टी.व्ही.गुंडाळून ठेवा बर!!!

साधारण एक  दोन वर्षापूर्वी माझ्या मनात सहज येऊन गेले होते कि भविष्यातील टी.व्ही. एका पडद्या सारखा असेल . पाहिजे तेव्हा गुंडाळून ठेवायचा आणि उघडला कि बघायचा. याबद्दल माझ्यामनात असे हि आले होते कि आपल्या देश्यातल्या टी.व्ही. बनविणाऱ्या मोठ्या कंपनीला हि कल्पना सुचवायची. तशी मी सुरुवात हि केली होती. पण जीवन इतके व्यस्त आहे कि कुठलेच काम पूर्ण होत नाही. हि कल्पना मी मित्रांना आणि घरी मुलीला हि सांगितली होती. मला वाटते ब्लोग वर हि टाकली होती. आज लोकसत्तेमध्ये एक बातमी वाचली आणि कल्पना पुन: जागृत झाली. जपान मध्ये एका कंपनीने असा टी.व्ही. तयार केला आहे. Screenshot_1

Advertisements

लेक टेपिंग चे शिल्पकार!!

लेक टेपिंग- एक सुखद अनुभव

काल दि.२५/०४/२०१२ रोजी आपल्या महाराष्ट्रासाठी मनाचा तुरा असलेल्या कोयना प्रकल्पावर एक अतिविशिष्ट घटना घडली ज्याचा मी स्वतः साक्षीदार राहिलो. मी आपल्या डोळ्यांनी टी घटना घडतांना बघितली. टी म्हणजे कोयना येथे दुसऱ्यांदा झालेली लेक टेपिंग. पहिली १९९९ मध्ये झाली होती. मला अभिमान वाटतो की मी ह्या घटनेचा साक्षीदार राहिलो.

मी ह्या कामाशी निगडीत असल्याने मला लेक टेपिंग म्हणजे काय हे माहित आहे. पण बऱ्याच मंडळींना ह्याचा अर्थ काय हा प्रश्न पडला असेल. म्हणून मी ही पोस्ट लिहीत आहे.

लेक टेपिंगचा शाब्दिक अर्थ असा होईल. लेक म्हणजे जलाशय/सरोवर. आणि टेपिंग म्हणजे छिद्र पाडणे. होय हाच त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. पाण्याच्या अगडबंब अशा अतिभव्य जलाशयाला जमिनीतून भगदाड पाडणे म्हणजेच लेक टेपिंग.

सध्या सरळ भाषेत सांगायचे झाले तर असे सांगता येईल की एखाद्या पाणी साठवायच्या टाकीला भोक पाडून नळ बसविणे. फरक इतकाच असतो की आपण टाकीला भोक पाडून नंतर नळ बसवितो आणि येथे आधी नळ बसवितो व नंतर भोक पडतो.

हे ह्या खालील चित्रावरून अगदी सहज समजून येईल.ह्या चित्रामध्ये एक पाण्याचा तलाव दिसत आहे. त्या तलावाच्या खालून एक बोगदा तयार करून तलावाच्या तळाशी आणला जातो. पण तलावामध्ये पाणी असल्याने त्या पाण्याच्या दाबाने छिद्र पडू नये म्हणून एका ठराविक जाडीचा खडक तसाच ठेवला जातो.तो खडक येथे काळ्या रंगाने दर्शविण्यात आला आहे. ह्याच काळ्या खडकात स्फोटक लावून त्याला उडविले जाते. ते खाली पाण्यात पडते आणि पाण्याचा प्रवाह सुरु होतो.

हे अतिकौशल्याचे काम आहे म्हणून ह्या कामात सहभागी सर्व अभियंते व इतर सर्वांचे मनापासून अभिनंदन करायला हवे.

This slideshow requires JavaScript.

 

भू-कंप!मला झालेली पूर्व-जाणीव!

