आत्मबल….

(मित्रांनो, हा संदेश व्हाट्सएपवर प्राप्त झालेला आहे. मला खूप आवडला .म्हणून मी येथे आपल्या वाचकांसाठी सादर करित आहे. थोडाफार बदल केला आहे. शिर्षक मात्र मी दिला आहे.)

कुठलाही आजार आपल्याला का होतो? कारण आहे आपण स्वतः, आपण मी आजारी आहे हे स्विकारल्यामुळे आजारी पडतो!

आता हेच बघा न! आपल्या पोटात वायु म्हणजे हवा असते. छातीत हवा असते. जसी फुग्यात असते तशी. फुगा पाण्यात बुडतो का? नाही. मग माणूस का हो बुडतो? कारण आपण घाबरतो. पाण्यात पडता बरोबर आपण इतके घाबरून जातो कि काय करावे हे त्याला सुचत नाही आणि म्हणून माणूस बुडून मरतो. तुम्ही युट्यूब वर लहान मुलांचे व्हिडीओ पहा. अहो अगदी नवजात बाळाला पाण्यात टाकून दिले तर ते पोहताना दिसते. त्याला तर कोणीही शिकवले नाही. पण एक शक्ती निसर्गाने दिलेली आहे त्याचा वापर तो करतो. प्रतिकार करण्याची शक्ती. ही नैसर्गिक देन प्रत्येक माणसाला दिलेली असते. कमी जास्त प्रमाणात तिचा वापर अनवधानाने होत असतो. आपल्याला न कळत आपण ती वापरतो.

तर ताप आल्यावर,सर्दी झाल्यावर, शिंक आल्यावर कसलाही आजार झाल्यावर थोडे थांबा.
तुमच्यातील प्रतिकारशक्तीला काम करू द्या.

आता मन आणि शरीर यांना जोडणारी काही लक्षणे बघू या.

१) एखाद्या गोष्टीची जबरदस्त भिती किंवा चिंता वाटली की घशाला कोरड पडते.

२) परीक्षेचा किंवा अजून कसला तणाव असेल तर पोटात गोळा येतो,

३) समोर एखादा अपघात किंवा दुर्घटना पाहिली की हातापायातली शक्ती गळून जाते.

४) आणि याविपरीत सतत हसतमुख असणारी व्यक्ती नेहमी क्वचितच आजारी पडते.

तर हे सिद्ध झाले आहे की, आपल्या शरीरातल्या आंतरिक क्रियांवरही अज्ञात मनाची सत्ता चालते. जसं की, समोर मातीचे कण उडाले की सेकंदाच्या दहाव्या भागात लगेच पापण्या मिटतात. अज्ञात मन शक्तीशाली आहे पण एखाद्या सेनापतीसारखं, त्याच्यावर सत्ता चालते विचारांची!

ताकतवार असला तरी तो गुलामच! दिलेला आदेश पाळणं एवढचं त्याचं काम!
आपण जे काही बोलतो तेच आपले विचार आहेत.

१) ब्लडप्रेशर आणि हृदयविकार –
समजा एखादा माणुस, नकळत, अशी वाक्ये पुन्हा पुन्हा वापरत असेल,
उदा.
– त्याला बघितलं की माझं रक्तच खवळतं!
– ह्यांच्यासाठी मी रक्ताचं पाणी केलं, आणि हे बदलले!
– माझी तळपायाची आग मस्तकाला जाते!

क्वचित अशी वाक्ये वापरली गेली, तर हरकत नाही, पण पुन्हा पुन्हा हेच बोलल्यास आणि ते सुप्त मनात गेल्यास त्याचा विपरीत परिणाम रक्ताभिसरणावर नक्कीच होतो.

डॉक्टरकडे गेल्यावर औषध-उपचाराने काही काळ बरं वाटतं, पण अज्ञात मन त्याचा पिच्छा सोडत नाही.

ही सर्व वाक्य सतत तणावात असणार्‍या व्यक्तीच्या सवयीचा भाग बनतात आणि लवकरच तिला ब्लडप्रेशर आणि मोठ्या स्वरुपाचे हृदयाचे विकार घेरण्यास सुरुवात करतात.

थोडक्यात सतत मानसिक तणाव, हताशपणा आणि निराशा अनुभव करणाऱ्या व्यक्तीला हृदयाचे विकार लवकर घेरतात.

