अपोलो-11

आज 20 जुलै रोजी मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवण्याच्या त्या ऐतिहासिक घटनेला बरोबर 50 वर्षे झाली. चंद्र भूमीवर पहिले पाऊल ठेवणारा तो मानव म्हणजे निल आर्मस्ट्राँग. दुसरा होता एडविन ऑल्ड्रिन. अमेरिकेचे अपोलो 11 या यानाने हे अंतरिक्ष वीर चंद्रावर गेले होते.

तत्पूर्वी ही परिकल्पनाच होती.

पण मानवाने त्या परिकल्पनेला मुर्त स्वरूप दिले.

पण भविष्यात चंद्र एक पर्यटन स्थान असेल हे नक्की. तेव्हा कदाचित आपण नसु ही.

Advertisements

टी.व्ही.गुंडाळून ठेवा बर!!!

साधारण एक  दोन वर्षापूर्वी माझ्या मनात सहज येऊन गेले होते कि भविष्यातील टी.व्ही. एका पडद्या सारखा असेल . पाहिजे तेव्हा गुंडाळून ठेवायचा आणि उघडला कि बघायचा. याबद्दल माझ्यामनात असे हि आले होते कि आपल्या देश्यातल्या टी.व्ही. बनविणाऱ्या मोठ्या कंपनीला हि कल्पना सुचवायची. तशी मी सुरुवात हि केली होती. पण जीवन इतके व्यस्त आहे कि कुठलेच काम पूर्ण होत नाही. हि कल्पना मी मित्रांना आणि घरी मुलीला हि सांगितली होती. मला वाटते ब्लोग वर हि टाकली होती. आज लोकसत्तेमध्ये एक बातमी वाचली आणि कल्पना पुन: जागृत झाली. जपान मध्ये एका कंपनीने असा टी.व्ही. तयार केला आहे. Screenshot_1

अर्थ-जगात नैराश्य

आजच्या लोकसत्तेत एक महत्वपूर्ण बातमी वाचली. शेअर करावीशी वाटली व यावर माज्या मनातील विचार लिहावेसे वाटले म्हणून हा प्रपंच.

बातमी अर्थ जगताची आहे. शीर्षक ” धूर केवळ निराशेचा!”

देशाचा औद्योगिक उत्पादकता दर खूप खाली आला आहे. किती तर  एप्रिल ते फेबृअरी २०१२ यां कालावधीतील दर ३.५% आहे. पूर्वीच्या आर्थिक वर्षात तो ८.१% इतका होता. त्यातील ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्राची वाढ गेल्या वर्षीच्या १३.४% वरून थेट खाली घरंगळत येऊन ०.२% वर  पोहोचली आहे.

यावर मी विचार केला तर असे वाटले की याला महागाई जवाबदार आहे. महागाईमुळे जनता ग्राहकोपयोगी वस्तू घेईनासी झाली आहे. पण असे का झाले. महागाई इतकी का वाढली. मला वाटते महागाई ही माणसाच्या खिश्याच्या फुगवट्यावर अवलंबून असते. ज्या ज्या वेळी वर्तमान पत्रात पगार वाढीच्या बातम्या येतात तेव्हा बाजारात महागाई वाढते. मग महागाई वाढली म्हणून पुनः पगार वाढ होते. पुनः महागाई वाढते. असे हे चक्र चालूच राहते. पण मागच्या दशकापासून वर्तमान पत्रात फक्त कर्मचाऱ्यांचे पगार वाढले अशाच बातम्या येत आहेत असे नाही. आय टी च्या लोकांचे पगार किती आहेत, व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थ्यांना किती कोटीचे पेकेज मिळाले असा बातम्या झळकतात. त्या कोण महिला आहेत त्यांना वर्ष्याचे वेतन म्हणे काही  कोटी मिळते.  मागच्या काही वर्ष्यातील बातम्या पहिल्या तर औद्योगिक क्षेत्रात जास्त वेतन देण्याची चढाओढ लागली आहे असे स्पष्ट दिसून येईल.

हायचे परिणाम काय होतील? जितके जास्त वेतन ती   कंपनी आपल्या कर्मचाऱ्याला देईल त्या प्रमाणात त्यांच्या उत्पादनाच्या किमतीत वाढ होईल. आणि महागाई वाढेल. सांगायचा तात्पर्य की देशातील १% लोकं खुपच जास्त वेतन घेतात आणि त्या प्रमाणात बाजारात भाव वाढ होते. त्याचे परिणाम ९९% लोकांना भोगावे लागतात.

आता हे एक टक्का लोकं बाजारात जाऊन समजा टी.व्ही., फ्रीज, संगणक अशा वस्तू घेतील तर वाढलेल्या किमतीचे त्यांना काही वाटणार नाही. पण ९९% लोकांपैकी ५०% लोकं ह्या वस्तू भाववाढीमुळे  घेऊ शकत नाहीत. त्यामुळे वस्तूचा खप कमी होईल. म्हणूनच ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्राची वाढ घटली असेल.

