अमरत्व…

हे ईश्वरा तू काय विचार करून हे जग निर्माण केले आहे? आम्ही जन्माला येतो, आयुष्यभर मर मर राबतो, झटतो आणि शेवटी मरतो. जे काही कमावतो चांगल वाईट जे असेल ते सर्व येथेच तर सोडून जातो. अगदी नाव सुद्धा. मग का तू हे जग निर्माण केले असावे? बर असे ही नाही कि एकदा जन्माला आला कि कायमस्वरूपी अमर झाला. तसे असते तर आयुष्यभर जगण्यासाठी पैसा अडका लागला असताच. म्हणून झटणे साहजिकच झाले असते. पण असे शक्य नाही असे झाले असते तर ही धरती माणसांच्या वजनाने केव्हाच जागेवरून लांब सरकून गेली असती आणि हे ब्रम्हांडाच मुळी जागेवर राहिलं नसतं. असो. आपल्याला काय त्याचं.

मला ही अशी भिती वाटतेच. शेवटी माणूस आहे. आज दोन वर्षे झाली ऑपरेशन ला. केंसर सारख्या जीवघेण्या आजारातून बाहेर पडणे सोपे नव्हे. पण वेळीच कळाले व लागलीच ऑपरेशन करून टाकले. ऑपरेशन च्या आधी खूप भिती वाटत होती. आता आपल संपल. अस वाटायच. पण २५ जून २०१९ रोजी दवाखान्यात भरती झालो. आणि सर्व दैवावर सोडून दिले. मरणाचा विचार सोडून दिला. बस्स. आणि कोठून हिम्मत एकवटली माहिती नाही. सहज सामोरे गेलो. माझी मुलगी माझ्या सोबत होती. मला वाटायचं ही कस करणार आपलं. पण तिला ही कशी व कोठून हिम्मत आली माहीत नाही. केल तिने व्यवस्थित. तिला तर वाटत आहे कि तिचे आईवडील अमरत्व घेऊन जन्माला आले आहेत. ती सतत म्हणत असते तुम्हाला काय झाले आहे? उगाच घाबरत असतात. तिच्या मुळे जगण्याची हिम्मत मिळते.

पण अमरत्व घेऊन कोणीही जन्माला येत नाही. जो आला तो कधीतरी जाणारच. त्याला परत जायला काहीतरी निमित्त लागते इतकंच. कोरोना आला आणि लाखो लोकांना घेऊन गेला. एरव्ही ही लोक मरतातच कोणी हार्ट फेल होऊन जातो, कोणी कर्करोगाने जातो तर कोणी अपघाताने जातो. दररोज लोक मरतातच. मरण हे अटळ आहे. पण तरीही मनुष्य मरणाला घाबरतो. कोणालाही जायचे नसते. (5721873)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐“जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे,प्रत्येक क्षण हा योग्यच असतो चुकतो तो फक्त आपला निर्णय…!”🍁शुभ सकाळ🍁💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐www.ownpoems.wordpress.com

सकारात्मकता….

सकारात्मकता म्हणजे पॉजिटिव्हिटी. सद्ध्याच्या कोरोना काळातील नकारात्मकतेने ओतप्रोत भरून वाहत असलेल्या जगात सर्वाधिक उच्चारला जाणारा सकारात्मक ऊर्जेने तुडुंब भरलेला असा हा शब्द.

नुसता उच्चार केल्याने किंवा वाचन केल्याने अंगात तरतरी येते असा शब्द.

आजार, हाल, उपेक्षा, रुग्ण, दवाखाने अशा नकारात्मकतेने भरलेल्या वातावरणात हा शब्द कानावर पडला कि तिनके का सहारा ठरतो.

मी एकदम तंदुरुस्त आहे. मला काय होतय. हे लोक घाबरट आहेत. म्हणून त्यांना कोरोना होतोय. असा आत्मविश्वास असलेली वयस्कर मंडळी फिरायला घराबाहेर पडतात. ही विचारांची सकारात्मकता झाली. पण एका वेळी हजारो लोकं असा विचार करतात आणि ते घराबाहेर पडतात. तेव्हा रस्त्यावर, बाजारात गर्दी उसळते. सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा उडतो आणि हेच कोरोनाला हव असतं. हे सकारात्मक विचार करणारी लोकं असतात न. पण त्या बाबाला हे माहीत नसते न.

आणि येथेच घात होतो. नकळत तो हल्ला चढवतो.

कदाचित त्यांच्या सकारात्मकतेमुळे त्यांना जास्त लक्षणं दिसत नसतात. पण ते आपल्या सोबत हे वायरस घेऊन फिरतात. घरी ही घेऊन जातात. अजाणतेपणी घरची लोकं, मित्रमंडळी किंवा शेजारी पाजारी यांच्यावर ते वायरस हमला करतात.

आता हेच बघा न. कोरोना पॉजिटिव म्हणजे वाईट गोष्ट. पण पॉजिटिव थिंकिंग चांगली गोष्ट आहे. काही वेळा निगेटिव्ह चांगले असते तर काही वेळा पॉजिटिव. जसे एच आय व्हि निगेटिव्ह चांगले असते. अर्थात प्रत्येक वेळी पॉजिटिव्ह हा शब्द चांगला असतोच असे नाही.

