जीव वाचला…………..

https://ravindra1659.wordpress.com/2012/12/29/%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b5-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%b2%e0%a4%be/

Advertisements

दगडांचे जंगल………

लेक टेपिंग- एक सुखद अनुभव

काल दि.२५/०४/२०१२ रोजी आपल्या महाराष्ट्रासाठी मनाचा तुरा असलेल्या कोयना प्रकल्पावर एक अतिविशिष्ट घटना घडली ज्याचा मी स्वतः साक्षीदार राहिलो. मी आपल्या डोळ्यांनी टी घटना घडतांना बघितली. टी म्हणजे कोयना येथे दुसऱ्यांदा झालेली लेक टेपिंग. पहिली १९९९ मध्ये झाली होती. मला अभिमान वाटतो की मी ह्या घटनेचा साक्षीदार राहिलो.

मी ह्या कामाशी निगडीत असल्याने मला लेक टेपिंग म्हणजे काय हे माहित आहे. पण बऱ्याच मंडळींना ह्याचा अर्थ काय हा प्रश्न पडला असेल. म्हणून मी ही पोस्ट लिहीत आहे.

लेक टेपिंगचा शाब्दिक अर्थ असा होईल. लेक म्हणजे जलाशय/सरोवर. आणि टेपिंग म्हणजे छिद्र पाडणे. होय हाच त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. पाण्याच्या अगडबंब अशा अतिभव्य जलाशयाला जमिनीतून भगदाड पाडणे म्हणजेच लेक टेपिंग.

सध्या सरळ भाषेत सांगायचे झाले तर असे सांगता येईल की एखाद्या पाणी साठवायच्या टाकीला भोक पाडून नळ बसविणे. फरक इतकाच असतो की आपण टाकीला भोक पाडून नंतर नळ बसवितो आणि येथे आधी नळ बसवितो व नंतर भोक पडतो.

हे ह्या खालील चित्रावरून अगदी सहज समजून येईल.ह्या चित्रामध्ये एक पाण्याचा तलाव दिसत आहे. त्या तलावाच्या खालून एक बोगदा तयार करून तलावाच्या तळाशी आणला जातो. पण तलावामध्ये पाणी असल्याने त्या पाण्याच्या दाबाने छिद्र पडू नये म्हणून एका ठराविक जाडीचा खडक तसाच ठेवला जातो.तो खडक येथे काळ्या रंगाने दर्शविण्यात आला आहे. ह्याच काळ्या खडकात स्फोटक लावून त्याला उडविले जाते. ते खाली पाण्यात पडते आणि पाण्याचा प्रवाह सुरु होतो.

हे अतिकौशल्याचे काम आहे म्हणून ह्या कामात सहभागी सर्व अभियंते व इतर सर्वांचे मनापासून अभिनंदन करायला हवे.

This slideshow requires JavaScript.

 

संयोग …………….

सध्या आमच्या घरातील वातावरण खूप वेगळ आहे. परवा खूप आनंद होता. अगदी गदगदायला होत होत आणि दोनच दिवसांनी वातावरण तंग झालं. माफ करा पण मी काही खाजगी गोष्टी शेअर करत असतो. जे कदाचित सर्वांना आवडत नसेल. पण मला नेहमी प्रसंग जोडायची आवड आहे. असाच एक प्रसंग.

झाल अस की कन्येने पी.एच.डी. साठी पुणे विद्यापीठाची प्रवेश परीक्षा दिली होती. दोन स्तरावरील परीक्षा तीने पार केल्या. आणि आम्ही अगदी अत्यानंदाने  भारावून गेलो. पण पी.एच.डी. करता करता ३-४ वर्ष निघून जातील. फार मोठा काळ आहे हा. हे मनात आले आणि मनावरील ताण वाढला. असो आजच सायंकाळी ती विद्यापीठातून घरी आली आणि त्याच गोष्ठी सुरु होत्या. तेव्हा माझ्या मनातील पी.एच.डी. करायची सुप्त इच्छा जागृत झाली. मनात येऊन गेले की आपण एक वेगळ्या विषयावर पी.एच.डी. का करू नये? तो विषय असा की पौराणिक काळात म्हणजे रामायण महाभारताच्या काळात जी विविध प्रकारची आयुध वापरली जायची; ज्यात विमान एक होते, यांचा अभ्यास करावा. थोड्या वेळाने सौ.ने वाचनालयातून पुस्तक बदलून आणा असा आदेश फर्मावला. सौ. च्या आदेशापुढे श्रींचे कधी चालले आहे का? ( आणि मी नाही कसा म्हणणार कारण मला बाहेर पडायला कारण हवेच असते. सिगारेट ओढायला.) मी ग्रंथालयात गेलो आणि पुस्तक चाळता-चाळता माझ्या हाती एक छानस पुअस्तक लागल. शीर्षक वेगळाच होता. “देवांच्या राज्यात” लेखक “राजेंद्र खरे” मुख पृष्ठावरच लिहील आहे,” देवांच्या राज्यातून प्रवास करत आनंद मार्गी जीवनाचा वेध घेणारं अनोख पुस्तक” खरोखर अनोख पुस्तक हाती पडल होत. घरी आल्यावर थोड चाळल तर पुस्तक आणण्यापूर्वी जे विचार मनात घोळत होते अगदी त्याच विषयाच पुस्तक होत हे जाणवलं. याला संयोग म्हणायचं की आणखी काही. अस माझ्या बाबतीत नेहमीच घडत. कदाचित इतरांच्या बाबतीत ही घडत असेल.

