खुंटी…

पूर्वी प्रत्येक घरामध्ये कपडे टांगण्यासाठी घरातील भिंतीला खुंट्या ठोकलेल्या असत. वडील बाहेरून आले कि सदरा काढून खुंटला टांगत असत. आम्हाला गंमत वाटे. पण आमचा हात पुरत नसे खुंटी पर्यंत. मग वडिलांना सदरा काढून द्यायचा. ते खुंटीवर आमचा छोटासा सदरा टांगत. तो लहान असल्याने दोन तीन वेळा खाली पडत असे. टांगला गेला कि आनंदाने नाचत असू.

मी नेहमी प्रमाणे खुंटी चे चित्र नेटवर उपलब्ध होते का म्हणून शोधाशोध सुरू केली. पण सापडले नाही. बराच प्रयत्न केला. हिंदी भाषेत ही खुंटीच म्हणतात म्हणून हिंदी मधे टाकून पाहिले. बराच वेळ गेल्यावर अलीबाबा. कॉम वर अशा परंपरागत खुंट्या विकत मिळत असल्याचे लक्षात आले. त्याचा स्क्रीन शॉट काढला व येथे टाकला.

त्यांना डॉली खुंटे म्हणतात असे दिसून आले.

आता या जमान्यात धातूचे खुंटे ज्यांना हुक म्हणतात ते मिळतात. स्क्रू ने भिंतीवर फिट केले जाते. डेकोरेटिव पद्धतीची विविध आकाराची अत्यंत आकर्षक अशी हुक्स बाजारात उपलब्ध असतात. ह्याच त्या आधुनिक खुंट्या.☺️😊☺️😊

(19662)

🌼🌹🌹🌼🌼🌹🌹🌼🌼🌹🌹

तुटलेली फुले, “सुगंध” देऊन जातात🌹गेलेले क्षण, “आठवण” देऊन जातात प्रत्येकांचे “अंदाज” वेग-वेगळे असतात
म्हणुन काही माणसं “क्षणंभर”, तर काही “आयुष्यभर” लक्ष्यात राहतात…!!

💐💐 शुभ सकाळ 💐💐
🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

http://www.manachyakavita.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

जाते, पाटे आणि वरवंटे….

लहान असताना रोज सकाळी ३-४ वाजेला घरातील कामे सुरु होत. त्यात जात्यावर दळण दळायचं काम एक होते. हे काम दररोज नसे. पण दोन तीन दिवसातून एकदा केले जायचे. दोन शेजारणी एकत्र दळत. सोबत गाणं गायलं जात असे. कधी कधी आई एकट्याने दळत असे. पण ती पहाट आठवणीत राहून गेली. अशी सुमधुर सुश्राव्य सकाळ कधी होणे नाही. दळण असो अगर नसो. पूर्वी बायका सकाळी लवकर उठत असत. सवयच होती ती सर्वांना. पुरुष मंडळी सुद्धा सकाळी पांच वाजेला आंघोळ करून तयार असायचे. ठंडी आहे म्हणून उशिरा उठणे असे कधी झाले नाही. आम्ही लहान होतो तरीही लवकर उठून तयारी करत होतो. सकाळी पांच वाजता चिमणी घेऊन अभ्यास करायला बसत असू. घरोघरी असच असायचं. आम्ही तर शेजारच्या मित्रांसोबत अभ्यास करत होतो. असो.

पूर्वी गिरण्या नव्हत्या. घरोघरी जाते होते. दगडी जाते. दोन पाते असायची एक वरचं तर दुसरं खालचं. मधे एक दांडा असायचा. वरच्या पात्याला एक दांडा असायचा. त्याने वरचं पातं गोल फिरवल जायचं. वरच्या पात्याच्या मध्यभागी असलेल्या दांड्याच्या अवतीभवती थोडी मोकळी जागा मुद्दामहून ठेवलेली असायची.

त्यातून ज्वारीचे दाने टाकले जायचे. दोन पात्यांमधे ते येत व दळले जात. शुद्ध पिठ बाहेर पडत असे. शुद्ध आणि पौष्टिक ही. भाकरी सुद्धा स्वादिष्ट लागत असे. तेव्हा चे अन्न गुडचट लागे. पोळी असो अगर भाकरी नुसती जरी खाल्ली तरी गोड लागत असे. तोंडाला लाळ सुटून आणखी गोड होत असे. आता तर पोळी ही गोड लागत नाही आणि खातांना तोंडातून लाळ ही उत्पन्न होत नाही. जन्म झाला आहे म्हणून खायचे व जगायचे बस. अर्थात जगण्यासाठी खायचे.

