मित्रांनो, आजचा शिर्षक वाचता बरोबर जीवलग मित्र किंवा जवळचा एखादा नातेवाईक यांचा चेहरा डोळ्यासमोर आला असेल न. यायलाच पाहिजे. येथेच तर नात्यातील प्रेम दिसते. मनाला धीर येतो, उभारी येते. असा सुधीर प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच. ज्याच्या जवळ दोन मिनिटे बोलल्यावर,( प्रत्यक्ष किंवा फोनवर.), दोन मिनिटे भेट घेऊन मन मोकळे केल्यावर हलके हलके वाटते. असा हा सुधीर. मग तो मित्र असो किंवा मैत्रीण किंवा एखादा नातेवाईक.
म्हणून माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे मित्रांनो, आजच्या या कठीण प्रसंगी एक दुसऱ्या साठी सुधीर व्हा. आपलं मन मोकळं करा. बरे वाईट जसे असतील तसे विचार व्यक्त करा. स्वतः हून व्यक्त व्हा. मन हल्क होईल. मनावरचा ताण कमी होईल.
मित्रांनो, मी हे का लिहित आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पडलाच पाहिजे. नाही तर लेख वाचनाला काही अर्थ उरत नाही. अर्थ समजून घेतला नसेल, त्यानुसार काही प्रमाणात वागत नसतील तर लिहून काय उपयोग. असो. जशी ज्याची मरजी….
बरीच उदाहरणं समोर येत आहेत कि ते लग्न समारंभाला किंवा इतर कुठल्या समारंभाला गेले होते. तेथून सोबत कोरोना घेऊन आले. एक एक करत घरातील बरेच सदस्य गेले. प्रवासात कोरोनाची लागण होते आहे. काही वेळा काय झाले हे लक्षात येत नाही. तीन चार दिवस निघून जातात. नंतर उशीर झालेला असतो.
दवाखान्यात आपल्या समोर लोकांना मरण येत असेल तर साहजिकच रुग्ण घाबरून जातो. मरणाच्या बातम्या व दररोज ची रुग्ण संख्या बघून धडकी भरते. नुसत नाव जरी काढल तरी ह्रुदयाचे ठोके थांबतात.
अशा नकारात्मक परिस्थितीत मला वाटतं आपल्या मित्र मंडळींशी, नातेवाईकांशी मोबाईल वर का होईना बोलत राहिले, एक दुसऱ्याला धीर देत राहिले तर मनाला आधार मिळतो. मनुष्य दुःख सहन करण्यासाठी मानसिकरित्या तयार होतो.
हा काळ भयावह आहे. नातेवाईक सुद्धा जवळ येण्यास घाबरत आहेत. दवाखान्यात एकटे रहावे लागते. अशा परिस्थितीत मोबाईल हाच आधार आहे. सतत संपर्कात राहून धीर दिला तर रुग्णांना काही प्रमाणात नक्कीच फायदा होईल असे मला ठामपणे वाटते.
(03621852)
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
“प्राजक्ताची फुले गुंफताना दोरासुद्धा रंगीत होतो, गंधीत होतो. त्याप्रमाणे चैतन्यमय माणसांत राहिल्याने मन सदैव टवटवीत राहते, प्रत्त्येक घरात अशी माणसे असावीत ज्यांच्या असण्यानेच त्यांच्या घरातील व त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्त्येकांची मने विवेक-विचारांनी, ज्ञानाच्या अमृतकणांनी भरल्याशिवाय राहणार नाहीत…!!”
सुप्रभात
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
http://www.ravindra1659.wordpress.com
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