श्रद्धा(19541)

मला वाटते श्रद्धा ही कोणाची कोणावरही असु शकते. कोणाची देवावर, तर कोणाची गुरूवर, तर कोणाची आई-वडिलांवर इ.इ.

श्रद्धा ही जीवापाड केली जाते. त्यात कोणतेही प्रलोभन नसते. ज्याच्यावर श्रद्धा आहे त्याला ही कसला मोह नसतो किंवा ज्याची श्रद्धा आहे त्याला ही आपल्या श्रद्धेय कडून काही अपेक्षा नसते.

वारकरी हा असाच श्रद्धाळू. विठ्ठलावर निस्सीम प्रेम करणारा, सैकडों किलोमीटर चा प्रवास पायी करणारा. असा हा वारकरी. त्याचे देवाकडे काही ही मागणे नसते किंबहुना तो तशी अपेक्षा ही व्यक्त करित नाही. फक्त आपल्या विठ्ठलाच्या भक्तीत मग्न होऊन चालणे बस इतकेच.

बर असे ही नाही कि जितके वारकरी असतात ते धनाढ्य असतात. सर्व बिचारे सर्वसामान्य गरीब घरातील असतात. तरी ही ते देवाला काही मागत नाही किंवा देव ही त्यांना काही देत नाही. पण असे म्हणता येणार नाही कारण जो देवाची भक्ती करतो तो मनाने सुखी असतो.

आपल्याला देवळातून एखादा बाहेर पडताना दिसला की आपण लगेच विचारतो काय मागितले देवाकडे?

पण असे असते का? तर उत्तर आहे नाही. आपली ती समजूत असते कि देवाची पूजा करणारा नेहमी पूजा करतांना देवाला काही तरी मागतोच. काही नाही तर देवा मला सुखी ठेव हे तरी तो मागतोच. पण वारकरी तसी कसलीही अपेक्षा उराशी बाळगून नसतो.

उत्तर भारतात प्रसिद्ध “कावडिया” हा ही असाच एक संप्रदाय. महादेवावर निस्सीम प्रेम करणारा भक्त. देवाकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता शैकडो किलोमीटर पायी चालत असलेला हा महादेवाचा भक्त. परवा टि.व्हि.वर पाहिले एक भक्त लोटांगण घालत जात होता. त्याला पत्रकाराने प्रश्न विचारला तु काय मागण्या साठी एव्हढा खडतर प्रवास करतोय. तर त्याने उत्तर दिले “काही नाही. बस देवावर श्रद्धा आहे.”

पत्रकाराने त्याला विचारले “एवढा मोठा. प्रवास तु असे लोटांगण घालत करू शकशील का?”

“देवावर श्रद्धा आहे. निश्चितच करणार.”

असे हे देवाचे भक्त. कोणालाही देवाकडून कसलीही अपेक्षा नाही. “ठेवीले अनंते तैसेचि रहावे मनी असु द्यावे समाधान”

स्थलांतर……

पुर्वी बहुतेक भारतीय लोकं खेडेगावातच रहात असत. आवागमनाची साधने ही कमीच होती. एस.टी. सुध्दा कमीच होत्या. त्यामुळे एका गावातून दुसर्या गावात जाण्यासाठी पायी किंवा बैलगाडी ने प्रवास केला जात होता. हे माझ्या लहानपणी.

वडिलांच्या लहानपणी तर म्हणे पायी किंवा घोड्यावर बसून प्रवास होत असे.

लग्न सुद्धा जवळपास असलेल्या खेड्यात च होत असत.

तेव्हा शहरं नव्हतीच मुळी.

काळ बदलत गेला. शहरं वाढली. उद्योग आले. लोकांचे स्थलांतर गावांकडून शहरांकडे सुरु झाले. आणि शहरं नगरात रूपांतरित होत गेली.

मग नगरांची महानगरं झाली. गावातील मंडळी नगरात व नगरातील महानगरात स्थलांतरित होत गेली.

पुढे आणखी काळ बदलला. शिक्षण वाढलं. आता जगाची दारं उघडली गेली आणि मुलं विदेशात शिक्षण घेऊ लागली. मग काय? एकदा मुलगा विदेशात गेला कि परत येणार नाही हा विचार मनात ठेऊनच पालक मुलांना शिकायला पाठवू लागले. झालं स्थलांतरित होण्यासाठी आणखी एक जागा मिळाली. ती म्हणजे “विदेश”.

