निसर्ग शाळा…

आम्ही लहान होतो तेव्हा आमचे सर आम्हाला जवळच असलेल्या जंगलात घेऊन जायचे. तेथे पांचवी ते अकरावी चे वर्ग भरवले जात असत. हे हिवाळ्यात केले जात असे. खूप आनंद येत असे. सहल ची सहल होत असे आणि अभ्यास ही. निसर्गाशी मैत्री ही होत होती. पण आम्हाला सर शिकवत असत.

पण निसर्गात असे ही विद्यार्थ्यी आहेत ज्यांना कोणते सर शिकवत असावेत असा आपल्याला प्रश्न पडतो? हा व्हिडीओ पहा. हा पक्षी किती सुंदर विणकाम करुन आपले घरटे तयार करत आहे. कोणी शिकवले असावे बर याला?

व्हाट्सएपच्या माध्यमातून प्राप्त

आता याच्या पेक्षा लहान हा किटक बघा. ही आहे माकडी म्हणजे कोळीष्टक. आकार किती लहान. मेंदू बर किती सा असावा यांचा! पण बुद्धिमत्ता किती तल्लख असते बघा. या व्हिडीओ मधून तुमच्या लक्षात येईलच हे.

व्हाट्सएपच्या माध्यमातून प्राप्त

ही निसर्गाची किमया आहे मित्रांनो. मेंदू मोठा असला तरच अक्कल असते असे नाही. हे यावरून सिद्ध होत नाही का?💐💐💐💐💐💐💐💐💐7021886💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

कधी कुणाच्या शोधात नका निघू कारण… लोक हरवत नाही, बदलून जातात.!!..ज्यांच्या डोळ्यात लहान लहान गोष्टी वरून हि पाणी येत ती लोक कमजोर नाही तर सच्च्या मनाची असतात!!चुका स्विकारण्याची तयारी ठेवली की माणसं गमावण्याची वेळ येत नाही…प्रत्येकाला आनंदी ठेवणे आपल्या हातात निश्चित नाही…….पण प्रत्येकाबरोबर आनंदी रहाणे हे मात्र निश्चीतच आपल्या हातात आहे”🙏🌹 *सुप्रभात.. 🌹🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐www.manachyakavita.wordpress.com💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

स्वरचयिता…

विश्वकर्मा, विश्व रचयिता तो. त्याने फक्त सजिवांना जन्मच नाही दिला तर हे संपूर्ण ब्रम्हांड अविरत अजरामर सुरू राहो यासाठी सर्व व्यवस्था करून स्वयंपूर्ण केले. मानव, पशूपक्षी यांना वैचारिक शक्ती ही प्रदान केली. मानव जसा आसरा शोधून त्यात आयुष्यभर राहतो. तसे पशू पक्षी ही आसरा शोधतात. काही निसर्ग निर्मित आसर्यात राहतात. तर……..यापुढील वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे:-

https://koshtirn.wordpress.com/2020/04/20/%e0%a4%b

(8320751)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

जगातील प्रत्येक गोष्ट सुंदर आहे…
मात्र तीची सुंदरता तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे.

💐💐शुभ सकाळ💐💐

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.manacheslok.blogspot.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

हुशार हंस….(141019585)

मित्रांनो, आपण टिव्हीवर बातम्यांमधे सतत बघत असतो जगातील कुठल्या न कुठल्या शहरात अतिवृष्टी मुळे पाणी साठले आहे. महापुर आला आहे. गाड्या वाहून जात आहेत. घर कोसळत आहेत आणि इतकी लोकं मेली. प्रगत देशांमध्ये सुद्धा हे घडत आहे. याच मुख्य कारण प्लास्टिकचा अति वापर……पुढे खालील लिंक वर वाचा😊

https://koshtirn.wordpress.com/2019/10/17/325/

स्थलांतर

तुम्ही म्हणत असणार हा काय  विषय घेउन बसला आहे हा. पण मी काही दिवसांपूर्वी बातमीपत्रात एक बातमी वाचली होती. आफ्रिकेतील पक्षी जळगांवला दर वर्षी विशिष्ट कालावधीत येतात. मला हे वाचून फार आश्चर्य वाटले. मग आठवले. इतर ठिकाणी सुद्धा असे पक्षी विदेश्यातुन काही कला साठी येत असतात. एवढ्या लांब च्या ठिकाणाहून हे पक्षी आपल्या येते का बरे येत असतील. मला वाटते येथील वातावरण त्या विशिष्ट काळात वेगळे व त्यांना योग्य असे राहत असेल. म्हणूनच ते येथे स्थलांतर करीत असतील. आल्या वर त्यांच्यातील मद पक्षी येथे अंडी घालतात. पण त्यांचे येथे घर नसते. म्हणून ते इतरांच्या घरात अंडी घालतात. नंतर ते पक्षी परत आपल्या गावाकडे निघून जातात. मात्र त्यांची अंडी येथेच असतात. ती अंडी मग आपल्या कडील पक्षी ज्यांच्या घरात ती अंडी असतात ते पक्षी उबवतात. काही कला नंतर त्यातून लहान पिल्लं जन्म घेतात. आपल्या कडील पक्षी त्या पिल्लांवर माया करतात त्यांना वाढवितात. मात्र ती पिल्लं आपल्या मुल पक्ष्यांची वाट बघत असतात. असा त्या बातमीचा मठाला होता.
या पिल्लांचे नंतर काय होत असणार बर. कदाचित पुढील वर्षी त्या पक्ष्यांचा थवा पुन्हा येणार व येथे राहणारे पिल्लं त्यांच्या थव्याबरोबर निघून जाणार आपल्या त्या यशोदेला सोडून जिने त्यांचा सांभाळ केला एक वर्ष.

