कळस


( दिवाळीत श्रीयुत प्रमोद देव म्हणजे बाझाकारांचे देवकाका यांनी दीपज्योती हा अंक प्रकाशित केला होता. त्यात माझी एक हास्य कथा प्रकाशित झाली होती. ती मी येथे माझ्या ब्लॉग मित्रांसाठी प्रशिध्द करीत आहे.)

आज दिवाळी असल्याने सुनिधी स्वयंपाक घरात सकाळ पासूनच व्यस्त होती. त्यामुळे ती खूप थकली होती. काय करीत होती ह्याचा उलगडा सुमितला काही केल्या होत नव्हता. त्याला वाटले ती एव्हढा काय स्वयंपाक करीत आहे. ( स्वयंपाक घरात दुसर काय करणार त्याला असे वाटले). अचानक तिने तिचा अर्धांगिन(बायकोला अर्धांगिनी म्हणतात मग नवऱ्याला काय म्हणतात हे मला माहित नाही बर का! त्यावरून मी हा शब्द तयार केला आहे.) सुमितला ओरडून आवाज दिला, अरे सुमित, हे बघ मला जरा एका ताम्ब्यामध्ये पाणी आणून दे बर!

सुमित हॉल मध्ये टी.व्ही. वर बातम्या ऐकून ऐकून कंटाळा येऊन झोपी गेली होता.( माणसांना दुसर काय येत म्हणा.). त्याला तिचा आवाज काही ऐकू आला नाही. तिने काही क्षण त्याची वाट पाहिली. पण तो न आल्याने ती चिडली आणि दिवाणखान्यात येऊन त्याच्यावर खेकसली, अरे मी तुला एव्हढे ओरडून बोलावीत आहे. ऐकायला येत नाही का तुला.तो खडबडून जागा झाला. अग, काय झालं एव्हढे ओरडायला. तो थोडा नारामैनेच बोलला, कारण त्याने तिचा रागरंग ओळखला होता.

अरे, माझे हात बघ आणि मी पाणी घेऊ शकते का अशा हातांनी याचा जरा विचार कर.

काय झाले तुझ्या हातांना? भाजले गीजले नाही न! नाही तशी अपेक्षा ही करीत नाही. पण ते आपल सहज विचारलं. त्याने थोडी थट्टा करून तिचा मुद् बदलेल असा विचार करून म्हटले.

काय अपेक्षा काय आहे तुझी? माझा हात भाजावा असे वाटते काय तुला? ती रागेरागे म्हणाली.

अरे देवा मी मिस्कीलीने म्हणालो आणि हिला तर ते जास्त वाईट वाटलेलं दिसते आहे. आता काय करावे? हा प्रश्न त्याला पडला.

ती पुनः त्याला म्हणाली,अरे मी तुला पाणी भरून तांब्या मागते आहे तो मला किचन मध्ये आणून दे पटकन. ती परं ओरडून म्हणाली आणि तो ताडकन जागेवरून उतला. त्याला उठतांना बघून ती सुध्दा पाय आपटत किचन मध्ये गेली.

सुमितने किचन मध्ये जाऊन तांब्या शोधायचा प्रयत्न केला पण त्याला तांब्या कोठे ठेवला जातो हे काही ठाऊक नव्हते. तो अगदी हळू आवाजात म्हणाला नव्हे पुटपुटला, अग, आपण तांब्या कुठे ठेवतो?

तिने ते ऐकले आणि म्हणून म्हणते मी जरा बायकोच्या कामाला हातभार लावत चल.

हे काय मी हातभारच लावतो आहे न!

हा लावला. घरातल्या वस्तू कोठे ठेवतो ते विचारणारा माणूस घर कामात बायकोला हातभार लावत असेल हे शेंबड्या मुलाला तरी पटेल का? अरे बाळा जरा इकडे ये बर हे काका काय म्हणता आहे बघ! तिने किचन मधील खिडकीतून बाहेर डोकावून रस्त्यावरील लहान मुलाला हाक मारली. आणि सुमित धावतच तिच्या जवळ गेला आणि,अग असे काय करीत आहे. कशाला कोणाला बोलावून माझे धिंडवडे काढतेस. हा बघ मी तांब्या घेऊन आलो. तो आता आपली पंचाईत होणार असे वाटल्याने तिची विनवणी करू लागला.

ती म्हणाली, आता आला न लाईनवर. नवऱ्याला आपल्या मुठीत असे ठेवावे ह्याची शिकवणी घ्यायला सुरुवात करावी असे मला वाटते.

त्याने तिला हात जोडले आणि म्हणाला,अग बाई तुला कसली शिकवणी घ्यायची आहे ती घे पण मला आता येथून बाहेर जाऊ दे. कळस झाला आहे अगदी. तो वैतागून म्हणाला.

हो काय, कळस? आज दिवाळीचा सन आहे नाही तर मी कळस नक्कीच गाठला असता.

त्याने तिचे ते रौद्र रूप पाहून पुनः माघार घेतली आणि, अग, तुला नाही म्हनालो मी. मी तर स्वतःला कळस गाठला असे म्हणालो.

अजून काही नाही जरा ही दिवाळी सुरळीत पण पार पडू द्या मग दिवाळ काढून कळस गाठते कि नाही ते बघा.

आणि त्याचा उतरलेला चेहरा बघून ती हसायला लागली.अरे हे काय रे सुमित मी तुझी थट्टा केली. तू उगाच आपला घाबरून गेला. मी काहीही मागणार नाही रे तुला. चल आता दिवाळीची तयारी जवळ जवळ झालीच आहे, आता जा तू. आणि त्याने सुटकेचा स्वास घेतला.

यावर आपले मत नोंदवा