हा माझा खूप आवडता विषय. मग मी सौ. ला बसवलं आणि आपल प्रवचन सुरु केल. काही परिच्छेद वाचून दाखविले. त्यातील एक येथे देत आहे.

“अनेक उपासक भ्रामरी,ओंकाराच अथवा मंत्रांच विशिष्ट लयीन,आघातान उच्चार करून त्या प्रांतात जाण्याचा प्रयत्न करतात.त्यामुळे मेंदू अक्षरश: charged होतो,प्रभारित होतो. संपूर्ण शरीर प्रभारित होत.वैत विचार, नकारात्मक विचार त्यामुळे दूर होतात. सातत्यान भ्रमारीचा अभ्यास केला तर एक वेळ अशी येते की उपासकाला दिव्यानुभूती मिळून जाते.” “मंत्रांच प्रतिदिन धीरगंभीर खर्ज स्वरात उच्चारण  केल तर अतिशय प्रभावी, आल्हाददायक, उत्साहवर्धक सकारात्मक कंपनं सभोबाती निर्माण होतात. घरातील वातावरण प्रसन्न बनून जात. वाईट विचार, दुष्ट लहरी नाहीशा होतात.”

याबद्दल मला माझ्या मित्राने सांगितलेला एक प्रसंग आठवला. मित्राने सांगितले की तो कोकणात नौकरीला होता. कुटुंब सोबत नव्हते. सर्व एकटेच होते. एकदा ते सर्व मित्र कोठे जंगलात गेले. फिटर असतांना त्यांच्या पैकी एक मित्र अचानक गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पण तो केव्हा गायब झाला हे समजले नाही. सर्व घाबरले आणि त्याला शोधायला लागले. लांबून त्यांना एक नाद ऐकायला येऊ लागला. हळूहळू ते त्या नादाकडे जाऊ लागले. जवळ गेल्यावर त्यांना ओंकार सुरु असल्याचे ऐकू आले. तेथे एक देऊळ होते. देऊलासामोरचे दृश्य बघून ते चकित झाले. देऊलासमोर त्यांचा मित्र बसलेला होता पण जमिनीवर नव्हे तो जमिनीपासून साधारण पाने २ फुट वर होता. म्हणजे अधांतरी. हे जवळ गेले आणि त्याची तंद्री मोडली. तसा तो जमिनीवर येऊ लागला. ह्या मंत्रात इतकी शक्ती आहे. माझे म्हणणे असे आहे की मंत्रात नव्हे तर तल्लीनतेत इतकी शक्ती आहे. तुम्ही कोणतेही काम पूर्ण आत्मीयतेने व तल्लीनतेने केले तर फळ निश्चितच चांगले मिळते.

असो विषय खूप भरकटला आहे. आणखी ही काही सांगायचे होते पण पुनः कधी तरी.

बिन भिंतींची शाळा

सध्या वर्तमान पत्रात बिन भिंतीच्या शाळेचा विषय खुप चर्चिला जातोय. हे वाचुन मला माझे लहानपण आठवले. मी सुमारे १९७१-७२ मध्ये ६ वी ७ वी मध्ये असेल. माझा जन्म महाराष्ट्रातील्च. दुसरी पर्यंत मी येथेच शिकलो. परिस्थितीमूळे आम्हाला मध्यप्रदेशात जाव लागल. तेथे ५ वी पर्यंत मराठी शाळा होती. पण ६ वी पासुन हिंदीत शिक्षण घ्यावे लागले. तेव्हा आमचे प्राचार्य होते श्री पाठक सर. त्यांना वेगळं करण्याची खुप हौस होती. नेहमी ते वेगळे काही तरी करत असत. त्यांची शिकवण्याची पध्दतपण वेगळी होती.

विदेशात फ़ोरेस्ट स्कुलची संकल्पना आहे हे ह्या चित्रावरुन स्पष्ट होते. गुगल वरुन सापडलेले हे चित्र.