काल रात्री सुमारे ११ वाजता आम्ही घरात गप्पा मारत बसलो होतो. मी,सौ. आणि तिच्या भावाचा मुलगा सध्या आमच्या येथे पाहुणा म्हणून आला आहे, आणि आमची कन्या जीवनिका नेट वर काही काम करत बसली होती. मी सोफ्यावर रेंगाळलो होतो. शेजारी पाहुणा मुलगा बसला होता. सौ. जमिनीवर बसली होती. अचानक मला सोफा हलल्याची जाणीव झाली. मी पाहुण्याला विचारले की तू पाय हलवत आहेस का? तो नाही म्हणाला, मी ही बगितले की तो काही पाय हलवीत नाहीये. मग सोफा का हलतोय. मी लगेच त्यांना म्हणालो अरे भूकंप होतोय! क्षणात उठलो खिडकीतून बघितले. बाहेर बघून काहीच जाणीव झाली नाही. मी सर्वांना म्हटले हा नक्की भूकंपाच होता. टी.व्ही.वर बातम्या पहिल्या कुठे काही बातमी आहे का? सर्व हिंदी मराठी चेनाल्स पाहून झाले. पण काही माग्मोस लागला नाही. मनात आले एखाद्या वर्तमान पात्राच्या कार्यालयात फोन करून विचारावे. पण लोकं आपल्याला वेड्यात काढतील असे समजून तो विचार ही मनातून काढला. मग मी पाहुण्यासोबत सोफा का हलला असेल याचे विश्लेषण करू लागलो. लाकडी व वजनदार सोफा असल्याने पाय हलविल्याने तो हलणार नाही याची खात्री केली. आणि विसरून झोपलो. आज सकाळी टी.व्ही.वर बातमी आली की ११ वाजता सातारा येथे भूकंप झाला. तो पुण्यात ही जाणवला. ४.७ स्केलचा भूकंप. पण ह्या वेळेला मी घरात नव्हतो. मी मॉल मध्ये खरेदी करायला गेलो होतो. घरी आल्यावर कन्येने मला सांगितले.  म्हणजे मला भूकंप येण्यापूर्वी त्याची जाणीव झाली होती तर.

हे माझ्यासाठी नवीन नाही. यापूर्वी खूप वेळा असे झाले आहे. ज्या ज्या वेळी मी जमिनीवर झोपलो असेल. किंवा पलंगावर झोपलो असेल म्हणजे असे की येण केन प्रकारे माझ्या डोक्याचा स्पर्श अशा वस्तूशी असेल जी जमिनीला अटेच असेल तर मला भूकंप येत असल्याची पूर्व जाणीव होते. प्रत्येक वेळा घरच्यांना सांगतो ही. प्रत्येक वेळा असे झाले आहे. मला जाणीव झाली त्या नंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पेपरात बातमी वाचली.

ही गोष्ट कोणी स्वीकृत करो अगर न करो, कोणाला पटो अगर न पटो पण माझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. या पुढे जर अशी जाणीव झाली तर मी पहिल्यांदा वृत्तपत्र कार्यालयाकडे विचारणा करेल.

मोबाईलचे विश्व

मोबाईलने सर्व जगच बदलून टाकल आहे अस नाही का वाटत आपल्याला? मला तरी वाटत बुआ. असो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पूर्वीचे मोबाईल तरी बरे होते. फोन आला म्हणजे प्रत्येक मोबाईलवर एकच रिंग वाजायची. ट्रिंगग ग ग ग ग ग………अशी. मग मोबाईल क्रांती झाली. हि पण एक गम्मतच आहे बघा. हळू हळू जास् जसे जग प्रगती करत आहे तास तसे शब्दांचे अर्थ हि बदलत चालले आहे. पूर्वी क्रांती शब्द कानावर पडला की अंगातील रक्त सळसळायच. क्रांती म्हणजे एखादे युध्द डोळ्यासमोर उभ राहायचं. जसे १८५७ ची क्रांती. मध्यंतरीच्या काळात क्रांतीचा अर्थ थोडा सौम्य झाला. जसे एखाद्या सरकारी धोरणाला विरोध करायचा मोर्चा काढायचा म्हणजे क्रांती झाली असे वाटायला लागायचे. आणि आता त्याचा अर्थ पुर्णच बदलून गेलाय. प्रथम टी.व्ही. च्या क्षेत्रात क्रांती झाली. मग संगणक क्रांती झाली. मग मोबाईल आले. हळू हळू मोबाईल क्षेत्रात क्रांती झाली. असो. विषय जरा भरकटलाय. क्षमा असावी.