पूर्वी ज्वारी ची भाकरी दररोज खात असत. तेव्हा ज्वारी चे पिक जास्त घेतले जात होते. गहू कमी खात असत. आमच्या कडे तर दिवाळी, दसरा अशा सणाला किंवा विशिष्ट पाहूणे आले तरच वरण पोळी व भाताचे जेवण होत असे. इतर वेळी फक्त भाजी भाकरी. याच्याने पोट व्यवस्थित राहत असे. तब्येत ठणठणीत राहणार. आणि घरात वरण भात म्हणजे जिन्नस व आनंदाचा दिवस मानला जात असे. अहो, शीरा पूरीचा पाहुणचार म्हणजे खुप मोठी गोष्ट. दिवाळी दसरा या सणांची आतुरतेने वाट पाहात असत सगळे. स्रिया तर एक महिना आधी पासून काय घ्यायचं, काय करायचं याचं नियोजन सुरू करत. असो, नेहमी प्रमाणे विषयांतर झालच.

पाटा आणि वरवंटा ही जोडी ही त्याकाळी अत्यंत महत्त्वाची होती.

घरोघरी असणारच. हीच श्रीमंती होती हो त्याकाळी. पाट्या वरवंट्यावरील चटणी😢 काय स्वाद असायचा राव. आता लिहित असताना ही तोंडाला पाणी सुटले. तो स्वाद आठवला राव. मिक्सर आला आणि जीवनातील रयाच गेली बघा.

आधीच रसायनांचा मारा म्हणून भाजी पाला बेस्वाद झालेले. त्यात मिक्सर, ग्राईंडर ची भर. त्यात चटणी केली सर्व स्वाद जळून जातो.

आणि हो ह्या सुख सोयी सोबत आजारपण घेऊन आल्या.

(19649A)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

लिहिल्याशिवाय
दोन शब्दातील अंतर
कळत नाही….
हाक आणि हात
दिल्याशिवाय माणसांचे
मनं जुळत नाही…
💐💐शुभ सकाळ💐💐

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.ownpoems.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रद्धा(19541)

मला वाटते श्रद्धा ही कोणाची कोणावरही असु शकते. कोणाची देवावर, तर कोणाची गुरूवर, तर कोणाची आई-वडिलांवर इ.इ.

श्रद्धा ही जीवापाड केली जाते. त्यात कोणतेही प्रलोभन नसते. ज्याच्यावर श्रद्धा आहे त्याला ही कसला मोह नसतो किंवा ज्याची श्रद्धा आहे त्याला ही आपल्या श्रद्धेय कडून काही अपेक्षा नसते.

वारकरी हा असाच श्रद्धाळू. विठ्ठलावर निस्सीम प्रेम करणारा, सैकडों किलोमीटर चा प्रवास पायी करणारा. असा हा वारकरी. त्याचे देवाकडे काही ही मागणे नसते किंबहुना तो तशी अपेक्षा ही व्यक्त करित नाही. फक्त आपल्या विठ्ठलाच्या भक्तीत मग्न होऊन चालणे बस इतकेच.

बर असे ही नाही कि जितके वारकरी असतात ते धनाढ्य असतात. सर्व बिचारे सर्वसामान्य गरीब घरातील असतात. तरी ही ते देवाला काही मागत नाही किंवा देव ही त्यांना काही देत नाही. पण असे म्हणता येणार नाही कारण जो देवाची भक्ती करतो तो मनाने सुखी असतो.

आपल्याला देवळातून एखादा बाहेर पडताना दिसला की आपण लगेच विचारतो काय मागितले देवाकडे?

पण असे असते का? तर उत्तर आहे नाही. आपली ती समजूत असते कि देवाची पूजा करणारा नेहमी पूजा करतांना देवाला काही तरी मागतोच. काही नाही तर देवा मला सुखी ठेव हे तरी तो मागतोच. पण वारकरी तसी कसलीही अपेक्षा उराशी बाळगून नसतो.

उत्तर भारतात प्रसिद्ध “कावडिया” हा ही असाच एक संप्रदाय. महादेवावर निस्सीम प्रेम करणारा भक्त. देवाकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता शैकडो किलोमीटर पायी चालत असलेला हा महादेवाचा भक्त. परवा टि.व्हि.वर पाहिले एक भक्त लोटांगण घालत जात होता. त्याला पत्रकाराने प्रश्न विचारला तु काय मागण्या साठी एव्हढा खडतर प्रवास करतोय. तर त्याने उत्तर दिले “काही नाही. बस देवावर श्रद्धा आहे.”

पत्रकाराने त्याला विचारले “एवढा मोठा. प्रवास तु असे लोटांगण घालत करू शकशील का?”

