माझे ते गाव


माझ्या गावा जवळून
वाहणाऱ्या त्या नदीच्या
पाण्याची खळखळ,
तटावरील झाडांच्या
पानांची सरसर,
शरीराला झोंबणारा
तो थंड गार वारा

किती छान वातावरण होते ते,
त्या माझ्या गावचे,
आज,
तो काळ बदललाय
नदीचे पाणी,
धरणाने अडवलेय
झाडांचा लोकांनी
फडशा पाडलाय
तो झोंबणारा वारा
आता नाहीसा झालाय
तेथील जनसंख्या वाढलीय
सगळीकडे घरेच घरे
त्या गावचे गावपण
हिरावून घेतलेय
जनसंख्या रुपी राक्षसाने
प्रदूषणाचा रावण
गावाला ग्रासू पाहतोय
आपल्या त्या गावात
जावेसेच वाटत नाही
आता मला

कारण ते गाव
आता गाव नाही
ते आता शहर झालेय


यावर आपले मत नोंदवा