आणि आता तर जग परग्रहावर विस्थापित होऊ पाहातयं. म्हणजे कदाचित याच किंवा पुढील दशकात मानव चंद्रावर राहायला सुरुवात करेल. बातम्या ही वाचायला मिळतात कि चंद्रावर प्लॉट पडलेत. काही लोकांनी तर विकत ही घेतले. असो.

स्थलांतरित होण्यासाठी गाव ते नगर, नगर ते महानगर, तदनंतर विदेश व पुढे परग्रह अशी स्थानं आहेत असे दिसून येते.

आंबा….

फळांचा राजा आंबा. त्याला चाखल्यावरच कळत फळांचा राजा का म्हणतात ते. तो सर्व फळांचा राजा असला तरी त्याच्यात वेगवेगळ्या जाती आहेत.

गरिबात गरिब आंबा म्हणजे तो अगदी लहान असतो. रस जवळजवळ नसतोच. पण गोड. गरिबाला परवडणारा. आणि श्रीमंतांना परवडणारा म्हणजे देवगड हापूस. सर्वात महागडा. हा आंब्याचा राजा.

हापूस मधे ही रत्नागिरी, कर्नाटकी हापूस असे काही प्रकार असतात.

पण आपल्याला त्याचे काय आंबा गोड आणि स्वादिष्ट लागला म्हणजे झालं.

माझा हे शीत पेय आंब्याच्या रसापासून तयार केलेले. प्रवासात सोबत घेतले की काही खायची गरज वाटत नाही.

मस्त

सेल्फ डिसिप्लीन भाग -५

जपान मध्ये स्वस्छ्तेशिवाय स्वयं शिस्तीचा आणखी एक नमुना मला आपल्या नजरेस आणावासा वाटतो. आम्ही जवळ जवळ १ महिना तेथे वास्तव्य केले. त्या एक महिन्यात आम्ही फक्त एक वेळा दोन पोलिसांना पहिले होते. म्हणजे तेथे लोकांमध्ये स्वयं शिस्त कुटून कुटून भरलेली आहे. असे वाटते. आपल्या कडे पोलीस असतांना घडू शकते तर पोलीस नसले  तर काय काय घडू शकते हे कथन करायची आवश्यकता वाटत नाही. मी आपल्या लोकांची निंदा करीत नाही. पण आपण शिस्तच काय नियम हि पळत नाही. रस्त्यावरील सिग्नल हिरवा होण्याची हि आपण वाट पाहत नाही आणि पळत सुटतो. रस्त्यावर डाव्या बाजून चालायचे असते हा नियम पण पायदळ चालणारांना कसला आलाय नियम. काही महाभागांना रस्त्याच्या मध्यभागून चालतांना सुद्धा तुम्ही बघितले असेल. जपान मध्ये एकदा सुटीचे भ्रमणाला गेलो असता एक गम्मत झाली होती. तो मला वाटते राजाचा जून महाल होता. त्याला आता पिकनिक स्पोट केला होता. अफाट परिसर होता आणि बघणारे देशी आणि विदेशी खूप होते. तिकीटाची मोठी लाईन पार करून आम्ही गेट मध्ये शिरलो तर आत पुनः एक लाईन होती. मी कंटाळलो होतो. सोबती लाईन मध्ये असल्यामुळे व समोर केंतीन दिसल्यामुळे मला सिगरेटची हुक्की आली आणि मी सोबत्यांना सांगून त्यांच्या उत्तराची वाट न पाहता पळत त्या केंतीन मध्ये शिरलो. त्यांना इंग्रीजी येत नव्हती. सिगरेट जवळ होती. इतर लोकांना पीतांना बघितले.  मी पण हिम्मत केली सिगरेट पेटविली आणि मशीन मध्ये कॉईन टाकून चहाची केन काढली. चहा पीत असतांना माझ्या जवळ तेथील कदाचित गार्ड असेल तो आला आणि काही तरी बडबड करायला लागला. मला त्याची भाषा कळेना. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. त्यामुळे मला त्याचा आवाज वाढल्या सारखा झाला आणि माझी हवा ताईत व्हायला सुरुवात झाली. मी बाहेर लाईन मध्ये बघितले तर सोबती नजरेस पडले नाही. आता मी घाबरलो. ती चहा आणि सिगरेट फेकून मी पळालो लाईन कडे सोबती बरेच पुढे गेले होते. त्यांच्या जवळ जाऊन जीवात जीव आला. नाही तर माझे काही खरे नव्हते. तेव्हा मला प्रश्न पडला होता कि चुकून आम्हा लोकांची चुकामुक झाली तर काय होईल. आम्ही त्यांना काही सांगू शकत नाही आणि ते आम्हाला समजू शकत नाही. तुम्हाला सांगतो आम्ही त्या राजवाड्यात ४-५ तास होतो. जो पर्यंत आम्ही तेथे होप्तो तो पर्यंत तो गार्ड माझ्या मागे मागे फिरत राहिला. बाहेर पडलो तेव्हा तो गेट पर्यंत आला. मध्ये आमच्या वर एक हेलीकोप्तर घिरट्या मारायला लागले तेव्हा तर मी फार घाबरलो होतो. मला वाटत होते कि ते माझ्या वर पाळत ठेवण्यासाठीच आले आहे.अशी त्यांची शिस्त आहे.
आम्ही परत येतांना एका जपान्याने माझ्या मुली साठी एक डायरी भेट दिली होती. आज १२ वर्ष झाली आजून ती डायरी