“देवावर श्रद्धा आहे. निश्चितच करणार.”

असे हे देवाचे भक्त. कोणालाही देवाकडून कसलीही अपेक्षा नाही. “ठेवीले अनंते तैसेचि रहावे मनी असु द्यावे समाधान”

तिळगुळ घ्या गोडगोड बोला!

मित्रांनो, आपण सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙂 कामाच्या भाराखाली उद्या मकर संक्रांति आहे हे माझ्या स्मरणातून निघून गेले होते. मला देवेंद्र ने आठवण करून दिली म्हणून ही पोस्ट टाकता आली.याबद्दल देवेंद्रला धन्यवाद. या मकर संक्रान्तीच प्रथम तिळगुळ(वर्चुअल)  त्याच्या कडूनच मिळाल. म्हणून हे वर्ष चांगल जाईल याची खात्री पटते. तरी मी जगभरातील सर्व ब्लोग मित्रांना ज्यात महेंद्र, भाग्यश्री, तन्वी,अनिकेत, अनुजा, अनुजा खैरे, सुरेश पेठेजी,सुहास झेले , देवेंद्र, नीरज शिंदे,  गजानन, अपर्णा,हेरंब,सोनल,सचिन,कांचन, आल्हाद, आणखी किती तरी मित्र आहेत या ब्लोग रुपी बिन भिंतीच्या घरात. चार पाच महिन्यांच्या कालावधीत माझे जगभरातील किती तरी मित्र तयार झालेत. त्या सर्व मित्रांना मी मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांनी स्वीकारावी हीच अपेक्षा.

लहान असतांना हा सन साजरा करीत होतो ते  दिवस आठवतात का? गावामध्ये राहत होतो. या सणाला सर्व बालगोपाल सायंकाळी छान छान कपडे परिधान करून घरो घरी तिळ गुळ द्यायला व थोर मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला निघायचे. थोरांनी त्यांना तिळगुळासोबत आप आपल्या ऐपती प्रमाणे साखर, गोळी किंवा ५-१०-२५  पैसे ( आता तर ते हद्दपार झाले आहेत. काही दिवसांनी ५० पैसे व १ रुपया सुद्धा हद्द पार होईल असे वाटते. कारण त्यांची किंमत कमी झाली आहे.) खुप छान दृश्य असायचे ते! आता जगाला व समाजाला शहरीकरणाने  इतके व्यापून टाकले आहे की सण, सण राहिलेले नाही.असो. पुनः एकदा सर्व मित्रांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙂 🙂

गुगल ने मकर संक्रांतीच्या सणाची दाखल घेऊन आपल्या मुख्य पृष्ठावर पतंगाचे चित्र देऊन लिंक दिली आहे हे विशेष वाटले. याबद्दल गुगल चे आभार मानायला हवेत.

परंपरा-२

आपल्या देशात पूर्वापार चालत आलेल्या परंपरा खूपच आहेत. मागची पिढी बहुतेक परंपरा   पाळायची. आता या आय. टी. च्या जमान्यात त्या परंपर पाळणे शक्य आहे असे वाटच नाही. वेळ हि कोणाला नसतो. एवढी शिकलेली मुल, विदेशात भक्कम वेतन घेणारी, आलिशान घरांमध्ये राहणारी हि मुल त्या जुन्या परंपर पळत असतील असे मला तरी वाटत नाही. असो.
श्रावण गेला, भाद्रपद आला. मात्र सोबत बाप्पांना घेऊन आला. या वर्षी तब्बल १२ दिवस बाप्पा आपल्या सोबतीला होते. बाप्पांचे विसर्जन झाले. विरह झाला. विरहातून बाहेर पडायला होते न होते, भाद्रपदातील कृष्ण पक्ष म्हणजे पितृ पक्ष सुरु झाला. प्रत्येकाने आपापल्या पित्तरांना जेऊ घालायचे. आज षष्ठी वडिलांना जेऊ घालायचे होते. घातले. आदराने, प्रेमाने.कर्तव्य पार पाडले. परंपरा पाळली. अर्धांगिनीने आठवड्यापासून याची आठवण करून दिली होती. मी सर्व परंपरा व कर्तव्ये माझ्या अर्धांगिनी कडे देऊन टाकली आहेत. तिला सर्व आठवण असते म्हणून. मी आपल्या देवाने दिलेल्या लहानश्या ह्य मेंदूत किती गोष्ठी साठवून ठेवणार. खरच मनापासून वाटत जग जवळ येत चालाल आहे नव्हे आलेलं आहे पण माणसाचा मेंदू तेव्हडाच आहे तो किती गोष्टी डोक्यात ठेवणार. असो तर अर्धांगिनीने आज हे कर्तव्य आपलेपणाने व प्रेमाने पार पाडले. आनंद झाला. आपले कर्तव्य फक्त कर्तव्य म्हणून पार पडणे व आपलेपणाने व प्रेमाने पार पडणे यात किती फरक आहे. प्रेमाने पार पाडले कि आनंद होतो, आदर वाढतो. मात्र तेच कर्तव्य कोणी फक्त एक लावून दिलेली परंपरा व कर्तव्य समजून जबरी पार पडत असेल तर मनाला कोठे तरी दुख होते.
मनात आले, हे पितृ पक्षात पित्तरांना जेऊ घालणे फक्त मुलगाच करू शकतो. मुलगी नाही, कारण टी दुसर्या घरी गेलेली असते. जर कोणाला मुलगा नसला तर. तर काय त्याला गेल्यावर जेऊ कोण घालेल. त्याने का उपाशी राहायचे. पण परंपराच ती. मनातील दुख कोणाकडे व्यक्त करू नये …………………………………………………………….. खरच का हो आपली पित्तर जेवायला येत असतील. ते काही हि असो. मला वाटत हि आपल्या पित्तारांप्रती  आदर व्यक्त करणे व त्यांची आठवण ठेवणे अश्या  भावनेतून पूर्वापार चालत आलेली परंपरा असावी.

