नववर्ष आगमन(19603 )

🎉🎉🎊🎉🎉🎊🎉🎉🎊

आज पवित्र पाडवा,
काल लक्ष्मीचे झालेले शुभागमन,
आज नववर्षाचे पहिले पाऊल,
अशा ह्या मंगल प्रसंगी
आपल्या मंगल भविष्याची
पायभरणी होवो,
आपणा बरोबर परिवारास
सुखशांती लाभो..!

दिवाळी पाडवा आणि नववर्षांनिमित्त
स्नेहमय शुभेच्छा…! 🙏💐

🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊

http://www.manachyakavita.wordpress.com

दिवाळी पाडवा..(19602)

आज बलिप्रतिपदा💐
💐दिवाळी पाडवा,
राहो सदा नात्यात गोडवा💐
💐कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे,
बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा)💐
साडेतीन मुहूर्तांपैकी एक💐
💐बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या
परिवारास मनापासून शुभेच्छा💐
💐💐शुभ दीपावली!💐💐

*****

http://www.manachyakavita.wordpress.com

आपण मात्र सर्वांचे व्हावे ….(19583)

पहाटे प्राजक्तासारखे उमलून🌹

निशिगंधासारखे सुगंधित होत जावे🌼

सुगंधित आनंदाच्या लाटांवर🌹

आयुष्य झुलत जावे 🌼

अश्रू असोत कुणाचेही🌹

आपणच विरघळून जावे !🌼

नसोत कुणीही आपले,🌹

आपण मात्र सर्वांचे व्हावे ….. !!!🌼

🌺🙏शुभ सकाळ 🙏🌺

महानायक..(41019575)

एखादा मनुष्य किती भाग्यवान असू शकतो ? याची कल्पना केली जाऊ शकते का? पण आहे अशी एक व्यक्ती आहे.

मला आठवते मी लहानपणी एक सिनेमा पाहिला होता. नाव आठवत नाही. मला वाटते सन १९७०-७१ असावे. नेपानगर मधील पदमा टॉकीज. अमिताभ बच्चन हा हिरो होता.

एकदम सडपातळ देहयष्टी. भरपूर उंची (आता जी उंची गाठली आहे ती कोणत्याही नटाने गाठलेली नाही). तेव्हा त्याला बघुन कोणी कल्पना ही करू शकत नव्हते की नट एव्हढी उंची गाठेल. तो ज्या शिखरावर पोहोचेल तेथे दुसरा कोणीच पोहोचू शकणार नाही.

आई तेजी व वडील हरीवंशरॉय. आडनाव श्रीवास्तव होते पण वडिलांनी बच्चन लावले. वरील फोटोत बघा. बारका बुरका हा पोरगा जेव्हा सिनेमा मधे रोल मिळण्यासाठी प्रयत्न करत होता याला या उंची मुळे झिडकारले जात होते.

आज तोच मनुष्य संपूर्ण जगात प्रसिद्ध झाला आहे.

७७ वर्षे वय होऊन सुद्धा आपली सुपरस्टार ची सिट त्याने कायम ठेवली आहे. टिव्हीवर सतत जाहिराती आहेतच. मुथ्थुट फायनान्स, कौन बनेगा करोडपती, वेलस्पन टॉवेल, con fabrics,फ्लिपकार्ट,

कल्याण ज्वेलर्स कुठे नाही तो. एकमेवाद्वितीय असे हे व्यक्तिमत्त्व आणि न भूतो न भविष्यती असा ही मनुष्य जगाला ईश्वराने बहाल केलेले गिफ्ट आहे. ह्यांना उद्दंड आयुष्य लाभो हिच प्रार्थना

रुमादेवी(31019574)

मित्रांनो, कोणाच्या नशिबी काय लिहिलेले असेल काही सांगता येत नाही. असे म्हणतात कि ज्याच्या पत्रिकेत राजयोग असतो तो एखादा लिडर किंवा मोठा माणूस होतो. अशी अनेक जणं असतात जे अत्यंत गरीब घरची असतात पण त्यांच्या हातून असे काही घडते ते शिखरावर जाऊन पोहोचतात.

काही दिवसांपूर्वी कौन बनेगा करोडपती मधे रुमादेवी नामक एक स्रीला एक सेलीब्रिटी म्हणून विशेष आमंत्रित केले होते. वय फक्त ३० वर्षे. गावंढळ, राजस्थान मधील एका लहानशा खेड्यात राहणारी. फक्त आठवीपर्यंत शिक्षण व १७ वर्षाची असतांना लग्न झालेली एक महिला.

