सान्निध्यात माझ्या


तुझ्याच सान्निध्यात
राहून मी
शिकलो
जगायला
जीवनाचे अनमोल क्षण.
तुझ्याच सहवासात
मी पाहिले
सुखाचे सु-मधुरपण.
तू मिळाली
अन्
मिळाले मला जीवन
दुखाचे वारे गेले
सुखाच्या लाटा
उसळल्या
तू
अशीच रहा
माझ्या सान्निध्यात
जीवनात
अंगणात माझ्या
अशीच
फूलवित रहा
पारिजात
जीवनात
माझ्या
तू अशीच रहा सान्निध्यात माझ्या


यावर आपले मत नोंदवा