डायरी

आहे मुली जवळ.  मी तेथून काही वस्तू आपल्या होत्या आठवण म्हणून.  त्यातील artificial फुल

फुल

अजून जशीच्या तशीच आहेत फुलदाणीत. मित्रमंडळींसाठी भेट वस्तू म्हणून जवळ जवळ १०० पेन आणले होते. वेगवेगळी चोकलेट होती. मुली साठी तेथील चोकलेट बिस्कीटचा एक डबा

डबा

आणला होता. त्यातील वस्तू तेव्हाच संपल्या पण डबा आज ही आहे.

सेल्फ डिसिप्लीन भाग ४

आम्ही जपान मध्ये असतांना बऱ्याच वेळा बुलेट ट्रेन मध्ये बसायची संधी मिळाली. बुलेट ट्रेन ज्याचे मला खूप वर्षांपासून  आकर्षण होते. पूर्वी उल्लेख केल्या प्रमाणे मशीन मधून कॉईन टाकून ऐन वेळेला तिकीट काढले मात्र मी आग्रह केल्याने स्मोकिंग बोगीचेच तिकीट काढले. तशी मला वाटते एकच बोगी होती. आम्हाला ठरलेल्या कार्यक्रमा प्रमाणे एका विशिष्ठ ठिकाणी जायचे होते. आधल्या दिवशी जो आमच्या सोबत येणार होता त्याच्याशी तशी चर्चा होऊन नियोजन झाले होते. त्या नुसार आम्ही घरून निघालो. प्रथम लोकल ट्रेन पकडली आणि ठरलेल्या रेल्वे स्टेशन वर पोहोचलो. तो जपानी मनुष्य अद्याप ठरलेल्या जागी पोहोचला नव्हता. आम्ही त्याची वाट पाहत होतो. त्याला शोधण्या साठी आम्ही इकडे तिकडे पाहत होतो. अचानक आम्हाला हिंदी मध्ये एक आवाज आला” कूच मदद चाहिये हो तो बताइये.”
“आम्ही दचकून पालटून पाहिले तर एक भारतीय मनुष्य आमच्या शेजारी येऊन उभा राहिला होता. आम्ही थोडा वेळ त्याच्याशी गप्पा मारल्या. तो दिल्लीचा राहणारा होता आणि काही कामानिमित्त जपान मध्ये आलेला होता.  आम्ही त्याला धन्यवाद दिला व तो निघून गेला.
मी  घड्याळाकडे पाहिले तेव्हा आम्हाला येऊन अर्धा तास झालेला होता.पण हा जपानी कोठे दिसत नव्हता. आणि अचानक त्याचे दर्शन झाले. मग मी पुनः घड्याळ  पहिले आणि विचार केला कि आमचे काळ किती वाजता भेटायचे ठरले होते. तेव्हा लक्षात आले कि हा मनुष्य ठरलेल्या वेळीच आपल्याला भेटला. त्याला विचारले तर तो म्हणाल मी १० मिनिटा पूर्वी येथे पोहोचलो आहे. पण आपली वेळ ठरलेली होती म्हणून मी लांब उभे राहून वेळ होण्याची वाट पाहत होतो. वेळ झाली आम्ही मी तुम्हाला भेटायला आलो. आम्ही अक्षरशः कपाळावर हाथ मारून घेतला. अर्थात मनामध्येच. तर अशी त्यांची शिस्त आहे. इतरांना आपली वाट बघत ताटकळत ठेवत नाहीत आपल्यासारखे.

IMG1860AIMG1862A