समजगैरसमज…..


एक अतिसंवेदनशील व काळाविपरित अशी पोस्ट व्हाट्सएपच्या माध्यमातून बर्याच वेळा वाचायला मिळाली. ती म्हणजे गुजरात मधे एका लहान भावाने मोठ्या भावाविरुध्द न्यायालयात एक आगळावेगळा खटला दाखल केला. मोठा भाऊ मला आईवडीलांचा सांभाळ करू देत नाही. त्यांना कायम तोच सांभाळतो. माझ्या वाट्याला आईवडीलांना येऊच देत नाही. म्हणून हा खटला दाखल केला होता. आहे कि नाही हा विशिष्ट खटला. या कलियुगात अशी आईवडीलांचा सांभाळ न करण्यासाठी नव्हे तर सांभाळ करण्यासाठी भांडणारी भावंडे या कलीयुगात आगळीवेगळीच आहेत नाही का!!

मा. न्यायाधीश महोदयांना सुद्धा धक्का बसला. शेवटी निकाल लहान भावाच्या बाजूने लागला.

पण यानिमित्ताने काही मुद्दे मनात डोकावून जातात. आईवडील यांचा म्हातारपणी सांभाळ करणे किंवा न करणे याला जवाबदार कोण असते? मुलगा, सून, आई, वडील कि आणखी कोणी.

परिस्थिती कशी असते ते पहाः-

१) आई वडीलांना मुलांमध्ये लुडबुड नको म्हणून वेगळे रहावयाचे असते. तेव्हा ते त्यांच्या स्वतः च्या घरात राहतात व मुलाला स्वतंत्र राहावयास सांगतात.

२) आईवडीलांना स्वतः एकांत किंवा स्वच्छंदी जीवन जगायची इच्छा असते. कोणाचा जांच नको कि भिती नको. पेंशन मिळते. स्वतः चे घर असते. मस्त खायच आणि मौज करायची.

३) काही वेळेला आईवडीलांना सांभाळण्यासाठी सूना तयार नसतात. त्यामुळे मुलांना नाईलाजाने त्यांना वृद्धाश्रमात ठेवणे भाग पडते.

४) काही वेळा मुलगा आईवडील यांचा सांभाळ करण्यासाठी तयार नसतो.

५) घर छोटे असते. मोठे घर घेण्याची ऐपत नसते. मग मुलगा वेगळं भाड्याचं घर घेतो. फक्त झोपण्यासाठी ते असतं. बाकी खाण-पिणं सोबतच असतं.

६) घर छोटे असते.म्हणून मुलगा पूर्णतः वेगळा संसार थाटतो.

७) घर मोठे असते , सर्व सोईस्कर असते पण सूनेला स्वतंत्र संसार हवा असतो.

असे बरेच फेक्टर लागू पडतात. यात नेमके कोणाला जवाबदार धरावे. प्रत्येक परिस्थितीत वेगवेगळी व्यक्ती जवाबदार असते. जवाबदार धरण्याचा प्रश्न ही कधी उदभवेल? जेव्हा आईवडील हतबल आहेत. काम करु शकत नाहीत. पैसे ही नाही. उपाशी रहावं लागतय. तरच जवाबदार कोण हा विचार येतो. नाही का मित्रांनो. आईवडील स्वेच्छेने एकटे रहाणे पसंत करत असतील तर मुलं जवाबदार कसे? मुलं स्वेच्छेने वेगळे रहायचे म्हणत असतील तर आईवडील जवाबदार कसे?

(5320720)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

वेळेसोबत चालणे आवश्यक असतेच असे नाही. पण सत्यासोबत चालल्यावर वेळ एक दिवस स्वतः आपल्यासोबत चालायला लागते.

💐💐शुभ प्रभात💐💐

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.ownpoems.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