किती गमतीशीर गोष्ट आहे ही. हजारो किलोमीटरचा पल्ला ओलांडून तो पक्ष्यांचा  थवा आपल्या देशात येतो काय अंडी घालतो काय  व निघून ही जातो काय.
माझ्या मनात एक विचार आला कि पक्ष्यांमध्ये एवढी माणुसकी. माफ करा ते पक्षी आहेत माणूस नाही म्हणजे माणुसकी म्हणणे चुकीचे ठरेल नाही का? पण येथे शब्द तरी काय वापरता येईल बरे. काही सुचत नाही. “पक्षीपण” म्हणता येणार नाही कारण त्याचा अर्थ “उडण्याचा गुण” असा होतो. त्यामुळे याला माणुसकी असेच म्हणणे जास्त योग्य होईल नाही का? कारण त्या पक्ष्यांना कोठे हा लेख वाचायचा आहे कि ते आपल्याला शिव्या देतील. माणुसकी हा शब्द वापरला तर मला माझ्या भावना चांगल्या प्रकारे आपल्या पर्यंत पोहोचवता येतील नाही का?  चला तर आता आपल्या मुल मुद्द्यावर येऊ. तर किती ही माणुसकी त्या पक्षी नावाचे प्राण्यामध्ये. त्याला बोलता येत नाही पण किती समजदार असतो. आपण ह्या गोष्टींचा कधी ही विचार केला नसेल. दुसऱ्या एका पक्ष्याच्या पिल्लांची अंडी उबवणे, पिल्लांना जन्माला घालणे व त्यांचा सांभाळ करणे. हे काही सोपे काम नाही. पण आपणाला हे कसे कळणार आपण कधी केले थोडेच आहे असे काही. आपण करू ही शकणार नाही असे. अहो, आपल्याला दुसर्याचा इतका तिटकारा येतो तर त्यांच्या पिल्लंना माफ करा मुलांना कसे सांभाळणार. मानव जाती ला हे काम अशक्य आहे नाही का. अहो ते पक्षी फक्त हवापालट करायला स्थलांतर करतात काही कायमस्वरूपी राहायला येत नाही.  मनुष्यप्राणी मात्र पोट भरायला स्थलांतर करतो.  धन्य मात्र त्या पक्ष्याचे जे दुसऱ्या देशातून आलेल्या पक्ष्यांच्या पिल्लांचे पालन पोषण करतात.

स्थलांतर ही संकल्पना अनादी काळापासून चालत आलेली आहे. कोलंबस, मोहम्मद तुगलक, या आपल्या देशावर राज्य केलेले इंग्रज यांनी सुद्धा, कारण काही ही असो, पण स्थलांतरच केले हो ते नाही का?  फरक इतकाच आहे कि ते आफ्रिकेतील पक्षी वातावरण बदलले कि आपल्या देश्यात परत जातात पण मनुष्यप्राणी हा परत जात नसतो.

हे लिहित असतांना बायको आली व तिने खडसावून विचारल, तशी ती मी संगणकावर बसलो असतांना जवळ आली कि मी दाचाकातोच, ” अहो काय चालले आहे तुमचे”. मी तिला लेख वाचून दाखवला, तिला तसदी नको म्हणून. पण ती म्हणाली, “अहो, सध्या एक तरी चिमणी दिसते का झाडांवर. चिमणीच काय कोणताच पक्षी दिसतो का? आपल्या टेरेस वर ४-५ वर्षापूर्वी चिमण्यांची जोडपी यायची आता कोठे गेली ती”
खरचं आहे हे, मी सुद्धा मागच्या ४-५ वर्ष्यापासून यावर विचार करतोय.मला वाटत मोबिल चा वापर वाढल्यापासून मोबिल वाढले पण पक्षी कमी झाले आहेत. खरे खोटे कोण जाणे. पण एक मात्र नक्की आपल्याला आपल्या मुला बाळांना आता या जोडलेल्या तील पक्ष्यांप्रमाणे पक्षी दाखवावे लागणार आहेत. कारण या पुढे पक्षी हे दिसणारच नाहीत मुलांना. आपणास विनंती आहे कि हा सांभाळून ठेवा, भविष्य काळात कामात येईल.