अरे काही होत नाही. असा विचार करून रस्त्यावर विरूद्ध दिशेला चालत गेलो किंवा गाडी चालवत नेली तर किती मिटर प्रवास करु शकतो आफण. उत्तर आहे एक मिटर जर शहरी रस्ता असेल तर.

एकूण याचा निष्कर्ष काय निघतो? तर , “योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन योग्य आचरण करणे योग्य असते.”😊😊

घरीच रहा सुरक्षित रहा.

झाडे लावा झाडे जगवा

(03421850)

👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

प्रत्येक प्रयत्नात सफलता मिळेलच असे नाही. परंतु प्रत्येक सफलता ही प्रयत्न केल्याशिवाय मिळत नाही.

👍शुभ सकाळ👍

👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

http://www.manachyakavita.wordpress.com

👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

मन आवरेना…

आपले आपले मन एक अद्रुष्य शक्ति आहे. त्यात अफाट ताकत लपलेली असते. हे आपल्या सर्वांना माहीत असेलच आणि तसा अनुभव ही सर्वांनी घेतला असेल. आपल्या मनाला असंख्य चक्षु असतात. ते ही अद्रुष्य असतात. त्या चक्षुंनी मन काही ही आणि किती ही लांबचे बघु शकते. अगदी अंतरिक्षातील सुद्धा. त्याच्या द्रुष्टीला सीमा नाहीच मुळी. ती असीम आहे.

म्हणूनच कवी वाळवंटात सुद्धा पाऊसाचा अनुभव आपल्याला मिळवून देऊ शकतो. आपण ही डोळे बंद केले आणि एखाद्या प्रेक्षणीय स्थळाचे चित्र डोळ्यासमोर आणले तर प्रत्यक्ष जाऊन आल्याचा भास होतोच की. फक्त मनाची ताकद असली पाहिजे.

मनाने आपण संवाद सुद्धा साधू शकतो. अर्थात असे माझे वैयक्तिक मत आहे. तुम्ही एखाद्या ची ज्याच्याशी खूप जवळीक आहे, मनाने आठवण काढली कि त्याला ही तुमची आठवण येते. हिचकी लागली कि कोणीतरी आठवण काढली असे पूर्वी म्हणत असत. ते हेच. मी असे अनुभव अनेक वेळा घेतले आहेत. पण आता आपण ते सर्व विसरत चाललो आहोत.

असो, मूळ मुद्दा असा आहे मित्रांनो, कि या कोरोना काळात माणसाचे मन हरपून चालले आहे. एखाद्याला छिंक आली तरी नाना विचार मनात घोंघवायला लागतात. भिती वाटायला लागते. रोजचे रुग्णांचे आंकडे बघून तर मन खिन्न होऊन जाते. अनेक विचार मनात खलबते करत असतात. बातम्या बघून तर मनात सुरू होणाऱ्या विचारांना आवर घालणे अशक्यप्राय होऊन जाते.

मागच्या वर्षाची परिस्थिती आणि या वर्षाची परिस्थिती यात खूप फरक आहे. तेव्हा रुग्ण संख्या हळूहळू वाढत होती. आता रुग्ण संख्या झपाटल्यागत वाढत आहे. अक्षरशः भिती वाटते रोजचे आकडे बघून.

त्यात आपला मित्र परिवार, नातेवाईक यातील काही जण कोरोना मुळे गेली असल्याने भिती आणखी वाढते. जायचे प्रत्येकाला असतेच मित्रांनो. पण कोरोना ने खूप हाल होतात. रुग्णाचे ही आणि इतरांचे ही. अहो, मुलं पालकांना दारोदारी फिरत आहेत पण दवाखान्यात जागा नाही. आता तर आईवडील आजारी मुलांना घेऊन फिरत आहेत. हे मी म्हणत नाही मित्रांनो. सतत बातम्या येत आहेत टिव्हीवर.

म्हणून म्हणतो मित्रांनो, शक्य तो घराबाहेर जायचे टाळाच. अगदी जायची गरज असलीच तर पूर्ण काळजी घेऊन बाहेर पडा. मास्क पूर्ण तोंड आणि नाक झाकू शकेल असेच वापरा. आपल्याला गुदमरल्या सारखे होते पण थोडे सोसले तर मनाची मानसिकता बदलते. ते एडजस्ट करून घेते स्वतःला.

मित्रांनो, यावर्षी चिंता या गोष्टींची आहे कि कोरोना आता लहान मुलं आणि तरुणांना ही ग्रासत आहे. ही भावी पिढी आहे. त्यांना अशा परिस्थितीतून जाणे आपल्याला परवडण्यासारखे मुळीच नाही.

मित्रांनो, घरात रहा, स्वस्थ रहा, मस्त रहा.

( 02921845 )

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आनंद देणाऱ्या व्यक्ती पेक्षा हक्काने त्रास देणाऱ्या माणसाच्या आठवणी जास्त आल्हाददायक असतात.