आपल्याला काय वाटते?

परंपरा -१

प्रत्येक मानव हा उदरनिर्वाहासाठी नौकरी, व्यवसाय करीत असतो. त्यामुळे समाजातील लोकांना त्याला भेटता येत नाही. त्याची समाजातील लोकांशी गाठ-भेट होत राहावी कदाचित यासाठीच समाजाने वेगवेगळ्या परंपरा लावून दिल्या असाव्यात असे माझ्या मनाला वाटत असते. वाढ दिवस साजरा करणे,सण साजरा करणे या परंपरा त्याच साठी सुरु झाल्या असाव्यात असे मला माझे मन सांगत असते.
आनंद असो वा दुख, मानव एकटा कधीच साजरा करू शकत नाही. त्यासाठी त्याला इतरांची गरज भासतेच. अचानक आनंद झाल्यावर व एकटा असल्यावर तो स्वतः आनंदाने उड्या मारतो. पण, त्यावर त्याचे समाधान होत नसते. त्याला तो आनंद इतरांसोबत वाटायचा असतो. इतरांना कधी सांगू असे त्याला होते. लगेच तो घराबाहेर पडतो. मित्रांना भेटतो व मनातील सर्व भावना व्यक्त करतो. त्यानंतर त्याला हायसे होते. आणि त्याच्या मनाचे समाधान होते. असा हा मानव प्राणी.दुख  झाल्यावर सुद्धा त्याला दुसऱ्याच्या खांद्याची गरज असतेच. आपल्या मनातील भावना तो इतरांच्या खांद्यावर आपले डोके ठेवून व्यक्त करतो तेव्हाच  त्याच्या मनाचे समाधान होते. दुखात असलेल्या व्यक्तीला जवळचा मित्र भेटल्यावर बघा तो लगेच हुंदके देवून रडायला लागतो. त्याच्या गळा लागून, त्याच्या खांद्यावर डोके ठेवून ढसाढसा रडून घेतो. मन समाधानी झाल्याशिवाय तो शांतच होत नाही. मित्र सुद्धा त्याचे समाधान होई पर्यंत त्याला रडू देत असतो.

आपल्यावर असा प्रसंग कधी तरी आला असेल. एखाद्या दुखी मित्राला/ नातेवाईकाला भेटल्यावर त्याच्या पाठीवर प्रेमाने हात ठेवता बरोबर तो रडायला लागतो. लांब कशाला जाता. आपले बालपण आठवा कि, लहान असतांना वडिलांनी मारल्यावर आपण घराच्या एका कोपऱ्यात रुसून बसतो. आई जाणून बुजून आपल्या जवळ येत नाही किंवा वडील तिला आपल्या जवळ येवू देत नाही. पण जो पर्यंत आई जवळ येत नाही तो पर्यंत आपण रडत नाही. एकदाचे वडील घराबाहेर पडले,  व आई जवळ आली,  कुशीत घेऊन मायेने पाठीवर हात फिरविला कि आपण जोरजोरात रडायला लागतो. म्हणूनच कदाचित आपल्या पूर्वजांनी या परंपरा सुरु केल्या असाव्यात असे वारंवार माझे मन मला सांगत असते.