२५ पुर्ण

२५ म्हणजे पाव! हो न? हा २५ चा आकडा आयुष्यात फार महत्वाचा मानला जातो. २५ दिवस, २५ महिने, २५ वर्ष यांना फार महत्व असत. त्यानंतर ५०, ७५ आणि शेवटी १००. यांना महत्व दिल गेल आहे. २५ म्हणजे सिल्वर जुबली, ५० म्हण्जे गोल्डन, ७५ महणजे ्डायमंड आणि १०० शतक.

आयुष्यात असे दिवस येतात कि ते आठवणित राहतात. मुलगा/मुलगी २५ वर्षाचे झाले की त्याला महत्व असते. तसेच लग्नला २५ वर्ष झाली की तो दिवस साजरा केला जातो. आज आमच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस. आम्ही साजरा केला नाही, पण हा दिवस कायम आठवणित राहावा म्हणुन हा प्रपंच.

१५ जुन १९८६ ह्या दिवशी आम्ही कायमचे एक दुजे चे झालॊ होतो. म्हनजे आमचे लग्न झाले होते हो. प्रेम विवाह नव्हे. २५ वर्ष कशी संपली काही कळलेच नाही. जीवन कसे असावे? चटपटीत जेवणासारखे! त्यात सर्व माल मसाले असले तरच मजा येते. नाही तर जेवण संपले तरी पोटात भुक राहाते.

तसेच जीवनाचे ही असते. सहज तर सर्वच जगतात. त्यात थोडे मिठ, मसाले घातले कि जीवनाचा स्वाद बदलुन जातॊ. खुप प्रेम, मधुनच भांडण, मग त्यावर लोणी लावणे, आणि मग लोणचं तोंडी लावून मजेदार जगणे म्हण्जे जिवन.

असेच जीवन जगुन आयुष्याची ही २५ वर्ष संपवली.

उपरवाल्याने चप्पर फाड के दिलेली अफाट दुःख फुलासारखी आनंदाने झेलत इथ पर्यंत आलो आहोत. त्याच्या क्रूपेने पुढील आयुष्य सुखाचे जावो हीच प्रार्थना आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा

🙂  प्रजासत्ताक दिना निमित्त सर्व ब्लॉग मित्रांना शुभेच्छा 🙂

प्रजासत्ताक दिन चिरायु होवो

जय हिंद

तुम जियो हजारो साल…..

आज सौ. चा वाढ दिवस आहे. तिला वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

काय जमाना आला आहे नाही. आपल्या पत्नीचा वाढ दिवस आहे व तिला शुभेच्छा ब्लॉगमार्फत द्याव्या लागत आहेत. असे वाटत असेल नाही का तुम्हाला. पण तसे नाही. झाले असे कि काल सौ.ने मला कंप्यूटर वरून उठविले. मी समजलो नाही का ते. नंतर ती बसली. व मला शिकवा असे म्हणाली. तसे हे काही नवीन नाही कारण या पूर्वी ही बराच प्रयत्न केला आहे तिने. पण काल चा प्रयत्न स्वेच्छेने केला. आणि आश्चर्य म्हणजे तिला जमले ही. मुलगी आणि मी खूप आनंदित झालो. तिला मराठीत टाइपिंग करायचे शिकविले.त्याने तर ती सुद्धा इतकी आनंदित झाली कि लहान बाळा सारख्या टाळ्या वाजविल्या. मनुष्य हा कधी ही काही ही शिकू शकतो. शिक्षणा साठी वयाची अट नसते. हेच या वरून सिद्ध होते. आता पुढची पायरी म्हणजे तिला ब्लॉगिंग शिकविणे.
“तुम जियो हजारो साल
साल के दिन हो पचास हजार.”
वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाद दिवसा निमित्त तुझ्या साठी एक कविता भेट म्हणून देत आहे.
तूच माझी प्रेमिका
तूच माझी सखी “राधिका”
तूच माझी सहचारिणी
तूच माझी अर्धांगिनी

तूच माझा कनक
तूच माझे रजत
तूच माझे नाणे
तूच माझे गाणे

तूच माझी कविता
तूच माझी सरिता
तूच माझे प्राण
तूच माझी शान

तूच माझी दुनिया आहे
तूच आहे माझे सर्व काही
तूच तूच तूच..

Image063