👍👍शुभ प्रभात👍👍

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.ownpoems.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

गुगल लेंस…

मी संगणकावर १९८४ मधे ही काम केले होते. तेव्हा मी खाजगी कंपनीत कामाला होतो. कंपनी ने प्रशिक्षण देण्यासाठी खास व्यवस्था केली होती. म्हणून मी स्वतःला भाग्यवंत मानत होतो. पण मला सरकारी नोकरी हवी होती.

सरकारी नोकरी १९८५ मधे मिळाल्यावर १९९१-९२ मधे पुन्हा संगणक हाताळायला मिळाला. तेव्हा सर्च इंजिन होते का? काही आठवत नाही. मुळात तेव्हा विंडो बेस्ड ऑपरेटिंग सिस्टीम नव्हती. आक्टोबर १९९८ मधे मी जापानला गेलो होतो. एक महिना राहिलो तेथे. दररोज रात्री तेथे संगणक चालवायचो. अर्थात स्वखर्चाने. भारतातील बातम्या वाचायचो. मुंबईतील मिडडे, टाईम्स हे पेपर वाचत होतो.

हे सर्व सर्च इंजिन वरून शोधता येते.

पण आठवत नाही तेव्हा कोणते सर्च इंजिन होते. मला वाटते याहू असावे. (हो याहूच होते. लिहिता लिहिता सर्च केले तर कळले याहू १९९४ ची कंपनी आहे.)

नंतर आले ते गुगल.

सुमारे २२ वर्षांपूर्वी सेप्टेंबर १९९८ मध्ये अमेरिकेत स्थापित झालेली गुगल ही कंपनी. माझ्या माहिती प्रमाणे मुळ काम “गुगल सर्च इंजिन”.

असो. पण आज गुगल खूप मोठी झाली आहे. माझ्या माहिती प्रमाणे तेव्हा फक्त सर्च इंजिन पुरवणारी कंपनी विविध प्रकारचे प्रोडक्ट पुरवित आहे. जसे गुगल मैप, गुगल ट्रांसलेटर, इ.

त्यातील एक छान से प्रोडक्ट नुकतेच हाती आले आहे. नाव आहे “गुगल लेंस”.

आपल्या पैकी कदाचित काही मंडळींना याबद्दल माहिती असेल ही. किंबहुना काही तर वापर ही करित असावे. तरीही मला जे समजले ते मी थोडक्यात येथे सादर करित आहे.

प्ले स्टोर वरून गुगल लेंस चे एप (app) डाऊनलोड करून घ्यायचे. बस्स.

आपल्या मोबाईल मधील लेंस एपवर क्लिक करावे. कैमेरा उघडतो. खाली विविध ऑप्शन्स दिसतात. Translate, text, search, homework, shopping, places आणि dining.

आपल्याला मासिकातील जाहिरातीतील एखादी वस्तू आवडली असेल. तिच्यावर केमेरा घेऊन जा. नंतर तुम्हाला शॉपिंग वर जावे लागेल. आता एप स्वतः काम करेल. फोटोतील वस्तू बघून संबंधित सर्व लिंक उघडतील. ही वस्तू कोठे मिळेल हे तो लगेच सांगेल. अर्थात संबंधित लिंक जसे अमेझॉन, इ. उघडतील.

समजा समोर एखादे झाड आहे. त्याचा किंवा पानाचा फोटो काढायचा. फोटो काढला कि ती एप स्वतः सर्चिंग सुरू करते. क्षणार्धात तुम्हाला त्या फोटोतील माहितीशी तत्सम सर्व माहिती गुगल उपलब्ध करून देते.

तुम्ही कोणाच्या घरी गेला. त्यांच्या कडील एखादी वस्तू आवडली. लगेच फोटो काढा. लेंसवर सर्च करा.

इतकेच काय विविध भाषेतील शब्दाचा फोटो काढा. लगेच ट्रांसलेट करून मिळते. अहो समोरची भाषा कोणती आहे हे ही तो ओळखतो आणि इंग्रजी मधे भाषांतर करून समोर ठेवतो. याचा फायदा असा होऊ शकतो कि आपल्याला हे पुस्तक कोणत्या भाषेत आहे हे माहिती नसेल तरीही हरकत नाही. गुगल लेंस स्वतः ती भाषा ओळखते आणि तुम्हाला भाषांतर करून देते.

पूर्वी ऑनलाइन भाषांतर इतके चांगले होत नसे. आता मात्र खूप छान होते.

अस्तित्वात असलेल्या कोणत्याही वस्तू चा फोटो काढून त्याची माहिती इंटरनेट वर शोधता येते.

एक गंमत आहे. जे त्याला समजले नाही तेथे ‘समथिंग वेंट राँग’ असा संदेश देऊन ते मोकळे होते. अजिबात अंगाला लावून घेत नाही. असा भास होतो कि ते आपल्याला म्हणत आहे “तुझं तू बघ बाबा. मला हे समजत नाही.’😊😊

असो, पण ही एप खूप छान आहे. मला तरी आवडली. एकदा नक्की वापरून बघा. नाही आवडले तर ‘मेरी मर्जी’ म्हणत सोडून द्या. ☺️😊☺️😊☺️😊

(02621842)
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

शुभ सकाळ👍👍

आयुष्य खूप सुंदर आहे. त्याला आणखी सुंदर बनवा. आनंदाने जगा.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.koshtirn.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

ऋणानुबंध….