इतक्या कमी वयात कोणाचे ही पाठबळ नसतांना एका साध्या कशिदा च्या कामाच्या बळावर तीने सर्वोच्च उंची गाठली आहे. तीला सर्वोच्च नारी शक्ती पुरस्काराने महामहिम राष्ट्रपती यांचे हस्ते संमानित केले गेले आहे.

या वयात तीने २२००० महिलांना रोजगार मिळवून दिला आहे. इतक्या कमी कमी वयात, एक गरीब कमी शिक्षित महिला, २२००० महिलांपर्यंत पोहोचून त्यांना कशिदा करण्यासाठी प्रोत्साहित करते, त्या महिला व त्यांचे घरचे रुमादेवीवर विश्वास ठेऊन तयार होतात व त्याने एक नव विश्व नावारूपाला येते याला ईश्वरिय देनगीच म्हणावे लागेल.

अर्थात संधीचे सोने करणे हेही त्या व्यक्ती वर अवलंबून असते.

कौन बनेगा करोडपती मधे प्रसिद्ध सिने नटी सोनाक्षी सिन्हा ह्या रुमादेवीसोबत होत्या.

विशेष म्हणजे दोन्हींचे वय सारखे होते. रुमादेवीचे लग्न 17 व्या वर्षी तर सोनाक्षी अजूनही अविवाहित. हा फरक आहेच. असो.

रुमादेवी यांनी देशांतर्गत प्रदर्शनं भरविली, आपल्यासोबत कारागीर महिलांना घेऊन रेंप वाक सुद्धा केले. इतकेच नव्हे तर जर्मनी मधे त्यांच्या वस्रांचे प्रदर्शन ही भरवले होते. अशा ह्या अविश्वसनीय, अदभूत व अकल्पित व्यक्तिमत्वास सलाम.

(सर्व चित्रांसाठी गुगलचे आभार)

छप्पर फाडके….(19567)

एखादाच नशीब घेऊन जन्माला येतो असे म्हणतात. हे खरे ही आहे. या घटनेला बघून तरी माझी खात्री पटली आहे.

सोनी टि.व्हि.वर सध्या एक कार्यक्रम सुरु आहे. “कौन बनेगा करोडपती” परवा एक माऊली या कार्यक्रमात आली होती.

अंजनगाव सुर्जी जळगाव येथील बबिता ताडे. या माऊली शाळेतील मुलांना खिचडी बनवून देण्याचे काम २००२ पासून करित आहेत. त्यासाठी त्यांना मानधन म्हणून मासिक फक्त रु. १५००/- मिळतात. हे जेव्हा त्यांनी अमिताभ बच्चन यांनी विचारल्यावर सांगितले तेव्हा अमिताभ बच्चन हे सुन्न झाले.

त्या माऊली चे कौतुक करणे भाग आहे. कारण त्या दिवसातून दोन वेळा ४५० विद्यार्थ्यांसाठी खिचडी बनवितात. तरी ही त्यांच्या चेहर्यावर कोठेही निराशा किंवा नाराजी दिसत नव्हती.

त्यांनी पूर्ण उत्साहाने खेळायला सुरुवात केली. कोठेही आपला उत्साह कमी पडू दिला नाही.

शेवटपर्यंत त्यांचा आत्मविश्वास डगमगला नाही. एक खेडूत स्री इतक्या आत्मविश्वासाने खेळू शकते हे पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहिले नाही. त्यांच्या तोंडून वारंवार हे शब्द बाहेर पडत होते कि मला दाखवून द्यायचे होते कि एक खिचडी बनविणारी सुद्धा कमी नाही व मी येथून एक करोड जिंकून जाणार!

या आत्मविश्वासाच्या अगदी विरुद्ध त्यांच्या स्वतः साठीच्या अपेक्षा होत्या. सुरुवातीलाच त्यांनी सांगितले होते कि त्यांचा स्वतः चा मोबाईल नाही म्हणून त्यांना स्मार्ट फोन घ्यायचा आहे. मग बच्चन यांनी त्यांना एक स्मार्ट फोन भेट दिला.

जेव्हा रक्कम वाढत गेली तेव्हा शिवमंदिर दुरुस्त करावयाचे आहे अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. एक कोटी जिंकल्यावर हे पैसे माझ्या घरासाठी मुलांसाठी आहेत हेच ती माऊली बोलली.

प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी लॉजिकचा पूर्ण वापर केलेला मला आढळला. अहो, सात कोटीसाठीचा शेवटच्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा त्यांनी बरोबर दिले. मात्र एक कोटीनंतर त्यांनी माघार घेतल्याने त्या एक कोटी जिंकल्या.

