मला काल रात्री एक स्वप्न पडले. स्वप्नात मी बघितले कि एका दुचाकी वाहनाचा अपघात झाला आहे. तेव्हा मी कोठेतरी जात होतो. मी पाहिले अपघात झालेल्या त्या व्यक्तीच्या मानेला जोरदार झटका लागला होता. दुचाकीला एअरबेग होती पण झटका इतका जोरदार होता कि एअरबेग बाजूला होऊन त्याची मान खाली आपटली आणि लोंबकळलीच. माझ्या सोबत आणखी दोन तीन माणसे थांबली. मी क्षणाचाही विलंब न करता त्याच्या मानेला आधार देऊन त्याला दुसऱ्या माणसाच्या मदतीने उचलून बाजूला गवतावर झोपवले. पण मानेतील नस तुटल्याने व अंतर्गत रक्त स्राव होत असल्याने तो हळूहळू कोमात जात होता असे सोबत मदत करित असलेल्या सदग्रुहस्थाने सांगितले. ते डॉक्टर असल्याचे ही त्यांनी सांगितले.
त्या अपघातग्रस्त माणसाला आम्ही दोघांनी लगेचच दवाखान्यात हलविले. दवाखान्यात त्यावेळी डॉ. दिक्षित होते. हा त्यांचाच दवाखाना होता. हे एक प्रसिद्ध डॉक्टर. त्यांचा मागील काही काळापासून एका वेगळ्या विषयावर अभ्यास सुरू असल्याचे वर्तमानपत्रात वाचले होते. नेनो एफ ओसी(NFOC) चा वापर शरीरात कसा करावा हा तो अभ्यास. NFOC म्हणजे नेनो फायबर ओप्टिक केबल. अपघातात बहुतेक वेळा नस तुटते. मग मेंदूला रक्त पुरवठा थांबतो आणि मनुष्य कोमात जातो. त्यांनी कुठे तरी NFOC बद्दल वाचले होते. त्याचा शरीरात उपयोग करण्याची कल्पना त्यांच्या डोक्यात आली. मग त्याद्रुष्टिने त्यांनी अभ्यास सुरू केला. यावर
त्यांनी विचार केला कि संगणक रूपी डोके जे देवाने आपणास दिले आहे त्याला शरीरातील संवेदना मस्तिष्का पर्यंत पोहोचवणाऱ्या वाहिन्या जर तुटल्या तर NFOC त्यांच्या जागी वापरता येऊ शकते.
त्यांनी यावर बरेच पेपर लिहिले. ते आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित ही झाले. मानवी शरीरात या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी सर्व परवानग्या त्यांनी मिळवल्या होत्या. पण प्रत्यक्ष वापर अजून केला नव्हता. आज या रुग्णावर अशी शस्त्र क्रिया करण्याची वेळ आली आहे. त्यांनी लागलीच रूग्णांच्या नातेवाईकांशी चर्चा केली व त्याला NFOC केबल चा वापर करुन दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला.
NFOC ही एक महिन अशी डोळ्यांना ही न दिसणारी फ्लेक्झिबल कांचापासून तयार केलेली फायबर ऑप्टिक कैबल आहे.
आणि काय आश्चर्य! ऑपरेशन सक्सेसफुल झाले. मेंदू डेड व्हायच्या आत ऑपरेशन झाल्यामुळे तो रुग्ण कोमातून बाहेर पडला. ४८ तासांनी तो शुध्दीवर आला. ही बातमी जगभर पसरली. डॉक्टर दिक्षित यांचे जगभरात कौतुक झाले.
इतक्यात अहो सकाळ झाली. उठा. अशी हाक कानी पडली आणि मी जागा झालो. स्वप्न भंगले.
( मित्रांनो, ही एक काल्पनिक विज्ञान कथा आहे. मी स्वतः लिहिली आहे. NFOC अशी कैबल आहे का माहित नाही. )
(5521871)
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सुखापेक्षा दुखाः मध्ये असताना मिळणारे ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आणी परीणामकारकच असते.
🌹🌹🌹🌹 सुप्रभात 🌹🌹🌹🌹
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