याचे परिणाम माझ्या मते असे होतील की आता भाव कमी केल्याशिवाय गत्यंतर राहणार नाही. कारण प्रगती साठी खप महत्वाचा असतो किंमत नव्हे.

लोकसत्ता-१३-०४-२०१२

लोकसत्ता-१३-०४-२०१२

भुत आणि भविष्य!

जापानला नुकताच भुकंप आणि सुनामि ने जबर्दस्त हादरा दिला आहे. हा हादरा एव्हढा जबरदस्त होता की याने प्रुथ्वी आपल्या जागेवरुन सरकली आणि सर्व जग आ वाचुन जापान कडे पाहात राहिले.
नेशनल जिओग्राफिक सोसायटी ने जापान बद्दल नुकतीच काही चित्र प्रसारित केली आहेत. यांचे वैशिष्ट असे आहे की हे ज्या ठिकाणांना सुनामि लाटांनी हादरा दिला त्यांचे पुर्वीचे सुवास्तु चित्र आणि आताचे विदारक चित्र यांची तुलना आपाण करु शकतो.
पहा आणि निसर्गाच्या ताकदिला ओळखा.

खालील हेडिंग वर क्लिक करा

 

भुत आणि भविष्य


BEFORE TSUNAMI

AFTER TSUNAMIतिळा तिळा दार उघड!

कालच आपण संक्रांति साजरी केली. मोठ्या धूम धडाक्याने! ( माझे मत). प्रत्येकाने एक दुसर्याला तिळगुळ देऊन ‘तिळगुळ घ्या गोड गोड बोला.’ असा आग्रह धरला. स्त्रियांनी पारंपरिक वेशभूषेत हा सण साजरा केला.

का कुणास ठाऊक माझा डोळा फडफडत असल्याचे मला जाणवले. आणि का कुणास ठाऊक माझ्या मनात ‘ तिळा तिळा दर उघड!’ असे बोल घोळू लागले. अस का होत असाव याचा विचार करीत बसलो होतो. काही सुचेना. म्हणून जागेवर बसून टी.व्ही. सुरु केला. पाहतो तर काय तिळाने आपल भाल मोठ दार आधीच उघडून ठेवलं होत.

असो, असे आश्चर्याने काय बघताय. बातम्या नाही बघितल्या वाटत! कालची सर्वात महत्वाची एकच बातमी होती. पेट्रोलचे दर आणखी २.५० रुपयाने वाढले. तिळाने दार उघडले आणि गोड संक्रांत कडू झाल्याची विनाकारण जाणीव होऊन गेली. विनाकारण म्हणणेच योग्य आपण काय करू शकतो. जास्तीत जास्त पायी प्रवास करू शकतो. किंवा सायकलचा वापर करू शकतो.

रात्री माझ्या मनात एकाच विचार घोळत होता. आता आपण गाडी चालविणे सोडून द्यावे. ऑफिस जवळ आहे. १५-२० मिनिटे चालतच जात जावे. याने दोन कार्य साध्य होतात. एक तर इंधनाची बचत होईल, दुसरे व्यायाम होईल. आणखीही इंडायरेक्ट फायदे आहेतच. जसे प्रदूषण कमी होईल, गाडीचा देखभाल दुरुस्तीचा खर्च कमी होईल, आणि इतर कोणी लिफ्ट मागणार नाही. फायदेच फायदे.

सध्या घराचे अति कठीण शोध कार्य सुरु आहे. मला हे कार्य आकाशातून तारे तोडून आणण्यासारखे कठीण वाटायला लागले आहे आता. तर सांगायचा मुद्दा असा होता कि मध्यंतरी घर शोधात असतांना मला एक सद्गृहस्थ भेटले. सहज त्यांना विचारले तर त्यांचे वय म्हणे ७२ वर्ष होते. मी त्यांना विचारले अहो काका तुम्ही घरोघरी फिरून लोकांना घर दाखविता. मोठ मोठ्या इमारतींमध्ये चढून जाता. तुम्हाला थकवा नाही का येत. तर ते काय म्हणाले, अहो मागच्या ५० वर्षापासून मी घर खरेदी विक्री च्या व्यवहारात असून भला मोठा परिसर तेही सायकलने फिरत असतो. मला कधीच थकवा जाणवत नाही. तेव्हा मला जाणवून गेले कि सायकलवरील व्यायाम हा खूप महत्वाचा आहे. शरीर तंदरुस्त राहते.

मी विषयाला बगल देऊन टाकली नाही. ही माझी घाणेरडी सवय आहे बघा. प्रत्येक लेखात असेच होते. असो तर आपण तिळा तिळा……….. बद्दल बोलत होतो.

