चलचित्र …..२

तंत्रज्ञानाचा जितक्या गतीने विस्तार झाला तितक्याच गतीने आपण त्याला विसरत ही गेलो.

दररोज नवनवीन मोबाईल बाजारात उपलब्ध होत आहेत. काल जो मोबाईल आपल्याकडे होता, तो आज चालवायला होत नाही. जितक्या गतीने तंत्रज्ञानात बदल होत आहे तितक्याच गतीने आपली बुद्धी विसरत जाते. आपल्या मागच्या मोबाईल बद्दल आपण सर्व विसरून जातो.

मला ३० वर्ष्यापूर्वीचा कार्यालयाचा फोन नंबर आठवतो पण आताचे नंबर पाठ होत नाही. कारण आपल्या सुप्त बुद्धी ला ही कळते मोबाईल हातात आहे मग पाठ का करावे? लहान पणी पाठ केलेले पाढे पाठ आहेत अजून ही. आताच्या विद्यार्थ्यांना पाढे जमत नाहीत.

तंत्रज्ञानाने नवीन जग पहायला मिळते पण खर जग आपण विसरून जातो. आपण व्हर्च्युअल जगात जगतो आहोत.

Advertisements

झाडे…२

माझ्या मनाच्या कविता..।

https://manachyakavita.wordpress.com/2019/05/17/%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%87-%e0%a5%a8/

पाण्याचा गोळा………

मित्रांनो आज जगात पाणी प्लास्टिक बाटलीत भरून विकल जात आहे. त्यामुळे तहान भागते पण एक वेगळा भयानक प्रश्न जगासमोर येऊन उभा राहिला आहे. रिकाम्या बाटल्यांच काय? त्यामुळे प्रदूषण प्रचंड वाढतय! व्हाट्स अप कोणी तरी हा व्हिडिओ शेअर केला. मला आवडला. पण याबद्दल खात्री केलेली नाही. 

पण मला वाटते कि पाणी . पिल्यावर बाटल्या जमा करण्यासाठी मोठ्या डस्ट बिन ठेवल्या व त्या बाटल्यांचे रिसायकलिंग करून वापर केला तर? किंवा त्याच कंपन्यांनी त्या बाटल्या घेऊन स्टरलाईज करून पुन्हा वापरल्या तर चालेल का? 

दुसर मत वाचून  जरा किळस वाटतो.

असो आपल मत नोंदवा जरूर

टी.व्ही.गुंडाळून ठेवा बर!!!

साधारण एक  दोन वर्षापूर्वी माझ्या मनात सहज येऊन गेले होते कि भविष्यातील टी.व्ही. एका पडद्या सारखा असेल . पाहिजे तेव्हा गुंडाळून ठेवायचा आणि उघडला कि बघायचा. याबद्दल माझ्यामनात असे हि आले होते कि आपल्या देश्यातल्या टी.व्ही. बनविणाऱ्या मोठ्या कंपनीला हि कल्पना सुचवायची. तशी मी सुरुवात हि केली होती. पण जीवन इतके व्यस्त आहे कि कुठलेच काम पूर्ण होत नाही. हि कल्पना मी मित्रांना आणि घरी मुलीला हि सांगितली होती. मला वाटते ब्लोग वर हि टाकली होती. आज लोकसत्तेमध्ये एक बातमी वाचली आणि कल्पना पुन: जागृत झाली. जपान मध्ये एका कंपनीने असा टी.व्ही. तयार केला आहे. Screenshot_1

अमुल्यतेचे मूल्य

जेव्हा पासून जगात आय टी क्षेत्राचा जन्म झाला आहे. रुपयांचे मूल्य अधोगतीला चालले आहे. सध्या कोटी रुपये म्हणजे काहीच नाही. आजच एक बातमी वाचण्यात आली गुगल आणि याहू यांच्या चढाओढीत याहू ने बाजी मारली आणि गुगल कडील एका अधिकाऱ्याला वर्षाला चक्क ५ कोटी ८० लक्ष डॉलर पगार देऊ केला. यांचे रुपये किती हे करायच्या विचारानेच मला धडकी  भरली. आजचे एक डॉलरचे मूल्य ५२.६०  रु. असे होते. ह्या दराने ह्या माणसाचा वर्षाचा पगार काढणे अवघड वाटते. पण एक लक्ष डॉलर म्हणजे ५२.६३ लक्ष रु. ५८० लक्ष रु. म्हणजे ३०५०८ लक्ष रु. म्हणजे वर्षाचा एका माणसाचा पगार ३०५.०८ कोटी रु.  एका महिन्याचा पगार २५.४२ कोटी आणि रोजचा पगार ८४ लक्ष रु. बाप रे. मला वाटते मी हजारो वर्ष जगलो किंवा हजारो जन्म घेतले तरी इतका पगार मिळविणे मला शक्य नाही.

आजच दुसरी एक बातमी वाचली की सिटी ग्रुप ला मागील तिमाहीच्या जवळ जवळ ८८% कमी नफा  झाल्याने विक्रम पंडित यांनी राजीनामा दिला.

किती विरोधाभास वाटतो नाही ह्या दोन बातम्यांमध्ये. हे जगात काय चालले आहे? कोणी सांगेल का? कोटी पेक्षा कमीचे शब्द कोणाच्या ही तोंडून निघत नसल्याने कोटी ह्या शब्दाचे मूल्यच कमी झाले आहे.