त्या माऊली ला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.(सर्व फोटो साठी गुगल चा आभार )

झिरो एनर्जी स्कूल(19564)

काल व्हाट्सएपच्या ग्रुपवर एक संदेश प्राप्त झाला. कौतुकास्पद व अभिमानास्पद माहिती असल्याने येथे सादर करित आहे. फोटो व व्हिडीओ गुगल वरुन मिळविले आहेत.

“जिल्हा_परिषदेच्या या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून यंदा ४००० विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये होते.
जगातली तिसरी आणि भारतातील पहिली “झिरो एनर्जी स्कूल” म्हणून वाबळेवाडीच्या शाळेचा उल्लेख केला जातो. या शाळेला बँक ऑफ न्युयार्कचे प्रतिनिधी देणगी देण्यासाठी येवून गेले. हि शाळा जिल्हा परिषदेची शाळा पण या शाळेची वेटिंग लिस्ट लागते. या वर्षी वेटिंग लिस्टमध्ये चार हजार मुले होती. सध्या शाळेत सहाशे विद्यार्थी आहेत.

कधीकाळी दोन पडक्या खोल्यामध्ये भरवण्यात येणारी हि शाळा आज जिल्हा परिषद शाळांसाठी सर्वात मोठ्ठी रोल मॉडेल ठरलेय.

आणि यासाठी कारणीभूत ठरलेत ते वारे गुरूजी.
ही गोष्ट जितकी शाळेच्या विकासाची आहे तितकीच शिक्षणक्षेत्रात आपण काय करु शकतो दे दाखवण्यासाठी डोळ्यात झणझणीत अंजण घालणारी देखील आहे.

वाबळेवाडी हे गाव पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात शिक्रापूर पासून अडीच किलोमीटरवरच गाव. वाबळेवाडीची लोकसंख्या म्हणजे पन्नास ते साठ घरांच छोटस गाव. गावाची लोकसंख्या साडेतीनशे. सहा वर्षांपुर्वी गावची जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे फक्त दोन गळक्या खोल्या. पडक्या भिंती. याच खोल्यामध्ये मुलं शिकायची.

साल होतं जुलै २०१२.
या वर्षी जानेगाव येथून बदली होवून नवीन शिक्षक आले. पडक्या खोल्या पाहून एखाद्या शिक्षकानं काय केलं असत तर आपल्या सगळे कॉन्टेक्ट वापरून बदलीसाठी प्रयत्न केले असते. पण वारे गुरूजी वेगळे होते. वारे गुरूजी नवीन आव्हानं घेण्यासाठी ओळखले जायचे.

वारे गुरूजी विद्यार्थांना शिकवण्यास सुरवात केली. दोन छोट्या खोल्या. त्यामध्ये दोन शिक्षक आणि सर्व इयत्तेची मुले एकत्र अस एकंदरित चित्र. हे चित्र बदलण्यासाठी वारे गुरूजींनी १५ ऑगस्ट २०१२ मध्ये वाबळेवाडीच्या ग्रामसभेत एक आराखडा मांडला.

शाळा जागतिक पातळीवर घेवून जाण्यासाठी काय करता येईल हे मांडणारा तो आराखडा. दोन पडक्या खोल्यामधून जागतिक दर्जाची शाळा निर्माण करणं म्हणजे हास्यास्पद गोष्ट होती पण वारे सरांनी ते काम मनावर घेतलं. गावच्या लोकांना यातलं विशेष माहित नव्हतं पण त्यांना एकाच गोष्टीवर ठाम विश्वास होता तो म्हणजे वारे गुरूजी म्हणतायत म्हणजे काहीतरी चांगल होईल.

संपुर्ण गावाने एकत्र येवून झटायचं असा तो ठराव होता. २०१२ साली गावात एकूण १९ महिला बचत गट होते. या बचत गटांनी एक गोष्ट ठरवली ती म्हणजे पुढची तीन वर्ष आपणाला जो काही नफा होईल तो शाळेला द्यायचा. पै अन् पै गोळा करुन संसार उभा करणाऱ्या महिलांच्या दृष्टीने पाहिलं तर ही गोष्ट खूप क्रांन्तीकारी वाटेल. बचत गटांसोबत गावातले तरुण धावून आले. नवरात्र आणि गणेशोत्सवांसारख्या सणांचा खर्च कमी करून तो पैसा शाळेसाठी उभा करण्याच ठरवण्यात आलं.