अहो मी कालच महागाईवर लेख लिहिला होता आणि त्यात पेट्रोल दर ही भाववाढीचे एक कारण आहे असे लिहिले होते. आणि काय आश्चर्य लगेच भाव वाढ लागू झाली की. मला माहीत आहे मी विचार करतो ण की ते घडतेच. आता मला माझी थिंकिंग बदलून टाकावी लागेल असे दिसते. जरी बाजारात भाव वाढलेले असले तरी ते भाव योग्य आहेत असेच म्हणावे लागेल आणि मनाची तशीच समजूत ही करून द्यावी लागेल. म्हणजे उगाच भाव वाढ झाली आहे ह्याची जाणीव होणार नाही आणि सतावणार ही नाही. एक उपाय योग्य आहे. पूर्वी १० रुपयाला पाव किलो भाजी घेत होतो तर आता १० रुपयाला अर्धा पाव भाजी मिळेल. खर्च १० रुपयेच करायचा. भाजी चे वजन कमी होईल इतकेच. काय म्हणता पोट कस भरेल. अहो बायकोचे चार शब्द मिळतीलच की खायला. ह्याचे अर्धा पाव भाजीला चव छान येईल की.

(तर आजच तिळाने दार उघडायला सुरुवात केली आहे. किलकिले आहे अजून काही दिवसांनी पूर्ण उघडले तर पेट्रोल खारेधी करणेच बंद करावे लागेल.)

तिळगुळ घ्या गोड गोड बोला!

तिळगुळ घ्या गोड गोड बोला! मित्रांनो आज मकर संक्रांति. आपण मनात असलेल्या साडे तीन मुहूर्तांपैकी एक.( मी चुकलो तर नाही न!). मागच्या बऱ्याच कालावधी पासून आपल्या देशातील विविध वृत्त पत्रात/ दूरदर्शन वरील विविध वृत्त वाहिन्यावर एकच विषय घोळला ( चघळला) जातोय. महागाई, महागाई आणि महागाई! आज काय तर कांद्याचे भाव वाढले. दुसऱ्या दिवशी टमाटर, मग अंड, मग लसून. अहो महागाई वाढली म्हणजे ती प्रत्येक पदार्थाला लागू पडतेच की. एकाच पदार्थाचे भाव कसे वाढतील. नुकतेच पेट्रोल चे भाव वाढले. त्याचा परिणाम होईलच.

पण मला एक कळत नाही की महागाई वाढली हे ह्या न्यूज चेनल/ पेपर वाल्यांना कसे कळते. आपल्याला तर त्यांच्यामुळेच कळते. मी असे का म्हणतोय असा प्रश्न पडला असेल तुम्हा सर्वांना. मी तुमचे चेहरे बघुनच ओळखले. अहो, महागाई जरी वाढली असली तरी बाजारात गर्दी कमी झालेली दिसते का? ज्वेलर्सच्या दुकानावर बघा किती गर्दी असते ती. भाजी बाजारात तरी कमी  गर्दी दिसते. आणि हो सोन्याचे भाव वाढले की जास्त गर्दी असते. तेथे का महागाईची झळ पोहोचत नाही.

अहो महागाई वाढली म्हणून कोणी बाजारातून सामान विकत आणणे सोडून देतो का? कोणी खाणे सोडून देतो का? महागाई वाढली की दोन दिवस बाजारात कोणीच गेले नाही तर तिसऱ्या दिवशी कसे भाव कमी होतात ते बघा.

असो मी पण काय घेऊन बसतो नाही. असे तुम्ही म्हणत असणार. म्हणून मी आपले भाषण संपवतो आणि जाता पुनः एकदा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा!

तिळगुळ घ्या गोडगोड बोला!

हा कसला परिणाम?

 

ग्लोबल वार्मिंगमुळे जगभरातील वातावरणावर परिणाम झाला आहे हे आपण दररोज वाचत आणि बोलत आहोत. पावसाळा हल्ली जवळजवळ ६ महिने असतो. अवकाळी पाऊस येऊन बरेच नुकसान करून जातो. मग थंडी पडते आणि ती हि रेकोर्ड तोडते. या वर्षी म्हणे पहिल्यांदाच पेरिस मधील आयफेल टॉवरच्या परिसरात बर्चाची पंढरी चादर

साभार: गुगल

पसरली आहे.

 

आपणाकडे थंडीने कहर केला आहे. काळ पुण्याचे तापमान ६.५ डिग्री होते. नाशिक ५.९ वर स्थिरावले होते. वर्धा सर्वात थंड म्हणजे ४.५ डिग्री होते. पण मूळ मुद्दा वेगळाच आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणवले जाणारे महाबळेश्वर १५ डिग्री वर स्थिरावले होते. मागील काही वर्ष पासून मी या गोष्टी कडे लक्ष ठेऊन आहे. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आता उष्ण झाले आहे. आणि नाशिक पुणे त्यापेक्षा थंड झाले आहे. हे कसे

साभार: गुगल

काय? याला कश्याचा परिणाम म्हणायचे.

 

 

 

पूर्वी उन्हाळ्यामध्ये थंड हवेसाठी पर्यटक महाबळेश्वर येथे जात असत. मला वाटते आता हिवाळ्यात सुध्दा उष्णतेसाठी पर्यटकांना महाबळेश्वर येथे जावे लागेल. बरोबर. चला तर मग महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी जाऊ या आणि थंडीपासून आपले संरक्षण करू या!