तर आपण मोबाईलच्या क्रांती बद्दल बोलत होतो. तो पूर्वीचा ट्रिंगग ग ग ग ग ग…….चा आवाज झपाट्याने मागे पडला आणि ट्यून सुरु झाल्या आणि मग नवी क्रांती झाली आणि फिल्मी गाणे वाजायला लागले. जो पर्यंत ट्रिंगग ग ग ग ग ग……. होत तो पर्यंत काही वाटत नव्हत. पण जेव्हा ट्यून व गाणे वाजायला लागले तेव्हा मात्र गम्मत व्हायला सुरुवात झाली.

ती कशी असे विचारताय? ऐका तर मग.

एकदा एक मनुष्य एका मयतीत गेला होता. स्मशानात अंतिम क्रिया कर्म सुरु होते. तितक्यात ‘ व्हाय दिस कोलावरी दी’ ह्या गाण्याचे सूर ऐकू आले. एका मोबाईलची रिंग टोन होती ती. सर्वी मंडळी त्या आवाजाकडे बघू लागली. दु:खाचे वातावरण अचानक बदलले. पण ती जागा आनंदाची नव्हती म्हणून सर्व गप्प राहिले. कोणी तरी म्हणाल ‘अरे आपण कोठे आलो आहोत याचे तरी भान ठेवत चला जरा.’

झाल आता दुसऱ्याने विषय पुढे रेटून न्यायचे ठरवले आणि म्हणाला,’अहो बिचारा इतक्या दुखात होता की मोबाईल स्वीच ऑफ करायचा विसरला.’

तिसरा कोठे थांबणार होता. तो म्हणाला, ‘ते ठीक आहे हो, पण कमीत कमीत साईलेंट मोड वर तरी ठेवावा मोबाईल.’

चौथा इसम मोबाईल वरील रिंग वाजली होती तो होता. तो मनात म्हणाला , अरे बाप रे. ही चर्चा आपण कोठे आहोत याचे भान न ठेवता पुढे सुरुच आहे. शेवटी त्याने पुढाकार घेतला आणि म्हणाला, ‘ मी सर्वांची माफी मागतो आणि या पुढे माझ्या मोबाईलवर फक्त ट्रिंगग ग ग ग ग ग……. हीच रिंग टोन राहील याची काळजी घेईल. कृपा करून चर्चा थांबवा.’ तेव्हा सर्व गप्पा बसले. तर मंडळी असे आहे हे आधुनिक मोबाईलचे जग.

भूकंप भाग-२

मित्रांनो काल आलेल्या भूकंपामुळे माझ्या मनातील खूप दिवसांपासून घोळत असलेले विचार मी रात्रीच माझ्या मनावर ‘भूकंप’ च्या रूपात उतरविले आणि रात्री १ वाजला असल्यामुळे तेव्हा कोण ओं लाईन असेल म्हणून शेडूल करून सकाळी ७.५३ वाजता पब्लिश व्हावी असे केले होते. त्यानुसार माझी पोस्त पब्लिश हि झाली. आणि काय आश्चर्य आज माझ्या मुद्द्यावरच एक बातमी सकाळ पेपरात प्रकाशित झाली.

मी विचार मांडले होते कि पृथ्वीच्या गर्भात १ कि.मी पर्यंत जाऊन भूकंप मापन यंत्र बसविले तर आपल्याला काही तास आधी भूकंपाची माहिती मिळू शकेल. ह्याच मुद्द्याचे संशोधन करण्यासाठी कोयना परिसरात केंद्र शासनाने एक टीम पाठविली असल्याचे बातमीत लिहिले आहे. ते भूगर्भात ५-६ कि.मी. खोलवर यंत्र बसविणार आहे.

