काल संध्याकाळी अचानक आकाश ढगाळलं. एक महत्त्वाचे काम होते. सौ. व मी पटकन काम उरकून येऊ म्हणून बाहेर पडलो. अगदी जवळच जायचे होते. गेलो ही. दहा मिनिटे झाली असतील. जोरदार पाऊस सुरू झाला. रस्त्यात थांबलो. पावसाचा जोर जास्त होता. लागलीच रस्ता जलमय झाला. चालता ही येईना. अर्धा किमी वर घर पण रस्त्यावर पाणीच पाणी. बरेच रिक्षा गेले पण कोणी ही थांबायला तयार नाही. पावसाचा जोर काही कमी होत नव्हता. हिला त्रास होत असल्याने घरी जायची घाई होती. एक रिक्षावाला तयार झाला. रस्त्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी. रिक्षाला सुद्धा चालायला त्रास होत होता. कमी कालावधीत जास्त पाऊस पडला कि असेच होते. आपल्या गटारी पुरेशा क्षमतेच्या असतात. पण रस्त्यावर पाणी झिरपायला लावलेल्या जाळ्या प्लास्टिक कचरा किंवा कापडी कचरा अडकून पडल्याने पाणी जात नाही व रस्त्यावर साचते. किंवा कचरा अडकला नसला तरी इतका पाऊस असतो कि जाळीची क्षमता कमी पडते.
पण हल्ली पाऊस काही वेगळाच पडतो. असा पाऊस लहानपणी बघायला मिळायचा. परत ते पूर्वी चे दिवस येत आहेत का? तसे झाले तर हरकत नाही. पण जनसंख्या खूप वाढली आहे. शहर लोकांनी व घरांनी तुडुंब भरली आहेत. पाणी खूप लागत आहे. पण अति पावसाचा निचरा होऊ शकत नाही. त्या साठी एकच. लोकांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे. मी रस्त्यावर कचरा टाकणार नाही म्हणजे नाही अशी शपथ घेतली पाहिजे. तसेच प्लास्टिक न वापरण्याची सुद्धा शपथ घेतली पाहिजे.
(221019593)
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
“Plastic does not go away — it is a non-biodegradable material that can sit untouched in landfills if not exposed
to sunlight.” The Wisconsin Sea Grant collaborates with Chazen Art Museum to raise awareness of plastic pollution. … https://bieapfremp.org/
LikeLike