एके दिवशी त्यांनी फर्मान काढले की संपुर्ण शाळा जवळ जंगलात असलेल्या नदीकाठावर भरेल. ६ वी पासुन ११ वी पर्यंतची सायंस, आर्ट्स व कॊमर्स ची आमची शाळा. म्हणजे विद्यार्थी संख्या जास्तच. जंगल व नदी शाळेच्या जवळ म्हणजे १ ते दिड किलोमीटर अंतरावर होते. सकाळी सर्व विद्यार्थ्यांची प्रभात फेरी निघाली कि थेट नदीकाठावर जाऊनच थांबायची. मग वेगवेगळ्या झाडाखाली वेगवेगळे वर्ग भरायचे. सुटी होण्यापुर्वी सर्व विद्यार्थी रांगेने आधी शाळेत यायचे मग सुटी होत असे. निसर्गाच्या सान्निध्यात आमचा अभ्यास खुप छान होत असे. सर्व विद्यार्थी आनंदी असत.

mishra madam was teaching English

आमचे पाठक सर प्राचार्य असुन सुध्दा आम्हाला इंग्रजी हा विषय शिकवित असत. पण काही तास घेत असत. खरे सर वेगळे होते. ते नसले तेव्हा प्राचार्य शिकवित असत. त्यां

च्यामुळे माझी इंग्रजी भाषा छान झाली. त्यांनी आमच्या ११ वी च्या बेच (१९७७) वर खुप मेहनत घेतली होती. म्हणुन आमच्या एकमेव बेच मधुन सर्वात जास्त ५ विद्यार्थी इंजिनिअरिंगला गेले होते. निकाल पण खुप छान लागला होता. मी त्यांचा आवडता विद्यार्थी अत्यंत गरिब पण हुशार असल्याने त्यांना आवडत होतो. ११ वी मध्ये मी ्मेरिट मधे आलो होतो. जिल्ह्यात पहिला म्हणुन त्यांनी माझे खुप कौतुक केले होते. मला इंजिनिअरिंग कॊलेजला त्यांनीच प्रवेश मिळवुन दिला होता. फोर्म सुध्दा त्यांनीच मा

गविला होता. त्या

शिवाय कॊलेजच्या डायरेक्टरांना पत्र देऊन मला शिक्षणासाठी एखादी नौकरी किंवा आणखी काही मदत करण्याची विनंती केली होती. आज मी इंजिनिअर आहे निव्वळ त्यांच्यामुळेच. मी स्वतःला धन्य मानतो कि मला असे प्राचार्य लाभले.

माफ करा विषय भरकटला. तर बिन भिंतीची शाळा आम्ही लहानपणीच अनुभवली आहे.

आम्हाला त्यावेळी गणित शिकविणारे शर्मा सर व रसायन शास्त्र शिकविणारे रविंद्र परांजपे सर आता फ़ेस बुकवर भेटले आणि मी धन्य झालो.

सत्त्याग्रह

सत्त्याग्रह ह्या शब्दाची संधीविच्छेद केल्यावर दिसुन येईल की हा शब्द मुळात दोन शब्दांनी तयार झालेला आहे. सत्य आणि आग्रह. ह्याचा शाब्दिक अर्थ आहे सत्याचा आग्रह करणे. परंतु ह्या शब्दाचा वापर अहिंसावादी आंदोलन करण्यासाठी केला जातो. असो माझा मुळ उद्देश हा नाही. माझा मुळ उद्देश आहे ह्या शब्दातील किती ताकत  किंवा चुंबकिय शक्ति आहे ते निदर्शनास आणणे.

मित्रांनॊ, प्रथम महात्मा गांधींनी इंग्रजांच्या काळात जगाला दाखवुन दिले होते की सत्याग्रह ह्या शब्दात किती ताकत आहे. इंग्रज सरकारला

गांधीजींनी मिठासाठी सत्त्याग्रह केला होता.

त्यांच्या अहिंसावा

दी आंदोलनापुढे शरण जावे लागले होते. शेवटी सत्याग्रहाने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवुन दिले. पण ती ताकत आपल्या पिढीने सुध्दा पाहिली नव्हती तर तरुणांचा प्रश्नच उद्भवत नाही. आपणासाठी ह्या फक्त कागदावरील गोष्ठी होत्या. पण मागच्या ६-७ दिवसापासुन जग ह्या शब्दाची ताकत अनुभवत आहे. अन्नांनी ह्या शब्दाला पुनर्जीवन मिळवुन दिले आहे व प्रत्यक्ष अनुभव करवून दिला आहे. त्यांचे आभार मानायला हवेत.

आजच्या पिढीचा सत्त्याग्रह

तरुण पीढीला नावं ठेवणे ही समाजाची रितच आहे. तरुण पीढी बिघडली आहे असे प्रत्येक म्हातारा मनुष्य म्हणत असतो. पण आज ह्याच पीढीने सत्याग्रहाची ताकत ओळ्खली आहे व ती जगासमोर दाखवुन दिली. लाखाने तरुण रस्त्यावर उतरले आहेत पण एक ही चुकीचे पाऊल त्यांनी उचललेले नाही ही सत्त्याग्रहाचीच ताकत आहे असे माझे तरी मत आहे.