२) आतड्यांचे विकार – जी व्यक्ती स्वतःलाच घालून पाडून बोलते, स्वतःची निंदा करते, स्वतःला दुबळा समजते, तिला छोट्या आतड्यांच्या विकारांची समस्या उदभवते.

३) अपचन – बहुसंख्य लोक ह्या आजाराने त्रस्त आहेत, खरं तर मलविसर्जन ही अतिसहज आणि नैसर्गिक क्रिया आहे, तरीही काही जणांना ‘धक्का देण्यासाठी’ कृत्रिम उपायांचां, जसं की एखादे चुर्ण किंवा एखादं औषध ह्यांचा आधार घ्यावा लागतो.

आता ह्याची बरीचशी कारणं आहेत, इथे एका उदाहरणची चर्चा करुयात.

काही वेळा ह्याचं कारण बाल्यावस्थेत दडलेलं सापडतं, कडक शिस्तीच्या नादात आई वडीलांनी मुलाला एखादी शिक्षा केलेली असते, त्याचा राग त्याच्या मनात असतो, लहान मूल आईवडीलांवर राग काढू शकत नाही, त्याला त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकावीच लागते, त्यांना विरोध म्हणून ही क्रिया तो रोखून धरतो.

ह्या ठिकाणी आई वडील त्याला जबरदस्ती करु शकत नाहीत, हळुहळू तो मोठा होतो, शिस्तीचा बडगाही संपतो पण आपल्या आतड्यांवरचं नैसर्गीक नियंत्रण तो हरवून बसतो.

असं ही बघण्यात आलं की जेव्हा व्यक्ती आर्थिक संकटात सापडते, तेव्हा तिची पचनशक्ती कमजोर होते. जे लोक कंजुष वृत्तीचे असतात, त्यांच्यामध्ये मुळव्याध्याची समस्या जास्त आढळते.

४) छोट्याछोट्या गोष्टींवरही एखादी व्यक्ती वारंवार उत्तेजित होते, चिडते, अस्वस्थ होते, त्याचा परिणाम जठर आणि पित्ताशयावर पडतो.

५) डोकेदुखी –
आजकाल बहुतांश भगिनीवर्गाला झंडुबाम शिवाय झोप येत नाही. कारण काय असेल बरं?
– ह्या व्यक्तीला बघितलं की माझं डोकं दुखतं!
– त्याने माझं खुप डोकं खाल्लं!
– आमच्या ह्यांच्यासमोर कितीही डोकं फोडा, काही फायदा नाही,

निरंतर, नकळत असं बोलत राहील्याने अज्ञ मनात संदेश पोहचतो की माझ्या डोक्याला दुखायचे आहे.
आणि मायग्रेनचा त्रास चालू!

डोकेदुखीची अजुनही काही कारणे आहेत, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी अप्रिय घटना घडलेली असतेच, पण तिला मनातल्या मनात पुन्हा पुन्हा तिला उगाळण्याचा स्वभाव असेल तर डोकेदुखी सुरु होते.

तेव्हा असे कटु अनुभव विसरुन जाणेच इष्ट!

कधी नकोसे वाटणारे काम, त्रासदायक काम अंगावर येऊन पडते, आणि डोके दुखते. जितके पोस्टपोन केले तेवढा त्रास होतो, तेव्हा अशी कामे तात्काळ निपटून काढावीत.

६) पाठदुखी वा कंम्बर दुखी –
एखादी व्यक्ती सतत जबाबदारीच्या ओझ्याने वाकून थकुन गेली असेल तेव्हा तिला पाठदुखीला वा कम्बरदुखीला सामोरं जावं लागतं. असह्य वेदना होतात, ह्यात मानेपर्यंतचे स्नायू आखडले जातात. त्यांच्यावरचा ताण जाणवतो.

चेहरा मूळ स्थानी न राहता उजवीकडे किंवा डावीकडे कलतो.

आता सर्वात महत्वाचे, ह्यावर उपाय काय आहे?

आपापले औषधौपचार चालू ठेवा, पण हे रोग शरीरातून समूळ उपटून काढायचे असतील तर स्वयंसुचन हाच ह्यावरचा एकमेव उपाय आहे.