 

१०० रुपयाचे महत्व

नुकतीच दिल्लीत एक घटना घडली ती अशी की एका मित्राने दुसऱ्या मित्राचा खून केला फक्त उसने घेतलेले १०० रुपये परत केले नाही म्हणून. ही एक शोकांतिकाच वाटली. मन अक्षरश: रडायला लागले. प्रथमत: असे वाटले असा कसा तो मित्र फक्त १००/- रु. साठी आपल्याच मित्राला मारले? पण नंतर मन शांत झाल्यावर विचार केला तर चित्र वेगळेच निर्माण झाले.

मित्रांनो, साधारण  एक दशक भरापूर्वी १००/- रुपयाला आपल्याकडे खूप महत्व होते. त्याचे कारण असे की तेव्हा लोकांचे पगार मुख्यत: चार किंवा पाच आकडी होते. तेही कसे तर पाच आकडी पगार ३०-४० अगर जास्तीत जास्त ५० हजारापर्यंत. नंतर वर्तमान पत्रातून बातम्या झळकायला लागल्या. याचा पगार ७०,०००/- माग १,००,०००/- माग ५,००,०००/- आणि आता मागील २-३ वर्षात तर कोटी मध्ये पगार मिळत असल्याच्या बातम्या वाचायला मिळायला लागल्या. माणसाची एक प्रवृत्ती असते की त्याच्या डोळ्यासमोर जी वस्तू दिसत असेल त्यापेक्षा मोठी जर समोर आली तर लहानचे महत्व संपून जाते. त्यामुळे आता ज्यांचे पगार लाखात आहेत त्यांना १००/- रुपयाचे महत्व ते काय. त्याच्या साठी १००/- रु. एक रुपयाच्या बरोबर आहे. उच्च वेतन वाल्याला बाजारात गेल्यावर भाजीवाल्याने १००/- पाव ह्या भावाने भाजी दिली तरी त्याला काही वाटणार नाही. पण एखाद्या गरिबाला ह्या भावात भाजी घेता येईल का? सांगायचा तात्पर्य असा  की आज ही १००/- रुपये गरिबांसाठी मोठी रक्कम आहे.

ह्या मोठ्या मंडळींचे वेतन वाढते. त्याप्रमाणात बाजारातील भाव वाढ असते. आज बाजारात साखर ४०/- किलो आहे. जेव्हा १०,०००,००० रुपये वेतन घेणारा हीच साखर विकत घेतो त्याला दुकानदार ४०/- भावनेच साखर विकतो. म्हणजे १ कोटी, ४० लाख, १० लाख १ लाख वार्षिक वेतन घेणारे चार ग्राहक एका दुकानात साखर घ्यायला जातं तेव्हा चौघांना ४०/- रुपये भावानेच दुकानदार साखर विकतो. दुकानदार विचारात नाही की बाबा तुला पगार किती आहे? कमी पगार असेल तर तुला स्वस्त देतो जास्त असेल त्याला महाग देतो. जसे आता नवीन धोरण सुरु केले आहे – गेस सिलिंडर बाबत.

मला वाटते आता पगार बघून सर्व वस्तूंचे भाव ठरवायला हवेत. महिन्याला १ लाख पगार त्याला साखर १००/-.

५०००/- पगार त्याला साखर २०/- किलो. कसे वाटले?

 

 

आजची पाण्याची बचत उद्याच्या दुष्काळापासून सुटका.

होय मित्रांनो हे माझे मत आहे. ज्या प्रकारे विजेची बचत म्हणजेच विजेची निर्मिती, पैश्याची बचत म्हणजेच धनाची निर्मिती त्याच प्रकारे पाण्याची बचत म्हणजेच दुष्काळापासून सुटका. कशी ते आपण यापुढे बघू.

माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे की जी वस्तू त्याला मुबलक प्रमाणात मिळते ती तो मुबलक प्रमाणातच खर्च करतो. ज्यांना बचतीची सवय असते त्यांना बघा म्हातारपणी सुध्दा आनंदात जगतात. पैश्याची चणचण भासत नाही.

त्याचप्रमाणे आपण जेव्हा मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असते तेव्हा खूप वाया घालावीत असतो. तेच पाणी जर आपण सांभाळून खर्च केले तर धरणात पाणी साठा शिल्लक राहील. धरणात पाणी शिल्लक राहिले तर जवळपासच्या जमिनीखालील  पाण्याची पातळी कमी होणार नाही. दुसर्यावर्षी पाऊस आला तर धरण लवकर भरेल. धरण लवकर भरले तर धरणाचे दरवाजे उघडावे लागतील. दरवाजे उघडले तर धरणाखालील जमिनीला मुबलक पाणी मिळेल. त्याने तेथील जमिनीखालील पाण्याची पातळी वाढेल. असे दर वर्षी होत राहील आणि ४-५ वर्षांनी सर्व दूर पाणीच पाणी राहील. दुष्काळाचा प्रश्नच उरणार नाही.

मित्रांनो देवाने पंच महाभूतें तयार केली आहेत ण त्यांचा उपयोग ओळखा. ती माणसाची आवश्यकता पाहूनच तयार केली आहे. माती सुध्दा माणसासाठीच तयार केली आहे. म्हणूनच ती पाण्याचे शोषण करते व त्याला रोखून धरते. पण आपण त्याचे महत्व ओळखत नाही. पाण्याचे महत्व ओळखा. पाणी जिरविणे फार आवश्यक आहे.