मित्रांनो, आपल्या नेहमीच्या म्हणजे व्हाट्सएपच्या शाळेत मध्यंतरी एख छोटीशी पण बोधप्रद कथा वाचण्यात आली. आपल्याला ही आवडेलच. चला तर मग वाचा.
“दोन भाऊ समुद्राच्या किनाऱ्यावर फिरत होते. दोघांमध्ये कोणत्या एका गोष्टीवरून वाद झाला. मोठ्या भावाने लहान भावाच्या थोबाडीत मारली. लहान भाऊ काहीच बोलला नाही. फक्त वाळूवर लिहलं ‘आज माझ्या भावाने मला मारलं.’
दुसऱ्या दिवशी दोघेही पुन्हा समुद्रकिनाऱ्यावर फिरू लागले. लहान भाऊ समुद्रावर अंघोळ करू लागला. अचानक तो बुडू लागला. मोठ्या भावाने त्याला वाचवलं. तेव्हा लहान भावाने दगडावर लिहलं, ‘आज माझ्या भावाने मला वाचवलं’.
मोठया भावाने विचारलं, “जेव्हा मी तुला मारलं तेव्हा तू वाळूवर लिहिलं होतंस आणि जेव्हा तुला वाचवलं तेव्हा तू दगडावर लिहितोयसं अस का ?
लहान भावाने यावर उत्तर दिलं, “जेव्हा आपल्याला कुणी दुःख देत
तर ते वाळूवर लिहावं
कारण ते लवकर मिटून जावं… परंतु
जेव्हा कुणी आपल्यासाठी चांगलं करतं
तेव्हा आपल्याला ते दगडावर लिहायला हवं
कारण ते मिटु नये !!”
घडलेली वाईट घटना… विसरायलाच हवी आणि चांगली घटना नेहमी लक्षात ठेवायला हवी !!
मित्रांनो, कथा बोधप्रद आहे. पण प्रत्यक्षात अनुभव या उलट येतो.
आपण दहा काय शंभर गोष्टी चांगल्या केल्या आणि नेमकी १०१ वी चुकली तर ती जी चुथकली असते न नेमकी तीच लक्षात राहते. शंभर चांगल्या गोष्टी मनुष्य विसरून जातो. कारण हा माणसाचा गुणधर्म आहे. आपली स्मरणशक्ती अशीच आहे की ती वाईट गोष्टी पटकन आत्मसात करते.
आपण ही आठवा. घरी, कार्यालयात किंवा मित्रांच्या ग्रुपमध्ये
असे घडले असेल. सर्वसाधारणपणे प्रत्येकाला हा अनुभव येतोच येतो. कार्यालयातच बघा न. आपण दररोज पद्धतशीरपणे काम करत असतो. वरिष्ठ खुप खुश असतात आपल्यावर. पण एकावेळी एक चुक घडली कि आधी चांगले केलेले काम त्यांच्या मानसपटलावरून पुसले जाते. आणि नंतरच्या प्रत्येक कामाकडे पहायची नजर बदलेली असते. नंतर चांगल्याप्रकारे केलेल्या कामात ही त्यांना चुका दिसतात.
याउलट जो सतत चुका करत असतो त्याने एकदा चांगले काम केले कि त्याचे कौतुक होत असते.
आहे न विचित्र किंतु सत्य!!
(01821834)
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात, परंतू केलेल्या कर्माचे वारस आपण स्वत:च असतो.
⭐️शुभ प्रभात ⭐️
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
http://www.ravindra1659.wordpress.com
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