असे आपण नेहमी ऐकत असतो कि नवरा बायको ची जोडी वरूनच तयार करून तो म्हणजे देव पाठवतो. अर्थात असे ही म्हणता येईल कि पूर्व जन्माचे ऋणानुबंध असल्याशिवाय ते दोघे एकत्र येत नाहीत. अर्थात हे माणण्यावर आहे. जेव्हा नवरा बायको यांचे खूप चांगले संबंध असतात तेव्हाच असे म्हटले जाते. जर संबंध खराब असले तर दोष संबंध जोडणाराला किंवा आईवडिलांना दोष दिला जातो.

असेही म्हणतात कि ऋणानुबंध असल्याशिवाय दोन माणसे कधीच एकत्र येत नाही. मग ते कोणीही असो. मित्र असोत, नातेवाईक असोत, शाळेतील मित्रमैत्रिणी असोत किंवा कार्यालयातील सहकारी असोत, किंवा इतर अनेक जण असोत जे आपल्या संपर्कात येत असतात.

सोशल मीडिया आल्यापासून असे असंख्य लोकं आहेत ज्यांना कधीच पाहिले किंवा भेटले नाही. जगातील कानाकोपऱ्यात राहणारे काहीही संबंध नसतांना संपर्कात येत असतात.

अर्थात चांगले संबंध. हे त्या व्यक्ति विशेष वर अवलंबून असते.

याशिवाय ही काही असतात ज्यांच्याशी ऋणानुबंध असतात. ते असतात प्राणी, पक्षी, झाडेझुडपे, इ. एकदा का त्यांचेशी संबंध जुडला कि तो आयुष्यभर राहतो.

असाच एक प्राणी आमच्या घरी पंधरा दिवस राहून गेला. एक मांजरीचे पिल्लू. नाव होते टिटू. मुलीची खूप दिवसांपासून इच्छा होती. ती पूर्ण झाली. ज्यांच्या कडून ती आली होती ते सदग्रुहस्थ खरोखर प्राणीमित्र. त्यांची दिनचर्या डॉग फिडिंग ने सुरू होते.

खरे म्हणजे तिला कायम सांभाळण्यासाठी आणले होते. पण बायकोचे आजारपण आणि आता माझे आजारपण याशिवाय वाढते वय अर्थात म्हातारपण यामुळे पंधरा दिवसांत लक्षात आले कि आपले घर या सतकर्मासाठी योग्य नाही.

त्यांना विनंती केली. आणि मुली ने नेटवर कोणाला किटन पाहिजे का अशी विचारणा केली. काही लोकांनी प्रतिसाद दिला. त्यातील एका व्यक्ती शी मी बोललो. ते लगेच तयार झाले. मग ज्यांचेकडून आमच्या कडे आली होती, त्यांना सांगितले ते ही त्यांचेशी बोलले. शेवटी रविवारी आम्ही तिला त्यांचेकडे सोडून आलो. ते हि लगेच तिला पुढील घरी घेऊन गेले.

तेव्हा ते सदग्रुहस्थ म्हणाले ती भाग्यवान आहे. तिला चांगले घर मिळाले आणि आता ही चांगले च घर मिळत आहे.

या टिटू मुळे माझ्या शब्दकोशात नवीन शब्दांची भर पडली. मांजरीच्या पिल्लाला किटन म्हणतात हे मी प्रथमच ऐकले.

तीला घरात शी व सु करण्यासाठी केट लिटर लागते. ते आम्ही अमेझॉन वरून मागविले. हेही नवीन होते.

मांजर हा प्राणी एक कोपरा निवडला कि त्याच कोपऱ्यात शी व सु करते. घरभर घाण करत नाही. हा अत्यंत स्वच्छ राहणारा प्राणी आहे. तसेच शिस्त प्रिय ही आहे.

आमच्या कडील किटन खूप हुशार होती. तिला सर्व कळायचे. दिवसभर मांडीवर बसायला आवडायचे. बसू दिले नाही तर नाराजी दर्शविण्यासाठी कोपऱ्यात गुपचूप बसून राहायची.

तिला सोबत खेळायला खूप आवडायचे. लपाछपी व बॉल खेळणे हा तिचा आवडता खेळ.

वरील व्हिडीओ बघा. किती मस्ती करत असेल ती हे यावरून लक्षात येईल.

तीची खूप आठवण येते. आज आम्ही घरात सर्व शांत आहोत. केवळ तिच्या मुळेच.

एक मात्र चांगले व समाधानी वाटले कि ती एका चांगल्या घरात गेली आहे. तिला तेथे खूप प्रेम मिळेल.