वाबळेवाडीची हि शाळा का उभा राहू शकली याचं मुख्य कारण म्हणजे गाव आणि शाळा एकत्र आली.
शाळेतील शिक्षकांवर गावाने विश्वास दाखवला आणि शिक्षकांनी देखील तो सार्थ करून दाखवला. शिक्षक प्रयोग करत आहेत म्हणल्यानंतर शाळेची विद्यार्थीसंख्या देखील वाढू लागली. गावाची मदत कशी होत गेली याबद्दल सांगायच झालं तर गावात यात्रेनिमित्त तमाशा आयोजित करण्यात आला होता.

सुमारे सव्वा लाख रुपये यात्रा कमिटीमार्फत तमाशासाठी गोळा करण्यात आले होते. वारे गुरूजींनी यात्रा कमिटीची भेट घेतली, तेव्हा यात्रा कमिटीने तात्काळ १ लाख २० हजार रुपयांची रक्कम वारे सरांना देण्याच मंजूर केलं. त्या रकमेतून वारे सरांनी विद्यार्थांना टॅब घेतले.

महाराष्ट्रातील पहिले टॅब स्कूल म्हणून या शाळेचा उल्लेख करावा लागतो. हे पैसै तमाशासाठी गोळा करण्यात आले होते. ते खऱ्या अर्थाने सत्कारणी लागले.
आज शाळेची जी इमारत आहे ती गावकऱ्यांनी दिलेल्या जागेवर आहे. नवीन खोल्या बांधाव्यात म्हणून वारे सरांनी गावकऱ्यापुढे आपलं म्हणणं मांडल. गावकऱ्यांनी देखील सुमारे दिड एकर शेती बक्षीसपत्र करून शाळेच्या नावावर केली.

तालुक्यातल्या जमिनीचे भाव पाहता दिड एकर जमिनीची किंमत अडीच कोटी रुपयांपेक्षा अधिक होते. हळुहळु शाळा रुपडं बदलत असताना गावकऱ्यांनी पुन्हा नजीकची दिड एकर जमीन शाळेसाठी देवू केली.

शाळेमध्ये सुमारे दोनशे विद्यार्थी झाले. तरिही खैरे सर आणि वारे सर असे दोनच शिक्षक विद्यार्थांना शिकवण्याच काम करत होते. सर्व इयत्तेच्या विद्यार्थांना शिकवण्यासाठी दोघांनी मिळून अभिनव अशा संकल्पना सुरू केल्या. दहा दहा विद्यार्थांचे गट तयार करुन त्यांना वरच्या वर्गातील एक विद्यार्थी विषय मित्र म्हणून देण्यात आले. छोटे प्रयोग करुन विज्ञानाच्या संकल्पना विद्यार्थांमध्ये रुजवण्यात आल्या.

शाळेची किर्ती सर्वदूर पोहचू लागल्यानंतर एक दिवस बॅंक ऑफ न्यूयार्कचे काही अधिकारी शाळेला भेट देण्यासाठी आले. त्यांनी शाळेला देणगी देण्याची भावना बोलून दाखवली. नक्की कोणत्या प्रकारची शाळा हवी असे विचारल्यानंतर वारे सरांनी त्यांना शाळेचे डिझाइन दाखवले. ते डिझाइन पसंत पडले. नव्याने शाळेची रचना करण्यात आली. आतराष्ट्रीय दर्जाची मिळतीजुळती अशी झिरो एनर्जी स्कुलची निर्मीती करण्यात आली.

जपान आणि आयर्लेंड सोडल्यानंतर जगातली हि तिसरी शाळा ठरली.
अनुभवातून शिक्षण देण्याच सुत्र शाळेने स्वीकारलं. दिवाळीच्या सुट्टीत मुलांना पोहायला शिकवण्याची जबाबदारी देखील शाळेने घेतली. संगीत, नाटक अशा प्रत्येक गोष्टीत विद्यार्थांची रुची वाढवण्यात आली. मुलांनी श्रमसंस्कार मिळावेत म्हणून पंचक्रोशीत झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. त्यातूनच परिसरात सुमारे एक लाख वृक्षांची लागवड करण्यात आली.

शाळेची यशस्वी घौडदौड पाहून राज्यसरकारकडून दहा शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. आज शाळेत बारा शिक्षक आहेत. ओजस च्या उपक्रमातून शाळेत आठवीपर्यन्तचे वर्ग निर्माण करण्यात आले. आज शाळेत नववी प्रर्यन्तचे वर्ग आहेत. तर भविष्यात १२ वी पर्यन्तचे शिक्षण देण्यात येणार आहे. १२ वी पर्यन्तचे शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा असण्याचा सन्मान वाबळेवाडीच्या शाळेला मिळणार आहे. आज शाळेची विद्यार्थीसंख्या सुमारे सहाशे असून चार हजार विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आहेत. आणि विशेष म्हणजे हि शाळा आजही मराठी माध्यमच आहे.”