाचे शरीर आणि बुद्धी दोन्ही क्षीण होत जातात. शरीर जसजसे साथ सोडत जाते आपली माणसं ही तसतशी संगत सोडत जातात.
मित्रांनो, आपण बालवयात होतो तेव्हाचा काळ आठवा. त्याकाळी आपली वडिलांशी बोलायची सुद्धा हिम्मत होत नसायची. काही काम असेल तर दोन तीन दिवस आईचे कान कोरायचे. तेव्हा आई हिम्मत करायची वडिलांना सांगायची. आता लहानपणीच मुल उलटं बोलायला धजावतात. घेऊन द्यायची ऐपत नव्हती तर जन्माला का घातले आम्हाला. असे लहानपणी बोलतात मुलं. आणि पालक कौतुकाने थाप देतात पाठीवर.
एखाद्या बापाने गालात लगावली तर मुलांची आई वर म्हणणार काय चुकल हो त्याचं? तुम्हाला हे शक्य नव्हते तर लग्न का केले? मुलांना जन्माला का घातलं?
आता घरातील मोठ्या माणसाचा धाकच राहिला नाही कोणाला!
पूर्वी मात्र घराचा कारभार मर्यादेत आणि धाकात चालायचा…! कुठल्याही कार्याचा श्रीगणेशा करण्याआधी घरातील जेष्ठ मंडळींचा सल्ला घेतला जायचा. त्यांच्या अनुभवाचा सर्व विचार करायचे. त्यामुळे घरातील देवघरा नंतर महत्वाचे स्थान म्हणजे घरातील वयस्करांचे होते…! आताची वास्तविकता पार वेगळी झाली आहे. आता देवघरालाच घरात जागा नसते तर देवासारख्या जेष्ठांना कोठे मिळणार जागा?
जसजसा जगात आधुनिकता व तंत्रज्ञानाचा पसारा वाढत गेला तसतशी माणसाची बुद्धी आणि मन संकुचित होत गेले.
घरात घरात गुळगुळीत फरश्या बसल्या आणि घरातील जेष्ठ त्यावर घसरत गेले. गेले ते सरळ घराबाहेरच. घरात त्यांना जागाच शिल्लक राहिली नाही. 😭
घरातून मोठी माणसं नाहीशी होत आहेत. त्यामुळे धाक नावाची गोष्ट सुद्धा लोप पावत चालली आहे. मर्यादा, धाक , शिस्त , संस्कृती इत्यादि प्रकारच्या या गोष्टी हल्ली व्हॉट्स ऍप वर सकाळी सकाळी संदेश पत्रावर वाचण्यापुरत्या मर्यादित राहिल्या आहेत. तेही कोणी वाचत नाही. आलेले संदेश शक्य तो कोणी डाऊनलोड करायच्या भानगडीत पडत नाही. जर पडलाच तर डाऊनलोड केले जाते पण वाचण्याच्या भानगडीत न पडता. डाऊनलोड केले कि फॉरवर्ड करायची घाई असते.
एकाला शोकसंदेश प्राप्त झाला होता. न वाचल्यामुळे प्रत्त्युत्तर देतांना अभिनंदन देऊन मोकळा झाला.
अहो सोशियल मिडिया वर शोकसंदेशाला लाईक केले जाते. काय म्हणायचे लोकांना. म्हटले तर काय करणार प्रतिक्रिया देण्यासाठी दुसरे साधनच नाही. अरे पण दोन शब्द लिहून दुःख व्यक्त करू शकत होतास न! पण इतकी तसदी ही घ्यायला मनुष्य तयार नाही. तास न तास वेळ घालवेल मोबाईल वर. असो.
पूर्वी घरातील मोठी माणसं लहानांना गोष्टी सांगायची. समाजातील चालीरीती शिकवायची.
आता तर मुलांवर ते जूने बुरसटलेले विचार नका बिंबवू. असे म्हणून सुना लहान मुलांना आजी आजोबां जवळ ही जाऊ देत नाहीत. अर्थात ते सोबत रहात असले तर.
पूर्वी संध्याकाळी दिवे लावणीला शुभंकरोति – रामरक्षा- आरतीचे स्वर कानावर पडत असायची. आता तर फक्त टिव्ही, मोबाईल बस.
म्हणून घरात मोठी वयस्कर माणसे पाहिजेत.
स्वयंपाकघर काय अन् देवघर काय.. सगळीकडे घरभर चपला घालून फिरायला सुरुवात झाली आणि घराचे घरपण नाही से झाले. याला उच्चभ्रू संस्कृती म्हणतात म्हणे.
मोजून-मापून पैसा खर्च कसा करायचा याचे धडे शिकवणारं, चुकलं तिथे रागवणारं व कधीतरी तोंड भरून कौतुक करायला ही न विसरणारं असं कुणीतरी मोठं माणूस प्रत्येक घरात पाहिजेच हो. त्याशिवाय घराला घरपण येत नाही!
एकाच छताखाली सर्वांना एकत्रितपणे बांधून ठेवणारं, टिव्ही बंद ठेवायला भाग पाडून सर्वांना सोबत घेऊन जेवण करायला लावणारं, घराबाहेर पडतांना मोठ्यांना वाकून नमस्कार करायची सवय लावणारं व देवापुढचा अंगारा कपाळावर लावणारं, आनंदाच्या वेळी पटकन देवापुढे साखर ठेवणारं, तर संकटाच्या वेळी देवाला साकड घालून प्रार्थना करणारं… असं मोठ्ठ माणूस घरात कुणीतरी पाहिजेच पाहिजे…!
पूर्वी मुलीच काय मुलांना ही घराबाहेर परवानगीशिवाय जायची अनुमती नसायची. आणि कोणी चुकुनही तशी हिम्मत करत नसे. खेळायला जायचे झाले तरी आईची परवानगी घेत असत. रात्री तर घराबाहेर अजिबात पडता येत नसे. तसे जेवण झाले कि घरातील मोठी मंडळी घराबाहेर खाटेवर येऊन बसत. तेव्हा त्यांच्या पुढ्यात येऊन बसता येत होते. मग ते गोष्टी सांगत. नसायची.
एखाद्या वडाच्या झाडासारखी सावली देणारी ही मोठी-वयस्कर माणसं असतात हो..! त्यांच्या असण्यानेच आपल्याला नकळत खूप आधार होतो. त्यांचे अस्तित्व घर व घरातील सर्वांसाठी खुप मोलाचे असते.
म्हणून म्हणतो मित्रांनो, घरातून बाहेर पडतांना डोकं ठेवून नमस्कार करण्याची सवय कायम राहावी म्हणून घरात ते अनुभवी पाय पाहिजेतंच…! त्यांच्याशिवाय घराला घरपण नाही.
( मध्यंतरी व्हाट्सएपच्या शाळेत एक छान पोस्ट वाचण्यात आली. त्याच विषयाचा आधार घेऊन ही पोस्ट लिहिली आहे.)
(13520803)
🌹🙏🙏❤🙏🙏🌹🌹🙏🙏❤🙏🙏🌹
चुका एकांतात सांगाव्या आणि कौतुक चारचौघात करावे. याने नातं जास्त टिकतं.
💐💐शुभ सकाळ💐💐
🌹🙏🙏❤🙏🙏🌹🌹🙏🙏❤🙏🙏🌹
http://www.koshtiravindra.blogspot.com
🌹🙏🙏❤🙏🙏🌹🌹🙏🙏❤🙏🙏🌹