जसं की डोकेदुखीचं उदाहरण घेऊ – तंद्रावस्थेत जाऊन आपल्या अज्ञात मनाला सुचना द्या –

आता माझं डोकं एकदम हलकं हलकं होत आहे,
आता ते अजून शिथील आणि हलकं झालं आहे,
डोके दुखण्याचे प्रमाण कमी होत आहे, माझ्या डोक्यात जमा झालेलं अतिरीक्त रक्त आता शरीराच्या इतर भागात सुरळीतपणे पसरत आहे.
माझा डोकेदुखीचा त्रास नाहीसा होत आहे, काही क्षणांमध्ये ही बैचेनी दुर होईल!

आणि डोकेदुखी गायब!
प्रत्येक रोगासाठी अशा सुचना तयार करुन त्या अज्ञ मनापर्यत पोहचवून रोगमुक्त होता येते.

सारांश काय तर मित्रांनो, भावनांची कोंडी करुन जगू नका, रोग बनून ते शरीराला पोखरतील, राग व्यक्त करा, आणि मोकळे व्हा!

इथे मला एका महापुरुषाचा दृष्टांत आठवतो, त्यांना राग आल्याक्षणी ते कागद घ्यायचे आणि सविस्तर लिहून काढायचे, मनातले संपुर्ण भाव ओतून रिते व्हायचे, ते कागद दोन चार दिवस तसेच टेबलावर ठेवायचे आणि नंतर जाळून किंवा फाडून टाकायचे.

अशा प्रकारे मनातली सारी खळबळ बाहेर काढून टाकता येते. आता क्रोधाची भावना नाहीशी होते आणि हलकं हलकं वाटतं.

तुम्हा सर्वांना, निरोगी आणि ठणठणीत आयुष्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा!

(4420711)
💐💐🙂🙂💐💐💐💐🙂🙂💐💐💐💐

प्रेम हि अशी अनुभूती आहे जी मनुष्यास कधी पराभूत होऊ देत नाही. याउलट द्वेष, घृणा माणसास कधीच जिंकू देत नाही.

🎊💫….शुभसकाळ 💫🎊…..🌹🌹

💐💐🙂🙂💐💐💐💐🙂🙂💐💐💐💐

http://www.rnk1.wordpress.com

💐💐🙂🙂💐💐💐💐🙂🙂💐💐💐💐

शनिवारवाडा

हल्ली कन्येला सुट्या आहेत. एम एस सी च्या पहिल्या वर्षाची परीक्षा संपली आहे. काय करावे म्हणून तिने लायब्रेरी  सुरु केली. पहिलं पुस्तक ऐतिहासिक. रणजित देसाईंच ‘स्वामी’.  तिला इतक आवडल की तिने  दोनच दिवसात संपवलं.

मग तिचा मोर्चा तिच्या आईकडे वळला.

“अग आई तू वाच ही कादंबरी खुपच सुंदर आहे.” असे तिने माझ्या देखतच आईला म्हटले.

मी ऐकून ही न ऐकल्यासारखे केले.

सौ. म्हणाली,” बेटा मला वेळ कोठे मिळतो वाचायला.”

पण तिला राहवले गेले नाही. तिने माझ्याकडे पाहून ( मी हेतूपुरस्कर दुसरीकडे बघत होतो),”पप्पा, तुम्ही सांगा न आईला ही कादंबरी वाचायला.”

मी सुटकेचा स्वास  टाकत सौ.ला म्हटले,” अग वाच न ती कादंबरी. तितकाच आनंद मिळेल आणि वेळ जाईल.”

तिने माझ्याकडे एक खतरनाक कटाक्ष टाकला आणि मी इकडे तिकडे पाहू लागलो.

“अहो इकडे तिकडे काय पहाताय. माझ्याकडे पहा जरा. मला वेळ तरी मिळतो  का?  हे तुमचे घर सांभाळता सांभाळता नाकी नौ येऊन जातात. मग माझे बारा का वाजवून घेऊ हे पुस्तक वाचून.”

आणि मी रंग ओळखून तेथून काढता पाय घेतला.

