असे म्हणतात कि नावात काय आहे? नाव काही ही असलं तरी काय फरक पडतो. पण असं म्हणणं मला तरी योग्य वाटत नाही.
नाव मग ते कशाचे ही असले तरी. खूप काही सांगून जाते. आता उदाहरणादाखल आपण दगड घेऊ. नुसता दगड शब्द कानावर पडला कि मनात कशा भावना तयार होतात बघा. डोळे मिटून घ्या आणि कोणाला तरी दगड म्हणायला सांगा. शब्द कानावर पडता बरोबर त्याच्यातील टणकपणाचा भास मनाला होतो. याउलट माती म्हणता बरोबर कोमलतेचा भास होतो. अग्नी ह्या शब्दातच जाळ आहे असे वाटते. हा शब्द कानी पडला कि उष्णतेची धधक जाणवायला लागते. तेच वर्षा म्हटलं तर शीतलतेचा भास होतो. एखाद्या माणसाला एका बंद अंधार कोठडीत जेथे कसलाच आवाज येणे ही शक्य नाही ठेवले . आता त्याला फोनकरून जर सांगितले की बाहेर पाऊस पडत आहे. तर न सांगता ही त्याला गार वाऱ्याची झुळूक आली असे वाटेल. आजूबाजूला गार वारे वाहत आहेत असे जाणवेल. आग लागल्याचे सांगितले तर त्याला चटका लागेल. माझ्या मते, ही किमया आपल्या मनाची असते. जे शब्द कानी पडतात, आपले मन त्याप्रमाणे त्या शब्दाला जगते.
तसेच शहर किंवा गाव यांच्यातील घरं किंवा इमारती सोसायट्या यांची नाव वाचली कि त्या गावची बरीच माहिती होऊन जाते. म्हणजे त्या गावावर कशाचा पगडा आहे. ऐतिहासिक पगडा आहे का? हे घरांच्या, रस्त्यांच्या नावावरून सहजपणे जाणवते.
हे जाऊ देत माणसांची नावंच बघा न. माझ्या वडिलांचे काळी म्हणजे सुमारे शंभर वर्षांपूर्वी नावं असायची, नामदेव, विश्वनाथ, रामदास, शंकर, लक्ष्मी, पार्वती. मुलांची अशी नाव ठेवली जात होती. त्यांच्या त्या काळी बहुतेक देवांचीच नाव ठेवली जायची. त्यानंतर चा काळ थोडा आधुनिक झाला. म्हणजे सुमारे ६०-७० वर्षापूर्वीचा काळ. हा काळ पूर्वी पेक्षा आधुनिक झाल्याचे नावातील बदलावरून सहज लक्षात येते. तेव्हा नावे ठेवली जात होती, मधुकर, सुधाकर, रमेश, सुरेश. हिच तेव्हाची आधुनिक नावं. नावांमधील बदल हा काळाचा महिमा म्हणतात न तसा आहे. जसजसा काळ बदलत गेला , शिक्षणाचा महिमा वाढला. नावांमध्ये आणखी आधुनिकीकरण होत गेले. रितेश, निमीष, बंटी, बबली, पिंकी अशी आधुनिक नाव उदयास आली. हल्ली मुलांची नाव
विशेष करून पेट नेम अशी असतात कि लक्षात ही राहात नाहीत.
थोडक्यात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल कि गाव, शहर, परिसर, घर, सोसायट्या यांच्या नावावरून बराचसा अंदाज येतो. तसेच माणसांच्या नावावरून काळाचा किंवा वयाचा अंदाज येतो. म्हणजे नावात काय आहे हे म्हणणे मला तरी योग्य वाटत नाही.
(6121877)
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🌹💐✒️ कुणाला दुःख देऊन
मिळवलेला आनंद कधीच
सुख देऊ शकत नाही.
पण कुणाला आनंद मिळावा
म्हणून स्वीकारलेले दुःख नेहमी
सुख देऊन जाते… ✍🏻
🌹🌹🌹सुप्रभात… 🌹🌹🌹
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