(01521831)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

🌹🌹❣️शुभ प्रभात ❣️🌹🌹
आपल्या आयुष्यातील चांगल्या माणसांचं महत्त्व आणि स्थान, हृदयातील ठोक्यांसारखं असतं. जे कधीही दिसत नाहीत; पण त्यांची स्पंदनं, त्यांचं अस्तित्व, आपणास सदैव जाणवतं.

☘️शुभ सकाळ☘️

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.koshtirn.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

विजयादशमी..2020

सस्नेह नमस्कार,

🌹🌹 सुप्रभात🌹🌹
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
आज विजयादशमी.

आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेऊन आली अश्विनातली विजयादशमी, दसऱ्याच्या आज शुभ दिनी, सुख-समृद्धी नांदो आपल्या जीवनी..!! 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आपणांस व आपल्या सर्व कुटुंबीयांस, आप्तेष्टांस, इतर सर्व परिवारांस विजया दशमीच्या मनपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा..!!🌳🍀☘️🌿🍃🌳
💐💐💐💐🌺🌺🌺🌺🌺🌷🌷🌷🌷
श्री परमेश्वर आपणा सर्वांना सुख, समृद्धी, भरभराटी, समाधान, ऎश्वर्य, शांती, नवचैतन्य, दिर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य प्रदान करो. 🙏🙏🙏🙏🙏🙏
आपल्या सर्वांच्या मनातील सर्व मनोकामना, स्वप्ने व आशा आकांक्षा पूर्ण होवोत हिच श्री परमेश्वर चरणी प्रार्थना. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

(13820806)

http://www.manachyakavita.wordpress.com

🌲🌹🌺🌷🥀🌼🌻🍀🌸💐🎄🙏🌼🌻🍀🌼🌻🍀🌼🌻🍀

नाती माणसांची…..

जन्मल्यापासून शेवटापर्यंत मनुष्य अनेक नातेवाईक, मित्रमंडळी यांचेशी संबंध जोडत जातो. आई वडील भाऊ बहिण ही नैसर्गिक नाती असतात. जन्म झाला कि आपसूकच ही नाती ही जन्माला येत असतात. जसजसे आपण मोठे होत जातो, नवनवीन माणसे भेटत जातात आणि मग गोतावळा वाढत जातो. मित्र मंडळी जमा होत जातात. हजारो लोकाशी आयुष्यात संबंध येत असतो. त्यातील काहीच लोकं आयुष्यभर लक्षात व संपर्कात राहतात.

सेवानिवृत्त झाले कि आयुष्यात निवांतपणा येतो. तेव्हा आयुष्याची एखाद्या चलचित्रासारखी उजळणी सुरू होते. मग अगदी बालपणापासून चे मित्र मंडळी आठवायला होतात. तेव्हा आपली खरी परीक्षा असते. जर पहिली दुसरीत आपल्या सोबत कोणकोण शिकत होते? हे आठवले तर आपली स्मरणशक्ती शाबूत आहे असे समजायचे😊😊.

पण ही नाती जपणे ज्याला शक्य झाले तोच खरे जीवन जगला असे समजायचे. वेगवेगळ्या प्रकारची माणसे आयुष्यात येत असतात. आवडी नावडीची असतात. हसणारी रडणारी ही असतात. सर्व प्रकारच्या माणसांशी जुळवून घेऊन आयुष्य जगणे प्रत्येकाला जमतेच असे नाही. जमले तर ठिक नाही जमले तरी ठिक.😊☺️😊☺️

याबद्दल एक छान संदेश वाचण्यात आला. म्हणून हे सूचले. संदेश खाली दिला आहे.

🙏🌺 “शुभ सकाळ”🌺🙏

“माणसे येती माणसे जाती…”
“टिकवून ठेवावी ती फक्त नाती..”
“कुणी हसवती कुणी रडवती..”
“तरी हक्काने मित्र म्हणवती…”
“प्रेम घ्यावे प्रेम द्यावे…”
“सगळ्यांनाच आपलेसे करावे…”
“लागले कधी जरी भांडावे…”
“तरी विषय प्रेमाने मांडावे…

“एकदाच जीवन हे मिळते…”
“हवे तितके मन जोडावे…”
“कधी हसावे कधी रूसावे…”
“रंग हे ही चाखून पहावे…”
“हीच तर मजा खरी नात्यांची..” “म्हणूनच नात्यांमध्ये.,”
हृदय मात्र सदा शुद्ध ठेवावे….

🌺🐬सप्रभात🐬🌺🐬

(13 120799)

🐬🌺🐬🌺🐬🌺🐬🌺🐬🌺🐬🌺🐬🌺🐬🌺🐬

नाती फुलांसारखी नाजूक असतात. त्यांना जपावे लागते.

☺️☺️हसरी सकाळ😊☺️

🌺🐬🌺🐬🌺🐬🌺🐬🌺🐬🌺🐬🌺🐬🌺🐬🌺

http://www.manacheslok.blogspot.com

🐬🌺🐬🌺🐬🌺🐬🌺🐬🌺🐬🐬🌺🐬🌺🐬🌺🐬🌺🐬🌺🐬🌺

संदेशवहन….