सायंकाळी घरी आलो. बेल वाजविली. सौ.ने दार उघडले आणि ,”या श्रीमंत.” असे उद्गार काढले. मी एकदम घायाळ. असे काय झाले आज. विचार करू लागताच मला आठवले कि बहुतेक सौ.ने प्रमोद देव साहेबांचे बझ वाचले असावे. कारण ते महिंद्र कुलकर्णींना श्रीमंत या नावाने संबोधतात. पण मी डोक्याला जास्त ताण द्यायचा नाही असा  विचार करून विषय सोडून दिला. कारण आज ऑफिसमधून यायलाच ८ वाजले होते. शरीराने थकलो होतोच डोक्यानेही  थकलो होतो.  तिने सुद्धा पुढे विषय काढला नाही.

५ मिनिटांनी मी पाहिले सौ.च्या हातात स्वामी. मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला.  तेव्हा मला जाणवले की आज  घरी आल्यावर सुद्धा ‘अहो, काही तरी बोला की.’ असा लकडा का लावला नाही त्याचे कारण काय.

मोठ्या मुश्किलीने जेवण मिळाले. जेवण सुरु करण्यापूर्वी ५ मिनिट व नंतर लगेच पुस्तक तिच्या हातातच होते. टी.व्ही. सुद्धा बघितला नाही. पण जेवण सुरु करण्यापूर्वी सौ.चा मोर्चा किचनकडे वळला त्यावेळात कन्येने माझ्या कडे मोर्चा वळविला होता. ‘पप्पा तुम्ही सुद्धा वाचा ही कादंबरी.’

‘बेटा, मला वेळ कोठे असतो वाचायला?’ मी बचावाची भूमिका घेत म्हटले.

पण ती कोठे ऐकणार होती. ‘मी  आता छडी घेऊन बसते.’ असे म्हणून तिने माझ्या समोर पुस्तक ठेवले आणि मला पुस्तक वाचायला भाग पाडले. मी मधूनच एक पान उघडले. तिने परत पुस्तक घेऊन पहिल्यापासून  वाचायला लावले.

आता मी वाचला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य मी वाचण्यात मग्न झालो. खरच अप्रतिम कादंबरी आहे ती.  मी ११ पाने वाचून काढली आणि सौ.ने माझ्या हातून पुस्तक हिसकाउन घेतले आणि वाचायला सुरुवात केली.

थोड्यावेळाने ती म्हणली,” अहो मला शनिवारवाडा बघायचा आहे.”

मी,”अग, अती झोकून घेऊ नको तू स्वत:ला त्या कादंबरीच्या कथानकात.”

मी कन्येकडे बघून म्हणालो,” बरोबर आहे न बेटा. आता ही स्वामी कादंबरी वाचून शनिवारवाडा पहायचा म्हणते आहे. उद्या मी हिटलर ही कादंबरी आणली व तिने ती वाचली तर म्हणेल मला ……………………”


हार्ट अटॅक टाळण्यासाठी काय करावे ?

माझ्या ब्लॉग मित्रांपैकी बरीच मंडळी ४० च्या पुढील आहेत. इश्वर करो कोणालाच  कधीच  हृदय विकार होऊ नये. पण आजार हा इश्वर सुद्धा टाळू शकत नाही. तो टाळावा लागतो. हल्ली तर २५ व्या वर्षी सुद्धा हृदय विकाराने मेला अशा बातम्या येत असता त. त्याचे कारण म्हणजे प्रत्येक बाबतीत अनियमितता. अहो आपण निसर्ग नियमच बदलून टाकलेले

कॉल सेंटर

आहेत.

हे टाळावे

कॉल सेंटर वर काम करणारे फक्त रात्रीच काम करतात. अवेळी झोपणे, अवेळी खाणे, नको ते खाणे हेच तर कारणीभूत ठरते. असो आपल्याला हे टाळता येत नाही. उदरनिर्वाहासाठी, जीवन जगण्यासाठी नौकरी तर करावीच

हे ही टाळावे

लागते.

पण दिनचर्या आपल्या हातात आहे. कोणी नाव ठेवले तरी चालेल पण आपण रोज योग्य तोच आहार करणे, थोडा का असेना नित्य व्यायाम करणे इत्यादी गोष्टींची योग्य वेळी काळजी घेतली तर आपल्याला हृदय विकार टाळता येऊ शकतो. यावर एक लेख लोकमत मध्ये वाचण्यात आला. त्याची लिंक येथे देत आहे. वाचण्यायोग्य आहे म्हणून देत आहे.

आपल्यालाच हार्ट अटॅक टाळण्यासाठी काय करावे ?