आज माझ्या कन्येची नेटची परीक्षा होती. पुण्यातील संगमवाडी येथील AISSM College of Engineering हे परीक्षेचे केंद्र होते. मी सोबत गेलो होतो. कॉलेज अतिशय सुंदर होते. केंटीन मध्ये चहा घेतला छान होता. अचानक पाऊस सुरु झाला. घरी येऊन परत जायला बसचा सोयीस्कर मार्ग नसल्याने तेथेच थांबायचे ठरवले. पाऊस बंद झाला व बाहेर पडलो. जवळ संगम घाट होता. ते पाहायला गेलो. त्या घाटाचे आणखी एक नावं होते”पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट”पुरातन वस्तू असल्याने
पाहायला गेलो. एक अतिशय पुरातन शंकराचे देऊळ दिसले.
येथे मुळा आणि मुठा ह्या दोन नद्यांचा संगम होत असल्याने यां स्थानाचे नाव संगमघाट असे पडले आहे. आणि हा परिसर संगमवाडी म्हणून ओळखला जातो.
हे स्थान पाहिल्यावर कंटाळा आला म्हणून चालतच बाल गंधर्व रंग मंदिर येथे गेलो. तेथे कला दालनात श्रीयुत मंगेश तेंडुलकरांचे व्यंग चित्र प्रदर्शन भरले असल्याचे समजले आणि मी लागलीच आत शिरलो. रु.१०/- तिकीट होते. काढले आणि आत शिरलो तर तेंडूलकर तेथेच दिसले. साक्षात त्यांना पाहिले आणि मी धन्य झालो.