झाडे…२

माझ्या मनाच्या कविता..।

https://manachyakavita.wordpress.com/2019/05/17/%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%87-%e0%a5%a8/

Advertisements

जल..

माझ्या मना जल हे जीवन…

https://manachyakavita.wordpress.com/2019/05/04/%e0%a4%9c%e0%a4%b2/

दुसरे जग

पाहायचे आहे मला

ते दुसरे जग

सोनेरी प्रकाशाने उजळून निघालेले

असे लोकांच्या तोंडूनच ऐकलेले

चुकून स्वप्नात ओझरतेच  पाहिलेले

प्रत्यक्षात कधी न पाहिलेले

ते जग जवळून पाहायचे आहे मला

 

सोनेरी सिंहासनावर बसलेल्या

कुबेराच्या सहवासात

अनुभवायचे आहे मला

कधी तरी

ते दुसरे जग

कसे असते

ते सोनेरी जग

अनुभवायचे आहे मला

देवा

तू तरी कृपा कर माझ्या वर

तिच्या वेदना………

आसवांना सुध्दा अश्रू अनावर झाले,

जेव्हा त्यांनी तिचे दुख ऐकले,

तिच्या जन्माच्या वेळच्या वेदना

तिच्या आईला,

ज्या सोसवेना

पण त्याहुनी जास्त दुख आईला झाले,

जेव्हा आपल्यांनीच तिच्या पिल्लाला जिवंतपणी गाडले!

का तुझी मी वाट पहावी………

का डोळ्यात तेल घालुनी
रात्रंदिवस तुझी मी वाट पहावी?

का तुझ्या आठवणींनी व्याकुळ होऊन
रात्रंदिवस तुझी मी वाट पहावी?

आणि

आली परत तरी सर्व विसरुनी
का तुजला मी भेट द्यावी?
का का का??????????

सर्व काही विसरून जाव…………

मित्रांनो आज खूप दिवसांनी मी आपणाला भेटत आहे. आता स्टेट्स तपासले तर दिवसभरात फक्त १५. मला वाटले मी या ब्लोग जगतातून लांब जात आहे. लगेच हि कविता लिहिली.मी नेहमी संगणकावरच डायररेक्ट लिहितो. वही  किंवा कागदाचा उपयोग  फक्त प्रवासातच करत असतो.

“सर्व काही विसरून जाव…………”

का कुणास ठाऊक

पण हल्ली अस वाटत

या कोन्क्रीट च्या जंगलातून निघून  जाव

लांब कोठे तरी रानावनात फिराव

आणि

थकल्यावर एखाद मोठठ औदुंबराच झाड शोधाव

आणि त्याच्या घनदाट सावली खाली चीरकाळासाठी विसाव

ह्या सामाजिक विकृती, नाती गोती, राग-लोभ, माया-ममता

सर्व काही विसरून जाव

आणि डोळे मिटूनी

शांत पडाव शांत पडाव शांत पडाव…

तुझे अस्तित्व…

जेव्हा पासुन

तु रुसला आहेस माझ्यावर,

माझ्या साठी

तुझे अस्तित्व

फक्त फ़ेस बुक, गुगल

आणि आर्कुट

पर्यंतच मर्यादित राहिले आहे

पण तु इतका रागावला आहेस

कि

माझी त्यावरील फ़्रेंडशिप ची रेक्वेस्ट

अक्शेप्ट सुध्दा करित नाहिस.