फरक एव्हढाच आहे कि ते आतील भूगार्भाची माहिती गोळा करून संशोधन करणार आहेत. माझे म्हणणे आहे कि तेथे यंत्र बसवावे आणि क्षणाक्षणाला दाब मोजावा. जर तो दाब वाढत आहे असे निदर्शनास आले तर नजीकच्या काळात भूकंप होणार आहे असे समजावे.

चला काही प्रमाणात का होईना माझे विचार व कल्पना बरोबर आहे. याचेच मला समाधान झाले.

याच विषयावर मी आणखीही काही मुद्दे मांडणार आहे. उद्या भेटू परत.

भूकंप

आज पर्यंत जगात अनेक भूकंप येऊन गेले आहेत. खूप नुकसान ही झाले आहे. जीवित आणि वित्त हानि मोजता येत नाही असे भूकंप सुध्दा झाले आहेत. आजच पाकिस्तानातील बलुचिस्तान येथे केंद्र बिंदू असलेला ७.४ रिस्टर स्केलचा भला मोठा भूकंप येऊन गेला आणि संपूर्ण उत्तर भारताला हादरवून गेला. एक वेबसाईट आहे जी सतत जगाच्या कानाकोपऱ्यात झालेल्या भूकंपाची माहिती देत असते. तिची लिंक आहे.

http://www.emsc-csem.org/#2

मला बऱ्याच वर्षांपासून हे कळत नाही कि भूकंप येण्यापूर्वी जीव जंतूंना कळते तसे माणसाला का कळत नाही. आता पर्यंत ह्यावर संशोधन झाले असेलच. पण जगात भूकंप येण्यापूर्वी भूकंप येणार आहे अशी माहिती देणारे यंत्रच तयार होऊ शकलेले नाही.

का कुणास ठाऊक पण वाटते असे यंत्र तयार करता येऊ शकते. ते कसे याबद्दल माझ्या मनात काय आहे ते मी येथे मांडत आहे.

आपण घरात कुकरचा वापर करतो. त्याचा सिद्धांत  काय आहे. एका बंद भांड्यात पाणी तापवायला ठेवले जाते. ते तापून त्याची वाफ होते. त्या वाफेचा दाब कुकरच्या क्षमतेपेक्षा जास्त झाला कि शिटी मधून ती वाफ बाहेर पडते आणि आतील दाब पुनः नॉर्मल होतो. तोच सिद्धांत पृथ्वी आणि भूकंपाचा आहे. पृथ्वी एक कुकर आहे. त्यात

साभार- विकीपेडीया

साभार- विकिपेडिया

असणारे द्रव पदार्थ सतत उकळत असतात. त्याने पृथ्वीच्या आतील दाब वाढत जातो. जेव्हा तो जास्त होतो तेव्हा त्याला ज्या स्पॉटला जागा मिळते म्हणजे विक स्पॉट असतो तेथून तो बाहेर पडायचा प्रयत्न करतो.

जर आपण कुकरच्या बाहेरील प्रष्ठावर दाब मापक यंत्र बसविले तर कुकरमध्ये जसजसा दाब वाढत जाईल आपणाला कळेल. तेच आपण पृथ्वीमध्ये का करू शकत नाही. परंतु पृथ्वीचे आवरण खूप जाड असल्याने वाढलेल्या दाबला मोजणे अशक्य आहे. पण हेच आपण पृथ्वीच्या आत शिरून का करू शकत नाही?

आता पर्यंतच्या संशोधनातून पृथ्वीवरील भूकंप प्रवण भागांची माहिती प्राप्त झालेली आहेच. आता ह्या संवेदनशील भागात जमिनीत काही अंतरावर साधारणपणे एक किलोमीटर च्या अंतरावर बोर करून दाब मोजायचा पर्यंत केला तर मला तरी शक्य वाटते आपणाला  काही तास आधी भूकंप येणार आहे हे समजू शकते.

प्रश्न एकच पडतो कि पृथ्वीच्या आत १ किलोमीटर खोदकाम करणे शक्य आहे का?