देव आणि भक्त


तो रोज रोज देवाची पूजा करून देवाला प्रसन्न करायचा प्रयत्न करीत होता. अर्ध आयुष्य संपल पण काही केल्या देव प्रसन्न झाला नाही. आणि त्याची परिस्थिती काही सुधारली नाही.

एके दिवशी तो देवाच्या देवळात गेला आणि रागे रागे त्याला म्हणाला देवा मी आयुष्य भर तुझी पूजा अर्चा केली पण काय उपयोग झाला. मी आज पासून तुझी पूजा करणार नाही. इतकेच काय दर्शन सुध्दा घेणार नाही.

असे म्हणून तो रागाने देवळातून बाहेर पडला. तितक्यात देव ओरडून म्हणाला. ‘अजी रुठ कर अब कहा जाईयेगा, जहा जाईयेगा हमे पाईयेगा. त्याला देवाच्या तोंडून ते शब्द ऐकल्यावर खरे वाटते. कारण देव सर्व ठिकाणी वास करतो हे त्याला माहीत होते.

पण त्याला देवाचा राग आलेला असतो म्हणून तो म्हणतो ‘आंसू भारी है ये जीवन की राहे, कोई उनसे (म्हणजे देवाला) कह दे हमे भूल जाये.’

10 thoughts on “देव आणि भक्त

    • धन्यवाद हेमंत! ऑफिस टूर वर कार ने प्रवास करीत असतांना बसून कंटाळा आला होता. जुनी गाणी ऐकत पहुडलो होतो. तेव्हा हि कल्पना सुचली.

      Like

यावर आपले मत नोंदवा