संदेश एकापासून दुसऱ्या कडे पाठविताना नेहमी फरक हा होतोच. म्हणजे संदेशवहनाचे कार्य हे क्लिष्ट कार्य आहे हे आपण जाणतोच. म्हणून ध चा मा करु नको रे बाबा. निरोप व्यवस्थित दे. असे वारंवार बजावून सांगितले जाते. तरीही बदल किंचित का असेना होतोच. का होतो असा बदल यामागे अनेक कारणं आहेत.

जसे

१) संदेश ऐकणारा लक्षपूर्वक संदेश ऐकत नसल्याने चुकीचे शब्द ऐकून तेच शब्द लक्षात ठेवतो.

२) संदेश ऐकणारा लक्षपूर्वक संदेश ऐकतो पण इतर गोष्टी मनात असल्याने चुकीचे ऐकून तेच शब्द लक्षात ठेवतो.

३) संदेश मोठा असेल तर लक्षात राहात नाही.

इतर ही अनेक कारणे असू शकतात.

तसेच संदेश घेऊन जाणाऱ्या च्या चेहऱ्यावरील भाव , संदेश सांगताना चेहऱ्यावर उमटणारे हावभाव या गोष्टींचा प्रभाव निश्चितच त्या संदेशावर पडत असतो.

या बाबतीत कोणीतरी एक प्रयोग केल्याचा व्हिडीओ व्हाट्सएपवर वायरल झाला होता. तो व्हि मी येथे शेअर करत आहे. आपण प्रत्यक्षच बघा कसा ध चा मा होतो ते.

१५ ते २० लोकांना ओळीत उभे केले होते. सर्वांची तोंडं एकाच बाजूला होती. प्रमुखाने शेवटच्या माणसाला कानात एक संदेश सांगितला. तो संदेश त्याने त्याच्या पुढच्याला कानात सांगायचा. त्यासाठी समोरच्याने मागे वळून मागच्याचे ऐकायचे. अगदी पहिल्या माणसाने त्याला सांगितलेला संदेश दुसऱ्या माणसाला निट सांगितला नाही. त्यात थोडा फरक होता. पुढच्या ने आणखी बदल करून त्याच्या पुढच्याला सांगितला. असे प्रत्येक मनुष्य संदेशात बदल करत गेल्याचे लक्षात आले व संदेशाचा मुळ अर्थ अक्षरशः चार पांच माणसांमधेच बदलून गेला. अहो फोनवर आपण बोलतो तो संदेश ही जसा चा तसा सांगता येत नाही. ऐकण्यात व नंतर तोंडाने पुढच्याला सांगण्यात थोडाफार बदल होतोच. हाच बदल अर्थच बदलत जातो. आणि ध चा मा होतो.

म्हणून लेखी संदेशाला खूप महत्त्व आहे.

असो.

(12920797)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

वेळेसोबत चालने आवश्यक असतेच असे नाही. पण सत्यासोबत चालल्यावर वेळ एक दिवस स्वतः आपल्यासोबत चालायला लागते.

💐💐शुभ प्रभात💐💐

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.Manachyakavita.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

बालपण….

“ह्या जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे पण ती तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबुन आहे.

जशी सकाळची शाळा भरतांना घंटेचा आवाज कर्कश वाटतो पण त्याच घंटेचा आवाज शाळा सुटतांना कानाला मंजुळ वाटतो.

💐शुभ सकाळ💐

सकाळी सकाळी व्हाट्सएप उघडले आणि वरील संदेश वाचला. मन बालपणीच्या सुंदर लालायित करणार् या आठवणीत रमले. खूप लहान असताना शाळेची घंटा टनटनटन… वाजायची तेव्हा बालमन त्या आवाजाकडे आकर्षित व्हायचे. मुलांना पांढरे शर्ट आणि खाकी चड्डी हो चड्डीच आता हा शब्द गावंढळ आणि वल्गर वाटतो. कोणीच वापरत नाही. पँट हाच शब्द सर्व वापरतात. हायफाय वाटतो तो. आता कसं हायफाय राहायची सवय झाली आहे सर्वांना. असो, शाळेत जात नव्हतो तोपर्यंत त्या घंटेचा तो आवाज कानाला सुमधुर आणि आकर्षक वाटायचा.

खेडेगावात लवकर शाळेत घातले जात नसायचे. जन्म कधी झाला याची नोंद ठेवली जात नसायची. खूप वर्षे झाली कि मुल शाळेत जायचा आग्रह करायचे. किंवा गुरुजी घरोघरी फिरून शाळेत नाव घालण्यासाठी आग्रह करायचे. पूर्वी प्रत्येकात आपूलकी असायची. गुरुजी म्हणजे गावातील उच्चभ्रू व उच्च शिक्षित मानले जात असत. त्याकाळी माझ्या माहिती प्रमाणे सातवी झाल्यावर प्राथमिक शिक्षक म्हणून नौकरी लागत असे.

असो, पण आईने व मी आग्रह धरला म्हणून शाळेकडची वाट आम्हाला दाखवली गेली. वडील बहुतेक खर्च वाढेल म्हणून टाळाटाळ करत असावे. तेव्हा ना नौकरी ना धंदा. दोन वेळ जेवायचे वांधे असायचे राव. घरोघरी हीच परिस्थिती.

मला वाटते मी आठ वर्षांचा असेल तेव्हा शाळेत नाव घातले गेले. कारण जेव्हा समजायला लागले सातवी आठवीत गेल्यावर तेव्हा आपण इतरांपेक्षा मोठे दिसतो हे कळायला लागले. पण काय करणार.

दुसरी पर्यंत खेड्यात होतो. पण कामाच्या शोधात मोठे बंधू इतरत्र गेल्याने आमचेही स्थलांतर झाले. ते शहरवजा गाव होते. बहुतेक मडळी सुशिक्षित होती. हे गाव म्हणजे शहर किंवा दोघी ही म्हणजे मध्यप्रदेशातील नेपानगर. पेपरमील असलेले. आणि त्यामुळेच नेपानगर असे नाव ठेवलेले.
असो. पण वरील संदेशात लिहिल्याप्रमाणे सकाळची शाळा भरतांनाचा घंटा कर्कश कधी वाटला. उलटपक्षी रोज शाळा भरायची वाटच पाहायला आवडायचे. शाळेत जायचा कधी कंटाळा आला नाही. किंवा आई पोट दुखते अशी नाटकं ही केल्याचे आठवत नाही. शाळेत जात नाही म्हणून कधी मार ही खाल्ला नाही. त्याचे कारण कदाचित मला मिळत गेलेले शिक्षक ही असावे. पहिली दुसरी गावात होतो. तेव्हा एक मैडम शिकवायच्या. खूप छान शिकवत असत. नाव आठवत नाही. हेडमास्तर मला वाटते फावडे सर होते. तिसरी पासून नेपानगर ची मराठी प्राथमिक शाळा होती. तिसरी, चौथी आणि पाचवी. एकच सर होते. महाजन सर. पायजमा कुर्ता आणि डोक्यावर टोपी घालत. खूप प्रेमाने आणि सुंदर शिकवत असत. पुढे मात्र हिंदी त शिक्षण झाले. तेथे सहावी ते अकरावी. सर्व शिक्षक छान शिकवायचे. जीव लावून शिकवणार. शिक्षणात आनंद यायचा. सहावीत मला वाटते गुहा सर वर्गशिक्षक होते. सातवीत दुबे सर. आठवीत कोणते सर होते आठवत नाही. नववीपासून कला, वाणिज्य किंवा विज्ञान यापैकी एक मार्ग निवडायचा. तेव्हा मला विज्ञान शाखेत जायला सांगितले होते सरांनी. पण मी परिस्थिती नुरुप वाणिज्य शाखेत जाणे पसंत केले आणि न सांगता जाऊन बसलो दळवी सरांच्या वर्गात. दोन तीन दिवस हौस भागवून घेतली. कारण मला बोलावणे आले आणि विज्ञान शाखेत जाऊन बसावे लागले. गणिताचे कुल्हाडा सर, जोशी सर; भौतिकशास्त्र शर्मा सर,रसायन चे परांजपे सर, जीवशास्त्र श्रीवास्तव सर हिंदी चे शुक्ला सर, इंग्रजी चे मिश्रा सर. पण बहुतेक वेळा प्राचार्य श्री पाठक सरच शिकवायचे. अगदी जीव ओतून शिकवायचे सर्व सर. त्यांच्या आशिर्वादाने, चांगल्या शिकवणूकीने आज आहोत. त्यांचे उपकार कधीच विसरू शकत नाही.

आनंद या गोष्टीचा आहे कि यापैकी बहुतेक सर सोशल मिडिया वर आपल्या संपर्कात आहेत. आज ही त्यांचे आशिर्वाद दररोज मिळत आहेत. ते असेच सदैव मिळत राहोत हिच ईश्वराच्या चरणी अपेक्षा.

(12820796)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आयुष्याने शिकवलेलं एक वाक्य…
“जिंकलो तर आवरायचं आणि हरलो तर सावरायचं…”
🌼🌹 शुभ सकाळ🌹🌼

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.ownpoems.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

एकटेपण

मित्रांनो, वर्तमानपत्रात नुकतीच एक आगळी वेगळी बातमी वाचण्यात आली. एका मुलीने आपल्या ५० वर्षीय विधवा आईचे लग्न लावून दिले. बातमी खरंच आगळीवेगळी वाटली. म्हणून मी लक्षपूर्वक व पूर्ण बातमी वाचली. तर मुलीचे वडील १०-१२ वर्षापूर्वी वारले होते. मुलीचे लग्न झाल्यावर आई घरी एकटीच राहत होती. आणि एकटेपणा माणसाला जगू देत नाही. तीहि स्त्री असेल तर एकटे राहणे अवघड असते. म्हणून त्या मुलीने आपल्या माउलीचे लग्न लावून द्यायचे ठरविले असावे. विशेष म्हणजे जावयाने सुद्धा यात सहभाग घेतला. हि घटना म्हणजे समाजात नवीन प्रथा किंवा पायंडा सुरु होत आहे असेच म्हणावे लागेल.

पण यानिमित्त नेहमीप्रमाणे माझ्या मनात बरेच प्रश्न घर करून गेले. गेले म्हणजे निघून गेले असे नव्हे. ते प्रश्न मनात येऊन पक्के घर करून राहू लागले. गमतीचा भाग वेगळा ठेऊन मूळ विषयावर परत येऊ.

त्यातील एक प्रश्न माझ्या मनात आला तो असा कि हि परिस्थिती का उदभवली. ५० वय असून एक जावई असताना लग्न करणे का आवश्यक वाटले. अर्थात त्या माउलीला नव्हे. भारतीय स्त्री या वयात लग्न करायचा विचार सुद्धा मनात आणत नाही. तर मुलगी आणि जावयाने त्या माऊलीचा एकटेपणा, सुरक्षितता या सर्वांचा विचार नक्कीच केला असणार. पूर्वीच्या काळी सुद्धा महिला कमी वयात विधवा होत असत. तेव्हा त्या माहेरी जाऊन राहत असत. मुलीचा पुनर्विवाह अजूनही समाजात तितकासा रुजलेला नाही. हा स्त्रीवर एका प्रकारे अन्यायच आहे. तेव्हा मामाच्या मुलीसोबत आत्याचा मुलगा मोठा होत असल्याने कदाचीत म्हणूनच मामाच्या मुलीशी लग्न करण्याची प्रथा जडली असावी. असो. तर त्या काळी एकेक घरात ४ ते ८ मूल मुली असत. मोठे कुटुंब असे. त्यामुळे ती विधवा माउली भावाकडे किंवा वडिलांकडे राहत असे. मुलांनाहि काही वाटत नसे. आता काळ बदललेला आहे.

एका कुटुंबात मुलगा असो व मुलगी एकच अपत्य असते. त्याचेच हे परिणाम आहेत. एकच मुलगी किंवा मुलगा असतो. मुलगी असेल तर सासरी जाते. मुलगा बहुतेक नौकरीसाठी विदेशात किंवा बाहेरगावी गेलेला असतो. किंवा सुनेला सासू आवडत नाही. अशी एक न अनेक कारणे असतात. ज्यामुळे सासूला एकटे राहावे लागते. अहो अशी अशी कुटुंब पाहायला मिळतात कि ८० वर्षाची आई वेगळी एकटी राहते व मुलगा थोड्याच अंतरावर आपल्या कुटुंबासोबत राहतो. त्या म्हातारी सोबत एक बाई असते सांभाळ करणारी. बारा तास ती सोबत राहते. रात्रीची वेगळी बाई येते सोबत म्हणून. पण त्या म्हातारीला नातवंडांचे सुद्धा सुख भोगता येत नाही. एक म्हातारी बिचारी दिवसभर एक बाई असते तिच्या सोबत. आणि रात्री. झोपेची गोळी घेऊन झोपायचे. अरे काय हे जीवन? देवा कोठे आहेस रे तू ? याचे मूळ कारण मला वाटते एक एक अपत्य असावं.

या एका अपत्यामुळे त्या अपत्याला ही तो एकटेपणा सलतो. हेवेदावे करता येत नाहीत. जीवनात जोपर्यंत प्लस मायनस म्हणजे सुख दुःख, चांगला वाईट हे सोबत अनुभवत नाही तोपर्यंत जीवनाचा आनंद उपभोगता येत नाही. फक्त सुख असेल तर त्याचे महत्त्व काय? दुःखाशिवाय त्याचे मुल्य शून्य. म्हणजे तुलना केली तरच सरसता लक्षात येते. म्हणून घरात एकटे मुल असेल तर तो कोणाशी भांडेल? बर वडील ही एकटे असल्याने काका किंवा आत्या असे कोणी नसते. म्हणजे त्यांच्या मुलात कधीतरी मिसळता येते. पण तसे ही नाही. तेव्हा पर्याय उरतो फक्त मित्रांचा. मित्र हे असतातच. पण शेवटी नातलग हे नातलगच. याने झाले काय कि काका- काकू, मामा- मामी, आत्या, चुलत भाऊ -बहिण, अशी नातीच राहिली नाहीत.

भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसी? हे समोर जास्त पांढरे शर्ट असेल तर कळते. असा एकटेपणा माणसाला नंतर हिस्टेरिक करून टाकतो. चिडचिडेपणा वाढतो.

याचे रुपांतर मग कुटुंब विस्कटून टाकण्यात होते.

देव जाणे पुढे काय मांडून ठेवले आहे. १०० वर्षाने समाज कसा असेल ह्याची कल्पना केलेलीच बरी.

(12320791)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

😊फुल कितीही सुंदर असू द्या
कौतुक त्याच्या सुगंधाचे होते.

माणूस कितीही मोठा झाला तरी
कौतुक त्याच्या गुणाचे, विश्वासाचे होते.

चांगल्या हृदयाने खुप नाती बनतात. आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात.💐🙏😊

🌹शुभ सकाळ 🌹

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.koshtiravindra.blogspot.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