सीमोल्लंघन

विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा

आज विजयादशमी. साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. ह्या दिवसाला सीमोल्लंघन अश्या नावाने सुद्धा ओळखतात. आज शमीची पण सोन म्हणून सर्वांना दिली जातात. त्यात एकमेकांचे प्रेम दिसून येते. विजयादशमी म्हटली कि मला हमखास लहानपणी साजरे केलेले सीमोल्लंघन आठवते. लहानपणी आम्ही सर्व भाऊ वडिलांसोबत गावची वेश ओलांडायला जात होतो व खरे खुरे सीमोल्लंघन करीत होतो. आता काय फक्त पेपरातच हा शब्द वाचायला मिळतो.

मला आठवते आम्ही सर्व तसेच गावाची इअतर मंडळी गावाची वेस ओलांडून शेतात जाऊन उसव शमीची पाने तोडून आणायचो(विचारूनच बर का). रमत गमत सर्व घरी यायचो. इकडे आई आमच्या ओवालानीची तयारी करून ठेवायची. आईने ओवाळणी केल्यावरच घरात यायची परवानगी होती. एकदा ओवाळले कि आम्ही घरात शिरायचो.मग आणलेले सोने घरात व शेजारी पाजारी वाटायला व मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला जायचो. सर्व आपुलकीने व मनाने आशीर्वाद व खाऊ द्यायचे.

आता कसले सीमोल्लंघन. सोन सुद्धा दारावर विकत घ्याव लागत.आता सर्व यांत्रिक जीवन झालेलं आहे. सर्व कस घरी बसल्या-बसल्या व्हायला हव. त्या बिचाऱ्या गरीब आदिवशी लोकांचे धन्यवाद मानायला हवेत जे आपल्या साठी घरबसल्या सोन आणून देतात नाही तर हा सण आपण साजरा करू शकलो असतो का? हि विचार करण्यासारखी गोष्ठ आहे. शहरामध्ये राहून आपण सीमोल्लंघन करून सोन आणू शकलो नसतो व हा सण हि साजरा करू शकलो नसतो. मला मना पासून वाटत आपण त्या लोकांचे ऋणी आहोत.
पण एक मात्र नक्की आणखी २५-३० वर्षानंतर हे सण साजरे होतील किंवा नाही हे काही सांगता येत नाही. आपण लहान होतो तेव्हा पेक्षा आता थोड्या प्रमाणात त्याचे रितिनियम उरले आहेत. पुढे ते हि कदाचित गळून पडतील. असे होऊ नये म्हणून आताच आपल्या मुलं-नातवंड यांना शिकवलं पाहिजे सानावारांबद्दल.
असो तर सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा